तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 31 December 2016

ग्राहक हीत जोपासण्याला शासनाचे प्राधान्य

विनोद तायडे
वाशिम, दि. ३१ :  ग्राहकाचे हित जोपासण्याला राज्य शासनाचे प्राधान्य असून त्यादृष्टीने जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून ग्राहकांच्या समस्या तातडीने निकाली काढण्याचा प्रयत्न होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेला सेवा हमी कायदा ग्राहकांच्या हिताचा असून यामुळे विविध शासकीय सेवा वेळेत मिळणे शक्य झाल्याचे राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष (मंत्रीस्तरीय) अरुण देशपांडे यांनी आज जिजाऊ सभागृह येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. याप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे उपस्थित होते.

श्री. देशपांडे म्हणाले की, ग्राहक हित जोपासण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. ग्राहकांशी संबंधित शासकीय विभागांचे प्रमुख व ग्राहकांचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक प्रत्येक महिन्याला होते. यामध्ये ग्राहकांच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. जिल्हास्तरावरील या महत्वाच्या बैठकीला सर्व संबंधित विभागांच्या सक्षम अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक असून तशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी तातडीने निकाली निघण्यास मदत होईल. राज्य शासनाने ग्राहक धोरण निश्चित करण्याचे ठरविले असून असे धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सध्या ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे यामाध्यमातून फसवणूक झाल्यास अथवा या सेवेबद्दल कोणाकडे दाद मागायची, याविषयी ग्राहक संभ्रमात असतात. अनेकवेळा ऑनलाईन शॉपिंगची सुविधा पुरविणाऱ्या कंपन्या आपली जबाबदारी झटकतात. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्राहक संरक्षण कायद्यात बदल करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे श्री. देशपांडे यांनी सांगितले.

ग्राहकांच्या तक्रारी टोल फ्री क्रमांक अथवा व्हॉटसअपद्वारे स्वीकारण्याची सुविधाही अनेक शासकीय विभागांनी उपलब्ध करून दिली आहे. औषधे, हॉटेल अथवा खाद्य पदार्थविषयक कोणतीही तक्रार असल्यास ती अन्न व औषध प्रशासनाच्या १८०० २२२ ३६५ या टोल फ्री क्रमांकावर स्वीकारली जाते. तसेच कमाल विक्री मूल्य (एमआरपी) पेक्षा अधिक दर आकाराला जात असल्यास अथवा वस्तूच्या वजनविषयक तक्रारी स्वीकारण्यासाठी वैधमापक शास्त्र विभागाने अमरावती विभागाकरिता असलेल्या ९४२२२५८८०० या व्हॉटसअप क्रमांक व मुंबई कार्यालयाचा ०२२-२२८८६६६६ हा क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. तरी या क्रनाकावर ग्राहकांनी आपल्या तक्रारी देवून त्यांचे निराकरण करून घेण्याचे आवाहन श्री. देशपांडे यांनी केले.

क्रिकेट कोच परिक्षेत अमोल खोब्रागडे विदर्भातून प्रथम

विनोद तायडे
वाशीम  - विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपूर व्दारा नागपूर येथे घेण्यात आलेल्या लेव्हल ओ च्या कोच परिक्षेत विदर्भातुन वाशीम येथील क्रिकेट प्रशिक्षक अमोल साहेबराव खोब्रागडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या परिक्षेत विदर्भातुन तब्बल 22 जण परिक्षेस बसले होते. त्यापैकी केवळ तीनच जण उत्तीर्ण झाले आहेत. अमोल खोब्रागडे यांनी या परिक्षेत प्रथम येण्याचा मान पटकावुन जिल्हयाच्या सन्मानात भर टाकली.
    विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या नागपूर येथील कोचेस अकॅडमीने आयोजीत केलेल्या जिल्हयासाठीच्या कोसेस ट्रेनिंगच्या सहा दिवसानंतर नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या लेखी व प्रात्यक्षीक स्वरुपाच्या या परिक्षेत विदर्भातील विविध जिल्हयातून 22 प्रशिक्षकांनी भाग घेतला होता. त्यापैकी तीनच जण उत्तीर्ण झाले. परिक्षेच्या निकालामध्ये जिल्हयातून प्रथम येण्याचा बहूमान अमोल खोब्रागडे यांनी प्राप्त करुन जिल्हयाचा नावलौकीक वाढविला. सद्यस्थितीत कोचेस परिक्षेमध्ये पास होणारे ते जिल्हयातील एकमेच कोच असून जिल्हयाला लेदर बॉल क्रिकेटमध्ये अधिक उंचीवर नेण्याचा त्यांचा मानस असून जिल्हयातून चांगले क्रिकेटपटु आपल्या हातुन घडुन राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर जावेत अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
-------------------------------------------------------------

अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांना पोलीस शिपाई भरती पुर्व प्रशिक्षणाबाबत आवाहन

विनोद तायडे
वाशिम, दि. ३१ :  मुस्लिम, ख्रिश्चन,बौध्द, शीख, पारसी आणि जैन या अल्पसंख्यांक समाजातील इच्छुक उमेदवारांना शासनामार्फत विनामुल्य पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरिता इच्छुक उमेदवारांनी मंगळवार, दिनांक ३ जानेवारी २०१७ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा पोलीस मुख्यालय (पोलीस कवायत मैदान) येथे निवड चाचणीकरिता अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

प्रशिक्षणार्थीचे वार्षिक उत्पन्न रुपये दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त नसावे,उमेदवार १८ ते २५ वर्षे वयोगटातील व उमेदवार इयत्ता १२ वी उत्तीर्ण असावा,उमेदवारांची उंची - महिला १५५ सें.मी. व पुरुष १६५ सें.मी. छाती- पुरुष- ७९ सें.मी. (फुगवुन ८४ सें.मी.) असणे आवश्यक आहे. उमेदवारांने सोबत शैक्षणिक अर्हता, रहिवासी दाखला,आधारकार्ड, सेवायोजन कार्यालयाअंतर्गत नाव नोंदणी दाखला इत्यादी कागदपत्रांची सत्यप्रत देणे आवश्यक राहील. उमेदवार शाररीकदृष्टा निरोगी व सक्षम असावा.

प्रशिक्षण दोन महिन्याचे असून दररोज ३ तासाचे प्रशिक्षण वर्ग व २ तासाचे मैदानी प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षणार्थ्यांस दरमहा १५०० रुपये प्रमाणे विद्यावेतन दिले जाईल. आहे. गणवेश साहित्यासाठी १००० रुपये एकरकमी अनुदान देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात मैदानी प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण संस्थेमार्फत चहापान व अल्पोपहार सुध्दा देण्यात येणार आहे. निवडलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणादरम्यान निवासाची व्यवस्था स्वत: करावी लागेल. तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक ३ जानेवारी २०१७ रोजी सकाळी १० वाजता पोलीस कवायत मैदान येथे अर्ज व सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह उपस्थित राहावे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

*****

भुवैज्ञानिक ,भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विविध पदांच्या मुलाखती ४ जानेवारी रोजी

मोईन खान

परभणी:-वरिष्ठ भुवैज्ञानिक, भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा परभणी या कार्यालया अंतर्गत प्रयोगशाळेतील कंत्राटी पद भरती करीता दिनांक १७ डिसेंबर २०१६ रोजी रसायने, अनुजैविक तज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा मदतनीस संवर्ग निहाय पात्र उमेदवारांची चाळणी पद्धतीने लेखी परीक्षा घेण्यात आलेली होती. त्यानुसार मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची गुणानुक्रमे यादी जनरल मिरीट लिस्ट www.parbhani.nic.in परभणी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच  वरिष्ठ भुवैज्ञानिक, भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा परभणी या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आलेले आहे. मुलाखतीचा बुधवार दि. ४ जानेवारी २०१७, मुलाखतीची वेळ दुपारी १३.00 वाजता, मुलाखतीचे स्थळ ः- मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी यांचे कार्यालय येथे घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी वेळेवर मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे. उमेदवारांना कुठल्याही प्रकारचा प्रवास भत्ता देय असणार नाही, असे वरिष्ठ भुवैज्ञानिक, भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांनी कळविले आहे.

आज तुळजाभवानी दुध संकलन केंद्राचे फुलचंद कराड यांच्या हस्ते उदघाटन

आज तुळजाभवानी दुध संकलन केंद्राचे फुलचंद कराड यांच्या हस्ते उदघाटन

परळी वैजनाथ:- परळी तालुक्यातील मौजे तळेगाव येथे रविवार,दि.०१ जानेवारी २०१7 रोजी साय. ६ वाजता तालुका दुध संघाचे तालुकाध्यक्ष तथा भगवानसेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांच्या शुभ हस्ते तर प्रमुख उपस्थिती  महाराष्ट्र ग्रामिण बँक संचालक, भारतीय केेंद्रीय कामगार शिक्षण मंडळ चेअरमन तथा उपाध्यक्ष ओबीसी कॉंग्रेस सेल महाराष्ट्र राज्य वसंतराव मुंडे, महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे  मॅनेजर सोळंके साहेब, समस्त गावकरी व मित्र मंडळ आदींच्या उपस्थितीत तुळजाभवानी दुध संकलन केंद्रचे उद्घाटन सपंन्न होणार आहे. श्री संत भगवानबाबा व्यायाम शाळा तळेगाव येथे सर्व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत दर्शऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे तालुकाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांनी केले आहे.

तर मुरलीधर मुंडे यांच्या प्रयत्नातुनच हे केंद्र उभे करण्यात येत असुन शेतकरी वर्गाला जोड धंदा व तसेच मजुर, बेरोजगारांना हाती काम म्हणून शेतीला जोड धंदा या उद्देशाने चलो गॉव कि और ! असे हि म्हणल्या जात आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे तुळजाभवानी दुध संकलन केंद्राच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांना पोलीस शिपाई भरती पुर्व परिकाषा प्रशिक्षणा साठी निवड ३ जानेवारी रोजी

मोईन खान

परभणी:-जिल्हयातील अल्पसख्‍यांक समाजातील उमेदवारांना (मुस्लिम, ख्रिश्‍चन, बौद्ध, शिख, पारसी, जैन आणि ज्यु) पोलीस दलामध्ये नोकरीच्या समान संधी मिळण्याच्या दृष्टीने विनामुल्य पोलीस शिपाई भरती पुर्व परीक्षा प्रशिक्षण वर्ग कार्यक‘म वर्ष २०१६-१७ मध्ये राबवण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी उमेदवार अल्पसं‘यांक प्रवर्गातील (मुस्लिम, ख्रिश्‍चन, बौद्ध, शिख, पारसी, जैन आणि ज्यु) असणे  आवश्यक आहे. नियम व अटी पुढीलप्रमाणे ः- प्रशिक्षणार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न तहसीलदार यांच्या मार्फत निर्गमीत करण्यात आलेले २०१६-१७ चे उत्पन्नाचे प्रमाणपत्र रूपये ६ लाख (रू. सहा लाख) पेक्षा जास्त नसावे. वयोमर्यादा १८ ते २८ वयोगटातील असावा व उमेदवार इयत्ता १२ वी उत्तीर्ण असावा. उंची पुरूष १६५ से.मी. व महिला उंची १५५ से.मी., पुरूष छाती न फुगवता ७९ से.मी., फुगवुन ८४ से.मी. असणे आवश्यक आहे. स्वतःचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट, शैक्षणिक अर्हता, उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत निर्गमीत करण्यात आलेले जातीचे प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, आधार कार्ड, सेवायोजन कार्यालयाअंर्तंगत नाव नोंदणी दाखला, ओळखपत्राची सत्यप्रत व इत्यादी कागदपत्रे देणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार शारिरीकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा. प्रशिक्षण दोन महिन्याचे असून दररोज तीन तासांचे वर्ग प्रशिक्षण व दोन तासांचे मैदानी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रक्षिणार्थ्यास प्रशिक्षणादरम्यान रू. १५००/- प्रतीमहा प्रमाणे विद्यावेतन देण्यात येणार आहे. गणवेश साहित्यासाठी रू. १०००/-  एवढे एकरकमी अनुदान दिले जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान मैदानी प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण संस्थेमार्फत चहापान व अल्पोपहार देण्यात येणार आहे. निवडलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान निवासाची व्यवस्था स्वतः करावी लागेल. या अटीची पुर्तता करणार्‍या उमेदवारांनी दि. ३ जानेवारी २०१७ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.00 वाजेपर्यंत या कालावधीत जिल्हा मुख्‍यालयाचे पोलीस परेड ग्राऊंडवर परभणी विहीत नमुन्यातील अर्ज आणि सर्व कागदपत्रांच्या सत्यप्रतींसह निवड चाचणीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी परभणी यांनी केले आहे.

फोटोग्राफर असोशियशनच्या वतिने बालगृहात खाऊ वाटप

सुजित शिंदे
कळंब:-फोटोग्राफर असोसिएशन च्या वतीने सहारा बालगह खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप करून सरत्या वर्षीला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतोत्सव साजरा करण्यात आला.                            या कार्यक्रमा प्रसंग कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सूर्यकांत नारकर प्रमुख उपस्थितीत पडवळ मामा व कळंब फोटोग्राफर असोसिएशन अध्यक्ष बालाजी बाहेती उपाध्यक्ष संतोष घुले सचिव वसीम सय्यद संघटना सतिश आडसूळ सल्लागार महादेव शेवते व सर्व फोटोग्राफर  च्या हस्ते साहरा बालगहातील विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटत करण्यात आले                                                या प्रसंगी या बालगहातील विद्यार्थ्यांना मिळालेल्या आयुष्याचा मनसोक्त आनंद घ्यावा. तसेच आई विषयी भावना व्यक्त करणारे काव्य सादर केले या  कार्यक्रमाचे प्रास्ताविक  शरद आडसूळ यांनी केले व कार्यकमाचे आभार प्रदर्शन संस्थाचे वतीने आश्रुबा कोठावळे सर यांनी केले या कार्यक्रमा प्रसंगी कळंब तालुका फोटोग्राफर असोसिएशन चे सर्व पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते


लॉटरीचे दुकान फोडून ५२ हजाराचा मुद्दे माल लंपास

सचिन पवार
औरंगाबाद:-जुना मोंढा परिसरात चोरट्याने 5 online लॉटरी च्या दुकान फोडून  3 मोबाइल रोकड असा जवळपास 52 हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी केली आहे या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

शासनाचा ड्रिम प्रोजेक्ट जलयुक्त शिवार मधून उकळीपेन सर्कल मध्ये कामे करावित

विनोद तायडे
वाशीम - शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्वाच्या ठरलेल्या आणि मुख्यमंत्र्यांचा ड्रिम प्रोजक्ट असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत या भागातील शेतकर्‍यांच्या हालअपेष्टा थांबविण्यासाठी उकळीपेन या गावाला या योजनेत सामावुन घेवून उकळीपेन सर्कलमध्ये 2017-18 या सत्रात तात्काळ प्रभावाने जलयुक्त शिवार योजनेची कामे सुरु करावीत अशी मागणी उकळीपेन सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्या अमिना हुसेन जानीवाले यांनी केली आहे. यासंदर्भात जि.प. अध्यक्षा सौ. हर्षदाताई देशमुख यांना 29 डिसेंबर रोजी आपल्या मागणीचे निवेदन जानीवाले यांनी दिले.
    दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, 2015-16 मध्ये माझ्या सर्कलमध्ये सर्वाधिक जलयुक्त शिवार अंतर्गत असलेल्या कामाची निकड असतांना माझे सर्कल डावलल्या गेले. माझे सर्कल जलयुक्त शिवारच्या कामापासुन वंचित ठेवल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये रोष व्याप्त आहे. सन 2014-15 पासून सुरु असलेल्या ही योजना शेतकर्‍यांसाठी वरदान ठरत आहे. माझ्या सर्कलमध्ये धुमका, बोराळा, तामसाळा, मोहगव्हाण, सुरकंडी, सायखेडा, ङ्गाळेगाव, शिरपुटी, अंजनखेडा अशा एकूण चौदा गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेची नितांत गरज आहे. शिवारातील नदी नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करुन सिमेंट प्लग, नालाबांध आदी कामे जि.प. लघुसिंचन विभाग, कृषी विभाग तथा भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणेमार्ङ्गत माझ्या सर्कलमध्ये देण्यात यावी. 2017-18 च्या विकास आराखड्यात जि.प. उकळीपेन सर्कलचा समावेश करुन त्यासाठी पर्याप्त निधी उपलब्ध करुन देत उन्हाळा सुरु होण्यापुर्वीच उल्लेखीत कामे सुरु करण्यात यावीत. उकळीपेन सर्कल जलयुक्त शिवार योजनेत सामावून घेवून या भागातील शेतकर्‍यांना न्याय देण्याची मागणी जि.प. सदस्या जानीवाले यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

दाते पंचांगावर कार्यवाहीची विविध आंबेडकरी संघटनांची मागणी

विनोद तायडे
वाशीम  - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यंाच्या 14 एप्रिल या दिनाला अशुभ दिवस असे लिहीणार्‍या दाते पंचांगाची 2017 च्या दिनदर्शिकेची विक्री बंद करुन प्रकाशकावर कारवाईची मागणी विविध आंबेडकरी संघटनांनी 31 डिसेंबर रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देवून केली आहे.
    संपूर्ण महाराष्ट्रात दाते पंचाग दरवर्षी दिनदर्शिका प्रकाशित करीत असते. आणि यावर्षीही 2017 ची दाते पंचाग व्यवस्थापनाने दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. या दिनदर्शिकेत तथागत गौतम बुध्द म्हणजे बुध्दपोर्णिमा, 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाला अशुभ दिवस म्हणून तर 6 डिसेंबर या डॉ. बाबाासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला चांगला दिवस व 26 जानेवारी या दिनाला वर्ज्य दिवस म्हणून दिनदर्शिकेत नमूद केले आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेच्या व भारतीय जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. परंतु या देशाला संविधान अर्पण करणार्‍या भारतीय घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जगाला शांतीचा संदेश देणार्‍या तथागत गौतम बुध्द या महामानवाबद्दल दिनदर्शिकेत असे अशुभ दिवस लिहीणार्‍या दाते पंचांगकर्त्यांवर योग्य ती कार्यवाही करुन दाते पंचांग दिनदर्शिकेची महाराष्ट्रात होणारी विक्री त्वरीत बंद करावी. अन्यथा जिल्हयातील आंबेडकरी जनतेच्या वतीने दाते पंचांग विरुध्द तीव्र असे आंदोलन कायदेशीर मार्गाने करावे लागेल. समस्त आंबेडकरी जनतेच्या भावना लक्षात घेता संबंधीत पंचाग व्यवस्थापनाविरुध्द कारवाईची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना रिपाई कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार पडघाण, पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे, सामाजीक कार्यकर्ते माधव डोंगरदिवे, दलीत मुक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी भगत, पीआरपीचे युवा अध्यक्ष संतोष इंगळे, रिपब्लीकन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष प्रविण पट्टेबहादूर, रिपाई कामगार आघाडीचे तालुका अध्यक्ष गजेंद्र राऊत आदींची उपस्थिती होती.
-------------------------------------------------------------

रब्बी हंगामा करीता प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी १०


विनोद तायडे
वाशिम, :  रब्बी हंगामाकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता विमा हप्ता भरण्यासाठी १० जानेवारी २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कालावधीत पिक विमा प्रस्ताव व विमा हप्त्याची रक्कम बँकेमध्ये जमा करून या योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी केले आहे.

रब्बी हंगामाकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१६ होती. जुन्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्याने शेतकऱ्यांना पीक विमा हप्ता बँकेत जमा करण्यासाठी समस्या निर्माण झाल्याने विमा हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पीक कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित पिकांसाठी ही योजना बंधनकारक आहे. बिगर कर्जदार शेतकरी आपला पीक विमा प्रस्ताव व विमा हप्त्याची रक्कम दिनांक १० जानेवारी २०१७ पर्यंत नजीकच्या बँकेत जमा करू शकतील, असे जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी कळविले आहे.

रब्बी हंगामातील गहू (बागायती) व हरभरा या पिकांसाठी वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये आहे. तर करडई पिकासाठी जिल्ह्यातील वाशिम, रिसोड व मालेगाव या तीन तालुक्यांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे. गहू (बागायती) या पिकासाठी प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम ३३ हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता प्रति हेक्टरी २२४.४० रुपये आहे.

हरभरा पिकासाठी प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम २४ हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता प्रति हेक्टरी १५८.४० रुपये आहे. तसेच करडई पिकासाठी प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कम २२ हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता प्रति हेक्टरी ३२३.४० रुपये आहे. भुईमुग पिकासाठी जिल्ह्यातील कारंजा तालुका वगळून सर्व तालुक्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू असून विमा संरक्षित रक्कम ३६ हजार रुपये प्रति हेक्टर आहे. याकरिता शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २३७.६० रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे.

ग्रामपंचायतीने जागा दिल्यास सौरउर्जा प्रकल्प

आशिष धुमाळ
परतूर:-राज्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीने दहा एकर जागा दिल्यास दोन मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी शासन मदत करेल. ही वीज थेट गावशिवारातील एक हजार शेतकऱ्यांना दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केली.

नागपूरच्या स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात "सकाळ - ऍग्रोवन सरपंच महापरिषदे'त दुसऱ्या दिवशी सरपंचांना ग्राम ऊर्जाविकास धोरणाची माहिती देताना ऊर्जामंत्री बोलत होते. "अपारंपरिक ऊर्जाविकास' या विषयावरील परिसंवादात ते सहभागी झाले. ऊर्जा बायोसिस्टिम्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक गजानन पाटील, जैन इरिगेशन सिस्टिमचे वरिष्ठ व्यवस्थापक संजीव फडणीस, बॉंबे नॅचरल हिस्ट्री ऑफ सोसायटीचे सहायक संचालक संजय करकरे, "सकाळ'च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे व्यासपीठावर उपस्थित होते.

"राज्यातील कोणत्याही गावात दहा एकर जमिनीवर सौर प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यात सरपंच व ग्रामपंचायतींची भूमिका मोलाची ठरणार आहे. राज्यातील 40 लाख वीजपंप सोलर ऊर्जेवर देण्याची चाचपणी सरकारकडून सुरू आहे. कोणत्याही ग्रामपंचायतीने जागा मिळवून द्यावी आणि त्यावर दोन मेगावॉटचा प्रकल्प उभारावा. त्यातून एक हजार शेतकऱ्यांना सोलर वीज पुरविली जाणार आहे,' असे बावनकुळे यांनी सांगितले. त्यावर किती सरपंच सोलर ऊर्जा प्लांटला जागा देण्यासाठी तयार आहेत, असे ऊर्जामंत्र्यांनी सभागृहात विचारताच सर्व सरपंचांनी हात उंचावून प्रतिसाद दिला.

बावनकुळे म्हणाले, की राज्यात आजही सहा हजार गावांमध्ये 18 लाख कुटुंबे विजेपासून वंचित आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी शासनाने ठोस धोरण आखले असून, शेती व घरगुती विजेच्या फीडरचे सेपरेशन करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. केंद्राने राज्याला पाच हजार कोटी रुपये दिले असून, यातील अडीच हजार कोटी फीडर सेपरेशनसाठी खर्च केले जाणार आहेत. राज्याने अपारंपरिक ऊर्जेबाबत धोरण निश्‍चित केले असून, 14 हजार 400 मेगावॉट वीजनिर्मिती केली जाणार आहे. शिवाय, दीनदयाल उपाध्याय योजनेतून शेती व गावांचा वीजपुरवठा वेगवेगळा करण्याचे काम केले जाईल. शासनाने 2019 पर्यंत सर्वांसाठी वीज हे उद्दिष्ट ठेवले आहे. गावे, नगरांमध्ये वीज जोडणीसाठी एनओसीची गरज लागणार नाही. जो मागेल त्याला पुराव्याच्या आधारे वीज जोडणी दिली जाईल.

पाणीपुरवठा योजनांची थकबाकी भरण्यासाठी नळसंजीवनी योजना शासनाने सुरू केली आहे. ग्रामपंचायतींनी थकीत बिलाच्या 50 टक्के रकमेचा भरणा केला तर उर्वरित रक्कम माफ केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

वीज व्यवस्थापकांची नियुक्ती
गावपातळीवर वीजसमस्या सोडविण्यासाठी आता वीज व्यवस्थापक नियुक्त करण्यात येणार आहे. त्याची नेमणूक करून ग्रामसभेचा ठराव वीज अभियंत्याकडे द्यावा. महाऊर्जा त्याला तीन महिन्यांचे प्रशिक्षण देऊन सक्षम करेल. यासाठी सरपंचांनी गावातील इलेक्‍ट्रिकल आयटीआय झालेल्या तरुणाची निवड करावी, असे बावनकुळे म्हणाले.

ऐतिहासिक स्थळे उजळणार
राज्यातील अर्ध्यापेक्षा अधिक गड - किल्ले अंधारात आहेत. एलिफंटासारखे स्थळ वीज नसल्याने सायंकाळी पाचनंतर बंद करावे लागते. येथे वीजपुरवठ्यासाठी समुद्रातून वीज टाकण्याचे काम जानेवारीत सुरू होणार आहे. यासाठी 28 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

7 हजार प्रकल्प उभारणार
सध्या निर्माण होणारी वीज ही साठवता येत नाही, त्यामुळे कुठे रात्री तर कुठे दिवसा ही वीज शेतीला मिळते. आज सर्वांना दिवसा वीज हवी. ही समस्या सोडविण्यासाठी राज्यात सध्या असलेल्या 40 लाख कृषिपंपांना सौरऊर्जेने जोडण्याचे काम केले जाणार असून, यासाठी 7 हजार प्रकल्प उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.