तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 31 October 2016

पुर्णेत देशाचे रक्षण करना-या जवानाच्या कुटूंबाचा सन्मान

दिनेश चौधरी

पुर्णा:-देशात सर्वञ दिपावली सन साजरा होत असतांना आपल्या कुटुंबाचा विचार न करता संपूर्ण देशवासीयच आपले कुटुंब आहे त्यांच्या संरक्षणाची जवाबदारी आपल्यावर आहे या भावनेने सिमा सुरक्षा दलात अहोराञ कर्तव्य बजावणा-या जवानांच्या प्रती आदर व्यक्त करुन दिपावली सनात ही आपल्या काळजाचा तुकडा आपल्या पासुन हजारो किलोमीटर दुर पाठवून शञूपासून देशाच्या सिमेचे संरक्षण करण्याचे देशभक्तीचे संस्कार आपल्या सुपुञाला देणाऱ्या शुरविर जवानाच्या जन्मदात्यांचा व परिवारातील अन्य सदस्यांचा सन्मान येथील मेडिकल असोशिएशन चे मा.अध्यक्ष तथा मा.उपनगराध्य प्रविण अग्रवाल व दिलीप पेडगावकर यांच्या तर्फे करण्यात आला या वेळी शहरातील सिमा सुरक्षा दलाचे जवान निखील शंकर डहाळे यांच्या माता सौ.शोभाताई वडिल शंकर डहाळे यांच्यासह कुटुंबातील सदस्यांचा  शाल-श्रीफळ व पुष्पहार मिठाई देऊन सत्कार करण्यात आला देशाच्या सिमेचे संरक्षण करणाऱ्या जवानाच्या कुटुंबाचा सत्कार करुन त्यांच्या प्रती आदर व्यक्त करणाऱ्या अग्रवाल व पेडगावकरांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद म्हणावे लागेल बिएसएफ जवान निखील डहाळे हे सद्या आसाम राज्यातील भारत-बांग्लादेश सिमेवर देशाच्या संरक्षणाची जवाबदारी पार पाडत आहेत

तेजन्यूज हेडलाईन्स,ताज्या बातम्या संक्षीप्त

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻
_____________________________________

⭐वर्धा जिल्ह्यातील टाकरखेड गावात डेंग्यूची साथ, दोन महिलांना डेंग्यूची लागण. त्यांच्यावर आर्वी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू, आरोग्य विभागाची टीम गावात दाखल, उपाययोजना सुरू.

⭐ नवी दिल्ली = नरेला औद्योगिक परिसरातील एका फॅक्टरीला आग लागली असून आग विझविण्यासाठी घटनास्थळी १८ अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

⭐ नवी दिल्ली = सरदार वल्लभभाई पटेल यांनी जे काही केलं ते राष्ट्रासाठी. मग ते काहीही असो भारतासाठी ते एकनिष्ठ होते - नरेंद्र मोदी


⭐ प.बंगालमधील पंजाबी पारा परिसरातील एका फर्निचरच्या कारखान्याला आग लागल्याचे वृत्त.

⭐अकोला = वाडेगाव येथे ट्रकने दिली दुचाकी स्वाराला धडक, 1 जण जागीच ठार.

⭐ सोलापूर = करमाळा- टेंभुर्णी रोडवर अपघात, दोन दुचाकींच्या धडकेत तिघांचा मृत्यू.

⭐गोंदिया = भंडारा- गोंदिया विधानपरिषद मतदारसंघातून प्रफुल्ल अग्रवाल हे कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार.


⭐ यवतमाळ = बैल आडवा आल्याने पोलिसांची जिप उलटली, पोलीस निरीक्षकांसह 2 पोलीस हवालदार जखमी.

⭐ नवी दिल्ली = पंतप्रधान नरेंद्र मोदींनी'रन फॉर युनिटी' ला हिरवा झेंडा दाखविला.

⭐जम्मू काश्मीर = पाकिस्तानने मेंढर सेक्टरमध्ये केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात एका महिलेचा मृत्यू.

⭐ सर्वांचं स्वप्न आहे की देश मजूबत, ताकदवान व्हावा. पण त्यासाठी देशात एकता असली पाहिजेही अट आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी.


⭐पत्रकार सुरक्षा कायदा होणारच - चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री


⭐कोल्हापुरात उद्या दुपारी ऊस दरप्रश्नी होणार सर्वपक्षीय बैठक - चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री

⭐ जम्मू काश्मीर = पाकिस्तान कडून राजौरी सेक्टरमध्ये शस्त्रंसधीचं उल्लंघन, एक जवान शहीद झाल्याची माहिती.

⭐जम्मू काश्मीर = पाकिस्तानने मेंढर येथे केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात दोन जवान जखमी, उधमपूरमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल.

⭐ कणकवली = कुडाळ मच्छी मार्केटमध्ये रिक्षेच्या धडकेत चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू, अंकुश हरमळकरच्या मृत्यू प्रकरणी रिक्षाचालक हरिश कुडाळकरला अटक, आज कोर्टात करणार हजर.

⭐चंद्रपूर = चिमूर तालुक्यातील पुयारदंड आश्रम शाळेजवळ मृतावस्थेत आढळला बिबट्या.

⭐नीती आयोगानुसार कृषी उत्पादनांच्या मार्केटींग आणि शेतकरी अनुकूल सुधारणांमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानावर असून, गुजरात, राजस्थान या राज्यांचा त्या खालोखाल क्रमांक लागतो.

⭐ भोपाळ दहशतवादी पलायन प्रकरण - मी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी बोललो आहे, राष्ट्रीय तपास यंत्रणेने याप्रकरणी तपास करावा, राजनाथ सिंग यांनी संमती दर्शवली आहे - शिवराजसिंग चौहान, मध्यप्रदेश मुख्यमंत्री.

⭐ पश्चिम बंगालमधील एगरा परिसरात रुग्णालयाच्या इमारतीला आग, बांधकाम चालू होतं, आग नियंत्रणात.


⭐सिमीचे दहशतवादी आणि मध्यप्रदेश पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीची चौकशी करण्याची काँग्रेसने मागणी केली आहे, सिमीचे आठही दहशतवादी या चकमकीत मारले गेले.

⭐ बांगलादेश = मंदिरांमध्ये तोडफोड केल्या विरोधात 200 अज्ञातां विरोधात गुन्हा दाखल.

⭐ डीआयपीपी आणि वर्ल्ड बँकेनुसार आंध्रप्रदेश आणि तेलंगण ही देशातील दोन राज्ये उद्योग-व्यवसाय सुरु करण्याची प्रक्रिया अधिक सोपी, सुटसुटीत ठेवण्यामध्ये आघाडीवर आहेत.

⭐ जम्मू आणि काश्मीर मधील राजौरी विभागात पाकिस्तान कडून पुन्हा गोळीबार. भारताकडूनही चोख प्रत्युत्तर.

⭐ बांगलादेश मध्ये हिंदूंची 15 मंदिरे आणि अनेक घरांची तोडफोड. - बांगलादेशी प्रसार माध्यमांचे वृत्त.

⭐ अकोला = केशव नगरमध्ये चोरट्यांनी फोडलीतीन घरे, लाखो रुपयांचा ऐवज केला लंपास, श्वानपथकासह पोलीस घटनास्थळी दाखल.

⭐न्यायाधीशांचे फोन टॅप होत आहेत. केजरीवाल यांचा सनसनाटी आरोप, मात्र रविशंकर प्रसाद यांनी आरोप फेटाळले.

⭐भारताच्या ए्नएसजी सदस्यत्वा बाबत भारत आणि चीनमध्ये सकारात्मक चर्चा.


⭐जम्मू आणि काश्मीर मधील शाळांना आगी लावण्याच्या घटना या विकृतपणाचे लक्षण, अन्यथा कुणी शाळांना आग लावण्याचा विचार का करेल. - व्यंकय्या नायडू.

मुली आणि महिलांच्या संरक्षणा साठी बांधील-रेणूका वागळे

राम सोनवने

सेलु :-शहरातील विद्यानगर परिसरातील ब-याच कालावधी पासुन बंद असलेली पोलिस चौकी क्या ठिकाणी कार्यन्वित करण्यात आली. 
  दि. 31 आँक्टोंबर रोजी दिवाळी पाडव्याचे औचित्य साधुन पोलिस ठाणे च्या वतिने  पोलिस चौकीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी रेणुका वागळे, पोलिस निरिक्षक जे. जे. राठोड यांची प्रमुख उपस्थिति होती. यावेळी बोलताना वागळे म्हणाल्या की पालकांनी अगोदर आपल्या मुलांवर संस्कार घडवावेत मुलगा मुलगी असा भेद न करता त्यांनी दोघांना ही समान मानावे तर मुलींनी न खचता येणा-या संकटाचा समना करावा. महिला, मुलीनी निर्भीडपणे वागावे न भिता न घाबरता त्यांनी वागण्याचा सल्ला यावेळी दिला. तर शहरातील सर्व गर्दीच्या ठिकाणी पोलिस यंत्रना राबवणारा असल्याचे ही यावेळी त्याम्हणाल्या जेणे करुन शहराता महिला, मुलींवर होणार्या अन्याय अत्याचारावर आळा घालता येइल. या पोलिस चौकीमुळे परिसरातील उद्यान तसेच मुलीची शाळा व महाविद्यालय ला फायदा होणार असुन ब-याच कालावधीपासुन या परिसरातील नागरीकांची मागणी होती की. या ठिकाणी पोलिस चौकी करण्यात यावेळी परिसरातील नागरीकाकडुन वेळोवेळी अंदोलने तसेच उपोषणे सुद्धा करण्यात आले होते.यावेळी सपोनि. अशोक जाधव सपोनि, अशोक नवले, माधव लोकुलवार, सुनिल जाधव सह,  विनोद बोराडे,श्रीनिवास उघडे, बालाजी वाघमारे, मुकुंद जाधव गणेश भिसे, विठ्ठल साबळे यांच्यासह परिसरातील नागरीकांची उपस्थिति होती. 
◼गर्दीच्या ठिकाणी तक्रारपेट्या 
मुलीना होत असलेल्या छेडछाडीचे प्रकार लक्षात घेता ज्या ठिकाणी महिलांची गर्दी असेल शाळा, महाविद्यालय, मंदीर या ठिकाणी पोलिस प्रशासनाच्या तक्रारपेट्या ठेवण्यात येणार असुव प्रत्येक आठ दिवसाला या तक्रार पेट्या उघडण्यात येणार आहेत. या तक्रारीवर निश्चितच कार्यवाही केली जाणार अासल्याचे यावेळी रेणुका वागळे यांनी स्पष्ट केले.

रायपूर येथे विजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू;महावितरण चा गलथान कारभार

राम सोनवने

सेलु: तालुक्यातील रायपुर येथे शेतातील तुटलेल्या विद्युत तारांमधुन विद्युत प्रवाह आल्याने एका बैलाचा मृत्यु तर एक बैल गंभिर जखमी झाल्याची घटना घडली. 
दि. 29 आँक्टोंबर रोजी घडलेल्या घटनेमध्ये रायपुर येथिल शेतकरी अशोक शंकरराव गाडेकर यांच्या गट क्र. 131मध्ये महावितरणचे विद्युत तार ब-याच कालावधी पासुन महावितरणच्या हलगर्जीपणामुळे तुटलेल्या अवस्थेत होते. सध्या शेतातील विद्युत पुरवठा सुरु करण्यात आला व या विद्युत तारांची दुरुस्ती महावितरणकडुन करण्यात आली नाही. या विद्युत तारामधुन विद्युत प्रवाह आला असल्याचे शेतकरी गाडेकर यांच्या लक्षात नसल्याने ते त्यांच्या शेतात सेयाबीन  पोते आणण्यासाठी गेले असताना या विद्युत तारांच्या संपर्कात बैलगाडीसह स्वत: गाडेकर हे आले व या विद्युत वाहीनीत विद्युत प्रवाह असल्याने त्यांच्या बैल गाडीला जुंपलेल्या बैलांना विजेचा धक्का लागल्याने त्यापैकी एका बैलाचा विजेच्या धक्याने जागीच मृत्यु झाला तर एक बैल गंभिर रित्या जखमी झाला आहे. प्रसांगवधाण राखुन शेतक-याने बाजुला उडी घेत आपले प्राण वाचवले परंतु आपल्या बैलांचे मात्र प्राण वाचवण्यात शेतकरी अपयशी झाले. अचानक घडलेल्या या प्रकरणामुळे शेतकरी यांच्यावर अस्मानी संकट आले आहे.

◼महावितरणकडुन अद्यापपर्यंत दुरुस्ती नाही. 
एवढेमोठे नुकसान शेतकरी यांचे झाले आहे परंतु अद्यापपर्यंत या शेतकरी यांच्या शेतातील तुटलेल्या तारांची दुरुस्ती महावितरणकडुन करण्यात आली नाही. महावितरणला नेमके काय साध्य करावयाचे आहे हेच कळायला तयार नाही. नेमकी दुरुस्ती का? करत नाही हे समजायला तयार नसल्याने या ठिकाणी अजुन किती आपघात महावितरणच्या निष्काळजी पणामुळे होतात का? काय हीच भिती परिसरातील शेतकरी यांना वाटत आहे. शेतकरी यांच्या या नुकसानीस नेमके जबाबदार कोणास धरावे. हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरणच्या निष्काळजी पणामुळे नाहक या गरीब शेतकरी यांना आर्थिक भुर्दंड बसला असल्याने या शेतक-यावर सध्या तरी अस्मानी संकट कोसळले आहे. तर महावितरणकडुन अद्यापपर्यंत तरी या विद्युत तांरांची दुरुस्ती करण्यात अाली नसल्याने शेतकरी यांच्या कडुव नाराजी व्यक्त करण्यात येत असुन महावितरणच्या कनिष्ठ अभियंता यांच्या शी संपर्क साधला असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नसल्याने या अभियंत्यास या घडलेल्या प्रकारचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.

सेलूच्या महिलांना पोलीसां कडून दिपावली भेट; विद्या नगरात पोलीस चौकी


प्रतिनिधि..
आज सोमवार ३१ ऑक्टोबर रोजी पोलिस चौकिचे उदघाटन होऊन,
यासाठी झालेल्या जनआंदोलनास अखेर यश प्राप्त झाले.नगर परिषद् च्या बेकायदेशीर विकलेल्या या जागेबद्दल सेलू मधे  मोठे जनांदोलन उभे राहिले होते.या जागेच्या ठराव पास करतना विरोधी गटांच्या विनोद बोराडे गटाने विरोध दर्शवला तरीही सत्तेतील गटाने हा ठराव परस्पर पास करुण अतिक्रमन केले.परंतु स्थानिक जनतेने आंदोलन ,उपोषन सतत करुण पाठ पुरावा करुण अखेरमहिला सुरक्षतेचा महत्वाचा प्रश्न निकाली निघुन अखेर पोलिस प्रशासनाने पोलिस चौकी ताब्यात घेऊन पोलिस उपअधीक्षक रेणुका वागूलें यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे पोलिस निरीक्षक जे.जे.राठोड. श्री अशोक जाधव ,
मनसे चे गणेश भिसे सोबत श्रीनिवास उघडे ,तसेच बोराडे गटाचे सर्व नगर सेवक तसेच बालासाहेब वाघमारे, सुदाम गुटाळ आणि सर्व व्यापारी विद्यानगर सेलू.व् पत्रकार उपस्थित होते..

मराठी माणसांनी ज्वारी सोडल्यानेच अनेक आजार बळावले-आयुर्वेदाचार्य वैद्य

प्रदिप कोकडवार

कल्याण:-चांगल्या तऱ्हेने जीवन जगण्यासाठी आणि दीर्घायुषी होण्यासाठी आपले अन्नही शास्त्रात सांगितले त्याप्रमाणे असले पाहीजे. मात्र आपण मराठी माणसांनी ज्वारी खाणे बंद केल्यानेच बहुतांश आजार बळावल्याचे स्पष्ट मत सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य खडीवाले यांनी व्यक्त केले. सुभेदार वाडा कट्टा आणि कल्याण रोटरी क्लबतर्फे कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात  ‘नियोजनबद्ध आहार उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली’ या विषयावर ते बोलत होते.
आपल्या दैनंदिन आहारात ज्वारीचे अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा आणि पाचक रस ज्वारीत ठासून भरलेला आहे. त्यामुळे दिवसाची सुरुवात ज्वारीच्या पदार्थाने करण्याबरोबरच जेवणातही आपण तिचा वापर केल्यास लठ्ठपणा,मधुमेह,ख हृदयरोग यासारख्या अनेक आजारांना आपण दूर ठेवू शकतो, असे खडीवाले यांनी सांगितले. तर हल्लीच्या काळात अपचनाची समस्या ही मोठ्या प्रमाणावर वाढली असून रोजच्या जेवणात पुदिना, आले आणि लसूण यांपासून बनविलेली चटणी खाल्ल्यास तुम्ही खाल्लेला दगडही (पचण्यास जड अन्न) पचवण्याची ताकद शरिरात तयार होते.

ज्याला 100 वर्षे जगायचे असल्यास लसूणासारखा छोटासा पदार्थ नाही. रोजच्या आहारात लसणाच्या किमान 3 ते 4 पाकळ्या खाल्ल्यास मधुमेह, हृदयरोग यांसारखे आजार जवळ फिरकतही नाहीत. आपल्या शारीरिक विकारांत वायूचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी जेवल्यानंतर किमान अर्धा तास चालल्यास डोक्यातील आणि पोटातील वायू बाहेर निघून चांगली झोप लागते.
तर आपल्याकडे उपवास करणाऱ्या व्यक्तींना शेंगदाणे, साबुदाणे, बटाटे हे परदेशातून आलेले पदार्थ चालतात. मात्र उपवासाला बटाट्याऐवजी शिंगाडे,रताळ्याचा वापर करणे केव्हाही शरीरासाठी चांगलेच ठरते. ज्यांचे पोट वाढलेले आहे, त्यांनी चणाडाळीऐवजी मुगाच्या डाळीचा अधिकाधिक वापर करावा. तसेच पश्चिमोतानासन आणि सिटअप्स (डोके आपल्या गुडघ्याला लावणे) केल्याने पोट कमी होते. पोट साफ नसल्याची तक्रार असणाऱ्यांनी दिवसातून किमान 20 ते 25 बिया असणाऱ्या काळ्या मनुका खाल्ल्यास पोट साफ होण्यास मदत होण्याबरोबरच चांगले रक्त, सर्दी, खोकला, पडसे, दमा यांना आळा बसतो, असे ते म्हणाले.
तसेच पालेभाज्या या जमिनीपासून कमी उंचीवर असल्याने इतर भाज्यांच्या तुलनेत त्याला माती लागण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्या खाण्यापूर्वी गरम पाण्यातून धुवून घेतल्यास त्याला लागलेले मातीचे कण निघून जाण्यास मदत होते.
तर मीठ खाल्ल्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण हे साखरेमूळे होणाऱ्या अजारांपेक्षा अधिक भयानक असल्याचे सांगत शक्यतो मिठाचा वापर टाळल्यास अनेक विकार आपण टाळू शकतो, असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरही वैद्य खडीवाले यांनी सखोल उत्तरे दिली.

राजेशदादांचा सोनपेठ मध्ये काँग्रेस ला हाबाडा;अनेकांचा राकाँत प्रवेश

प्रतिनिधी

सोनपेठ:-येथे नगर परीषद निवडणुक२०१६ च्या निवडणुकीत सर्वानी उमेदवरी अर्ज भरले परंतु कॉग्रेस पक्षाने एकाच घरात चार.चार उमेदवर दिल्यामुळे कार्यकर्त्यांना कोप-याला गुळ दाखवल्या मुळे आनेक नेते कॉग्रेस पक्षावर नाराज आसुन आनेक जन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे राजेशदादा विटेकर यांच्या कार्यावर विश्वास व्यक्त करून दिपावलीच्या लक्ष्मी पुजन संधेला छोटेखाणी कार्यक्रमात माजी.नगर सेवक तथा धम्म चळवळीतील नेते उत्तम भाग्यवंत,लक्ष्मन व्हावळे,छगन भाग्यवंत,सुधाकर रंजवे,मधुकर रंजवे,संजय भद्रे,नरेश भाग्यवंत,सतोष भाग्यवंत,बाबासाहेब भालेराव,आदीसहआनेक कार्यकर्त्याचा प्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी प्रभाकर सिरसाट,मारोती रंजवे,गौस खुरेशी, शिवाजी कदम, यांनी कॉग्रेस पक्षातील हुकुमशाहीवर रोख ठोक मत व्यक्त केले.  यावेळी समारोप प्रसंगी मा.राजेशदादा विटेकर यांनी मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी कॉग्रेस कडे सर्व समजातील लोकांना मानसनमानच मिळेल अशी ग्वाही दिली. यावेळी हाजी उस्मानबाबा खुरेशी,अमर वडकर,श्नीनिवास गुळभिले,दिलिप सातभाई,अँड.पुष्पक गुजराती,सुहासराव काळे,नयुम भाई,महालींग स्वामी,भगवान मोहीते,लहुकुमार वाकनकर,सतीश आपेट रामभाऊ वाकेकर,शेख दौलत शेरू मुल्ला आदीसह राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अनेक पदाधिका-याची उपस्तिथी होती

Sunday, 30 October 2016

शेतकरी बियाणे मदतीला मदत करणा-या मान्यवरांचा जन्मभूमी फाऊंडेशन च्या वतिने सन्मान

कार्तिक पाटील

पाथरी:-गेली तीन वर्ष दुष्काळाचा सामना करणा-या पाथरी, मानवत तालुक्यातील गरीब गरजू शेतक-यांना खरीप पेरणी साठी बियाणे मदत देण्या साठी पाथरी,मानवत तालुक्या तील अनिवासी मान्यवरां सह ईतर ठिकाण च्या अनिवासी बांधवांनी भरभरून मदत केली अशा संवेदनशील मनांचा जन्मभूमी फाउंडेशन च्या वतिने रविवारी पाथरीतील स्व नितिन महाविद्यालयाच्या सांस्कृतीक सभागृहातील शानदार कार्यक्रमात स्मतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
  या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी केकेएम महाविद्यालयाचे सचिव बालकिशन चांडक हे होते तर प्रमुख उपस्थितीत पेप्साको  मध्ये दिल्ली येथे जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले गोविंद सुर्यवंशी, न्यामुर्ती भक्ती अनिल तळेकर, उद्योगपती गुलशर खान, इक्साईड इन्सपेक्टर सुनिल जाधव, प्रकाश पिंपळे, जि प सभापती दादासाहेब टेंगसे, कृउबास सभापती अनिलराव नखाते, शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र धर्मे, या मान्यवरांची उपस्थिती होती या वेळी उपस्थित मान्यवरांना जन्मभूमी फाऊंडेशन ने स्थापणे पासून बियाणे मदत मिळवने ते बियाने वाटपा पर्यंत केलेल्या कार्याची शार्ट फिल्म दाखवण्यात आली या तर प्रास्ताविकात जन्मभूमी फाऊंडेशनचे अध्यक्ष सदाशिव थोरात यांनी प्रास्ताविकात जन्मभूमी फाऊंडेशनने केलेल्या कामाचा आढावा सर्वां समोर ठेउन संपूर्ण लेखाजोखा सादर केला. या वेळी जन्मभूमी फाऊंडेशन च्या मदतीने अभियांत्रिकी शिक्षणा साठी पुणे येथील मराठवाडा मित्रमंडळाने संपूर्ण पालकत्व स्विकारलेल्या वाघाळा येथील आत्महात्या ग्रस्त शेतक-याचा मुलगा मनोज घुंबरे वडी येथील शेतकरी प्रभाकर शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर उद्योगपती गुलशरखान यांनी जन्मभूमी फाऊंडेशन च्या पुढील पाण्या साठीच्या कामाला भिसे सर्वतोपरी लागेल ती मदत करण्याचे या वेळी जाहीर केले तर गोविंद सुर्यवंशी यांनी दिल्ली आणि इतर ठिकाणी कार्यरत असलेल्या मान्यवर अनिवासींना जोडन आपण या फाउंडेशन ला करता येइल अशी मदत करणार असल्याचे सांगितले या वेळी अभियंते सतिष कोल्हे,नितिन चिलवंत, गंगाधर सत्वधर, भुषण चांडक, अंकूश नखाते, गणेश विघ्ने, डॉ जगदिश कोल्हे, डॉ प्रांजली नखाते, प्रा डॉ सुरेश सामाले, प्रा गोपाल होगे, गणेश थोरे, प्रा प्रविन घटे, भारतीय चित्रपट सेनेचे मराठवाडा अध्यक्ष राजेश मोरे, प्रा डॉ राम भिसे पत्रकार सिद्धार्थ वाव्हळे या अनिवासिंचा स्मतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला या वेळी अभियंते सतिष कोल्हे, नितिन चिलवंत यांनी सत्काराला उत्तर देतांना जन्मभूमी फाऊंडेशन च्या भविष्यातील व्हिजन ला ही भरभरून मदत करणार असल्याचे या वेळी सांगितले या वेळी जिप सभापती दादासाहेब टेंगसे, रविंद्र धर्मे यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय समारोप बालकिशनजी चांडक यांनी केला. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन पांडुरंग कोल्हे यांनी केले तर आभार मानवत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल लाड यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतते साठी जन्मभूमी फाऊंडेशन चे उपाध्यक्ष राजेंद्र देशपांडे,सचिव किरण घुंबरे, सदस्य रामदास आण्णा ढगे,शरद उगले,डॉ उमेश देशमुख, अॅड जमिल अन्सारी,अॅड विठ्ठल भिसे यांनी परिश्रम घेतले

पुर्णा नप अध्यक्ष पदा साठी २० तर नगरसेवकां साठी २८४ उमेदवारी अर्ज

दिनेश चौधरी

पुर्णा:-येत्या 27 नोहेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणूकी साठी आज शेवटच्या दिवशी शहरातील दहा प्रभागातील 20 नगरसेवक पदासाठी तब्बल 284 उमेदवारी अर्ज तर नगराध्यक्ष पदासाठी 20 अर्ज दाखल झाल्याची माहिती तालुका निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार पांडूरग माचेवाड यांनी दिली
नगर परिषद निवडणूकीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता तर उमेदवारी अर्ज वापस घेण्याची अंतिम तारीख 11 नोहेंबर 2016 असुन उमेदवारी अर्ज वापस घेण्याच्या तारखे पर्यंत छाती ठोकपणे राजकीय रणांगणात उतरलेले किती राजकीय पैलवान रणांगणातून पलायन करतील हे तर उमेदवारी अर्ज वापस घेण्याच्या अंतिम तारखेलाच समजेल शहरात राजकीय घडामोडींना प्रचंड  वेग आला असुन राजकीय बुध्दीबळाच्या या खेळात माञ प्यादा हीं राजाला मात देण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्पष्ट होत आहे  जिल्ह्यातील प्रत्येक राजकीय पक्षाच्या पाठीमागे खबीरपणे उभे राहुन त्या राजकीय पक्षाचे वर्चस्व वाढविण्यासाठी  सिंहाचा वाटा उचललेल्या पुर्णा शहर व तालुक्याच्या वाट्याला माञ सदैव अवहेलनाच आल्याचे आता पर्यंतचा इतिहास पहाता लक्षात येते कारण फितूरी हा या तालुक्यातील पुढाऱ्यांच्या राजकारणाचा अभिन्य अंग असुन पुढाऱ्यांच्या फितूरीचा सर्वात मोठा फटका तालुक्याला व तालुक्यातील सामान्य निष्ठावान कार्यकर्त्यांना वेळोवेळी भोगावा लागत असुन जिल्ह्यातील संधीसाधू पुढाऱ्यांची गटबाजी आणि फितुरी तालुक्याच्या विनाशास कारणीभूत ठरत आहे

"तेजन्यूज हेडलाईन्स" मोबाईल वाहिनीचा शुभारंभ; मान्यवरांचा शुभेच्छांचा वर्षाव

कार्तिक पाटील

पाथरी:- आज जन्मभूमी फाऊंडेशन च्या पाथरी येथील सन्मान मेळाव्यात "तेजन्यूज हेडलाईन्स"या सोशल मिडिया आॅन लाईन वेब वाहिनीचा अनिवासी बांधव आणि पाथरी, मानवत तालुक्यातील मान्यवरांच्या हस्ते शानदार लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मानवत अर्बन बँकेचे सचिव मा बालकिशन भाऊ चांडक हे होते तर प्रमुख उपस्थितीत दिल्ली स्थित पेप्सीको चे जनरल मँनेजर गोविंद सुर्यवंशी, मुंबई स्थित सुनिल जाधव न्या. भक्ती अनिल तळेकर, उद्योगजक गुलशर खान प्रकाश पिंपळे, अभियंते सतिष कोल्हे, नितिन चिलवंत, गंगाधर सत्वधर, भुषण चांडक, अंकूश नखाते, आरटीआे गणेश विघ्ने, डॉ जगदिश शिंदे, डॉ प्रांजली नखाते, प्रा गोपाल होगे,प्रा डॉ सुरेश सामाले, गणेश थोरे , राजेश मोरे, प्रा प्रविन घटे, जि प शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे,कृउबास सभापती अनिलराव नखाते, शिवसेनेचे तालुका प्रमुख रविंद्र धर्मे ,जन्मभूमी फाऊंडेशन चे अध्यक्ष सदाशिव थोरात, रामदास आण्णा ढगे,सदस्य शरदराव उगले, पांडूरंग कोल्हे , डॉ उमेश देशमुख , स्मिता बनसोडे, पत्रकार सिद्धार्थ वाव्हळे मानवत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाळ लाड, या वेळी उपस्थीती होती या वेळी बालकिशनजी चांडक, जिप सभापती दादासाहेब टेंगसे यांनी तेज न्यूज वेब वाहिनी चे संपादक किरण घुंबरे पाटील आणि विकासक प्रा गोपाल उगले पाटील यांना शुभेच्छा देउन या वाहीच्या माध्यमातून जगभरातील क्षणाक्षणाच्या घडामोडी मोबाईलवर जाणून घेण्या बरोबरच पाथरी, मानवत तालुक्यातील अनिवासी बाधंवांना आपल्या गावची बित्तम बातमी या वाहिणीच्या माध्यमातू राज्य,
देश विदेशातील काना कोप-यात जाणून घेता येणार असल्याने ही वाहीनी माहीती तंत्रज्ञानाच्या युगात नविन घडामोडी जाणून घेण्या साठी पर्वणीच ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया या वेळी बोलतांना दिल्या.

Saturday, 29 October 2016

जन्मभूमी फाऊंडेशन ने जागृती केलेल्या पिंपळगावातील तरून सरसावले

जन्मभूमी फाऊंडेशनच्या जागृती मेळाव्याचा परिणाम
तरूनांनी एकत्रयेत नदी वर उभारला मातीचा बंधारा
पाथरी:- तालुक्यातील चाटेपिंपळगाव या गावातील तरूनांनी जन्मभूमी फाऊंडेशनच्या मार्गदर्शनात गावातील लेंडी नदी वर माती आणि पॉलीथीन चा वापर करत बंधा-याची उभारणी केली असून जवळ पास दिड किमी अंतरात पाणी साठल्या मुळे विहिरी आणि कुपनलीकांच्या पाण्याची पातळी जमिनी बरोबर आल्याने तरूनांच्या या कर्तबगारी ग्रामस्थ जाम खुश झाल्याचे दृष्य या गावी भेट दिली असता पहावयास मिळाले.
   गेली तीन चार वर्षा पासून हे गाव कोरड्या दुष्काळाचा सामना करत आहे दोन महिण्या पुर्वी पर्यंत घोटभर पाण्या साठी ग्रामस्थांना कोस भर भटकंती करावी लागत होती. ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्याची विहिर गावालगत वाहणा-या लेंडी किणारी मात्र या विहिरीत गेली अनेक वर्षा पासून पाण्याचा थेंब ही नव्हता सप्टेबर महिण्यात पडलेल्या पावसा मुळे विहिरीला पाणी आले होते त्यात नदीचे पात्र ही पाण्याने वाहते आहे अशातच गावातील तरुनांनी गौरी-गणपती सणा वेळी गावातील अनिवासींना सोबत घेत जन्मभूमी फाऊंडेशन च्या सहकार्यांने गावात जलजागृती मेळावा आयोजीत करून गाव विकासा साठी तरूनांनी पुढाकार घेत जन्मभूमी फाऊंडेशन ने गावचे पाण्याचे दुर्भिक्ष घालवण्या साठी मदतीचे आश्वासन देत लोकसहभाग आणि जन्मभूमी फाऊंडेशन ची मदत घेत या गावात जल संधारणाची कामे करण्याचा निर्धार केला असून त्या अनुशंगाने चाटेपिंपळगावातील तरून आता गाव पाणी टंचाई मुक्त करण्या साठी सरसावले असू नुकतेच या गावातील अनिवासी तरुन आशोक गिराम यांच्या मार्गदर्शनात महादेव जगताप आणि तुकाराम बुरंगे या तरूनांनी स्व खर्चातून पॉलीथीन आणि जेसीबी मशीन च्या साह्याने माती चा मजबूत बंधारा नदी पात्रात उभारला असून त्याला आतील पाण्याच्या बाजूने पाणी झिरपून माती वाहून जाऊ नये म्हणून पॉलीथीन लावण्यात आले आहे. तर पाण्याचा अतिरिक्त प्रवाह दोन ठिकाणी वेगळे चर काढून या नदी वर उभारलेल्या बंधा-याच्या पुढील बाजूस नदी लगट असलेल्या आेढ्यातून पाणी काढून देण्यात आले आहे. या ठिकाणी नदिची खोली जवळ पास विस फूट खोल असून बंधा-याची उंची चौदा फुट उंच ठेवण्यात आली आहे. त्या मुळे या मातीच्या बंधा-यात जवळपास दीड किमी अंतरात बॅक वाटर साचले असल्याने गावाला पाणी पुरवठा करणारी विहिर काठोकाठ भरली असून नदी काठावरील ईतर शेतक-यांच्या शेतातील विहिरी कुपनलिका काठोकाठ भरल्या असल्याने गावातील जगताप आणि बुरंगे या तरुनांचे मोठे कौतूक होत असून शुक्रवारी हा बंधारा पाहाण्या साठी तालुका कृषी अधिकारी वगरे यांनी भेट देऊन पाहाणी केली. तर टीम जन्मभूमी चे सचिव किरण घुंबरे आणि सहका-यांनी शनीवारी सकाळी या बंधा-याची पाहणी करून तरुनांना मार्गदर्शन केले. गाव टंचाई मुक्त करण्या साठी या गावचे सरपंच रामेश्वर भालसत्रे, बन्सी काळे, तुकाराम बुरंगे, प्रल्हाद काळे, भगिरथ काळे यांच्या सह मोठ्या संखेने तरून ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.

परभणी जिल्ह्यातील सात नप अध्यक्ष पदा साठी १११ तर १४७ प्रभागातील जागे साठी १२९९ अर्ज

कार्तिक पाटील
पाथरी:- परभणी जिल्ह्यातील सात नप साठी होणा-या निवडणुकी साठी आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकिय पक्ष आणि अपक्षांनी मोठी गर्दी करत उमेदवारी अर्ज दाखल केले यात सात नप च्या अध्यक्ष पदा साठी १११ उमेदवारांनी नामांकन दाखल केले तर नगरसेवक पदा साठी १२९९ अर्ज दाखल केले आहेत 
यात सोनपेठ नप अध्यक्ष पदा साठी १२अर्ज तर नगरसेवक पदा साठीच्या आठ प्रभागातील १७ जागां साठी १६० जनांनी उमेवारी अर्ज दाखल केले आहेत. तर पाथरीत अध्यक्ष पदा साठी २० आणि १० प्रभागातील २० जागे साठी १४९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, गंगाखेड येथे अध्यक्ष पदा साठी २१ अर्ज तर १२ प्रभागातील २४ जागां साठी २३७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. जिंतूर येथे अध्यक्ष पदा साठी १० तर नगरसेवकां साठीच्या ११ प्रभागातील २३ जागां साठी १२५ अर्ज. पुर्णा अध्यक्ष पदा साठी २० अर्ज तर १० प्रभागातील २० जागां साठी २८४ अर्ज.मानवत अध्यक्ष पदा साठी १० तर ९ प्रभागातील १९ जागां साठी १४४ अर्ज दाखल करण्यात आले आहेत तर सेलूत अध्यक्ष पदा साठी १८ आणि १२ प्रभागां साठी २०० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत

वाघाळा येथे "रेडा"चोरून आणनारा चोरटा चोपून काढला

कार्तिक पाटील
पाथरी:तालुक्यातील वाघाळा येथे एका चोरट्याने सात साडे सात च्या दिवे लावण्याच्या सुमारास संधी साधत केकरजवळा येथून देवाला सोडलेला म्हशीचा रेडा चोरून आणला हा रेडा उचलून नेतांनां काही जनांनी पाहीला लागलीच फोन वरून याची माहिती ग्रामस्थांना दिली आणि या चोरट्याचा पाठलाग करत वाघाळा गाव गाठले या ठिकाणी वाघाळा गावातील तरुन आणि ग्रामस्थांच्या मदतीने रेडा चोराला पकडले आणि बेदम चोप दिला आणि पाथरी पोलीसांच्या हवाली हा चोरटा केला. या वेळी पाथरी पोलीसांनी तात्काळ वाघाळा गावात येऊन चोरटा घेउन गेले आहेत या चोरट्याचे नाव उत्तम सुंदर पवार असल्याचे ग्रामस्थ सांगत असून तो परिसरात नियमित पणे लहाणाव मोठ्या चो-या करत शेतकरी आणि ग्रामस्थांना त्रास देत असल्याचे सांगितले जाते.