तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 31 December 2016

दाते पंचांगावर कार्यवाहीची विविध आंबेडकरी संघटनांची मागणी

विनोद तायडे
वाशीम  - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यंाच्या 14 एप्रिल या दिनाला अशुभ दिवस असे लिहीणार्‍या दाते पंचांगाची 2017 च्या दिनदर्शिकेची विक्री बंद करुन प्रकाशकावर कारवाईची मागणी विविध आंबेडकरी संघटनांनी 31 डिसेंबर रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देवून केली आहे.
    संपूर्ण महाराष्ट्रात दाते पंचाग दरवर्षी दिनदर्शिका प्रकाशित करीत असते. आणि यावर्षीही 2017 ची दाते पंचाग व्यवस्थापनाने दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. या दिनदर्शिकेत तथागत गौतम बुध्द म्हणजे बुध्दपोर्णिमा, 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाला अशुभ दिवस म्हणून तर 6 डिसेंबर या डॉ. बाबाासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला चांगला दिवस व 26 जानेवारी या दिनाला वर्ज्य दिवस म्हणून दिनदर्शिकेत नमूद केले आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेच्या व भारतीय जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. परंतु या देशाला संविधान अर्पण करणार्‍या भारतीय घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जगाला शांतीचा संदेश देणार्‍या तथागत गौतम बुध्द या महामानवाबद्दल दिनदर्शिकेत असे अशुभ दिवस लिहीणार्‍या दाते पंचांगकर्त्यांवर योग्य ती कार्यवाही करुन दाते पंचांग दिनदर्शिकेची महाराष्ट्रात होणारी विक्री त्वरीत बंद करावी. अन्यथा जिल्हयातील आंबेडकरी जनतेच्या वतीने दाते पंचांग विरुध्द तीव्र असे आंदोलन कायदेशीर मार्गाने करावे लागेल. समस्त आंबेडकरी जनतेच्या भावना लक्षात घेता संबंधीत पंचाग व्यवस्थापनाविरुध्द कारवाईची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना रिपाई कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार पडघाण, पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे, सामाजीक कार्यकर्ते माधव डोंगरदिवे, दलीत मुक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी भगत, पीआरपीचे युवा अध्यक्ष संतोष इंगळे, रिपब्लीकन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष प्रविण पट्टेबहादूर, रिपाई कामगार आघाडीचे तालुका अध्यक्ष गजेंद्र राऊत आदींची उपस्थिती होती.
-------------------------------------------------------------

No comments:

Post a comment