तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 15 October 2016

सबसे तेज,तेजन्यूज हेडलाईन्स,संक्षिप्त मंत्री बडोलेंवर दोन्ही छत्रपती खासदारांचा हल्ला बोल

✍🏻 TEJ NEWS HEADLINE ✍🏻
____________________________

⭐  गोंदिया = वाघाच्या कातड्याची तस्करी करणा-या ३ जणांना स्थानिक पोलिसांनी केली अटक.

⭐  नांदेड = सरदार ऑटो मोबाईलच्या गोदामाला लागली आग, अग्निशमनदलाच्या ४ गाड्या घटनास्थळी .

⭐ मुंबई मनपा कर्मचारी बोनसचा निर्णय लांबणीवर. गटनेत्यांच्या बैठकीला विरोधी पक्षांची दांडी.

⭐  युवा सेनेच्या मोर्चावर विनोद तावडेंची टीका, सरकारमध्ये राहून मोर्चे कशासाठी ?, नेतृत्व उभं करण्यासाठी हा मोर्चा असेल तर शुभेच्छा.

⭐ अहमदनगर = नगर शहरात शाळकरी मुलीचा विनयभंग; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

⭐ आग्र्या मध्ये धावत्या ऑटोरिक्षा मध्ये स्फोट, एक ठार, सहा जखमी.

⭐  वाराणसी चेंगराचेंगरी ही दुर्देवी घटना असून, मुख्यमंत्री कार्यालय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, दुर्लक्षासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई होईल - गौरव भाटीया, समाजवादी पार्टी.

⭐  बॅडमिंटन : भारतच्या अजय जयरामने ब्राझीलच्या यगोर कोऍलोहोचा पराभव करून डच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला .

⭐ नाशिक = पोलिसांनी मोबाईल इंटरनेट वरील बंदी हटवली। मात्र सोशल मीडिया सायबर क्राईमच्या रडारवर.

⭐ लातूर = लातूर शहरातील बार्शीनाका पुलावर महीलेला धडकून रोडवर पडलेल्या दुचाकी स्वारास बसने चिरडले.

⭐ वर्धा = गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने ५ जण गंभीर जखमी. स्थानिक स्वास्तिक कॉलनी येथील घटना. स्फोटामुळे घरांच्या खिडक्या व भिंतींना तडा.

⭐ सिंधुदुर्ग = नगरपालिका निवडणुकीचा काँग्रेसचा प्रचार सुरु, सर्व नगर पालिकांमध्ये काँग्रेसचीच सत्त्ता येणार - पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी व्यक्त केला विश्वास.

⭐ चंद्रपूर = जिवती तालुक्यातील नोकेवाडा येथील शेतक-याने कर्जबाजारीपणा व नापीकीला कंटाळुन विष प्राशन करून केली आत्महत्या.

⭐  वाराणासी चेंगराचेंगरी दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढून १९ वर पोहोचला.

⭐ भंडारा = शिवसेनेची संघर्ष पदयात्रा पवनी येथून भंडारा येथे पोहचली, शिवसैनिकांनी दिल्या केंद्र व राज्य सरकार विरुद्ध घोषणा.

⭐ वाराणासी चेंगराचेंगरी दुर्घटने बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले.

⭐ जळगाव = मुख्यमंत्र्यांच्या जामनेर दौ-याच्या निमंत्रण पत्रिकेत एकनाथ खडसेंचे नाव शेवटी टाकल्याने भाजपाच्या बैठकीत गोंधळ.

⭐ वाराणासी चेंगराचेंगरी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादवयांनी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे, गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्यातयेणार आहे.

⭐ मुंबई = युवा सेनेच्या केजी टूपीजी मोर्चाला सुरुवात, गिरगाव चौपाटीपासून मोर्चाला सुरुवात.

⭐ वाराणसी जवळच्या राजघाट ब्रिजवर चेंगराचेंगरीमध्ये १२ जण ठार, अनेक जण जखमी.

⭐  जळगाव = जळगावात आंतरराष्ट्रीय कापूस परिषदेस प्रारंभ.

⭐ पुणे = मतदार नोंदणीला २१ ऑक्टोबर पर्यंतची मुदतवाढ.

⭐  माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला,कोणत्याही जातीबद्दल बोललो नाही, मराठा शब्द कुठेही उच्चारला नाही, देशभरात आरक्षण मोर्चे निघत आहेत त्याबद्दल बोललो, राजकुमार बडोलेंचा खुलासा.

⭐ नवी मुंबई = मंदा म्हात्रे मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंच्या भेटीला,दोघांमधील वाद टोकाला गेले असताना भेट झाल्याने चर्चेला उधाण.

⭐ मुंबई = काँग्रेस - राष्ट्रवादीची बैठक संपली, एकत्र लढण्यावर सकारात्मक चर्चा - अशोक चव्हाण.

⭐ दहशतवादाशी लढण्यासाठी रशियाने घेतलेली भुमिका आणि समर्थन अभिनंदनीय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.

⭐ गोवा = ब्रिक्स शिखर परिषदेत भारत आणि रशिया यांच्यात पायाभूत सुविधा, रेल्वे, केए २२६ टी हेलिकॉप्टर्सचे संयुक्त उत्पादन, उर्जा,ट्रॅफीक आणि स्मार्ट सिटी करारावर स्वाक्षऱ्या.

⭐ मुंबई = राज्यभरात बेकायदा होर्डींग लावल्याचं प्रकरण, गणेशोत्सव आणि नवरात्रीत हायकोर्टाच्या आदेशांचं उल्लंघन, दोषी कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे निर्देश.

⭐ रत्नागिरी = राजसत्ता भ्रष्ट होते तेव्हा धर्मसत्ता मार्गावर आणते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य.

⭐ राजकुमार बडोलेंच्या बुद्धीची कीव येते, उदयनराजेंचा हल्लाबोल.

⭐ नाशिक = सहा दिवसानंतर इंटरनेट सेवा सुरु, हिंसाचारा नंतर इंटरनेट सेवा होती ठप्प.

⭐  काश्मीरमधील संचारबंदी अखेर उठवण्यात आली.

⭐ कोल्हापूर = मराठी क्रांती मोर्चाची सांगता. जिल्हाधकारी अमित सैनीयांना 5 भगिनींनी दिले निवेदन.

⭐  भारताची इच्छा असेल तर काश्मीर मुद्यावर चर्चा करण्याची तयारी,पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचं वक्तव्य.

⭐ ब्रिक्स परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग गोव्या मध्ये दाखल, पारंपरिक नृत्याने चीनच्या राष्ट्राध्यक्षाचे स्वागत.

⭐ रत्नागिरी = देहदान संकल्पने मागे धर्माचार्य उभे राहिल्यानेच 56 हजार दात्यांनी देहदानाचा संकल्प केला. हा देशातील नाहीतर जगातील विक्रम आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. अवयवदान उपक्रमात सहभागी झालेल्या ५६ हजार दात्यांच्या सत्कार कार्यक्रमास मुख्यमंत्री उपस्थित.

पाथरीत आर्ट ऑफ लिव्हिंग चा सतसंग संप्पन्न

सबसे तेज

कार्तिक पाटील

पाथरी:- येथील कांच बसवेश्वर मठात श्री श्री रवी शंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे आनंदाची अनुभूती अर्थात संतसंग कार्यक्रम १२ ते १४ ऑक्टोबर दरम्यान मोठ्या उत्साहात संप्पन्न झाला
तीन दिवस चाललेल्या या शिबिरात शहर वाशियांनी अतिषय उस्फूर्त प्रतिसाद दिला प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असणा-या व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला १२ते १४ ऑक्टोबर सकाळी ६ ते ९ या वेळेत हा सत संग कार्यक्रम संपन्न झाला तणाव मुक्त जिवण जिवण जगण्याची एक शास्रशुद्ध क्रिया जी श्री श्री रवीशंकर यांनी दिलेली एक अदभूत भेट आहे या मुळेच आज असंख्य लोक घेत असल्याची माहीती या कार्यक्रमाचे प्रशिक्षक भास्कर भैय्या मगर यांनी दिली या सोबतच कोजागृती च्या पुर्व संध्येला शहरातील शिक्षक कॉलनी मधील हनुमान मंदिरात भजन संध्या (सतसंग)  कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमा साठी पाचशे वर महिला पुरूषांनी सहभाग नोंदवला होता या वेळी नाशिक येथून आलेले  शरद डोल्हारकर यांनी त्यांच्या सुमधूर वाणीतून सर्वांची मने जिंकली या वेळी त्यांच्या सोबत प्रा काळे, प्रा राठोड, सुनिल आणि इतर मान्यवर उपस्थित होते या वेळी पाहूण्यांचे स्वागत पोलिस निरिक्षक माच्छरे, भावनाताई नखाते यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन अॅड पंकज नखाते विनायक थोरे, यांच्या सह आर्ट आॅफ लिव्हिंग परिवारातील सदस्यांनी केले होते.

डॉ ए पी जे अब्दूल कलाम

सबसे तेज
किरण घुंबरे पाटील

★भारताचे लोकप्रिय दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती. १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडू मधील रामेश्वर येथे एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. लोकांचे राष्ट्रपती अशी त्यांची ओळख होती. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना देशाचे 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखलं जायचं. त्यांचा जीवनप्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. डॉ. कलाम यांचं संपूर्ण आयुष्य आदर्श आहे. २७ जुलै २०१५ रोजी आयआयएम
- शिलॉंग येथे विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देत असताना कलाम यांचे निधन झाले. त्यांच्या जयंती निमित्त जाणून घेऊया त्यांच्या बद्दलच्या काही गोष्टी. - अब्दुल कलाम यांचे पुर्ण नाव अब्दुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम होते.

- भारताचे मिसाईल मॅन, लोकांचे राष्ट्रपती अशी अब्दुल कलाम यांची ओळख होती. त्यांना पद्म भूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- मद्रास तंत्रज्ञान संस्थेतून हवाई क्षेत्रातील एरोनॉटिकल इंजिनीयरींगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी डीआरडीओमध्ये (संरक्षण संशोधन विकास संस्था) काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी भारतीय लष्करासाठी हॅलिकॉप्टरचे डिझाईन तयार केले. - कलाम यांना करीयरच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये  प्रसिद्ध अवकाश शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. १९६३ साली कलाम यांनी नासा या जगातील अग्रगण्य अवकाश संशोधन संस्थेला भेट दिली. त्यानंतरत्यांनी पीएसएलव्ही आणि एसएलव्ही-३ या प्रकल्पांवर काम सुरु केले. हे दोन्ही प्रोजेक्ट यशस्वी झाले. - भारताचे तात्कालिक पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात देशाने पोखरण येथे दुसरी अणूस्फोटाची चाचणी केली. या चाचणीत कलाम यांनी महत्वाची भूमिका बजावली. या चाचणीनंतर देशातील आघाडीचे अणवस्त्र शास्त्रज्ञ म्हणून लोक त्यांना ओळखू लागले.
- १९९२ ते १९९९ या कालावधीत अब्दुल कलाम देशाच्या पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार होते. पोखरण अणू चाचणीच्या वेळी राजकीय आणि तांत्रिक दोन्ही आघाडयांवर त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.
- भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २००२ मध्ये त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले. २५ जून रोजी त्यांनी देशाचे ११ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
- राष्ट्रपती भवनातील सर्व दिवे सौरऊर्जेवर चालवण्यासाठी कलाम यांनी आराखडा तयार केला होता. पण या योजनेवर अंमलबजावणी करण्यापूर्वीच त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. सौरऊर्जे शिवाय भारताने आपली ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणूऊर्जा आणि बायोफ्युल तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा असे त्यांचे मत होते. - अग्नि आणि पृथ्वी या दोन क्षेपणास्त्र निर्मितीच्या तंत्रज्ञानामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान होते.- अब्दुल कलाम यांना लहान मुलांची आवड होती. ही लहान मुलेच उद्याची भविष्य आहेत. त्यामुळे ते जास्तीत जास्तवेळ मुलांसोबत घालवायचे. त्यांच्या कुतूहलपूर्ण प्रश्नांची उत्तरे द्यायचे.- जेव्हा डॉ. कलाम यांचं नाव राष्ट्रपती पदासाठी निवडलं गेलं. तेव्हा शपथविधी कार्यक्रमाला त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत विमान प्रवासाचे तिकीट उपलब्ध होते. पण डॉ. कलाम हे असे व्यक्ती होते, ज्यांनी आपल्या पदाचा कोणत्याही वैयक्तिक कामासाठी वापर केला नाही. त्यांनी आपल्या नातेवाईकांना सेंकड एसी रेल्वेनं दिल्लीला शपथ विधीसाठी आणलं. - एकदा एका दीक्षांत समारंभात राष्ट्रपती डॉ. कलाम यांची खूर्ची इतर खूर्च्यांपेक्षा वेगळी आणि मोठी होती. त्यामुळं त्यांनी त्या खूर्चीवर बसण्यास नकार देत, साध्या खूर्चीवर ते बसले होते. - एकदा कलाम यांनी फुटलेली काच इमारतीला बसवायला नकार दिला होता. ती फॅशनसाठी होती. पण त्यामुळं पक्ष्यांना नुकसान झालं असतं, असं सांगत कलाम यांनी हा सल्ला नाकारला होता. -
एकदा 400 विद्यार्थ्यांसमोर बोलत असतांना अचानक लाईट गेले. मात्र आपल्या चर्चेत, भाषणात कुठेही बाधा न येऊ देता डॉ. कलाम संपूर्ण विद्यार्थ्यां मधून रांगेत फिरले आणि आपली चर्चा कायम ठेवली.- राष्ट्रपती बनल्यानंतर केरळच्या राज भवनात डॉ. कलाम यांनी सर्वात पहिल्यांदा निमंत्रित केलेले पाहूणे म्हणजे रस्त्यावर काम करणारा एका चांभार आणि छोट्या रेस्टॉरंटचा मालक.

Friday, 14 October 2016

सबसे तेज,तेजन्यूज हेडलाईन्स,दिवस भरातील ताज्या घडामोडी राज्य,देश,विदेश,क्रिडा,संक्षीप्त.

✍🏻 TEJ NEWS HEADLINE ✍🏻

___________________________

⭐मुंबई = पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा देऊ नका अशी मागणी भाजपचे आमदार आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. या बाबतचं निवेदन आशिष शेलार यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना दिलं आहे.

⭐नवी दिल्ली = पाण्याची बाटली आणि कोल्ड ड्रिंक छापील किंमत म्हणजेच MRP पेक्षा जास्त रकेमला विकल्यास विक्रेत्याला तुरुंगवास आणि मोठ्या रकमेचा दंड होणार आहे. ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान यांनी हे वक्तव्य केलं आहे.

⭐ठाणे = जिल्ह्यातील वाशिंद मध्ये धक्कादायक बाब उघड झाली आहे. मोबाईलचा स्फोट झाल्याने तरुण जखमी झाला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. शहापूर मधील वासिंद मध्ये ही घटना घडली.

⭐सोलापूर = घरात सर्व कामे करणाऱ्या पतीला अत्यांत किरकोळ चुकी मुळे पेशाने मुख्याध्यापिका असलेल्या पत्नीने घरातून हाकलून दिले. त्यावर पतीने न्याय हक्कासाठी न्यायालयात धाव घेतली.  विशेष म्हणजे या पतीला दरमहा दोन हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश सोलापूरच्या दिवाणी न्यायालयाने दिला आहे.

⭐ जम्मू-काश्मीर मधील झकुरा येथील दहशतवादी हल्ल्यात एकूण ७ जवान जखमी झाल्याचे समजते.

⭐ केरळ = सीपीएम कार्यकर्त्याचा खून केल्या प्रकरणी तीन आरएसएसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

⭐श्रीनगर = जकुरा मध्ये CRPF कँप वर आतंकवादी हल्ला झाला आहे.

⭐लादेन, वनी, हाफिज सईदच्या पंक्तीत केजरीवाल ? सुरतमध्ये झळकली पोस्टर्स दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 'पाकिस्तानचा हिरो' असा उल्लेख असलेले पोस्टर सुरत मध्ये लावण्यात आले आहे.

⭐गोव्यात उद्धव ठाकरेंच्या विमानाला नाकारली परवानगी.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे उद्या शनिवार पासूनचा तीन दिवसांचा नियोजित गोवा दौरा लांबणीवर पडला आहे.

⭐ प्रणव मुखर्जी हे देशाला लाभलेले सर्वोत्तम राष्ट्रपती - संजय राऊत.

⭐ वर्धा = आजोबाच्या अस्थी विसर्जनासाठी गेलेल्या नागपूर येथील तरुणाचा सेलू येथील बोर नदीत बुडून मृत्यू.

⭐ वर्धा = खरांगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पानवाडी येथे दुर्गा देवी उत्सवा निमित्त आयोजित महाप्रसादाच्या कार्यक्रमात दोन गटात हाणामारी, याप्रकरणी चौकशीसाठी गेल्येल्या पोलिसांनाही शिवीगाळ व धक्काबुकी करण्यात आली, याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

⭐ शिर्डी = दस-याच्या मुहूर्तावर साईंच्या चरणी भरभरुन दान, ४ दिवसात साईबाबांना ३ कोटी ७५ लाखांचं दान.

⭐ अहमदाबाद = दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विरोध करणा-या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

⭐ दिव्यांगासाठी ‘मिशन’ राबविणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.

⭐ राज्याचे पशुसंवर्धन मंञी महादेव जानकर यांच्या विरोधात धुळे न्यायालयात राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचेप्रदेश सरचिटणीस कमलेश चौधरी यांनी शुक्रवारी दावा दाखल केला.

⭐ पाकिस्तानच्या लोकांशी आमचा विरोध नाही, आमचा पाकिस्तामधील दहशतवादाला आहे - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह

⭐ शेकापक्षाचे जेष्ठ नेते आमदार डॉ. गणपतराव देशमुख यांना धमकीचे पत्र, आमदार महोदयांनी संरक्षण नाकारले,परंतू पोलीसांनी जबाबदारी ओळखून सुरक्षेसाठी तीन पोलीस कर्मचारी तैनात केले, यापूर्वीही धमकीचे पत्र मिळाले होते.

⭐ दिल्ली एअरपोर्ट एक्सप्रेस लाईनवर फ्री वाय-फाय सेवा सुरु करण्यात आली आहे.

⭐ गोंदियामध्ये बनावट दारु बनवण्याचे साहित्य जप्त, एकाला अटक.

⭐ पाकिस्तान सरकारने पत्रकार सिरील अल्मेडा यांच्यावर घातलेली बंदी उठविली; पाकिस्तानचे सरकार आणि लष्कर यांच्यात मतभेद असल्याचे वृत्त अल्मेडा यांनी दिलं होतं, यामुळे सरकारने त्यांच्यावर पाकिस्तानातून बाहेर जाण्यास बंदी घातली होती.

⭐महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली रणजी मॅच, स्वप्निल गुगले आणि अंकित बावनेची तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 510 रनची पार्टनरशिप.

⭐नवी दिल्ली = भारत आणि रशिया यांच्यामध्ये गोव्यात उद्या संरक्षण विषयक महत्त्वाचा करार,या करारांतर्गत एस - 400 ट्रायम्फ नावाची क्षेपणास्त्र यंत्रणा भारत रशिया कडून खरेदी करणार.

⭐  सेन्सर बोर्डाने चित्रपटाला परवानगी दिल्यानंतर सिनेमा ओनर्स आणि वितरक संघटनांना बंदी घालण्याचा अधिकार नाही - पहलाज निहलानी.

⭐ मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये अवघ्या ३० अंकांची वाढ होऊन २७,६७३ वर स्थिरावला, तर निफ्टीतही १० अंकांची वाढ होऊन ८,५८३ वर बंद झाला.

⭐ विधान परिषदेच्या ११ जागा संदर्भात उद्या मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यासोबत बैठक, जिल्हा परिषद पंचायत समितीत आघाडी बाबतचा निर्णय जिल्हास्तरावर - अशोक चव्हाण.

⭐ सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे सैनिक असलेले कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र डँनियल काळे यांचे आज सकाळी ८.२० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले, त्यांच्या जाण्याने आझाद हिंद फौजेचा शेवटचा दुवा निखळला आहे. मृत्यु समयी त्यांचे वय ९५ होते.

⭐ अमेरिकन यंत्रणेचे सीनियर अधिकार सुहेल दाऊद यांनी आज ठाणे पोलिसांची भेट घेत यावेळी दोघांनी कॉलसेंटर बाबत माहितीची देवाणघेवाण केली, यावेळी अमेरिकेत अशाप्रकारे बोगस कॉलसेंटर सुरु असल्याचे तसेच या कॉल सेंटरचे दुबई कनेक्शन असल्याचे समोर आले आहे.

⭐ अकोला = एसीबीने आकोटात तलाठ्याला लाच घेतांना पकडले.

⭐  सोलापूर = जुगार खेळताना तिघांना पकडले, २० हजारांचा माल जप्त, जोडभावी पेठ परिसरातील घटना.

⭐  दलितांसाठी कोणता पक्ष काम करत असेल तर तो भाजपा आहे - अमित शाह.

⭐ पाकिस्तानने आमच्या कंटेंटवर बंदी घातल्यानंतर आम्ही पाकिस्तानी अभियंते, तंत्रज्ञांच्या भारतात काम करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे - नितीन दातार, सिनेमा ओनर असोशिएशन.

⭐ लातूर = निलंगा तालुक्यातील कासार शिरशीत किराणा व्यापा-याच्या दीडवर्षीय मुलाचे अपहरण.

⭐ रत्नागिरी = चिपळूणमध्ये होणाऱ्या मराठा मूक मोर्चासाठी रविवारी 16 रोजी मुंबई-गोवा महामार्गावरील जड वाहनांची वाहतूक बंद. छोट्या वाहनांसाठी मार्गात बदल.

⭐ पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेले सिनेमे प्रदर्शित न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे - नितीन दातार, सिनेमा ऑनर्स असोसिएशन

⭐ नवी दिल्ली = लष्कर ए तयब्बाच्या बहादूर अली अर्फ सैफुल्लाहला पटियाला हाऊस कोर्टाने २२ ऑक्टोबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली.

⭐  सोलापूर = शेतीच्या कारणावरून दोन गटात हाणामारी, चौघे जखमी, आठ जणां विरूध्द गुन्हा दाखल.

⭐ समाजवादी पक्षात कोणतेच वाद नाहीत, येणा-या निवडणुकीत समाजवादी पक्ष बहुमताने विजयी होईल, मुलायम सिंग यादव यांची पत्रकार परिषद.

⭐ सांगली येथील अष्टविनायक नगरमध्ये घरफोडी; पाच लाखांचा ऐवज लंपास केल्याचा अंदाज. पोलिस दाखल.

⭐ डोंबिवली = बेकायदेशीररित्या गावठी कट्टा (पिस्तुल) विकायला आलेल्या तरूणाला विष्णुनगर पोलिसांनी केली अटक.

⭐ उरी हल्ल्या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही, आम्हाला फक्तया भागात शांती हवी आहे - फारुक अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू-काश्मीर

⭐ नवी दिल्ली = पुणे मेट्रोला पीआयबीकडून मंजुरी, बैठकीत पुणे मेट्रोला मिळाली मंजुरी.

⭐ मध्यप्रदेश = 40 प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, रतलाम येथील घटना, शोधकार्य सुरु.

⭐  सावंतवाडी  = वेर्ले (ता.सावंतवाडी) ग्रामपंचायती मधील 35 लाखाच्या अपहार प्रकरणी सरपंच प्रमिला मेस्त्री यांना अटक, ग्रामसेवक केतन जाधव मात्र अद्याप फरार. चार दिवसापूर्वी झाला होता गुन्हा दाखल.

⭐ नाशिक = हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत एकूण ११७ जणांना अटक. नाशिक शहर, ग्रामीण भागात मिळून एकूण ५३ गुन्हे दाखल - पोलिस महानिरीक्षक निलयकुमार चौबे यांची माहिती.

⭐ शिर्डी = शालेय विद्यार्थिनीचा ग्रंथपालाने केला विनयभंंग, प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालयातील घटना.

पाथरी सत्ता धा-यांचा विकास कामांच्या उदघाटनाचा धडाका तर विरोधकांचा कॉर्नर सभांवर भर

कार्तिक पाटील

पाथरी:- न प निवडणूक जसजशी जवळ येत आहे तस तसा निवडणूकीचा फिवर वाढत असून येथील निवडनूक सत्ताधारी राष्ट्रवादी कॉग्रेस विरूद्ध इतर पण सर्व स्वंतंत्र लढवणार असल्याने प्रत्येक जन आपआपल्या परीने निवडणूक लढण्या साठी प्रयत्न करतांना दिसून येत आहे सत्ताधारी राकाँ च्या वतिने मागील काही महिण्या पासून विकास कामांचे उदघाटने उरकण्याचा धडाका सुरू असून कामे युद्ध पातळीवर सुरू केली आहेत तर विरोधक प्रमुख विरोधक म्हणून मागील दोन वर्षां पासून राष्ट्रवादी ला सोडचिठ्ठी दिलेले दोन नगर सेवक काँग्रेस पार्टीशी घरोबा करून सत्ताधा-यां सोबत टोकाचा संघर्ष करण्याच्या तयारीत सत्ता धा-यांना उघडे पाडण्या साठी शहरात काॅर्नर सभा घेत आहेत. विरोधक सत्ताधारी राकाँ च्या एकाधिकार शाही विरोधात रंणशिंग फुंकत आहेत तर सत्ताधारी शहराच्या विकास कामांना समोर ठेऊन निवडनुकीला सामोरे जात आहेत. कार्यकर्त्यांची मजबूत फळी ही सत्ताधारी राकाँची जमेची बाजू असल्याने विरोधकांना विखरून विरोध करणे तसे अवघड जाणार असल्याचे राजकिय जाणकार सांगत आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला विरोध करण्या साठी काँग्रेस पक्ष माजी मंत्री वरपूडकर, माजी आ बोर्डीकर यांची मदत घेत स्थानिक कार्यकर्त्यांना पुढे करत निवडणुक रिंगणात दिसतील तर राकाँ ला आणखी एक घरातूनच म्हणजे माजी मंत्री फौजिया खान यांच्या परिवर्तन विचार मंच चा ही दुसरा स्वतंत्र पॅनल या ठिकाणी उभा राहाणार आहे, या दोन्ही कडून म्हणजे परिवर्तन आणि काँग्रेस पक्ष यांचे नहराध्यक्ष पदाचे उमेदवार जवळ पास जाहीर झाले आहेत, तर शिवसेना खा संजय जाधव यांच्या मार्गदर्शना खाली निवडूक लढवेल पण स्वतंत्र असे ही सेनेने या पुर्वीच जाहीर केले आहे. भाजपा ही या ठिकाण चा नप अध्यक्ष पदाचा उमेदवार कमळ चिन्ह घेऊनच उभा राहाणार असल्याचे सांगत आहेत त्या मुळे पाथरी नपची निवडणूक ही पंचरंगी होणार असे चित्र सद्य स्थितीत दिसत आहे.दुरीकडे राकाँने या वेळी ५०% उमेदवारी तरूनांना देण्याची घोषणा केलेली असल्याने अनेक तरून राकाँ कडून उमेदवारी मिळण्या साठी धडपडत असतांना दिसत आहेत  या पुर्वी काही वेळा सर्व पक्षीय एकत्र येऊन राकाँला शह देण्याचा प्रयत्न झाला पण त्यात ही सर्व पक्षीयांना यश आले मागच्या नप वेळी तर निष्ठावाण कट्टर शिवसैनिकांच्या गळ्यात काँग्रेस पक्षाचा तिरंगा अडकऊन हाताचा पंजा मळत बसण्याची वेळ शिवसेनेच्या तत्कालीन नेतृत्वानेच खेळी करून पाहीली पण ही खेळी त्या वेळी फसली होती गत वेळी राकाँने सर्व पक्षीयांना न पा निवडणूकीत "व्हाईट वॉश" दिला होता या वेळी सर्व पक्षीय एक होऊन लढा देतील असे चित्र अजून तरी दिसत नाहीत. गत वेळ पेक्षा या वेळी सत्ता धा-यांना कडवा विरोध आहे. राकाँ चे दोन नगरसेवक दोन वर्षा पासून राकाँ पासून वेगळे होऊन त्यांनी राकाँला कडवा विरोध चालवला आहे. मात्र हा विरोध जनतेला कितपत पचनी पडतो हे येत्या काळात स्पष्ट होणारच आहे. विरोधक विखरून निवडणूकीला सामोरे जात असल्याचा आनंद राकाँच्या गोटात पाहावयास मिळत आहे. काहिही झालं तरी या वेळी निवडणूक जिंकावयाचीच या इर्षेने राकाँ विरोधक प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. राकाँ, शिवसेना,भाजपा यांच्या वतिने मात्र अद्याप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. सर्व पक्षीयांनी सामाजीक क्षेत्रात चांगले काम असणा-याला या निवडणूकीत संधी द्यावी अशी अपेक्षा मतदार ठेऊन आहेत.सर्व सामान्य मतदार शहरात होत असलेल्या राजकीय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. या वेळी २० नगरसेवक पदां साठी उमेदवार मिळवणे काही पक्षांना मोठे जिकिरीचे होणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक पार्टी चूनिंदा माणसें या वेळी निवडणूक रिंगणात उतरऊन "हाबाडा" देण्या साठीची तयारी करत आहेत इच्छूकांच्या भेटी गाठी गल्ली-बोळात, चौका-चौकात सभा घेऊन आपले म्हणणे मतदारां पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत ही निवडणूक पाथरी नप ची असली तरी ३० वर्षा पासून सत्तेत असलेल्या आ बाबाजानी दुर्रांनी विरूद्ध माजी मंत्री सुरेश वरपूडकर, माजी आ बोर्डीकर, माजी मंत्री फौजिया खान, खा संजय जाधव ,भाजपा अशीच असणार असल्याचे राजकिय जाणकार मानत आहेत. मागील काही दिवसा पासून व्यक्तीगत पातळी वर सत्ताधारी आणि विरोधक एक मेकांवर चिखल फेक करत आहेत तर या साठी सोशल मिडियाचा पण वापर होतांना दिसून येत आहे. कोणा कडून पंमचर काढणारा मोठा झाला असा तर कोणी सोशल मिडियातून कांदा विक्री करणारा असा खालच्या पातळी वरचा वैयक्तीक विरोध ही मतदार सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाथरी शहरातील मतदारांना अनुभवा वयास येत आहे.
येत्या काही दिवसात नामांकन पत्र भरण्या वेळे पर्यंत अजून कायकाय नविन हालचाली होत राहातात ते पहाणे पाथरी शहरातील मतदारां साठी आैच्छूक्याचे असणार आहे.