तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 8 October 2016

सबसे तेज,तेजन्यूज हेडलाईन्स,राज्य,देश,विदेश,क्रिडा,संक्षिप्त.

तेजन्यूज हेडलाईन्स न्यूज नेटवर्क

⭐बीड = पंकजा मुंडेंनंतर आता भगवानगडचे महंत नामदेव स्वामी यांचीही ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे. यातली भाषा एखाद्याला महंताला न शोभणारीच आहे. मी फाडून खाईन, मी तयारीत आहे, माणसं थांबवली आहेत, अशा शब्दांत विरोध करणाऱ्यांना इशारा देण्याची भाषा महंत वापरात आहेत.

⭐मुंबई = नागपूर सुपर एक्सप्रेस हायवेला समांतर अशी एक गॅस पाईपलाइन टाकली जाणार आहे.गॅस, पेट्रोल डिझेल आणि एलपीजीची ही पाईपलाईन असेल. याद्वारे मुंबईतल्या तेल शुद्धिकरण प्रकल्पातून गॅस थेट विदर्भ आणि नागपूरपर्यंत पोहोचवला जाणार आहे.

⭐मुंबई = मुंबई महापालिका अभियंत्यांना दिलेल्या अपमानास्पद वागणूक प्रकरणी मनसे नगरसेवक संदीप देशपांडे आणि संदीप धुरी यांनी अखेर शरणागती पत्करली आहे. दोघंही शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात हजर झालेत. पोलीस स्टेशनमध्ये हजर होताच पोलिसांनी दोघांनाही अटक केलीय.

⭐ जम्मू काश्मीर = पुलवामा येथे दहशतवाद्यांनी पोलिसांकडील दोन शस्त्र पळवून नेल्याची माहिती.

⭐ मुंबई = मनसे नगरसेवक संदीप देशपांडे आणि संतोष धुरी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणा बाजी केली.

⭐ सिंधुदूर्ग = थरारक पाठलाग करुन बेकायदा दारू पकडली, दहा लाखांचा मुद्देमाल जप्त, लातूरकडे जाणाऱ्या दारु विरोधात आठवड्यातील दुसरी कारवाई, आंबोली येथील घटना.

⭐ मुंबई = मनसे कार्यकर्त्याचं शिवाजी पार्क पोलीस ठाण्यासमोर निदर्शन,महापालिकेने मनसेच्या दोन नगरसेवकां विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याच्या विरोधात निदर्शन.

⭐ नंदूरबार = शहरातील सुप्रिया नगरातील 3 दिवसापासून बेपत्ता युवकाचा मृतदेह त्याच परिसरात पावसाच्या पाण्याच्या डबक्यात सापडल्यामुळे खळबळ.

⭐ नागपूरमध्ये २५ ऑक्टोबर रोजी मराठा क्रांती मोर्चा.


⭐ कोल्हापूर = कागल पंचतारांकित एमआयडीसीत लॅबोरेटी कंपनीमध्ये स्फोट, दोन कामगार जागीच ठार.


⭐ नागपूर = सर्जिकल स्ट्राईकचे पाऊल योग्य नव्हते. हिंसेचे उत्तर हिंसाअसू शकत नाही, युद्ध हा पर्याय नाही - मेधा पाटकर.

⭐ रत्नागिरी = दापोलीत समुद्राचे पाणी अचानक 3 मच्छीमार बुडाले, स्थानिकांनी तिघांनाही काढले बाहेर, मच्छीमार इरफान कादिर यांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर असून दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

⭐ सोलापूर = बार्शीत व्यापा-यांच्या घरी धाडसी चोरी, ४२ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल लंपास, श्वान पथकासह पोलीस अधिकारी घटनास्थळावर दाखल.

⭐ नवज्योत कौर सिद्धू यांचा भाजपा मधून राजीनामा.

⭐ रत्नागिरी = दापोली येथील बुरोंडी समुद्रात दोघे बुडाले.

⭐ विरार पूर्वे कडील काळा हनुमान येथील शबाना मंजिल येथे हॉलचे छतकोसळून २ वर्षांच्या मुलीचा मृत्यू.

⭐ सोलापूर = रूपाभवानी परिसरात घरफोडी, 25 तोळे सोने लंपास, पोलीस घटनास्थळी दाखल.

⭐ सांगली = कुपवाड येथे एक तर्फी प्रेमातून युवकाच्या त्रासाला वैतागून बाप-लेकीचा पोलीस ठाण्यात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न. पोलिसांनी वाचविले प्राण. संदीप सुर्वे या युवकाला अटक.

⭐ चंद्रपूर = जिवती तालुक्यातील येल्लापूर येथील दत्ता निवृत्ति आंदे (37) या तरुण शेतक-याने केली आत्महत्या. त्याच्यावर 65 हजार रुपयांचे कर्ज होते.

⭐ भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना = पहिल्या दिवसाचा खेळ संपला, दिवसाअखेर भारताच्या 3 विकेट्स गमावत 267 धावा.

सबसे तेज,तेजन्यूज हेडलाईन्स ताज्या बातम्या राज्य,देश,विदेश,क्रिडा,संक्षिप्त

तेजन्यूज हेडलाईन्स न्यूज नेटवर्क

⭐रत्नागिरी = शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता फक्त पक्षाचं काम करणार असं त्यांनी जाहीर केले आहे. त्यांचा राजकीय वारसदार कोण असेल याची चर्चा सुरु झाली आहे.


⭐मुंबई = ऑक्टोबर महिन्यात पावसाने हजेरी लावली होती. मात्र, दोन दिवस पाऊस गायब झाल्याने शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवी दसरा मेळाव्या वरचे सावट दूर झाले आहे. पावसामुळे मेळावा होणार की नाही, याची कुजबुज सुरु होती. मात्र, शिवसेनेने मेळावा होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे शिवतिर्थावर वाघाची डरकाळी घुमणार आहे.


⭐बुलडाणा = जिल्ह्यातील चिखली तालुक्यातल्या कव्हळा जिल्हा परिषदशाळेत मध्यान्ह भोजनातून 42 विद्यार्थ्यांना विषबाधा


⭐हैदराबाद = वडिलांना ज्वेलरीच्या बिझनेसमध्ये यश मिळावे म्हणून ६८ दिवस उपवास ठेवणा-या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला आहे.  हैदराबाद मध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. कुमारी आराधना असे या मुलीचे नाव असून ती जैन समजातील आहे. आराधना सेंट फ्रान्सिस शाळे मध्ये १० व्या इयत्तेमध्ये शिकत होती.

⭐हैदराबाद = तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी वारंगलमधील देवी भद्रकाली साठी 11 किलो 700 ग्राम वजनाचा 3.6 कोटींचा सोन्याचा मुकूट बनवून घेतला आहे. 9 ऑक्टोबरला हा मुकूट देवीला चढवण्यात येणार आहे.
स्वतंत्र तेलंगणा राज्य अस्तित्वात आल्यास, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील देवी-देवतांना सोन्याचे दागिने अर्पण करेन, असा नवस के.चंद्रशेखर राव यांनी केला होता. स्वतंत्र तेलंगणासाठी करण्यात आलेल्या आंदोलना दरम्यान त्यांना हा नवस केल्याचे बोलले जात आहे.

⭐कराची = भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर धाबे दणालेल्या पाकिस्तान मध्ये मोठया प्रमाणावर अस्वस्थता पसरली असून, लवकरच तिथे आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रिझवान अख्तर यांना पदावरुन हटवले जाण्याची शक्यता आहे. पुढच्या काही आठवडयात हा बदल होऊ शकतो असे पाकिस्तानी प्रसार माध्यमांचे म्हणणे आहे.

= करी रोड येथील मोनो रेल ट्रॅकचा काही भाग निखळला, जीवितहानी नाही.

⭐ औरंगाबाद = टिळकनगर येथे मनपाच्या २० कोटीच्या भूंखडावर अतिक्रमण सुरु होते, आज दुपारी एक वाजता अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई केली.


⭐ नाशिक = सैन्यात भरतीच्या नावाखाली मुंबईच्या सहा तरुणांची 35 लाखांची फसवणूक, यशवंत मारुती पाटीलयांच्या फिर्यादी वरून संशयित प्रकाश विक्रम चव्हाण विरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

⭐ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे किसन नगरचे नगरसेवक योगेश जानकर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.


⭐ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी लोणावळ्या जवळील कार्ला गडावर पत्नी शालिनी ठाकरे व दोन्ही मुलांसमवेत येऊन कुलस्वामींनी आई एकविरेचे दर्शन घेतले.

⭐ कुर्ला पश्चिमेला न्यू मिल रोडवर पावर सबस्टेशन मध्ये आग लागली आहे, जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

⭐ सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे, त्यांना जागे करण्याचे आवाहन असून देशात व राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार येणार, त्यासाठी सज्ज राहाण्याचे आवाहन केले आहे - अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष.

⭐ चंद्रपूर = कांग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे रेल्वेने आगमन झाले असून, विदर्भ किसान काँग्रेस तर्फे आयोजित रॅली व धरणा कार्यक्रमात ते सहभागी झाले आहेत.


⭐गुजरातच्या ओखा रेल्वे स्थानकातून एका महिलेला ताब्यात घेतले असून, तिच्याकडे व्दारका मंदिराचा नकाशा सापडला.

⭐न्युझीलैंड विरुद्ध तिसर्या कसोटी सामन्यात 78  षटकात भारताच्या तीन बाद 217 धावा.


⭐ पिंपरी-चिंचवड युनिट तीनच्या पथकाने पिंपळे सौदागर येथे दोन गोडाऊनवर छापाटाकून ५ लाखांचा गुटखा केला जप्त.

⭐ जयललिता यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे, कावेरी पाणी वाटपाच्या मुद्यावरुन तामिळींच्या हक्कासाठी त्यांनी लढा दिला व त्या यशस्वी ठरल्या - एमडीएमके प्रमुख वायको.

⭐अहमदनगर = आघाडीचा भरवसा नाही, जि.प. मध्ये काॅंग्रेस स्वबळावरच लढणार-भाई जगताप

⭐बिडकीन (ता पैठण) येथील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी केले १२ लाख रुपये लंपास. शुक्रवारी मध्यरात्री घडली घटना.

⭐ सुरक्षा पथकां बरोबर झालेल्या चकमकीत निदर्शकाचा मृत्यू झाल्यानंतर जुन्या श्रीनगर मध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

⭐सातारा = कराडचे ज्येष्ठ कवी राजाभाऊ मंगसुळीकर यांचे निधन. 'हिमालयावर येता घाला, साह्यगिरी हा धावून गेला,' यासह शेकडो अजरामर कविता त्यांनी लिहील्या होत्या.

Friday, 7 October 2016

सबसे तेज,तेजन्यूज हेडलाईन्स राज्य,देश,विदेश,क्रिडा,संक्षिप्त.

तेजन्यूज हेडलाईन्स न्यूज नेटवर्क

⭐बलुचिस्तानचा विषय सोडा अन्यथा आम्ही खलिस्तानचा मुद्दा जिवंत करु = नवाझ शरीफ सरकारने अमेरिकेत नियुक्त केलेल्या दोन विशेष राजदूतांनी भारता विरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे.

⭐भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर गुजरात मधील भाजीपाला विक्रेत्यांनी पाकिस्तान मध्ये भाजीपाला पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मिरची,टोमॅटोच्या पुरवठ्यावर व्यापा-यांनी बंदी आणली

⭐ भारत विरुद्ध न्यूझीलैंड तिसर्या कसोटी सामन्यात भारताच्या 2 बाद 76 धावा.

⭐  टर्कीची राजधानी अंकारामध्ये पोलिसांनी रोखल्यानंतर दोनआत्मघातकी हल्लेखोरांनी स्वत:ला स्फोटामध्ये उडवून घेतले.

⭐ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री मुकुल वासनिक आज चंद्रपूर जिल्ह्यात.

⭐ जालना = भरधाव वाहनाच्या धडकेने पादचारी ठार, शहरातील कन्हैयनगर भागातील घटना.

⭐ जम्मू-काश्मीर - पूंछमध्ये सेक्टरमध्ये पाकिस्तान कडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान जखमी.

⭐ महिलांबद्दल केलेल्या असभ्य वक्तव्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितली माफी.

⭐ सर्व धोके परतवून लावण्यास भारतीय हवाई दल सक्षम आहे - अरुप रहा, हवाई दल प्रमुख.

⭐ मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने, कुर्ला स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक उशिराने,सीएसटीकडे जाणा-या जलद लोकल उशिराने.

⭐ जम्मू-काश्मीर = शोपियान जिल्ह्यात जमनागिरी परिसरात पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांचा हल्ला, 1 पोलीस शहीद, आणखी एक जण जखमी.

⭐  हैती चक्रीवादळामुळे अमेरिकेत ८५० जणांचा मृत्यू, अमेरिकेते फ्लोरिडा मध्ये तिघांचा मृत्यू.

⭐  भारतीय वायू सेनेचा आज ८४ वा स्थापना दिवस असून, आजच्याच दिवशी भारतीय वायूसेना अस्तित्वात आली होती.

⭐ गृहमंत्री राजनाथ सिंह जैसलमेरमध्ये आज सुरक्षा स्थितीचा आढावा घेणार, बाडमेरच्या सीमा भागाचाही दौरा करणार.

⭐ रशियाच्या हॅकर्सनं अमेरिकेन राजकीय समूहावर सायबर हल्ले केल्याचा अमेरिकेचा दावा.

लोकनेते अनिलराव नखाते (भाऊ) यांचा वाढदिवस भव्य-दिव्य सत्कार सोहळ्याने साजरा होणार

सबसे तेज,तेजन्यूज हेडलाईन्स

कार्तिक पाटील

पाथरी:- वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी चे संस्थापक अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरीचे सभापती लोकनेते अनिलराव नखाते यांचा वाढदिवस दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी शिवाजी नगर पाथरी येथील शांताबाई नखाते विद्यालयात साजरा होणार आहे.
या वेळी नखाते यांच्या वाढदिवसा निमित्य वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळांच्या शाळेंच्या वतिने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार या वेळी अनिलराव नखाते (भाऊ) यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न होणार असून या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी हिंगोली-परभणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आ बाबाजानी दुर्रांनी हे राहाणार असून प्रमुख प्रमुख उपस्थितीत जि प अध्यक्ष राजेश दादा विटेकर ,राकाँचे मराठवाडा संपर्क प्रमुख हभप सारंगधर महाराज,राकाँ प्रदेश सरचिटनिस मुंजाजी भाले पाटील, राकाँचे जेष्ठ नेते गंगाधरराव गायकवाड, प्रमुख पाहूणे म्हणून जि प शिक्षण आणि आरोग्य सभापती दादासाहेब टेंगसे, नगराध्यक्ष जुनेद खान दुर्रांनी, पं स सभापती तुकारामजी जोगदंड, जि प सदस्य चक्रधरराव उगले, सुभाषराव कोल्हे, न प गट नेते तबरेज दादा दुर्रांनी,कृउबास उप सभापती बाळासाहेब कोल्हे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन आशोकराव गिराम, माधवराव जोगदंड, नप उपाध्यक्ष नारायण पितळे, राकाँ तालुका अध्यक्ष एकनाथराव शिंदे, नारायणराव आढाव, शंतनू पाटील, एकनाथराव घांडगे, लहूराव घांडगे, संजय काका रणेर, सुनिल उन्हाळे, रत्नाकर शिंदे यांची या वेळी उपस्थीती राहाणार आहे हा कार्यक्रम रविवार ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वा सुरू होणार आहे.

कोपर्डी प्रकरणी आरोपपत्र दाखल, तेज न्यूज हेडलाईन्स संक्षिप्त.

सबसे तेज,तेजन्यूज हेडलाईन्स न्यूज नेटवर्क

⭐ चंद्रपूर = अक्षर साहित्य कला मंच राजूरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी यांच्यातर्फे आयोजित 'अभंग' या अक्षय समृद्ध साहित्य प्रकाराला वाहिलेलं राज्यातील एकमेव'दुसरे' अभंग साहित्य संमेलन २७ नोव्हेंबरला धनोजे कुणबी सभागृह, राजूरा, जि. चंद्रपूर येथेसंपन्न होत आहे.

⭐ चंद्रपूरातही आता फॉरेन्सिक लॅब उभारण्यात येणार असून आज या इमारतीचे उद्गघाटन करण्यात आले.

⭐रत्नागिरी = मराठे आता पेटलेले आहेत. ते ऐकणार नाहीत. मेहेरबानी नको, मराठा समाजाला आरक्षण द्यायलच हवे. - नीलेश राणे

⭐ काँग्रेस मध्ये राहुलभक्ती देशभक्तीवर भारी पडत आहे - रवीशंकर प्रसाद.

⭐ पुणे = संमेलनाध्यक्ष पदासाठी प्रवीण दवणे यांचा अर्ज दाखल.

⭐सर्जिकल स्ट्राईकचा आम्हाला अभिमान, आम्हाला राजकारण करायचं नाही, युद्द आणि सर्जिकल स्ट्राईकमध्ये फरक असतो - रवीशंकर प्रसाद.

⭐ यवतमाळ = घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस ठाण्याचा शिपाई कैलास निंबर्ते याला लाच घेताना सवळी सदोबा येथे रंगेहात पकडले, यवतमाळ एसीबीची कारवाई.

⭐ जैश-ए-मोहम्मदला भाजपाने तयार केलं हे ऐकून फार दुख: झालं, नेमकं काँग्रेसला काय म्हणायचं आहे, आयएसआयला या वक्तव्याचा सर्वात जास्त आनंद झाला असेल - रवीशंकर प्रसाद.

⭐ नवी दिल्ली = ट्रिपल तलाक संबंधी केंद्राने सर्वोच्च न्यायालयात केलं प्रतिज्ञापत्र सादर, महिलांना त्यांचे मुलभूत हक्क नाकारण्याचं कोणतंच कारण नसल्याचं केंद्राने प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

⭐ चांदवड (नाशिक) = पिंपळगाव बसवंत आणि वड़नेर भैरव येथील मोबाइल दुकान फोडणारे तिघे अवघ्या 18 तासात जेरबंद, वड़नेर भैरव पोलिसांची कामगिरी.

⭐मुस्लिमांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी काढल्या जाणाऱ्या राज्यातील पहिल्या क्रांती मोर्चाला मुंब्रा येथे सुरूवात.

⭐जळगाव =  मी नागीण आहे, मुख्यमंत्र्यांच्या धमक्यांना घाबरणार नाही - खा. सुप्रिया सुळे

⭐नवी दिल्ली = सर्वोच्च न्यायालयाचा बीसीसीआयला आदेश, शिफारशी न मानणा-या असोसिएशनचा निधी रोखा, राज्य क्रिकेट असोसिएशनचा निधी रोखण्याचे आदेश.

⭐ ठाणे = मनपा आरक्षण सोडतीत मनसेचा गोंधळ; सोडतीचा कार्यक्रम थांबवून मनसेची घोषणाबाजी.

⭐ ठाणे = आरक्षण सोडत कार्यक्रमात मनसेचा गोंधळ. आरक्षण कसे फुटले जाहिर करा नहीं तर सोडत रद्द करा. महापालिकेचा केला निषेध.

⭐ अहमदनगर = कोपर्डी प्रकरणी अखेर ४५० पानांचे दोषारोप पत्र दाखल. 3 आरोपी 70 साक्षीदार.

⭐ गोवा = प्रसिद्ध फोटोग्राफर मोनिका घुरडे यांची हत्या, भाड्याच्या फ्लॅटमध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह.

⭐ पुणे =  ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव' ७ ते ११ डिसेंबर दरम्यान होणार.

⭐ गाझियाबाद = निठारी हत्याकांडाचा आरोपी सुरेंद्र कोली याला नंदा देवी हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा, सीबीआय न्यायालयाचा निकाल.

⭐ रावळपिंडीला जाणा-या जफर एक्स्प्रेमध्ये स्फोट, 4 जणांचा मृत्यू, 13 जण जखमी - पाकिस्तान प्रसार माध्यमांचे वृत्त

⭐ जैश-ए-मोहम्मदला भाजपाने तयार केलं, मसूद अजहरला सोडलं भाजपाने सोडलं, आणि आमच्यावर आरोप करता - कपिल सिब्बल

⭐ ठाणे = प्रभाग रचना जाहिर होण्यपूर्वीच वॉर्ड रचना फुटल्याने बीजेपीने घेतला आक्षेप. महापलिका आयुक्तांना दिलेले निवेदन आरक्षण सोडत रद करण्याची केली मागणी.

⭐ ज्यांच्या विरोधात हत्येचे गुन्हे आहेत ते आम्हाला शिकवणार, भाजपा एवढ्या खालच्या स्तराला जाईल असं वाटलं नव्हतं - कपिल सिब्बल

⭐ औरंगाबाद = सिग्नल वरून बाजूला जाण्यावरून दोन गटात हाणामारी, दोन तरूणांची वृध्दाला मारहाण. चिश्तीया पोलीस चौकी समोर हीघटना घडली.

⭐ प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वीच वार्ड रचना फुटल्याने बीजेपीने घेतला आक्षेप, महापलिका आयुक्तांना दिले निवेदन, आरक्षण सोडत रद करण्याची केली मागणी, ज्या अधिका-याने यादी फोडली त्यांच्यावर कारवाई करण्याची भाजपची मागणी.

⭐नवी दिल्ली = बिहारमधील दारुबंदी उठवण्याच्या पाटना उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती, पुन्हा एकदा दारुबंदी लागू होणार.

⭐नवी दिल्ली = हाजी अली दर्ग्यात महिला प्रवेशावर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, हाजी अली बोर्डीने आपली बाजू मांडण्यासाठी दोन आठवड्यांची वेळ मागितल्यानंतर न्यायालयाकडून स्थगिती, 17 ऑक्टोबरला पुढील सुनावणी.

⭐जोधपूर = केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सीमारेषे वरील राज्यांच्यामुख्यमंत्र्यांची भेट घेतली, भारत पाकिस्तान सीमारेषा 2018 पर्यंत सील करण्याचा उद्देश - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह.

⭐मुंब्रा बायपा येथे कंटेनर नाल्यात पडून १ जखमी. उपचारांसाठी काळसेकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

⭐मुंबई = मनसे नगरसेवक संदीप देशपांडे  आणि संतोष धुरी यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या डोळ्यादेखत मनसेचे नगरसेवक फिरतात कसे असा सवाल दहियांनी पोलिसांना विचारला. संध्याकाळ पर्यंत दोघांनाही अटक करण्याचे तोंडी आदेशही यावेळी देण्यात आला आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरींवर पालिकेच्या अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

⭐पुणे = पुणे महापालिकेच्या 2017 च्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकांची प्रभाग रचना आणि आरक्षण आज जाहीर झालं. पहिल्यांदाच 4 वॉर्डांचा एक प्रभाग अशा पद्धतीने होणाऱ्या या निवडणुकीत 41 प्रभाग असतील. यातून 162 नगरसेवक निवडून येतील.

⭐कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष ज्युवान मान्यूअल सांतोस यांना यंदाचं शांततेचं नोबेल.

⭐कोपर्डी = कोपर्डी बलात्कार आणि हत्येप्रकरणी अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 86 दिवसांनी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.साधारण 300 पेक्षा जास्त पानांचं हे आरोपपत्र आहे.  जितेंद्र शिंदे, संतोष भवर आणि नितीन भैलुमे या तिघा आरोपीं विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. हत्या आणि बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा  त्यांच्यावर दाखल करण्यात आलाय.

Thursday, 6 October 2016

तेजन्यूज हेडलाईन्स,ताज्या बातम्या राज्य,देश,विदेश,क्रिडा, संक्षिप्त

सबसे तेज,तेजन्यूज हेडलाईन्स

⭐मुंबई = नारायण राणे यांचे कट्टर समर्थक संदेश पारकर यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पारकर यांचा हा पक्ष प्रवेश झाला.

⭐पटणा = बिहार पोलीस दलाचे सिंघम अशी ओळख असलेले मराठ मोळे तडफदार आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर येत आहेत. वैयक्तिक कारणांसाठी शिवदीप लांडे यांनी तीन वर्षांकरता महाराष्ट्रात नियुक्ती करण्याची विनंती केली होती.

⭐नवी दिल्ली = याआधी कधीही सर्जिकल स्ट्राईक्स करण्यात आलेले नाहीत. ज्यावेळेला कारवाई केले जाते त्यावेळी जवान थोड्याफार प्रमाणात एलओसी पार करतात, पण त्याला आपण सर्जिकल स्ट्राईक म्हणू शकत नाही. असं मत माजी डीजीएमओ विनोद भाटिया यांनी मांडलं आहे.

⭐ हंडवारा लंगेट येथील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आजपासून एनआयए तपास सुरु करणार, तपास पथकात १० ते १२ जणांचा समावेश.

⭐ जम्मू-काश्मिर अखनूर मध्ये संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर लष्कराकडून शोधमोहिम सुरु.

⭐ भारत-पाकिस्तानचा सीमावर्ती भाग सील करणार, सीमावर्ती भागात मोठी भिंत उभारणार,गृहमंत्रालयातील सूत्रांची माहिती

⭐  सौदी अरेबिया = जेद्दा हल्ल्याचे कनेक्शन महाराष्ट्रशी?,बीडच्या फय्याज कागजीने हल्ला घडवल्याची शंका,पाकिस्तानी वेशात जेद्दामध्ये स्फोट केल्याची शंका,मुंबई हल्ल्याच्या षड़यंत्राचा फय्याज कागजीवर आरोप,ओळख पटवण्याचा प्रयत्न, डीएनए सॅम्पलची मागणी.

⭐ वणी (नाशिक) = सप्तशृंगगडावर एसटी बसला अपघात, 30 जखमी, आज पहाटे 5 च्या झाला अपघात.

⭐ कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांना शिवीगाळ, मारहाणीची धमकी. मा. नगरसेवका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

⭐ नाशिक महापालिकेच्या 31। प्रभागांसाठी आज निघणार सोडत, सकाळी 11 वाजता महाकवी कालिदास कला मंदिरात प्रभाग रचनेच्या सीमारेषा घोषित होणार.

⭐ पाकिस्तानकडून पूँछच्या मालती मध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन, कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

⭐ मुस्लिम समाजाचा आज मुंब्रा येथे आरक्षणासाठी मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेस नेते हुसेन दलवाई मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती.

⭐ हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांच्या प्रवेशासंबंधी याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी, मुंबई उच्च न्यायालयाने दर्ग्यामध्ये महिलांच्या प्रवेशावरील बंदी हटवल्यानंतर या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

⭐  केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षते खाली होणा-या या बैठकीला गुजरात, राजस्थान, जम्मू-काश्मिर आणि पंजाबचे मुख्यमंत्री उपस्थित रहाणार.

⭐ पाकिस्तानला सीमा लागून असलेल्या चार राज्यांसोबत आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह चर्चा करणार, जैसलमेर मध्ये होणा-या या बैठकीला बीएसएफचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित रहाणार.

⭐  अहमदनगर = कर्जत शहरा जवळ बंधारा फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया. पावसात घाईघाईने उरकले होते काम.

⭐ मुंबई = रस्ते विभागाचे मुख्यअभियंता संजय दराडे यांना खड्डे प्रकरणी रस्त्यावर उभे करून मनसेने अभियंत्यांचा रोष ओढावून घेतला आहे. या घटनेच्या निषेधार्थ अभियंत्यांनी आज पासून काम बंद आंदोलन पुकारले आहे.

⭐ शंघाय = काल रात्री ९.२२ वाजता चीन मधील तायतुंग व कोहसुंग शहरांना भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर ५.७ तीव्रता नोंदविण्यात आली तर केंद्र बिंदू भूगर्भात १५ कि.मी. खोल होता.