तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 31 October 2016

रायपूर येथे विजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू;महावितरण चा गलथान कारभार

राम सोनवने

सेलु: तालुक्यातील रायपुर येथे शेतातील तुटलेल्या विद्युत तारांमधुन विद्युत प्रवाह आल्याने एका बैलाचा मृत्यु तर एक बैल गंभिर जखमी झाल्याची घटना घडली. 
दि. 29 आँक्टोंबर रोजी घडलेल्या घटनेमध्ये रायपुर येथिल शेतकरी अशोक शंकरराव गाडेकर यांच्या गट क्र. 131मध्ये महावितरणचे विद्युत तार ब-याच कालावधी पासुन महावितरणच्या हलगर्जीपणामुळे तुटलेल्या अवस्थेत होते. सध्या शेतातील विद्युत पुरवठा सुरु करण्यात आला व या विद्युत तारांची दुरुस्ती महावितरणकडुन करण्यात आली नाही. या विद्युत तारामधुन विद्युत प्रवाह आला असल्याचे शेतकरी गाडेकर यांच्या लक्षात नसल्याने ते त्यांच्या शेतात सेयाबीन  पोते आणण्यासाठी गेले असताना या विद्युत तारांच्या संपर्कात बैलगाडीसह स्वत: गाडेकर हे आले व या विद्युत वाहीनीत विद्युत प्रवाह असल्याने त्यांच्या बैल गाडीला जुंपलेल्या बैलांना विजेचा धक्का लागल्याने त्यापैकी एका बैलाचा विजेच्या धक्याने जागीच मृत्यु झाला तर एक बैल गंभिर रित्या जखमी झाला आहे. प्रसांगवधाण राखुन शेतक-याने बाजुला उडी घेत आपले प्राण वाचवले परंतु आपल्या बैलांचे मात्र प्राण वाचवण्यात शेतकरी अपयशी झाले. अचानक घडलेल्या या प्रकरणामुळे शेतकरी यांच्यावर अस्मानी संकट आले आहे.

◼महावितरणकडुन अद्यापपर्यंत दुरुस्ती नाही. 
एवढेमोठे नुकसान शेतकरी यांचे झाले आहे परंतु अद्यापपर्यंत या शेतकरी यांच्या शेतातील तुटलेल्या तारांची दुरुस्ती महावितरणकडुन करण्यात आली नाही. महावितरणला नेमके काय साध्य करावयाचे आहे हेच कळायला तयार नाही. नेमकी दुरुस्ती का? करत नाही हे समजायला तयार नसल्याने या ठिकाणी अजुन किती आपघात महावितरणच्या निष्काळजी पणामुळे होतात का? काय हीच भिती परिसरातील शेतकरी यांना वाटत आहे. शेतकरी यांच्या या नुकसानीस नेमके जबाबदार कोणास धरावे. हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरणच्या निष्काळजी पणामुळे नाहक या गरीब शेतकरी यांना आर्थिक भुर्दंड बसला असल्याने या शेतक-यावर सध्या तरी अस्मानी संकट कोसळले आहे. तर महावितरणकडुन अद्यापपर्यंत तरी या विद्युत तांरांची दुरुस्ती करण्यात अाली नसल्याने शेतकरी यांच्या कडुव नाराजी व्यक्त करण्यात येत असुन महावितरणच्या कनिष्ठ अभियंता यांच्या शी संपर्क साधला असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नसल्याने या अभियंत्यास या घडलेल्या प्रकारचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.

No comments:

Post a comment