तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 31 December 2016

क्रिकेट कोच परिक्षेत अमोल खोब्रागडे विदर्भातून प्रथम

विनोद तायडे
वाशीम  - विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपूर व्दारा नागपूर येथे घेण्यात आलेल्या लेव्हल ओ च्या कोच परिक्षेत विदर्भातुन वाशीम येथील क्रिकेट प्रशिक्षक अमोल साहेबराव खोब्रागडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या परिक्षेत विदर्भातुन तब्बल 22 जण परिक्षेस बसले होते. त्यापैकी केवळ तीनच जण उत्तीर्ण झाले आहेत. अमोल खोब्रागडे यांनी या परिक्षेत प्रथम येण्याचा मान पटकावुन जिल्हयाच्या सन्मानात भर टाकली.
    विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या नागपूर येथील कोचेस अकॅडमीने आयोजीत केलेल्या जिल्हयासाठीच्या कोसेस ट्रेनिंगच्या सहा दिवसानंतर नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या लेखी व प्रात्यक्षीक स्वरुपाच्या या परिक्षेत विदर्भातील विविध जिल्हयातून 22 प्रशिक्षकांनी भाग घेतला होता. त्यापैकी तीनच जण उत्तीर्ण झाले. परिक्षेच्या निकालामध्ये जिल्हयातून प्रथम येण्याचा बहूमान अमोल खोब्रागडे यांनी प्राप्त करुन जिल्हयाचा नावलौकीक वाढविला. सद्यस्थितीत कोचेस परिक्षेमध्ये पास होणारे ते जिल्हयातील एकमेच कोच असून जिल्हयाला लेदर बॉल क्रिकेटमध्ये अधिक उंचीवर नेण्याचा त्यांचा मानस असून जिल्हयातून चांगले क्रिकेटपटु आपल्या हातुन घडुन राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर जावेत अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
-------------------------------------------------------------

No comments:

Post a comment