तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 31 December 2016

अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांना पोलीस शिपाई भरती पुर्व परिकाषा प्रशिक्षणा साठी निवड ३ जानेवारी रोजी

मोईन खान

परभणी:-जिल्हयातील अल्पसख्‍यांक समाजातील उमेदवारांना (मुस्लिम, ख्रिश्‍चन, बौद्ध, शिख, पारसी, जैन आणि ज्यु) पोलीस दलामध्ये नोकरीच्या समान संधी मिळण्याच्या दृष्टीने विनामुल्य पोलीस शिपाई भरती पुर्व परीक्षा प्रशिक्षण वर्ग कार्यक‘म वर्ष २०१६-१७ मध्ये राबवण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी उमेदवार अल्पसं‘यांक प्रवर्गातील (मुस्लिम, ख्रिश्‍चन, बौद्ध, शिख, पारसी, जैन आणि ज्यु) असणे  आवश्यक आहे. नियम व अटी पुढीलप्रमाणे ः- प्रशिक्षणार्थीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न तहसीलदार यांच्या मार्फत निर्गमीत करण्यात आलेले २०१६-१७ चे उत्पन्नाचे प्रमाणपत्र रूपये ६ लाख (रू. सहा लाख) पेक्षा जास्त नसावे. वयोमर्यादा १८ ते २८ वयोगटातील असावा व उमेदवार इयत्ता १२ वी उत्तीर्ण असावा. उंची पुरूष १६५ से.मी. व महिला उंची १५५ से.मी., पुरूष छाती न फुगवता ७९ से.मी., फुगवुन ८४ से.मी. असणे आवश्यक आहे. स्वतःचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट, शैक्षणिक अर्हता, उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत निर्गमीत करण्यात आलेले जातीचे प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, आधार कार्ड, सेवायोजन कार्यालयाअंर्तंगत नाव नोंदणी दाखला, ओळखपत्राची सत्यप्रत व इत्यादी कागदपत्रे देणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार शारिरीकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा. प्रशिक्षण दोन महिन्याचे असून दररोज तीन तासांचे वर्ग प्रशिक्षण व दोन तासांचे मैदानी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रक्षिणार्थ्यास प्रशिक्षणादरम्यान रू. १५००/- प्रतीमहा प्रमाणे विद्यावेतन देण्यात येणार आहे. गणवेश साहित्यासाठी रू. १०००/-  एवढे एकरकमी अनुदान दिले जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान मैदानी प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण संस्थेमार्फत चहापान व अल्पोपहार देण्यात येणार आहे. निवडलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान निवासाची व्यवस्था स्वतः करावी लागेल. या अटीची पुर्तता करणार्‍या उमेदवारांनी दि. ३ जानेवारी २०१७ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.00 वाजेपर्यंत या कालावधीत जिल्हा मुख्‍यालयाचे पोलीस परेड ग्राऊंडवर परभणी विहीत नमुन्यातील अर्ज आणि सर्व कागदपत्रांच्या सत्यप्रतींसह निवड चाचणीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी परभणी यांनी केले आहे.

No comments:

Post a comment