तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 30 November 2016

सबसे तेज,तेजन्यूज हेडलाईन्स ताज्या घडामोडी संक्षीप्त


💤पेट्रोल पंपावर २ डिसेंबरपर्यंतच स्वीकारण्यात येणार जुन्या ५०० च्या नोटा

💤ममता बॅनर्जी यांना जीवे मारण्या प्रयत्न, तृणमृल काँग्रेसचा लोकसभेत आरोप; लोकसभेत गदारोळ

💤तामिळनाडू, पाँडिचेरी किनारपट्टीवर 'नाडा' वादळ धडकणार; बचाव आणि मदत कार्यासाठी नौदलाच्या शक्ती आणि सातपुडा युद्धनौका तयारीत

💤पुणे: पगार व पेन्शनसाठी बँकांबाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत

💤घरगुती गॅस सिलिंडरचे दर २ रुपये ७ पैशांनी वाढले

💤पंजाब: २००० च्या बनावट नोटा असलेले ४२ लाख रुपयांसह तिघे जण मोहाली पोलिसांच्या ताब्यात

💤लातूर: सिेने-नाट्यनिर्माते श्रीराम गोजमगुंडे (वय ७१) यांचे दीर्घ आजाराने निधन. बाभूळगावात आज होणार अंत्यसंस्कार

💤मुंबई: राज्यभरातील पतसंस्थांचा आज राज्यव्यापी मोर्चा; पतसंस्थांच्या व्यवहारावर परिणाम होण्याची शक्यता

💤 - मुंबई : कुर्ला नेहरु नगर परिसरात पालिकेने खोदलेल्या खड्ड्यात पडून सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू, शौचालयासाठी खोदला होता खड्डा

💤- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर, गुंदवली - भांडुपदरम्यान जलबोगद्याचं लोकार्पण.

💤 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत लावली हजेरी,  दिल्ली : विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित

💤 - भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल मकाऊ ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहोचली.

💤 344 कॉम्बिनेशन औषधांवरील बंदी दिल्ली उच्च न्यायालयाने हटवली.

💤 - मुंबई - शहिदांच्या कुटुंबियांना दिला जाणार निधी वाढवण्यात आला, राज्य सरकार 5 ऐवजी 8 लाख रुपये मदत देणार, दरवर्षी मदतनिधीची रक्कम वाढवली जाणार.

💤 - मथुरा - यमुना एक्सप्रेसवेवर धुक्यामळे 12 गाड्या एकमेकांवर आदळल्या, एकाचा मृत्यू तर 10 जखमी.

भद्राबाई डोंबाळे यांचे निधन

राम सोनवने
सेलू:-शहरातील महाजन गल्ली येथील रहिवाशी शुभद्राबाई गणेशअप्पा डोंबाळे वय(95वर्ष) यांचे दि.30 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:वाजता निधन झाले. त्यांच्या पश्च्यात दोन मुलगी ,जावई, नातू असा परिवार आहे. त्या शहरातील शंकर राऊत व रामभाऊ राऊत यांच्या आजी होत्या त्यांच्या निधनाने  राऊत परिवरावर दुःखाचे डोंगर कोसळला त्यांच्या वर शहरातील स्मशान भुमित अंतीम संस्कार करण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुका उपाध्यक्ष पदी दादासाहेब तांबे

प्रदिप जाधव
वैजापुर:-स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वैजापुर तालुका उपाध्यक्ष पदी तलवाडा येथील दादासाहेब तांबे यांची निवड झाली,

युवा जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी यांनी लोणी येथील बैठकीत ही निवड केली.
शेतकरी चळवळीत झोकुन काम करावे, असे आव्हान त्यांनी केले.
खासदार राजु शेट्टी, सदाभाऊ खोत, रवी तुपकर, राहुल भैया मौर्य यांच्या आदेशानुसार ही नियुक्ति करण्यात आली.
चंद्रशेखर साळुंके, दिगंबर गायके, योगेश घायवट, नवनाथ मगर, राहुल मगर, अतुल तांबे, योगेश पवार, राहुल जाधव, आदींची उपस्थिती होती.

मराठा आरक्षणा साठी आ भांबळेंच्या घरा समोर भजन आंदोलन

प्रदिप कोकडवार
जिंतूर:-मराठा आरक्षण साठी शासनाच दुर्लक्ष होत असल्या मूळ मराठा समाजाच्या वतीने आज जिंतूर येथे आमदार विजय भाम्बळे यांच्या घरासमोर भजन आंदोलन करण्यात आले तसेच मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले

जेष्ठ सिनेअभिनेते- श्रीराम गोजमगुंडे यांचे निधन

लातूर:-मराठी सिनेसृष्ठीतील जेष्ठ अभिनेते-दिग्दर्शक श्रीराम गोजमगुंडे यांचे निधन झाले आहे.

मूळचे लातूर येथील रहिवासी असणारे श्रीराम गोजमगुंडे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आज पहाटेच्या सुमारास एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २५ ऑगस्ट १९४५ रोजी जन्मलेले श्रीराम गोजमगुंडे हे ७२ वर्षाचे होते. मराठवाड्यातील ते पहिले अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून ओळखले जात होते.१९७४ मध्ये राजा शिवछत्रपती या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्ठीत पदार्पण केले.यानंतर श्रीराम गोजमगुंडे यांनी गड जेजुरी जेजुरी, झटपट करू दे खटपट, निखारे, पिंजरा प्रीतीचा, झाकोळ, आपलेच दात आपलेच होठ, पारध, सुळावरची पोळी, या सुखानो या आदिसाहित अनेक मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका बजावल्या. १९८० मध्ये लातूर आणि परिसरात चित्रित केलेल्या 'झटपट करू दे खटपट' या मराठी चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शकही ते होते. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपट सुष्टीतील एक जेष्ठ अभिनेता तर हरवलाच. पण मराठवाड्यातील लातूरच्या मातीतील पहिला अभिनेता, दिग्दर्शक काळाने हिरावल्याची भावना व्यक्त होत आहे.

पोलीस पाटलांचे मानधन वाढवण्या बाबत प्रस्ताव तात्काळ सादर करा-गृह राज्यमंत्री केसरकर

मुंबई, दि.30 : राज्यातील पोलीस पाटलांचे सध्याच्या तीन हजार रूपये असलेले मानधन वाढविण्याचा प्रस्ताव गृह विभागाने तयार करून तात्काळ वित्त विभागाकडे सादर करण्याचे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिले.
     मंत्रालय येथील दालनात राज्यातील पोलीस पाटलांचे मानधन वाढविणे तसेच इतर प्रलंबित मागण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी श्री.केसरकर बोलत होते.यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रभात कुमार,वित्त विभागाचे उपसचिव ज.अ.शेख,गृह विभागाचे उपसचिव श्री.अजेटराव,सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव सु.ह.उमराणीकर तसेच महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष महादेव नागरगोजे आदी उपस्थित होते.
    राज्यातील हंगामी पोलीस पाटलांना कायम करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचे श्री.केसरकर यांनी सांगितले. पोलीस पाटलांना शासन निर्णयाप्रमाणे राज्यपाल पुरस्कार देण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे कळविण्यात येत आहे. त्याचबरोबर  पोलीस पाटलांचे नुतनीकरण करतांना ज्यांची सेवा समाधानकारक त्यांचीच पुनर्नियुक्ती होईल. पोलीस पाटलांची तालुका स्तरावर कार्यशाळा घेऊन प्रशिक्षण देण्याबाबत पोलीस महासंचालक यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच  पोलीस पाटलांना तलाठी कार्यालयात कार्यालय मिळण्यासाठी महसूल मंत्र्यांना प्रत्यक्ष विनंती करणार असल्याचेही श्री.केसरकर यांनी यावेळी सांगितले.
     यावेळी श्री. केसरकर म्हणाले की, राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेतील शेवटचा महत्वाचा घटक पोलीस पाटील आहे. तेव्हा पोलीस पाटलांनी प्रामाणिकपणे  आपले कर्तव्य पार पाडावे. गावात घडणाऱ्या अनुचित घटना, अवैध धंदे यांची वेळोवेळी नोंद ठेवावी तसेच संबंधीत  माहिती तात्काळ पोलीसांना द्यावी. त्यामुळे लवकर कारवाई करण्यात येईल.यामुळे गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होवून महाराष्ट्र बदल घडवू शकतो.
      यावेळी पोलीस पाटलांचे वय 60 वरुन 65 वर्षापर्यंत करणे आणि इतर विविध  मागण्याबाबत   नियमानुसार सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे श्री. केसरकर यांनी सांगितले. यावेळी  पंढरपुरचे आमदार भारत भालके महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष मोहनराव शिंगटे, पंढरीनाथ पाटील, वर्धा पोलीस पाटील संघटनेचे सहसचिव अशोक वैरागडे, विदर्भ पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष दीपक पालीवाल तसेच चिंतामण पाटील आदी उपस्थित होते.

अनिल घोगरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

अविनाश घोगरे
घनसावंगी:-भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते अनिल घोगरे पा यांनी भाजपा पक्षाला सोडचिट्टी  देऊन माजी मंत्री आ राजेश टोपे यांच्या नेतृत्वार विश्वास ठेवुन  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला या वेळी रामदास घोगरे ,बबन लाहमगे, राजु थोरात दिनकर बादाडे ,लखण भोरे ,भगवान पांढरे ,आबासाहेब खोसे, लक्ष्मण मुर्तडकर ,यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती
राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या ध्येयधोरणानुसार आ राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनात यापुढे राजकीय वाटचाल करुन समाजकारण व जनसामान्यांना सदैव मदतीचा हात देण्याचे अभिवचन अनिल घोगरे यांनी दिले

मराठा समाज बांधवांच्या वतिने आ केंद्रे यांच्या कार्यालयावर भजन मोर्चा

प्रतिनिधी
गंगाखेड:-गंगाखेड पालम पुर्णा  तालुक्यातील सर्व मराठा बांधवांच्या वतीने आज गुरूवार  दिनांक ०१/१२/२०१६ रोजी गंगाखेड चे आमदार मधुसूदन केंद्रे यांच्या कार्यालयावर भजन मोर्चा काढण्यात येणार आहे येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण स्वामिनाथन अयोग ,कर्ज माफी  इत्यादी प्रश्न मांडावे यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे तरी गंगाखेड पालम पुर्णा या तिन्ही तालुक्यातील मराठा बांधवानी उपस्तिथ राहावे हि  विनंती समाजा बांधवांना करण्यात आली आहे.
वेळ ठीक १० वाजता
स्थळ ; भगवती चौक गंगाखेड
आयोजक ; सकाळ मराठा समाज गंगाखेड पालम पुर्णा
संपर्क ; ९८८१९५१५४७,९४२१८६६६११,९४०५१११२०१,८००७५८०५१६,

अपात्र मराठी चित्रपटांचे पुनर्परिक्षण होणार


महामंडळाच्या विनंतीला सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा सकारात्मक निर्णय

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वात एक शिष्ट मंडळ नुकतेच सांस्कृतिक कार्य मंत्री श्री विनोद तावडे यांना भटले. या भेटीत मराठी सिने सृष्टीला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मेघराज राजेभोसले आग्रही होते. आणि त्यांच्या मागणीला सांस्कृतिक मंत्री विनोद तावाडेंनीही तेवढाच सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मराठी चित्र सृष्टीत चैतन्याचे वातावरण पसरले आहे.

मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षांनी गेल्या 6 महिन्या पासून वारंवार विविध मागण्यांसाठी पाठपुरावा सुरु ठेवला होता, त्यात प्रामुख्याने खालील मागण्या होत्या।

1. चित्रपट अनुदानातील अनेक त्रुटी दुरुस्त करण्याची मागणी होती, तिला मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला

2. अनुदानासाठी अपात्र 60 पेक्षा अधिक सिनेमाबद्दल फेर विचार करण्याचे सूतोवाच श्री विनोद तावडे यांनी दिला।

3. अनुदान योजनेसाठी अपात्र ठरलेल्या चित्रपटांपैकी सुरुवातीला 10 चित्रपटांचे पुनरपरिक्षण करून ते योग्य वाटल्यास इतर अपात्र चित्रपटांचेही पुनरपरिक्षण करणार

4. सिनेसृष्टीतील व्यावसायिकांसाठी ठराविक ठिकाणी प्लॉट ची मागणी झाल्यास, तिथे आर्टिस्ट कॉलोनी साठी शासन प्रयत्न करणार

5. चित्रपट महामंडळाच्या व चित्रपटाच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या विविध पदाधीकाऱ्यांना महाराष्ट्रातील विविध शासकीय विश्राम गृहात मोफत राहण्याची सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन मंत्री विनोद तावडे यांनी मान्य केले.

6.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त होणाऱ्या भव्य अश्या "अखिल भारतीय मराठी चित्रपट महोत्सव" करिता योग्य ते सहकार्य करण्यास शासनाची तयारी.

7. वयोवृद्ध कलावंतांना त्यांच्याच अकाऊंट मध्ये त्यांचे पेन्शन जमा करणार..पेन्शन ची रक्कम शासनाने वाढविली असून आता ₹ 2100 दिली जाणार.

8. मराठी चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचावे म्हणून, चित्रपट महामंडळासोबत मिळून विशेष योजना राबविणार.

9. प्रोविडेन्ट फंड च्या धर्तीवर सर्व मराठी तंत्रज्ञ व कलाकारांना पेन्शन योजनेसाठी शासनही मोठा हातभार लावणार. चित्रपट महामंडळातर्फे याबद्दलचा आराखडा लवकरच शासनाला देणार.

10.चित्रपट प्रसिद्धी व चित्रपट महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी होणाऱ्या कार्यक्रमाचा आराखडा मराठी चित्रपट महामंडळ शासनाला देणार.

11. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्रातील बहुसंख्य नाट्यगृह मराठी सिनेमा प्रदर्शनासाठी देण्याच्या महामंडळाच्या मागणीला सुद्धा विनोद तावडेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला

विविध मागण्यांच्या प्रतीक्षेत असणारी मराठी चित्रपट महामंडळाच्या पदरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन मराठी चित्रपट सृष्टीला पालक म्हणून सांभाळून मदतीचा हात दिला असल्याचे चित्र असून, मेघराज राजेभोसले व संचालक मंडळांच्या कढतर प्रयत्नांना मोठ्या प्रमाणावर यश आले आहे.. याबद्दल महामंडळाच्या अध्यक्षांनी संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीतर्फे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांचे आभार मानले.

सदर शिष्टमंडळात चित्रपट महामंडळाच्या अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या सोबत, महामंडळाचे संचालक सतीश रणदिवे, पितांबर काळे, वर्षा उसगावकर, कार्यवाहक विजय खोचिकर, चैताली डोंगरे महामंडळाचे सल्लागार अभिनेते सुशांत शेलार उपस्थित होत्या. तसेच चित्रसृष्टीतील अनेक मान्यवरांमध्ये निलकांती पाटेकर, रामदास तांबे, जेष्ठ दिग्दर्शक रमेश साळगावकर, अजय राणे, दिग्दर्शक ज्ञानेश्वर आंगणे, दिग्दर्शक अजित साबळे, आदी उपस्थित होते..

-दिपक चौधरी (जनसंपर्क प्रमुख, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ)

सबसे तेज,तेजन्यूज हेडलाईन्स ताज्या घडामोडी संक्षिप्त


☀- सोलापूर - सर्वच नेतेमंडळीचा एकमुखी सुर 'सिद्धेश्वर' कारखान्याचे नेतृत्व धर्मराज काडादी यांनीच करावे - आ. सिद्धाराम म्हेत्रे
___________________________________

💤🌟💤
☀- ज्येष्ट सिने व नाट्य अभिनेते श्रीराम गोजमगुंडे यांचे निधन. आज सकाळी ११ वाजता लातुरात अंत्यविधी
___________________________________

💤🌟💤
☀- विरोधी पक्षनेत्यामध्ये आज सकाळी ९.३० वाजता संसदेमध्ये बैठक होणार
___________________________________

💤🌟💤
☀- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना अमेरिकेचे नवनिर्वाचीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन करुन पाकिस्तान भेटीचे निमंत्रण दिले
___________________________________

💤🌟💤
☀- दाट धुक्यांमुळे दुश्यमानता ५० मीटरच्या खाली आल्याने दिल्ली विमानतळावरील वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे
___________________________________

💤🌟💤
☀- नोटाबंदी - पेट्रोल पंपावर पाचशेच्या जुन्या नोटा स्विकारणं बंद होऊ शकतं, आज औपचारिक घोषणेची शक्यता
___________________________________

💤🌟💤
☀- द्रमुकचे प्रमुख एम करुणानिधी यांना चेन्नईतील रुग्णालयात केले दाखल, महिन्याभरापासून अॅलर्जीचा त्रास सुरु होता
___________________________________

💤🌟💤
☀- महिन्याच्या पहिल्या तारखेला बँकांमध्ये पैसे पुरवण्यासाठी मोठी तयारी, लष्करही कामाला लागल्याची सूत्रांची माहिती
___________________________________

💤🌟💤
☀- नोटाबंदीनंतर आग्र्यातील तरुणाच्या खात्यात तब्बल 100 कोटी जमा, कुटुंबासह बँक अधिकारीही चक्रावले, तपास सुरु
___________________________________

💤🌟💤
☀- शहीद कुणाल गोसावी आणि संभाजी कदमांवर आज अंत्यसंस्कार, पंढरपूर, नांदेडमध्ये पार्थिवाची प्रतीक्षा, महाराष्ट्र शोकाकूल
___________________________________

💤🌟💤
☀- मुंबईच्या विकासासाठी 10 हजार कोटींचा निधी मंजूर, पालिका निवडणुकांच्या तोडांवर केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
___________________________________

💤🌟💤
☀- आई - वडिलांना मुंबईच्या फुटपाथवर घेऊन जाण्याचं धाडस करणार नाही, खुद्द पालिका आयुक्त मेहतांची हतबल प्रतिक्रिया
___________________________________

💤🌟💤
☀- मुंबईतील फोर्ट परिसरात इमारतीला भीषण आग, इमारतीचा दुसरा मजला जळून खाक, मध्यरात्री आग विझवण्यात यश

ब्रेकींग

⭕ महत्वाची बातमी⭕

शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे पार्थिव पंढरपूर येथील मूळ गावी दाखल


अवैद्य वाळू तस्करांचा सुळसूळाट लाखोंचा महसूल डब्यात

प्रतिनिधी
वैजापुर तालुक्यातील विरगाव पोलिस ठाणे अन्तर्गत चाळीस कि. मी. च्या गोदावरी नदी च्याआंतर असलेल्या नदी पात्रातुन अवैध रित्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाळू उपश्या मुळे लाखो रुपयांचा शासनचा महसुल बूड़त आहे,
काही दिवसा पूर्वी स्थानिक ग्रामस्थानी या बाबत बड्या आधिकार्याकड़े तक्रार करुण लगाम घालण्याचा प्रयत्न केला तरीही वाळू तस्करानच्या डोक्यावर कोणाचा हात आहे असा प्रश्न जनतेला पडला आहे.

सैराट अधिकाऱ्यांच्या झिगाट कारभार...

महसुल सह विरगाव पोलिसाना महिन्याकाठी लाखो रुपयांचे पॅकेज दिले जात असल्याचे काही विश्वसनीय सूत्राकडून कळले आहे,
    भालगाव.नागमठान.चेंडूफल.आव्वलगांव सह आदि गावांतुन मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे तरी या वाळू तस्करना लगाम कोण घालेल या कड़े सर्व जनतेच् लक्ष् लागले आहे मात्र येणारा काळच ठरवेल.

ग्रामिण क्षेत्रामध्ये सेट टॉप बॉक्स केबलसेवा अविवार्य

प्रतिनिधी
बुलडाणा, :- जिल्ह्यातील ग्रामीण भागात केबल प्रसारण सेवा सेट टॉप बॉक्सद्वारे करण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र शासनाने 1 जानेवारी 2017 पासून ही सेवा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेने 31 डिसेंबर 2016 पूर्वी सेट टॉप बॉक्स बसवून घ्यावेत. त्याशिवाय केबल सेवा वैध असणार नाही. तरी मुदतीपूर्वी सेट टॉप बॉक्स बसवून अविरत केबल सेवेचा आनंद घ्यावा, असे आवाहल जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

दिन विषेश

🌷 *॥ दिनविशेष ॥* 🌷       
                 
१ डिसेंबर २०१६
              【या वर्षातील ३३६ वा दिवस】       
  *जागतिक एडस प्रतिबंध दिन* ,  *एन. सी. सी. दिन*
          *===s=====v======m====* 
🔮 *१७६१*  -  ’मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम’च्या संस्थापिका मेरी तूसाँ चा जन्मदिन.
🔮 *१८८५*  - आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा ’काकासाहेब’ कालेलकर यांचा जन्मदिन.
🔮 *१९०९*  -  मराठी नवकाव्याचे प्रणेते बा. सी. मर्ढेकर यांचा जन्मदिन.
🔮 *१९११* - 'हंस', 'मोहिनी', 'नवल' आणि 'सत्यकथा' या मासिकांचे संपादक अनंत अंतरकर यांचा जन्मदिन.
🔮 *१९४८*  - एस. एस. आपटे यांनी ’हिन्दुस्तान समाचार’ ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.
🔮 *१९५५*  - पार्श्वगायक उदित नारायणचा जन्मदिन.
🔮 *१९६३* - नागालँड भारताचे १६ वे राज्य बनले.
🔮 *१९६३*  -  श्रीलंकेचा क्रिकेटपटू व व्यवस्थापक अर्जुना रणतुंगा यांचा जन्मदिन.
🔮 *१९६५* - भारताच्या सीमांच्या संरक्षणासाठी सीमा सुरक्षा दलाची (Border Security Force) स्थापना.
🔮 *१९८०* -  भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफचा जन्मदिन.
🔮 *१९८१* - AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली.
🔮 *१९८५* -  स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा ’दादा’ धर्माधिकारी यांचा मृत्यूदिन.
🔮 *१९८८* -  विचारवंत व साहित्यिक गंगाधर बाळकृष्ण तथा ‘गं. बा.‘ सरदार यांचा मृत्यूदिन.
🔮 *१९९०*  -  राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी विजयालक्ष्मी पंडीतचा मृत्यूदिन.
🔮 *१९९२*  - कलाक्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व अविस्मरणीय कामगिरीबद्दल गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ’गदिमा पुरस्कार’ गायिका आशा भोसले यांना जाहीर.
🔮 *१९९२*  - ज्यूडी लेदेन या ब्रिटिश महिलेने ३९७० मीटर (१३०२५ फूट) उंचीवरुन हँग ग्लायडर चालवून उंचीचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला.
🔮 *१९९९*  - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (कै.) इंदिरा गांधी यांना ’वूमन ऑफ द मिलेनियम’ म्हणून मानांकित करण्यात आले.
🔮 *२००१* - ट्रान्स वर्ल्ड एअरलाइन्सचे शेवटचे उड्डाण. यानंतर ही कंपनी अमेरिकन एअरलाइन्समधे विलीन झाली.

पाथरीचे कृषीअधिकारी वगरे यांचे रेल्वे प्रवासात -हदयविकाराने निधन

प्रतिनिधी
पाथरी:-पाथरीचे तालुका कृषी अधिकारी सखाराम वगरे यांचे आज पहाटे मुंबई हून रेल्वेने परत येत असतांना रेल्वेतच -हदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. दोन दिवसा पुर्वी कामानिमित्त वगरे हे मुंबई येथे गेले असल्याचे सांगण्यात येत आहे ते मानवत तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते.गत वर्षी पाथरी येथील तालुका कृषी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार त्यांना देण्यात आला होता. पुढील वर्षी जानेवारी महिण्यात ते या पदावरून सेवा निवृत्त होणार होते अशी माहीती मिळत आहे मुलीच लग्न असल्या कारणाने शिल्लक असलेली रजा मिळावी याच कामा साठी ते मुंबई येथे गेले असल्याचे सांगण्यात येत आहे काल रात्री ते परतीचा प्रवास करत होते. रात्री दहा च्या सुमारास त्यांनी मानवत चे एआे मुळे यांना शेवटचा फोन केला होता त्या अनुषंगाने मनमाड येथून रेल्वे पुलीस ने रात्री साडेतीन वाजता मुळे यांना फोन करून वगरे यांच्या विषयीची माहीती दिली. त्या मुळे वगरे यांचे पार्थीव घेण्या साठी नाते वाईक मनमाडच्या दिशेने रवाना झाले आहेत सखाराम वगरे हे माजलगाव तालुक्यातील सोन्ना-थडी या गावचे रहीवाशी असल्याचे सांगण्यात येते.

यशस्वी होण्यासाठी करा तयारी स्पर्धा परिक्षेची

💎 चालू घडामोडी व दिनविशेष 💎
१.१२.२०१६

💥 अर्थसत्ता 💥
💎 सॅमसंग इलेक्ट्राॅनिक्सचे विभाजन होणार
💎 जानेवारीत मुंबईत ‘उद्योगबोध’ जागतिक परिषद
💎 जनधन खात्यातून महिन्याला फक्त १० हजार काढण्याची मर्यादा
💎 दूरसंचार क्षेत्रात १० अब्ज डॉलरची परकीय गुंतवणूक

💥 क्रीडा 💥
💎 एआयएफएफला ‘एएफसी पुरस्कारा’चे नामांकन
💎 ब्राझीलच्या क्लबला जेतेपद देण्याचा प्रस्ताव
💎 कोहलीची ‘विराट’ झेप!

💥 तंत्र-विज्ञान 💥
💎 गुरूसारखा उष्ण बाह्य़ग्रह सापडला
💎 शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांना गुगलची मानवंदना

💥 आंतरराष्ट्रीय 💥
💎 फॉर्च्युनच्या ५० कॉर्पोरेट्स हेड्स लिस्टमध्ये भारतीय वंशाचे ४ व्यक्ती
💎 थायलंडच्या राजेपदासाठी वाजिरालोंगकोर्न यांना निमंत्रण
💎 अमेरिकेच्या व्यापार मंत्रिपदावर विलबर रॉस यांची नेमणूक शक्य
💎 बोफोर्स तोफा खरेदीचा अमेरिकेशी झाला करार
💎 बापूंचा चरखा ठरला जगात प्रभावशाली

💥 राष्ट्रीय 💥
💎 थिएटरमध्ये चित्रपट सुरु होण्याआधी तिरंग्यासह राष्ट्रगीत बंधनकारक
💎 'डिजीटल पेमेंट'च्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांची समिती
💎 ओबीसी वर्गात १५ नवीन जातींचा समावेश

💥 महाराष्ट्र 💥
💎 महाराष्ट्राला अवयवदानात ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ पुरस्कार
💎 राज्यासह मुंबईत एचआयव्ही संसर्ग घटला

💎 💎 दिनविशेष 💎 💎

💥 💥 डिसेंबर १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३५ वा किंवा लीप वर्षात ३३६ वा दिवस असतो.

💥 💥 जागतिक दिन
लोकशिक्षण दिन (भारत)

💥 💥 ठळक घडामोडी
१६४० - पोर्तुगालला स्पेनपासून स्वातंत्र्य. होआव चौथा, पोर्तुगाल राजेपदी.
१८२२ - पेद्रो पहिला ब्राझिलचा सम्राट झाला.
१८३५ - हान्स क्रिस्चियन अँडरसनच्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.
१९५८ - मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
१९६३ - नागालँड भारताचे १६वे राज्य झाले.
१९६५ - भारतात सीमा सुरक्षा दल (बॉर्डर सिक्युरीटी फोर्स) ची स्थापना.
१९७३ - पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य.
१९७४ - टी.डब्ल्यू.ए. फ्लाइट ५१४ वॉशिंग्टन डलेस ईंटरनॅशनल विमानतळाच्या वायव्येस कोसळली. ९२ ठार.
१९८१ - युगोस्लाव्हियाच्या आयनेक्स एड्रिया एव्हियोप्रोमेत विमानकंपनीचे डी.सी. ९ जातीचे विमान कोर्सिकामध्ये कोसळले. १७८ ठार.
२००१ - ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्सचे शेवटचे उड्डाण.

💥 💥 जन्म
१०८१ - लुई सहावा, फ्रांसचा राजा.
१०८३ - ऍना कॉम्नेना, बायझेन्टाईन इतिहासकार.
१९८० - मोहम्मद कैफ, भारतीय क्रिकेट खेळाडू.

💥 💥 मृत्यू
११३५ - हेन्री पहिला, इंग्लंडचा राजा.
१९७३ - डेव्हिड बेन गुरियन , इस्त्रायलचा पहिले पंतप्रधान.

💥 💥 दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चुका नसतीलच असे सांगता येणार नाही.

💥 महाराष्ट्र 💥

💎 महाराष्ट्राला अवयवदानात ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ पुरस्कार
► महाराष्ट्राला अवयवदानामध्ये ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ हा पुरस्कार मिळाला आहे.
► ‘अंगदान’चा उत्सव साजरा करण्याचे आवाहन मोदींनी ‘मन की बात’ मध्ये केले होते.
► त्यानंतर महाराष्ट्राणे १ ऑगस्ट रोजी ‘महाअवयवदान अभियान’ हाती घेतले होते.
► या अभियानाला महाराष्ट्र राज्यातून भरघोस प्रतिसाद मिळाला.
► राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्ताने आज या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
► आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.