तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 22 October 2016

जिंतूर पालिके साठी किती मतदार करणार मतदान

तेज न्यूज अवश्य पहा

प्रदिप कोकडवाड

जिंतुरा:- शहरात 11 प्रभागात 30हजार आठशे सात मतदार 
महिला मतदार 14हजार सातशे 37
बजावणार मतदाना चा हक्क
जिंतूर न प च्या सार्वत्रिक
निवडणुकीत 11 प्रभागातून एक नगराध्यक्ष आणि 23 सदस्य निवडून देण्यासाठी हि निवडणूक 27 नोव्हेम्बर ला होणार आहे

भारताने तिस-यांदा कोरले कब्बडी विश्वचकावर नाव

तेजन्यूज हेडलाईन न्यूज नेटवर्क

अहमदाबाद, दि. 22 - भारताने सलग तिस-यांदा कबड्डी विश्वचषक जिंकत विजयगाथा कायम ठेवली आहे. भारताने 38-29 फरकाने इराणचा पराभव केला . कबड्डी विश्वचषक जिंकण्याचा हॅट्र्टिक साधत भारताने आपणच कबड्डीचे बादशाह असल्याचं दाखवून दिलं आहे. पहिल्या हाफमध्ये 18-13 गुणांसहित आघाडीवर असलेल्या इराणला त्यानंतर आघाडी कायम ठेवता आली नाही. भारताकडून अजय ठाकूरने विजयात महत्वाचा वाटा उचलला. अजय ठाकूरने 16 रेड्समध्ये 12 गुण मिळवले. सुरुवातीला अटीतटीचा वाटणारा सामना भारताने शेवटच्या टप्प्यात मात्र सहज जिंकला. भारत पुन्हा एकदा विजेता ठरला असून इराण उपविजेता झाला आहे. 

 

भारताने शुक्रवारी धडाकेबाज विजयाच्या बळावर स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली होती. यजमान भारतीय संघाने दुसऱ्या उपांत्य सामन्यात थायलंडवर ७३-२० ने मात केली होती. दुसरीकडे इराण संघाने सेमीफायनलमध्ये दक्षिण कोरियाचा २८-२२ ने पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. 

 

महाराष्ट्रात पहिल्या दोन विश्वचषक कबड्डी स्पर्धा झाल्यानंतर तब्बल नऊ वर्षांनंतर अहमदाबादमध्ये भारतीय संघाने इराणसोबत पंगा घेतला. महाराष्ट्राच्या यजमानपदाखाली २००४ आणि २००७ मध्ये पुरुषांच्या पहिल्या दोन विश्वचषक कबड्डी स्पर्धा रंगल्या होत्या. यामध्ये दोन्ही वेळा इराण आणि भारत हे दोन संघच समोरासमोर दिसले होते. भारताने इराणवर निर्विवाद वर्चस्व मिळवत दोन्हीवेळा विश्वचषकावर कब्जा मिळविला. भारताने ही विजयी गाथा पुन्हा एकदा कायम राखली आहे. 

 

भारताने पहिल्या विश्वचषकामध्ये इराणला ५५-२७ अशा मोठ्या फरकाने पराभूत करत पहिल्या विश्वकपावर शिक्कामोर्तब केला होता. त्यानंतर तब्बल तीन वर्षाच्या खंडानंतर मुंबईमध्ये दुसऱ्या विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले. यावेळीही इतर संघाच्या तुलनेत पहिल्या विश्वचषकामध्ये दावेदारी सिद्ध केलेल्या भारत आणि इराक दुसऱ्यांदा समोरा समोर आले. यावेळीही भारताने विजय मिळवत इराणला पराभूत केले. पनवेलच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या विश्वकपच्या अंतिम सामन्यात भारताने इराणला २९ – १९ अशा फरकाने पराभूत केले होते.

 

सेलू नगरराध्यक्ष पदासाठी राकाँ ची उमेदवारी शेख कौसर शेख उमर यांना जाहीर

HMन्यूज

प्रतिनिधी

सेलू:-आगामी नगरपालिका निवडणुकीतील नगराध्यक्ष पदासाठीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून शेख कौसर शेख उमर यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवार 22 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीचे परभणी जिल्हा प्रभारी तथा माजी मंत्री सुरेश धस,जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्रानी,आ.विजय भांबळे,राष्ट्रवादीचे सरचिटणिस डॉ.संजय रोडगे,सारंगधर महाराज रोडगे,जिल्हा उपाध्यक्ष विनायक पावडे,तालुकाध्यक्ष अशोक काकडे,ता.कार्यध्यक्ष माउली ताठे,शहराध्यक्ष इसाक पटेल,विठ्ठल कोकर ,गौतम साळवे आदींची उपस्थिती होती.
शहरातील श्रीराम प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री सुरेश धस यांनी नगराध्यक्ष पदासाठी शेख कौसर शेख उमर यांचे नाव जाहीर केले. तसेच जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्रानी यांनी सेलू शहराचा पाथरी शहराच्या धर्तीवर विकास करण्याचे आश्वासन दिले.शहरातील रस्ते,सर्व धर्मीयांसाठी मंगल कार्यालय,भाजी मार्केट,जनावरांचा बाजार,पिण्याचे पाणी आदी विविध विकासात्मक प्रश्न मार्गी लावणार असल्याचे स्पष्ट केले.तर आ.विजय भांबळे यांनी आगामी 27 तारखेपर्यंत शहरातील सर्व प्रभागातील उमेदवारांचे ए.बी.अर्ज देणार असून जवळपास सर्व उमेदवार निश्चित झाले असल्याची माहिती दिली.पालिकेत सत्ता आल्यानंतर नात्यागोत्यांचे राजकारण करणार नसून शहराच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे सांगत असतानाच सेलू शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी देणार असल्याचे माहिती यावेळी आ.भांबळे यांनी दिली.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लढत हि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांशीच असल्याचे सांगत असतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाशीही आघाडी करणार नसल्याचे जाहीर केले.

सबसे तेज ,तेजन्यूज हेडलाईन्स,ताज्या बातम्या संक्षिप्त

✍🏻 TEJ NEWS HEADLINES  ✍🏻

--------------------------------------------------------------

⭐तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता उपचारांना प्रतिसाद देत असून, सध्या त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे - सी.विद्यासागर राव, तामिळनाडू राज्यपाल.

⭐जागतिक अर्थव्यवस्थे मध्ये मंदी असतानाही भारताचा जीडीपी वाढत आहे - अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री.

⭐माझ्यावरील आरोप खोटे असून, ज्यांनी माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई करणार - वरुण गांधी.

⭐ इराकच्या किरकुकमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांचा हल्ला, ४६ जण ठार, मृतांमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांची संख्या जास्त.

⭐ ठाणे = परदेशात नोकरीचे आमिष दाखवून बनावट पासपोर्ट, व्हीसा, विमान तिकिट देऊन फसवणूक करणाऱ्या एका दुकलीला ठाणे पोलिसांनी अटक केली. आरोपी नरूल अन्सारी आणि महमद शहा यांच्याकडे नेपाळ मधील काही पासपोर्ट सापडले.

⭐करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल' सिनेमाच्या प्रदर्शनासाठी सहकार्य करणार नाही - नितीन दातार, अध्यक्ष, सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशन.

⭐ नंदुरबार = तळोदा येथे आई व मुलीचा गळफासने मृत्यू. आत्महत्या की घातपात, पोलिसां कडून तपास सुरू.

⭐भुसावळ येथे रेल्वे रुळांजवळ सापडला महिलेचा मृत्यू, खुनाचा संशय.

⭐ चेन्नई = जयललितांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव अपोलो रुग्णालयात पोहोचले.

⭐पाकिस्तानी कलावंतांना घेऊन काम करणा-या निर्मात्यांनी प्रायश्चित म्हणून प्रत्येकी पाच कोटी रुपये द्यावेत आर्मी वेलफेअर फंडाला द्यावेत - राज ठाकरे.

⭐ पाकिस्तान हव तेव्हा तुमच्या चित्रपटांवर बंदी आणणार, हव तेव्हा प्रदर्शित करणार, त्यांना रेड कार्पेट का ? - राज ठाकरे.

⭐ लिहून द्या एकही पाकिस्तानी कलावंत, गायक, तंत्रज्ञ सिनेमात घेणार नाही, त्यांनी मान्य केलं आहे - राज ठाकरे.

⭐ यवतमाळ = राष्टीय महामार्गावर कर्तव्य बजावणा-या  वाहतूक पोलिसाला भरधाव ट्रकने उडवले, वाहतूक शिपाई अरविंद चौधरी यांचा जागीच मृत्यू. ट्रक चालक फरार.

⭐ खामकर बंधूंचा चीनी फटाके न विकण्याचा निर्णय.

⭐यापुढे पाक कलाकारां सोबत काम करणार नाही - बॉलिवूडचा नरमाईचा पवित्रा.

⭐ नालासोपारा = पोलीस ठाण्याच्या लॉकअपमधून गंभीर गुन्ह्यातला आरोपी पळाला.

⭐ मुंबई = 'ए दिल है मुश्किल'सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा,सिनेमाला विरोध करणार नाही - मनसे, मुख्यमंत्री-राज ठाकरे-निर्मात्यांच्या बैठकीनंतर घेतला निर्णय.

जिंतूरात देशमुखांच्या शहर विकास आघाडीचे उमेवार जाहीर

प्रदिप कोकडवाड

जिंतूर:- नगरपरिषद निवडनुकीत रंग भरण्यास सुरूवात झाली असून काँग्रेस,राष्ट्रवादी पाठोपाठ आज माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी राकाँ  आणि काँग्रेस पार्टीला शह देण्या साठी आज नगरविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदा साठीच्या उमेदवार म्हणून अहिल्याबाई विनायकराव देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली आहे तर प्रभाग निहाय उमेदवार प्र १ हकीम खा तयंब खा पठाण प्र 3 प्रताप देशमुख
प्र ११ विजयकुमार घुले  सौ करुणा रत्नदीप शेजावळे यांची उमेदवारी घोषीत करण्यात आली आहे या विषयी आज स्वतः प्रताप देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन हि घोषणा केली आहे .काँग्रेस /राष्ट्रवादी सोबत लढत देऊन उमेदवार विजयी करणार असल्याचा निर्धार त्यांनी या वेळी व्यक्त केल

पत्रकारीतेतील भिष्माचार्यांना शुभेच्छा!!!

पत्रकारिते मधिल भिष्मांचार्य यांचा जन्मदिन उत्सहात

प्रदिप कोकडवार

जिंतूर:-कणखर विचारसरणी चे  जेष्ठ पत्रकार आणि अधिस्वीकृती चे विभागीय सदस्य डॉ सुभाषचंद्र राठी यांच्या जन्मदिन निमित्त आज एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन जिंतूर येथील बालक मंदिर शाळेत आयोजित केलं होतं
वयाची 50 वर्ष पत्रकारितेत एकसारखे खर्च करून पत्रकारचं अतूट नाते ज्यांनी निर्माण केलं अश्या डॉ राठीजींना तेज न्यूज कडून शुभेच्छा!!

   

सेलू जवळ वाहकाने पास धारक मुलींना तिकिट वाढीच्या नावा खाली बस मधून उतरवले

कार्तीक पाटील

पाथरी:-राज्य परिवहन महामंडळाच्या मानवत- आैरंगाबाद एम एच २० बीएल २८९१ या गाडीत धामनगाव येथून काही महाविद्यालयीन मुली बसून प्रवास करत असतांना या गाडीच्या वाहकाने त्यांना दर वाढीचे पैसे मागीतले मात्र या मुलीं कडे पैसे नसल्याने त्या वाहकाने कुंडी पाटी जवळील गणपती मंदिराजवळ गाडी थांबऊन या गाडीतून प्रवास करणा-या मुलींना अक्षरश: गाडीतून हाकलून रस्त्यात सोडले त्या मुळे या वाहका विरोधात गाडीतील प्रवाशी आणि नागरीकां मधून संताप व्यक्त होत असून पाथरी-आैरंगाबाद गाडीच्या या वाहका ने केलेल्या या प्रकाराची चौकशी करून त्याला शासन करावे अशी मागणी प्रवाशां मधून होत आहे.ही घटना आज शनीवार २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते साडे नउ दरम्यान सेलू -पाथरी मार्गावर घडली
  या वर्षी दिपावली हंगामा साठी राज्य परिवहन महामंडळाने २० आॅक्टोबर रोजी निर्णय जाहीर करत २२ ते २४ आॅक्टोबर, २८ ऑक्टोबर ते २ नोहेंबर, ५ ते ६ नोहेंबर , आणि १२ ते १४ नोहेंबर दरम्यान यात साधी, जलद, रात्र सेवा बस साठी १० टक्के, निम आराम साठी १५ टक्के, वातानुकूलीत बस साठी २० टक्के अशी ही भाडेवाड हंगामी स्वरूपात केवळ १४ दिवसां साठी असनार आहे. मात्र या भाडे वाढीतून विद्यार्थी पास, आवडेल तेथे प्रवास अशा पास धारकांना सुट दिलेली असतांना आज पाथरी येथून आैरंगाबाद साठी जाणा-या राज्यपरीवहन महामंडळाच्या बस मधून सेलू येथे शाळा, महाविद्यालया साठी जाणा-या विद्यार्थ्यांना या एस टी बस च्या वाहकाने अक्षरश: वेठीस धरले या वेळी या गाडीतून प्रवास करणा-या विद्यार्थ्यां कडून पाच ते दहा रुपये जादा जबरदस्ती वसूल केले त्याच वेळी या बस मधून धामनगाव येथून महाविद्यालयीन सत्र परिक्षे साठी येत असलेल्या काही मुलीं कडे पैसे नसल्याने या गाडीच्या वाहकाने सेलू जवळील कुंडी पाटी जवळ बस थांबवली आणि या मुलींना गाडीतून अक्षरश: हाकलून लावत खाली उतरवून सोडले या वेळी या मुली साहेब आमची १० वाजता परिक्षा आहे, घरून आम्हाला आगाऊ पैसे देत नाहीत, साडे नऊ वाजले आहेत, आमची नुतन महाविद्यालयात परिक्षा आहे, १० वाजता पेपर आहे ,आम्हाला येउ द्या, अशी विनवनी केली मात्र या मुलींनी कळकळीची विनंती करून हा या महाशयांना या लेकरांची दया आली नाही त्या मुळे महामंडळाने घेतलेला निर्णय विद्यार्थ्यी वगळून असतांना या वाहकाने पैसे कशा साठी वसूल केले? हे पैसे नेमके कोणाच्या खिशात जाणार ?लेकरांचा दोष नसतांना त्यांना रानावनात अशा प्रकारे सोडून जाने कित पत योग्य आहे ?ज्यांचे पैसे वसूल केले त्यांच काय असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून बस मधून आडराणात सोडलेल्या या मुलींना पदविच्या परिक्षेला महाविद्यालयात वेळेवर पोहचता आले नसल्यास त्यांच्या शैक्षनिक नुकसानाच काय? त्या मुळे अशा या वाहकाला कठोर शासन करावे अशी मागणी या गाडीतून प्रवास करणारे पवन पवार यांच्या सह प्रवाश्यांनी केली आहे.वाचन प्रेरणा दिना निमित्त प्रथम एज्यूकेशन फाऊंडेशन च्या वतिने विविध कार्यक्रम

शांतीलाल शर्मा

  पालम:- तालुक्यात काही गावात वाचन प्रेरणा दिनानिमित्त प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन या सामाजिक सेवाभावी संस्थे तर्फे शेख राजूर, केरवाडी व नाव्हलगाव येथे विविध उपक्रम राबवण्यात आले
       १५ ऑक्टोबर रोजी ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन संस्थे मार्फत शेख राजूर, केरवाडी व नाव्हलगाव येथे मोठ्या उत्साहात वाचन प्रेरणा दिन राबवण्यात आला.यामध्ये गावागावातून रॅली व ग्रंथ दिंडी काढण्यात आली तसेच वाचनाचे संदेश देण्यात आले. मुलांसाठी उत्कुष्ट प्रकट वाचन स्पर्धा घेण्यात आली मुलांचे ग्रुप करून वाचन घेण्यात आले.3 री ते 5 वि आणि 6 वि ते 8 वि मधून प्रत्येक गावातून 6 नंबर काढून मुलांना प्रथम संस्थेतर्फ व पालकांच्या मदतीने  बक्षिसे देण्यात आली. गावातील काही पालकांनी आपल्या मुलाचे वाचन घेतले व वाचनात सहभागी झाले.गावातून ग्रंथ दिंडी काढून पुस्तके जमा करण्यात आली. व वाचन दिन मोठ्या उत्साहात सादर करण्यात आला. यामध्ये गावातील नागरिक, अंगणवाडी ताई,पालक ,तरुण युवक, शिक्षक व प्रथम चे जिल्हा समन्वयक पांडुरंग नाईक , प्रथम टीम यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. मुलांना मार्गदर्शन करण्यात आले व वाचनाचे महत्व पटवून देण्यात आले.

राजकीय पक्षात "इनकमिंग आऊट गोईंग" ला सुरूवात


लक्ष्मण वानखेडे

गंगाखेड ( बालाघाट ) :  नगर परिषद निवडणुक काळातील राजकीय इनकमिंग आउट गोईंग ला सुरवात झाली असुन त्याची सुरवात समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शे.युनुस यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेशाने झाली आहे.
माजी मंत्री व कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांच्या उपस्थितीत गंगाखेड येथे शे.युनुस यांनी आपल्या समर्थकासोबत दि.18 आक्टोबर रोजी प्रवेश केला. कॉंग्रेसने त्यांना लगेच शहराध्यक्ष पद देवुन पक्षात सक्रीय केले.यावेळी तालुकाध्यक्ष संतोष मुंडे,बाळ काका चौधरी,नगरसेवक राजकुमार सावंत,गोविंद यादव,विजयकुमार तापडीया आदी उपस्थित होते.
आज दि.21 आक्टोबर रोजी राष्ट्रवादी महीला आघाडीच्या शहराध्यक्षा माजी नगरसेवीका नगमा बेगम महंमदखॉं पठाण यांनी उद्योजक तथा रासपा नेते डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थीतीत रासपा मध्ये प्रवेश केला.यावेळी त्यांच्यासोबत अहेमद पठाण,अजमत पठाण,मोहसिन पठाण,इनायतुल्ला पठाण,आश्रफ पठाण,जावेद पठाण,शे.अनिस,शे.मैनुद्दीन आदींनी रासपात प्रवेश केला.याप्रसंगी रासपाचे विलास गाढवे,नंदकुमार पटेल,राजेश फड,संदिप अळनुरे,
कालूभाई आदी उपस्थीत होते.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुस्लीम समाजातील पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी पक्ष प्रवेश केल्याने कॉंग्रेस व रासप ला मताच्या राजकारणात फायदा होईल असे चित्र निर्माण झाले आहे.
पुढच्या काळात सर्वच राजकीय पक्षांना कार्यकर्त्यांच्या पक्ष सोडून जाण्याच्या प्रश्नाचा सामना करावा लागणार हे सत्य नाकारता येत नाही.

Friday, 21 October 2016

सबसे तेज,तेजन्यूज हेडलाईन्स ताज्या बातम्या संक्षिप्त स्वरूपात.

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻
______________________________________

⭐जम्मू-काश्मीर = बारामुल्लामध्ये 'जैश-ए-मोहम्मद'च्या दोन दहशतवाद्यांना अटक, एके 47, एक पिस्तुलसह शस्त्रसाठा जप्त.

⭐ए दिल है मुश्किल चित्रपट वाद - यापुढे कोणत्याही पाक कलाकारांसोबत काम करणार नाही - मुकेश भट्ट.

⭐मुंबई = 'ए दिल है मुश्किल' सिनेमाचा वाद, प्रोड्युसर्स असोसिएशनच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय, थिएटरमध्ये सिनेमाच्या सुरुवातीला उरी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहणार, सिनेमाच्या नफ्यातून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करणार - मुकेश भट्ट.

⭐मुंबई = मुख्यमंत्री-राज ठाकरे-करण जोहर यांची बैठक संपली, भविष्यात पाक कलाकारांना सिनेमात घेणार नाही- प्रोड्युसर्स असोसिएशन.

⭐नाशिक लासलगाव येथे जनावरांचे अवशेष असलेले वाहन जाळण्याचा काही तरुणां कडून प्रयत्न, घटनेचा निषेध म्हणून लासलगाव बंदचे आवाहन.

⭐मंगरूळपीर ( वाशिम ) = शहरातील जांब रस्त्यावर असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ महीलेची हत्या, पोलीस घटना स्थळावर दाखल.

⭐मुंबई - 'ए दिल...'च्या प्रदर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी?, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, निर्माता-दिग्दर्शक करण जोहरलाही वर्षा बंगल्यावर बोलावल्याची माहिती, सिनेमामध्ये पाकिस्तानी कलाकारअसल्याने मनसे आक्रमक.

⭐मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, भेटीमागे 'ए दिल है मुश्किल' सिनेमाच्या वादाची पार्श्वभूमी असण्याची शक्यता.

⭐औरंगाबाद = एका महिलेची गळफास घेऊन आत्महत्या, नवरा वेळ देत नसल्याने केली आत्महत्या, पतीला पाठवला सेल्फी.

⭐सायबेरीया मध्ये रशियन हॅलिकॉप्टर कोसळून १९ जण ठार झाल्याचे वृत्त.

⭐ रिलायन्स जियोला कॉल जोडणी करत नसल्याबद्दल ट्रायने एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्यांना ३०५० कोटींचा दंड सुनावण्याची सरकार कडे मागणी केली आहे.

⭐ आमच्या जवानांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले, पाकिस्तान कडून जेव्हा जेव्हा अशी आगळीक होईल तेव्हा असेच उत्तर मिळेल - हंसराज अहीर, केंद्रीय गृहराज्यमंत्री.

⭐पंतप्रधान नरेंद्र मोदीं आज जाणार गुजरात दौ-यावर, वडोदरा येथे करणार आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन.

⭐ थायलंडला नमवून भारतीय कबड्डी संघाचा कबड्डी वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश, इराण विरुद्ध होणार अंतिम सामना.

⭐ पाकिस्तान कडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मू-काश्मिरच्या राजौरीमध्ये मांजाकोटे येथे पाकिस्तान कडून जोरदार गोळीबार, भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर, काल बीएसएफच्या गोळीबारात सात पाकिस्तानी सैनिकांसह, एक दहशतवादी ठार झाला होता.

⭐ बोध राज या पाकिस्तानी हेराला जम्मू-काश्मिरच्या सांबा सेक्टरमधून अटक करण्यात आली आहे, त्याच्याकडे पाकिस्तानी सीम कार्ड आणि नकाशे सापडले आहेत.

⭐जम्मू-काश्मीर = पाकिस्तानी हेर जम्मू पोलिसांच्या ताब्यात,  त्यांच्याकडून दोन पाकिस्तानी सिमकार्ड आणि फोन जप्त केलं.

⭐कॅमेरुन मध्ये ट्रेन अपघात, ५३ जणांचा मृत्यू झाला तर ३०० हून अधिक प्रवाशी जखमी.

⭐पाकिस्तान कडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मू-काश्मीर मधील राजौरी मध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार सुरु केला असून भारता कडून सुद्धा चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

⭐शिर्डी-सिन्नर मार्गावर बस, ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू.

⭐गडचिरोली = १७ लाख ५९ हजार रुपये किमतीच्या तांदळाची अफरातफर: वखार महामंडळाच्या निवृत्त साठा अधीक्षकावर देसाईगंज येथे गुन्हा दाखल.

⭐कबड्डी वर्ल्डकप = उपांत्य फेरीच्या लढतीत भारताचा थायलंडवर ७३-२० असा दणदणीत विजय, उद्या अंतिम फेरीत भारताची लढत होणार इराण बरोबर.

डॉ साहेब खंदारे यांना युनोस्कोचे निमंत्रण

शांतीलाल शर्मा

पालम:-येथील सामाजिक विज्ञाने व लोकसाहित्य संशोधन संस्थेचे संशोधन कार्यवाह आणि पालमच्या माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.साहेब खंदारे यांना यूनोस्कोने दक्षिण कोरीयामध्ये आयोजित केलेल्या आशिया खंडातील आयसीएच एनजीओ परिषद २०१६ साठी निमत्रीत केले आहे.
    सदरील परिषद नोव्हेंबर २०१६ च्या पहिल्या आठवडयात दक्षिण कोरियात होणार असून या परिषदेत सतरा देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहे.या परिषदेत डॉ.साहेब खंदारे 'अमुर्त सांकृतिक संचीताद्वारे समाज संवर्धन आणि रोजगार अभिवृधी, या विषयावर दोन सत्रांमध्ये आपले कृतीवर सादरीकरण करतील. जागतिकीकरणाच्या झपाटयात अमूत सांस्कृतीक संचीत गतीने कालबाह्य होते आहे.आणि त्या बरोबरच पारंपारीक तंत्रज्ञान आणि  कौशल्याचाही नाश होत आहे.ही बाब लक्षात घेवून डॉ.खंदारे गेल्या तीस वर्षापासुन लोकसाहीत्याच्या क्षेत्रात काम करीत आहे.या संदर्भात त्यांनी संपूर्ण भारतात अभ्यास दौरे केलेले असून श्रीलंका,बांगलादेश,भूतान,नेपाळ अशा देशातही अभ्यास केलाआहे.अमूर्त सांस्कृतिक संचिताच्या संवर्धनासाठी डॉ.साहेब खंदारे यांनी प्रचंड काम केले असून परभणी येथील सामाजिक विज्ञाने व लोकसाहित्य संशोधन संस्थेमध्ये हे सर्व संकलन-संवर्धन जतन करून ठेवले आहे.जगातील विविध देशांमधील विविध समूह आणि लोक यांच्या विकासासाठी त्यांचे लोकसाहित्य उपयोगी ठरू शकते.या भूमिकेतून डॉ.खंदारे यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे.या सर्व बाबी लक्षात घेवूनच जगातील युनोस्कोसारख्या अंतरराष्ट्रीय संस्थेने त्यांना निमंत्रीत केले आहे

सबसेतेज,तेजन्यूज हेडलाईन्स,ताज्या बातम्या,राज्य,देश,विदेश,क्रिडा,संक्षिप्त

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻
--------------------------------------------------------------------

⭐पुढच्या 48 तासात ऐ दिल है मुश्किल बाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करू असं राज ठाकरेंनी पदाधिका-यांना सांगितलंय. व्हॉट्सअप सोशल नेटवर्किंग साईट्सवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही यावेळी राज यांनी केलीय. चित्रपटाला विरोध कायम असल्याचं या बैठकी नंतर अमेय खोपकर यांनी स्पष्ट केलंय.


⭐ अहमदनगर = कोपरगावच्या संत जनार्दन स्वामी संस्था आश्रमाचे अध्यक्ष मोहन चव्हाण यांच्या भावाचे शिर्डी जवळील सावळी विहीर येथे अपघाती निधन. ही बातमी ऐकून दुसऱ्या भावाचे निधन. रामभाऊ व दौलतराव अशी दोघांची नावे.

⭐ललिता दाबास आत्महत्या प्रकरणी कबड्डीपट्टू रोहीत चिल्लरच्या वडिलांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.

⭐ तामिळनाडू = कोईम्बतूर मधील गांधी पार्क परिसरात फटाक्यांच्या गोडाऊनला आग, 10 जण आतमध्ये अडकल्याची भीती, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, बचावकार्य सुरु.

⭐ मुंबई = माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेचा जीवनगौरव पुरस्कार.

⭐ धुळे = अमृत आहार योजना अंतर्गत गर्भवती आणि स्तनदा मातांना आहार दिला नाही म्हणून 20 अंगणवाड़ी सेविका आणि 5 पर्यवेक्षिका नोटीस दिली. जिल्हा परिषद महिला विभागची कारवाई.


⭐नवी दिल्ली = जेएनयू विद्यार्थी नजीब अहमद बेपत्ता प्रकरणी विद्यार्थ्यांच रेल्वे भवन जवळ आंदोलन, पोलिसांनी 144 कलम लागू केलं असून आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे.

⭐नवी दिल्ली = सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचा हंगामी पॅरोल 28 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे, सहाराने आज 200 कोटी भरले असून नोव्हेंबर अखेरपर्यत 200 कोटी भरण्याची शाश्वती दिली आहे.

⭐मुंबई = शीना बोरा हत्या प्रकरण - विशेष सीबीआय न्यायालयात सीबीआय कडून पुरवणी आरोपपत्र दाखल.

⭐ सोलापूर = भीमा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणारे ४ जेसीबी, ६ ट्रॅक्टर पकडले.

⭐नगर = संगमनेर शहरात गोळीबार, दीपक दुसाने हा तरुण जखमी. कारण अस्पष्ट.

⭐ वोडाफोन ग्राहकांना दिवाळी भेट, रोमिंग इनकमिंग कॉल्सला शुल्क नाही.

⭐सोलापूर = पाच हजारांची लाच घेताना भूमाफक विभागातील अधिका-याला अटक. सोलापूर एसीबीची कारवाई.

⭐अहमदनगर = संगमनेर शहरातील एकता चौकात भरदिवसा गोळीबार, एक तरुण जखमी, रुग्णालयात दाखल.

⭐ सातारा = खटाव तालुक्यातील चितळी येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत पन्नास लाखांची चोरी, गॅस कटरचा वापर करून चोरट्यांनीआत प्रवेश केला. सोने-चांदीचे दागिने व सी सी टीव्ही फुटेजही लंपास केले.

⭐ माझ्या चारित्र्यावर संशय व्यक्त केल्याने मानहानीचा खटला चालवणार, माझ्यावर दोन पासपोर्ट असल्याचा आरोप, दाऊदशी काहीही संबंध नाही - रियाज भाटी.

⭐नवी दिल्ली = डेंग्यू प्रकरणी ११ नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी.

⭐पुणे = इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, प्रोजेक्टच्या मदतीसाठी बोलावून केला अत्याचार.

⭐ बुलडाणा खामगाव येथे दिवाळी सण जवळ आल्याने शेतकऱ्यांची बाजार समितीत गर्दी झाली असून, सोयाबीन विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांच्या वाहनांची २ कि.मी. पर्यंत रांग लागली आहे.

⭐ जम्मू काश्मीर मधील राजौरी येथे पाकिस्तान कडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय जवानांकडून प्रत्युत्तर.

⭐वसई सुरूचीबाग येथे झाडी मध्ये तीन दिवसांचे बाळ सापडले, बाळ सुखरूप असून बाळाच्या आईचा शोध सुरू आहे.

⭐ नागपूर = कुख्यात गुंड अरूण गवळी ची पॅरोलवर सुटका.


⭐ भारत - इंग्लंडमध्ये होणा-या टेस्ट सीरिज दरम्यान डीआरएसचा (डिसीजन रिव्ह्यू सिस्टीम) वापर करण्यास बीसीसीआयची मान्यता, ट्रायल म्हणून वापर करण्याची मान्यता देण्यात आली आहे.

⭐मुंबई = नवाब मलिक यांचे भाजपावर गंभीर आरोप, रियाज भाटी भाजपाच्या जुन्या कार्यकारिणीत होता, संपूर्ण मंबईत दाऊद टोळीने भाजपाला मदत केली.

⭐ अहमदनगर = शहरातील तारकपूरच्या झुलेलाल मंदिरासमोरील आहुजा क्लिनिक जाळण्याचा प्रयत्न, दोन मजली दवाखान्याच्या काचा फोडल्या, बेड जळाले, मोठे नुकसान.


⭐ सोलापूर रेल्वे स्थानकात चालत्या रेल्वेत अहमदनगरच्या महिलेवर बलात्कार, ३ आरोपींना अटक.

⭐लातूर = मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक सयाजीराव सौताडेकर यांचे वार्धक्याने निधन. निजामाविरुद्धच्या लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.