तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 29 October 2016

जन्मभूमी फाऊंडेशन ने जागृती केलेल्या पिंपळगावातील तरून सरसावले

जन्मभूमी फाऊंडेशनच्या जागृती मेळाव्याचा परिणाम
तरूनांनी एकत्रयेत नदी वर उभारला मातीचा बंधारा
पाथरी:- तालुक्यातील चाटेपिंपळगाव या गावातील तरूनांनी जन्मभूमी फाऊंडेशनच्या मार्गदर्शनात गावातील लेंडी नदी वर माती आणि पॉलीथीन चा वापर करत बंधा-याची उभारणी केली असून जवळ पास दिड किमी अंतरात पाणी साठल्या मुळे विहिरी आणि कुपनलीकांच्या पाण्याची पातळी जमिनी बरोबर आल्याने तरूनांच्या या कर्तबगारी ग्रामस्थ जाम खुश झाल्याचे दृष्य या गावी भेट दिली असता पहावयास मिळाले.
   गेली तीन चार वर्षा पासून हे गाव कोरड्या दुष्काळाचा सामना करत आहे दोन महिण्या पुर्वी पर्यंत घोटभर पाण्या साठी ग्रामस्थांना कोस भर भटकंती करावी लागत होती. ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्याची विहिर गावालगत वाहणा-या लेंडी किणारी मात्र या विहिरीत गेली अनेक वर्षा पासून पाण्याचा थेंब ही नव्हता सप्टेबर महिण्यात पडलेल्या पावसा मुळे विहिरीला पाणी आले होते त्यात नदीचे पात्र ही पाण्याने वाहते आहे अशातच गावातील तरुनांनी गौरी-गणपती सणा वेळी गावातील अनिवासींना सोबत घेत जन्मभूमी फाऊंडेशन च्या सहकार्यांने गावात जलजागृती मेळावा आयोजीत करून गाव विकासा साठी तरूनांनी पुढाकार घेत जन्मभूमी फाऊंडेशन ने गावचे पाण्याचे दुर्भिक्ष घालवण्या साठी मदतीचे आश्वासन देत लोकसहभाग आणि जन्मभूमी फाऊंडेशन ची मदत घेत या गावात जल संधारणाची कामे करण्याचा निर्धार केला असून त्या अनुशंगाने चाटेपिंपळगावातील तरून आता गाव पाणी टंचाई मुक्त करण्या साठी सरसावले असू नुकतेच या गावातील अनिवासी तरुन आशोक गिराम यांच्या मार्गदर्शनात महादेव जगताप आणि तुकाराम बुरंगे या तरूनांनी स्व खर्चातून पॉलीथीन आणि जेसीबी मशीन च्या साह्याने माती चा मजबूत बंधारा नदी पात्रात उभारला असून त्याला आतील पाण्याच्या बाजूने पाणी झिरपून माती वाहून जाऊ नये म्हणून पॉलीथीन लावण्यात आले आहे. तर पाण्याचा अतिरिक्त प्रवाह दोन ठिकाणी वेगळे चर काढून या नदी वर उभारलेल्या बंधा-याच्या पुढील बाजूस नदी लगट असलेल्या आेढ्यातून पाणी काढून देण्यात आले आहे. या ठिकाणी नदिची खोली जवळ पास विस फूट खोल असून बंधा-याची उंची चौदा फुट उंच ठेवण्यात आली आहे. त्या मुळे या मातीच्या बंधा-यात जवळपास दीड किमी अंतरात बॅक वाटर साचले असल्याने गावाला पाणी पुरवठा करणारी विहिर काठोकाठ भरली असून नदी काठावरील ईतर शेतक-यांच्या शेतातील विहिरी कुपनलिका काठोकाठ भरल्या असल्याने गावातील जगताप आणि बुरंगे या तरुनांचे मोठे कौतूक होत असून शुक्रवारी हा बंधारा पाहाण्या साठी तालुका कृषी अधिकारी वगरे यांनी भेट देऊन पाहाणी केली. तर टीम जन्मभूमी चे सचिव किरण घुंबरे आणि सहका-यांनी शनीवारी सकाळी या बंधा-याची पाहणी करून तरुनांना मार्गदर्शन केले. गाव टंचाई मुक्त करण्या साठी या गावचे सरपंच रामेश्वर भालसत्रे, बन्सी काळे, तुकाराम बुरंगे, प्रल्हाद काळे, भगिरथ काळे यांच्या सह मोठ्या संखेने तरून ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.

परभणी जिल्ह्यातील सात नप अध्यक्ष पदा साठी १११ तर १४७ प्रभागातील जागे साठी १२९९ अर्ज

कार्तिक पाटील
पाथरी:- परभणी जिल्ह्यातील सात नप साठी होणा-या निवडणुकी साठी आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकिय पक्ष आणि अपक्षांनी मोठी गर्दी करत उमेदवारी अर्ज दाखल केले यात सात नप च्या अध्यक्ष पदा साठी १११ उमेदवारांनी नामांकन दाखल केले तर नगरसेवक पदा साठी १२९९ अर्ज दाखल केले आहेत 
यात सोनपेठ नप अध्यक्ष पदा साठी १२अर्ज तर नगरसेवक पदा साठीच्या आठ प्रभागातील १७ जागां साठी १६० जनांनी उमेवारी अर्ज दाखल केले आहेत. तर पाथरीत अध्यक्ष पदा साठी २० आणि १० प्रभागातील २० जागे साठी १४९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, गंगाखेड येथे अध्यक्ष पदा साठी २१ अर्ज तर १२ प्रभागातील २४ जागां साठी २३७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. जिंतूर येथे अध्यक्ष पदा साठी १० तर नगरसेवकां साठीच्या ११ प्रभागातील २३ जागां साठी १२५ अर्ज. पुर्णा अध्यक्ष पदा साठी २० अर्ज तर १० प्रभागातील २० जागां साठी २८४ अर्ज.मानवत अध्यक्ष पदा साठी १० तर ९ प्रभागातील १९ जागां साठी १४४ अर्ज दाखल करण्यात आले आहेत तर सेलूत अध्यक्ष पदा साठी १८ आणि १२ प्रभागां साठी २०० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत

वाघाळा येथे "रेडा"चोरून आणनारा चोरटा चोपून काढला

कार्तिक पाटील
पाथरी:तालुक्यातील वाघाळा येथे एका चोरट्याने सात साडे सात च्या दिवे लावण्याच्या सुमारास संधी साधत केकरजवळा येथून देवाला सोडलेला म्हशीचा रेडा चोरून आणला हा रेडा उचलून नेतांनां काही जनांनी पाहीला लागलीच फोन वरून याची माहिती ग्रामस्थांना दिली आणि या चोरट्याचा पाठलाग करत वाघाळा गाव गाठले या ठिकाणी वाघाळा गावातील तरुन आणि ग्रामस्थांच्या मदतीने रेडा चोराला पकडले आणि बेदम चोप दिला आणि पाथरी पोलीसांच्या हवाली हा चोरटा केला. या वेळी पाथरी पोलीसांनी तात्काळ वाघाळा गावात येऊन चोरटा घेउन गेले आहेत या चोरट्याचे नाव उत्तम सुंदर पवार असल्याचे ग्रामस्थ सांगत असून तो परिसरात नियमित पणे लहाणाव मोठ्या चो-या करत शेतकरी आणि ग्रामस्थांना त्रास देत असल्याचे सांगितले जाते.

सेलूत उमेदवारी अर्ज भरण्या साठी शेवटच्या दिवशी भाऊ गर्दी

राम सोनवने
सेलु:-:पालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी  पालिका निवडणुकीतील इच्छुकांनी उपविभागीय कार्यालयात भाऊ गर्दी केली होती.
      शनिवार 29 आक्टोंबर शेवटच्या दिवशी पालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासकीय इमारत परिसरात इच्छुकांची भाऊ गर्दी होती. पालिका निवडणुकीतील इच्छुकांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली तर जवळपास सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवार निवडीचा पेच मिटल्याने प्रभागासह अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.यामुळे शेवटच्या दिवशी प्रशासकिय इमारत परिसरात इच्छुकासह कार्यकर्त्यानी गर्दी केली होती.
◼ उमेदवारीचा तिढा सुटला.
शहरातील बारा प्रभागतील एकुण 24 जागेसाठी 107 इच्छुक उमेदवारांनी तर अध्यक्षपदासाठी 7उमेदवारानी उमेदवारी अर्ज शुक्रवार 28 आँक्टोंबर पर्यंत दाखल केले आहेत .नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी सुरुवातीला इच्छुकांची गर्दी नव्हती 26 आँक्टोंबर रोजी प्रभागासाठी 18 तर नगराध्यक्ष पदासाठी 1,27 आँक्टोंबर रोजी प्रभागासाठी 22 ,28 आक्टोंबर रोजी प्रभागासाठी 67 तर अध्यक्ष पदासाठी 6उमेदवारी अर्ज दाखल झाले असुन आज शनिवार 29 आक्टोंबर रोजी प्रभागासाठी 93 तर अध्यक्ष पदासाठी 11उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने शेवटच्या दिवशी एकुण प्रभागासाठी 200 तर अध्यक्ष पदासाठी 18 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 
◼अध्यक्ष पदासाठी 18  नामांकन 
सेलु नगरपालिका निवडणुकीतील अध्यक्षपदासाठी विनोद बोराडे यांचे 3 ,श्याम भावसार, श्रीनिवास उघडे, पवन आडळकर2, हेमंतराव आडळकर, आशोक खताळ2 ,गणेश भिसे,संदिप लहाने, प्रसाद खारकर, शेख सोहेल, पठाण अमजद, विष्णु ढोले, तडवी पठाण इम्तियाज, शेख कौसर, आदी 14 इच्छुकांनी 18 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

पाराळा परिसरातील प्रवाशांना एसटी ची दिवाळी भेट; औरंगाबाद पारळा मार्गावर बस सूरू

प्रदिप जाधव
वैजापूर:-औरंगाबाद  पाराळा मार्गा  वरील  प्रवाशांची गर्दी  आणि  परिसरातील ग्रामस्थ  आणि विध्यार्थी यांची मागणी लक्षात घेता   एस टी  महामंडळा  कडून  औरंगाबाद पाराळा मार्गावर एस टी ची बस  सेवा सुरू केली आहे. बस सुरू झाल्या मुळे सर्वांनीआनंद वेक्त केला आहे. औरंगाबादचे वाहतूक नियंत्रक श्री रायलवार,  वैजापूरचे आगार प्रमुख श्री राजपूत, मा. सरपंच विशाल शेळके व श्री कैलास आहेर यांचा विशेष  प्रयत्नातून हि बस  सेवा सुरू  करण्यात  आली. 
औरंगाबाद हुन सायंकाळी 5.00 वाजत सुटणारी हि बस पडेगाव, माळीवाडा,  फटियाबादवाडी, जांभळा, देवगावरंगारी, गारज, शिऊर बंगला,  टुनकी, लोणी खु, तलवाडा,भादली मार्गे पाराळा  येथे सांयकाळी  7.00 वाजता पोहचेल आणि मुक्कामी थांबेल, परतीच्या प्रवासात  दुसर्या दिवशी सकाळी 6.30 वाजता पाराळा  येथून सुटेल  आणि औरंगाबादला सकाळी 8.30 ला पोहचेल. औरंगाबाद ते पाराळा  प्रवास 98रु भाडे  आकारण्यात  येत आहे.  मराठवाड्याची राजधानीआणि  जिल्ह्याचे ठिकाणशी जोडणाऱ्या या सेवेमुळे वैजापूरतालुक्यातील डोंगरथंडी तसेच मन्याड  खोरयातील पाराळा,भादली,  चिकटगाव, खरज, हिलालपूर,  वडजी या ठिकाणच्याग्रामस्थ याना या सेवेचा लाभ होणार आहे, तसेचपरिसरातील सर्व विध्यार्थी  खास करून विधार्थिनी, मुलीच्या शिक्षणासाठी या बसचा उपयोग  होणार आहे. आज सुरूझालेल्या  बसचे वाहक श्री एस पी काळे,  चालक श्री एन. बी.जगताप यांचा  आैरंगाबाद येथे शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यातआला  बसपूजन आणि  सत्कार  प्रसंगी वेळेस सर्वश्री मा. सरपंच विशाल शेळके,  कैलास आहेर, ज्ञानेश्वर बिडाइत, स्वप्नील पवार, प्रदीप आहेर,   देविदास  पवार,   संजय ढोकणे,  संदीप निपटे, आबासाहेब जाधव  आदी सह  ग्रामस्थ आणि विध्यार्थी उपस्थित होते.आणि पारळा येथे बसला फुलांचा हार श्री जालिंदर आहेर यांच्या हस्तेघातला व श्रीफळ वाहण्यात आले या प्रसंगी बाळासाहेब आहेर, बापूसाहेब आहेर, संतोष आहेर,  दिपक आहेर आदि उपस्तित होते

पाथरीत पाच ठिकाणी दरोडा;एकावर चाकू हल्ला

कार्तिक पाटील
पाथरी:- शहरातील आदर्शनगर आणि इंदिरानगर भागात शनावारी पहाटे एक च्या सुमारास सहा ते सात सशस्र दरोडे खोरांनी एकाच वेळी पाच ठिकाणी दरोडा टाकत १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल लंपास केला तर पत्नीला मारहाण करत असलेल्या पती ला चाकूने भोसकून गंभिररीत्या जखमी केल्याची घटना पाथरी शहरात घडली आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार शणीवारी पहाटे सव्वा एक वाजण्याच्या सुमारास आदर्श नगर भागातील चार घरी आणि इंदिरानगर भागातील एका घरी सहा ते सात सशत्र दरोडे खोरांनी घरात घूसून मारहाण करत एैवज लुटण्यास सुरूवात केली यात सुनिल नारलावार यांच्या पत्नीला दरोडेखोर मारहाण करत असतांना ते मध्ये पडले म्हणून दरोडे खोरांनी सुनील यांच्या पार्श्वभागावर चाकूने हल्ला करून जबर जखमी केले या वेळी दरोडेखोरांनी सुनिल यांच्या पत्नीच्या अंगावरील दागीने लुटूले या नंतर चार अजून काही ठिकाणाहून एक लाख सत्तर हजार सहाशे रुपयांचा मुद्दे माल पळवला या प्रकारा मुळे पाथरी शहरात दहशत पसरली आहे. या विषयी सुरेश विठ्ठलराव सोने यांच्या फिर्यादी वरून अज्ञात दरोडेखोरां विरोधात ३६१/१६ नुसार ३९५ नुसार दरोड्याचा गुन्हा पाथरी पोलीसात दाखल झाला आहे.

औरंगाबाद मध्ये फटाका मार्केट मध्ये आग

शेख अथर
औरंगाबाद : औरंगाबादच्या सर्वात मोठ्या फटाक्याच्या मार्केटला आज भीषण आग लागलीय. साधारण दीडतासापूर्वी लागलेल्या आगीवर आता नियंत्रण आणण्यात यश आलंय.
जिल्हापरिषदेच्या मैदानात असणाऱ्या जवळपास 150 दुकाननं आगीच्या भक्ष्यस्थानी आली. दिवाळीचे दिवस असल्यानं सगळ्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके होते.
आग लागल्यावर फटाके फुटायला लागल्यांनं मोठे आवाज होऊ लागले. आजूबाजूच्या इमारतींमध्ये राहणारे नागरिक प्रचंड प्रमाणात धास्तावलेत. या आगीत 20 कार, 30 ते 40 दुचाकी आणि पाच रिक्षा या आगीत आतापर्यंत जळून खाक झाल्या आहेत. अद्याप जीवितहानीबाबत माहिती समोर आलेली नाही. पण बहुतांश लोक वेळीच बाहेर पडल्याचं चित्र सध्या पुढे आहेत.

Friday, 28 October 2016

जिंतूर मध्ये राम कृष्ण परिवाराचा अव्याहत प्रभात फेरी;नागरीकांचा सहभाग

प्रतिनिधी
जिंतूर:-शहरात पहाटे पहाटे भक्तिमय वातावरण तयार करून सर्वांची सकाळ गोड करण्याचं कार्य गेल्या ११ वर्षा पासून अव्यहत पणे राम कृष्ण हरी  परिवार करीत आहे 
शहराचं सकाळ च धार्मिक वातावरण कायम सम्भाळत हि प्रभात फेरी चालू आहे

परिवर्तन विचारमंच मित्रमंडळाचे आज जबरदस्त शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल होणार

कार्तिक पाटील
पाथरी:- न प साठी उमेदवारी भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी परिवर्तन विचारमंच मित्रमंडळाचे फार्म या मित्रमंडळाचे अध्यक्ष सईद खान उर्फ गब्बर यांच्या नेतृत्वात मोठे शक्ती प्रदर्शन करत भरणार असल्याची माहिती परिवर्तन विचारमंच चे अध्यक्ष सईद खान यांनी दिली.
परिवर्तन विचारमंच च्या वतिने आज जूने पोष्ट आॅफिस, राममंदिरा पासून सकाळी ११ वाजता रँली काढण्या येणार असल्याची माहीती गब्बर यांनी दिली ही रँली मुख्य रस्त्याने नगरपालीका परिसरात येणार आहे. अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने नप परिसराला जत्रेचे स्वरूप येणार आहे आजच्या दिवशीच शिवसेना आणि भाजपाही आपआपले उमेदवारी अर्ज दाखल करतील.

राजकिय वरदहस्त प्राप्त गुंडां कडून पत्रकारांवर होणारे हल्ले थांबणार कधी?

दिनेश चौधरी
महाराष्ट्रात प्रसार माध्यमांवरील हल्लें राजकीय वरदहस्त प्राप्त गुंड शाहीला लगाम लावणार कोण..?
महाराष्ट्राची बिहारच्या दिशेने वाटचाल होते की काय..? असा गंभीर प्रश्न वृत्तपञ क्षेञा मध्ये उपस्थित होत असुन राज्यात राजकीय वरदहस्त प्राप्त गुन्हेगारी प्रवृत्ती कडून पत्रकारांवर होणारे हल्ले थांबतील तरी कशे..? गुन्हेगारी प्रवृत्तीला राजकारणातील राजकीय दहशतवादी प्रवृत्तीचे वेळोवेळी भक्कम पाठबळ मिळत असल्याने राज्यात सर्वञ अवैध व्यवसायात गुंतलेले गुन्हेगारी प्रवृत्तीचे गुटखा-गौण खनीज-मटका-भुखंड-अमली पदार्थ माफिया एकछञी दहशत निर्माण करतांना दिसत असुन राज्यात रामराज्य की रोमराज्य..? या प्रश्नाचे उत्तर राजकारणी देणार तरी काय..? 'मुह में राम बगल में छुरी'अशीच एकंदर परिस्थिती राज्यात निर्माण झाल्याचे दिसत असुन काल दि.26 आक्टोंबर 16 रोजी रात्री पनवेल येथे दैनिक कर्नाळा या वृत्तपञाचे  संपादक उन्मेश गुजराती यांच्यावर गुंडांनी भ्याड हल्ला केला होता ही घटना ताजीच  असतानाच दि.27 आक्टोंबर 16 रोजी गडचिरोली जिल्ह्यातअवैध धंद्याविरोधात बातमी लावली म्हणून नगरसेविकेच्या पतिकडून दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार रमेश कोंडबत्तुलवार यांच्या वर 10 ते 15 जनानी हल्ला केला आहे महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ले काही केला थांबेनात राजकीय दहशतवादी प्रवृत्तीने पोसलेल्या त्या सर्व तस्कर-गुंड-माफिया अवैध व्यवसाईक हरामखोर हलेखोरांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आता महाराष्ट्रातील निर्भीड जनहीतवादी सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या वृत्तपञ प्रतिनिधींवर आलेली आहे . 
महाराष्ट्रातील पञकार बांधवांनो पञकारांवर हल्लें करणाऱ्या हल्लेखोरांना राजकीय दहशतवाद्यांचे पाठबळ असल्यामुळे ते षंढ घाबरणार तरी कसे..? म्हणून पञकारांची एकता आवश्यक आहे. 
         
            - रणजीत सी.(चौधरी दिनेश)
             * प्रेस फॉर जस्टीस *

पुर्णेत प्रभाग सहा मध्ये माता-सुपुत्रानेच दाखल केली उमेदवारी

दिनेश चौधरी
पुर्णा:-नगर परिषद निवडणूकी मध्ये प्रस्थापितांना प्रत्येक प्रभागामध्ये प्रखर विरोध होतांना दिसत असुन वर्षानुवर्षे मतदारांनी विश्वास व्यक्त करुन बहुमताने निवडून दिलेल्या प्रस्थापित लोकप्रतिनिधींनी प्रभागाचा यत्किंचितही विकास तर केलाच नाही परंतू विश्वासघात माञ निश्चितच केल्याचे दिसत असुन अनेक प्रभागातील प्रस्थापित लोकप्रतिनिधींनी आपल्या क्षेञाचा विकास न करता करोडो रुपयांचा विकास निधी अन्य प्रभागांमध्ये वापरल्याने शहरातील अनेक अविकसित भागांचा विकास तर झालाच नाहीं परंतु संबंधित प्रस्थापित लोकप्रतिनिधींनी स्वतःचा माञ भरपूर विकास साध्य करुन घेतल्याने शहरातील अनेक प्रभागामध्ये मतदारच प्रस्थापित हटाव चे नारे देतांना दिसत आहेत
शहरातील प्रभाग क्र.06 या मागासवर्गीय व अविकसित प्रभागातील अण्णाभाऊ साठे नगर,कुंभार गल्ली,भिमनगर,अशोक नगर,विजय नगर,या भागात तर काडीमाञ हीं विकास न झाल्यामुळे या प्रभागा मध्यें प्रस्थापित लोकप्रतिनिधीं विरोधात तिव्र असंतोष पसरला असून मतदार जनतेच्या असंतोषाचा स्पोट येत्या 27 डिसेंबर 2016 रोजी मतपेटीतून व्यक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही सदरील प्रभागातून प्रस्थापित लोकप्रतिनींच्या विरोधात शुक्रवार दि.28 आक्टोंबर रोजी प्रभागातील राजु विश्वनाथ नारायनकर यांनी ओपन पुरुष गटातून तर एस.सी.महिला गटातून सारजाबाई विश्वनाथ नारायनकर या माता-सुपुञानेच उमेदवारी दाखल केल्याने प्रस्थापितांचे धाबे दनाणले असुन सदरील प्रभागामध्ये धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी जोरदार लढत होण्याची चिन्हें दिसु लागली आहे सदरील प्रभागातून उमेदवारी दाखल केलेल्या व जनसामान्यांसाठी सदैव तत्पर राहणाऱ्या राजु नारायनकर या सामाजिक कार्यकर्त्याला मानणारा फार मोठा वर्ग या प्रभागात असल्याने  या माता-सुपुञाचा विजय निश्चित मानला जात आहे

सेलूत व्यापारी-संचालकात वाद ,एैन दिपावलीत व्यापा-यां कडून सोयाबीन खरेदी बंद;शेतकरी अडचणीत

राम सोनवने
सेलु:तालुक्यात सध्या दिपावली सणाच्या निमित्ताने बाजरपेठेत शेतकरी आपले सोयाबीन विक्री करण्यासाठी आणत आहेत. सोयाबीनची हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी होत असतांनाच त्याच बरोबर बाजार समितीच्या संचालक व व्यापारी यांच्या वादामुळे व्यापा-यांनी खरेदी बंद केल्याने शेतकरी आडचणीत सापडले आहेत. 
दि. 27 आक्टोंबर रोजी बाजार समितीने संचालक व व्यापारी यांची बैठक आयोजीत केली होती. विकास काम व बाजार समितीचे उत्पन्न वाढवण्यासाठी चर्चा करत असताना संचालक व व्यापारी यांच्या मध्ये वाद निर्माण झाला. व्यापा-यांना जातीवाचक वक्तव्य केल्याने व्यापा-यानी त्या संचालकाच्या विरोधात बाजार समिती कडे व्यापारी असोसिएशच्या वतिने निवेदन दिले होते. या व्यापा-याच्या वतिने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की. बाजार समितीच्या संचालकाने जातीवाचक वक्तव्य करुन आमचा आवमान केला असुन त्या संचालकाचा व्यापारी असोसिएशनच्या वतिने निषेध करण्यात येत असुन या वक्तव्यामुळे व्यापा-याच्या भावना दुखावल्या असुन या बाबीचा निषेध करण्यासाठी व्यापा-याच्या वतिने खरेदी बंद ठेवण्यात आली होती. या खरेदी बंदचा फटका एेन सणासुदीच्या दिवसात शेतक-यांना बसत आहे.

◼वाद बाजार समिती संचालक व व्यापा-यात मात्र शेतकरी आडचणीत. 
शहरात बाजार समितीच्या संचालकात व व्यापा-यात वाद निर्माण झाला आहे परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकरीच यांच्या वादात भरडला जात असल्याचे चित्र सध्या बाजारपेठे मध्ये दिसत आहे. दीपावलीची खरेदी करण्यासाठी शेतकरी सध्या सोयाबिन विक्री साठी आणत आहेत. परंतु व्यापा-यानी अचानक खरेदी बंद ठेवल्यामुळे शेतकरी यांनी विक्रीसाठी आणलेला माल विक्रीच झाला नसल्याने अत्ता करावे तरी काय? हा प्रश्नच शेतक-याना पडला असुन बाजार समिती नेमकी कोणासाठी ही चर्चा सध्या शेतकरी करत आहेत. जर यांच्या वादामुळे बाजारपेठ बंद राहत असेल तर शेतकरी यांनी सणाच्या खरेदी साठी पैसे कोठुन आणायचे हा प्रश्न सुद्धा शेतकरी यांना पडला आहे.

◼वाद नेमका कसासाठी? 
बाजार समितीच्या वतिने आयोजीत बैठकीमध्ये नेमका वाद कसासाठी झाला. की संचालक व व्यापारी यांचा वाद एवढा विकोपाला जावुन व्यापारी यांनी बाजारपेठ बंद ठेवुन त्याचा निषेध नोंदविला. चुक नेमकी कोणाची व्यापा-यांची की संचालकाची हे मात्र समजायला तयार नाही. परंतु शेतक-याना सणासुदीच्या दिवसात आडचणीत आणणे कितपत योग्य आहे? हे या वाद करणा-या संचालक व व्यापा-याना समजायला पाहीजे.

पुर्णा न प साठी तिरंगी लढत;काँग्रेस ची उमेदवारी सौ जाधव यांना

चौधरी दिनेश
पुर्णा:-शहराचा मिनी आमदार म्हणजेच भावी नगराध्यक्ष कोण..? या प्रश्नाचे उत्तर शोधने आता तेवढे अवघड राहिले नसुन जवळ जवळ सर्वच पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा झाली असून शिवसेना-भाजप युती कडून सर्वात अगोदर नगराध्यक्ष पदाची उमेदवारी सौ.गंगाबाई सितारामअप्पा एकलारे यांना देऊन भावी नगराध्यक्षा म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली तर न.पा.तील सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे शाईस्ता बेगम जाकीर कुरेशी यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून अ.भा.काँग्रेस पक्षाच्या वतीने सौ.अनिताताई सुनील जाधव नगराध्यक्ष पदाची उमेदवारी बहाल करण्यात आली असुन नगराध्यक्ष पदाच्या या निवडणूकीत तिरंगी लढत होणार असल्याने शहराचा भावी मिनी आमदार कोण..? या प्रश्नाचे उत्तर शोधणे आता म्हणावे तितके अवघड राहिले नाही 
पुर्णा नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिन ही
पक्षांनी अधिकृत उमेदवारी जाहिर केलेल्या उमेदवारांची राजकीय पार्श्वभूमी पाहता असे लक्षात येते की तिन्ही पक्षांनी अत्यंत अभ्यासपूर्ण विचार करुनच आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निश्चित केले आहेत शहरातील मतदारांची एकुन संख्या 28,885 इतकी असुन सरासरी मतदान 70% ते 75% होण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.गंगाबाई सितारामअप्पा एकलारे या शहरातील प्रतिष्ठित व्यापारी व पुर्णा नगर परिषदेत सन 1986 ते 1996 या काळात सतत दहा वर्षे नगर सेवक पद भुषवीलेले सितारामअप्पा एकलारे यांच्या सुविद्य पत्नी आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार शाईस्ता बेगम जाकीर कुरेशी या मा.नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक जाकीर कुरेशी यांच्या पत्नी आहेत तर काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ.अनिता सुनील जाधव या मा.नगरसेवक सुनील जाधव यांच्या अर्धांगिनी असुन तिन ही उमेदवारांची तुलना केल्यास सौ.अनिताताई जाधव या सर्वात तरुण तडपदार व सुशिक्षित असल्याने महिला मतदार वर्गामध्ये त्या आपली बाजु निश्चितच भक्कम करु शकतात असे ही राजकीय जानकारांमध्ये मत व्यक्त होत असून शिवसेना उमेदवार सौ.गंगाबाई एकलारे यांना त्यांचे पती सितारामअप्पा एकलारे यांची प्रतिष्ठा व त्यांचा मुलगा प्रमोद एकलारे यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे फळ व शिवसेनेच्या विचारांशी एकनिष्ठ असलेल्या एकगठ्ठा मतदारांचा विचार केल्यास त्यांची ही विजयाकडे वाटचाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर नगर परिषदेत सतत साडेसात वर्षापासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी बहाल केलेल्या शाईस्ता बेगम जाकीर कुरेशी यांना त्यांचे पती मा.नगराध्यक्ष जाकीर कुरेशी यांचा अडिच वर्षाचा काळ वगळता उर्वरीत काळात शहराच्या विकासासाठी आलेल्या कोट्यावधी रुपयांच्या विकास निधीची झालेली अफरातफर व शहराची अविकसित शहराकडे झालेली वाटचाल भोवण्याची शक्यता ही नाकारता येत नाही मा.नगराध्यक्ष जाकीर कुरेशी हे मागील पंधरा वर्षापासून सतत नगर परिषदेत सत्तेत असुन हीं त्यांची प्रतीमा ते त्यांचे कार्यक्षेत्र वगळता शहरातील जनसामान्यांमध्ये उंचावू शकले नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या  सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे एकंदर या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत खरी लढत शिवसेना व काँग्रेस पक्षातच होणार असल्याचे मानली जात आहे


आष्टीत तळीरामाने पळवली बस;पादचा-या सह दुचाकी स्वार जखमी

प्रतिनिधी

आष्टी:- स्थानकात उभा असलेल्या एसटी बसच्या टायरमधील हवा चालक चेक करीत असतांना अचानकपणे एका तळीरामाने कॅबीनमध्ये प्रवेश करीत बस पळविली. मात्र, वेळीच चालकाने तत्परता दाखवीत धावत पाठलाग करीत बसमध्ये चढला आणि सुसाट वेगात निघालेल्या बसवर त्याने नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या प्रकारात बसचा धक्का लागल्याने एक पादचारी आणि एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. हा प्रकार आज गुरुवारी (दि. 27) सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास आष्टी बसस्थानक परिसरात घडला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया माहिती हाती येईपर्यंत सुरु होती.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पाथरी आगाराची आष्टी-सेलू एसटी बस (क्र. एमएच 14 बीटी 1676) आज सायंकाळी आष्टी बसस्थानकात उभा होता. यावेळी बसमध्ये वाहक उध्दव भुजबळ यांच्यासह 18 ते 20 प्रवाशी बसलेेले होते. तर बसचे चालक मुनवर खॉ पठाण बसच्या पाठीमागच्या टायरमधील हवा चेक करीत होते. या वेळी अचानकपणे सुनिल मुरली पवार हा दारुच्या नशेत बसमध्ये शिरला आणि त्याने स्टेअरिंगचा ताबा घेत बस सुरु केली तर हा प्रकार वेळीच हवा चेक करीत असलेले चालक श्री. पठाण यांच्या    आष्टी बसस्थानकातून...
लक्षात आल्याने ते बसच्या कॅबीनच्या दिशेने धावले. तोपर्यंत बस 20 ते 25 फुटापर्यंत पुढे धकली होती. यावेळी चालक श्री. पठाण यांनी धावत्या बसचा पाठलाग करुन दरवाजा उघडत आत प्रवेश केला आणि कॅबीनमध्ये जावून सुनिल पवार यास चालकाच्या जागेवरुन बाजुला करीत बसवर नियंत्रण मिळविले. मात्र, तोपर्यंत अनिल मदनलाल झंवर हे आपल्या दुचाकीवरुन (क्र. एमएच 21 डब्ल्यू 7664) जात असतांना त्यांना 10 ते 15 फुटापर्यंत बसने फरफटत नेल्याने श्री. झंवर हे गंभीर जखमी झाले. तसेच पादचारी ज्ञानेश्वर राठोड यांनाही बसचा धक्का लागल्याने तेही जखमी झाले.
सुदैवाने चालक श्री. पठाण यांनी वेळीच तत्परता दर्शविल्याने मोठा अनर्थ टळल्याची प्रतिक्रीया प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली. मात्र, या प्रकारामुळे बसस्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला होता. याप्रकरणी चालकाच्या फिर्यादिवरुन गुन्हा दाखल करण्यात आला

नप निवडनूकी साठी ऑफ लाईन अर्ज भरण्यास मुभा

प्रतिनिधी

मुंबई : आगामी नगरपालिका निवडणुकांसाठी ऑफलाईन फॉर्म भरण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ही परवानगी दिली आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी ही माहिती दिली आहे.

पुढील काही दिवसात राज्यात नगरपालिका तसंच नगरपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी ऑफलाईन फॉर्म्स भरण्याची परवानगी उमेदवारांना मिळाली आहे. 24 ऑक्टोबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. पण ऑनलाईन अर्ज भरताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे हा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

29 तारीखपर्यंत इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन अर्ज भरता येतील. राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी निवडणूक आयोगाला विनंती केली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

पाथरी नप साठी शुक्रवारी काँग्रेस सह ३४ जनांची नामांकने दाखल

कार्तिक पाटील

पाथरी:-शुक्रवारी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी नप नगरसेवक पदासाठी काँग्रेस,राकाँ आणि अपक्षांनी ३० अर्ज दाखल केले तर अध्यक्ष पदा साठी अपक्षांनी दोन तर काँग्रेस पक्षा कडून दोन असे चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
आज काँग्रेस पक्षा कडून नगरसेवक पदा साठी २१ जनांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर दोन अर्ज अध्यक्ष पदा साठी दाखल करण्यात आले तर ८ अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत नगरसेवक पदा साठी राकँच्या वतिने एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून नगराध्यक्ष पदा साठी आज दोन अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले काल राकाँ च्या वतीने नगरसेवक पदासाठी १८ तर नगराध्यक्ष पदासाठी ४नामांकने दाखल करण्यात आले होते त्या मुळे आता नगराध्यक्ष पदासाठी ८ नामांकने तर नगरसेवक पदासाठी ४८ नामांकन पत्रे दाखल करण्यात आले आहेत.उद्या शनीवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असू या दिवशी परीवर्तन विचारमंच मित्रमंडळ शक्ती प्रदर्शना सह उमेदवारी अर्ज दाखल करणार असून याच दिवशी शिवसेना-भाजपा उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल होतील त्या मुळे उद्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्या साठी मोठी गर्दी होणार आहे.

जालना नप अध्यक्ष पदा साठी संगिता गोरंट्याल यांचा अर्ज

मझहर सौदागर

जालना:-नगर परिषद निवडणूकीत नगराध्यक्ष पदासाठी सौ संगीता कैलास गोरंट्याल यांनी ऊमेदवारी अर्ज दाखल केला या वेळी मा.आ. कैलास गोरंट्याल ,अक्षय गोरंट्याल ,अब्दुल हापिज ,राम सावंत ,विजय चौधरी, मेघराज चौधरी अरूण मगरे, राहुल हिवराळे, शख माजद रोहीत बनवसकर,विनोद यादव,धर्मा खिल्लारे, नरेंद्र मित्तल, नरेंद्र अग्रवाल, आदी उपस्थित होते

जिंतूरात नप साठी ३८ उमेदवारी अर्ज

प्रतिनिधी

जिंतूर :-न प निवडणूक 2016 साठी आज शेवंट पूर्व दिनी एकूण 38 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत
उद्या शेवंटच दिवस असल्या मुळे उर्वरित उमेदवार उद्या दाखल करतील
आज येथील तहसिल कार्यालयात निवडणूक अधिकारी सूदर्शन गायकवाड यांच्या दालनात काँग्रेस तर्फे सौ शुभांगी सचिन गोरे राष्ट्रवादी कडून
श्रीमती सबिहा बेगम कफील फारुखी आणि बसपा तर्फे सौ इंदुमती वाघमारे यांनी तर सर्व प्रभागातील नगरसेवक पदासाठी एकूण35 अर्ज दाखल झाले आहेत यात काही विद्यमान नगरसेवक यांनी ही अर्ज दाखल केले आहेत
भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी उद्या शक्ती प्रदेशन करणार  अशी माहिती प्राप्त झाली आहे

धनत्रयोदशी च्या मुहूर्तावर इच्छूकांची भाऊ गर्दी

राम सोनवने

सेलु:-दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा असे म्हणत फराळावर ताव मारुन आनंद साजरा करण्या ऐवजी पालिका निवडणुकीतील इच्छुकांनी उपविभागीय कार्यालयात भाऊ गर्दी केली होती.
शुक्रवार 28 आक्टोंबर रोजी धनत्रयोदशिचे महुर्त साधुन पालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासकीय इमारत परिसरात इच्छुकांची भाऊ गर्दी होती. पालिका निवडणुकीतील इच्छुकांचे दीपावलीतील स्वादीष्ट मेजवानी अथवा फटाक्यांचे आवाज याकडे अजिबात लक्ष नाही,तर त्या उलट पालिका निवडणुकीतील 28 नोव्हेंबर रोजी जाहीर होणा-या निकालाकडे लक्ष लागले आहे.

◼107 व 7उमेदवारी अर्ज.
शहरातील बारा प्रभागतील एकुण 24 जागेसाठी 107 इच्छुक उमेदवारांनी तर अध्यक्षपदासाठी 7उमेदवारानी उमेदवारी अर्ज शुक्रवार 28 आँक्टोंबर पर्यंत दाखल केले आहेत .नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी सुरुवातीला इच्छुकांची गर्दी नव्हती 26 आँक्टोंबर रोजी प्रभागासाठी 18 तर नगराध्यक्ष पदासाठी 1,27 आँक्टोंबर रोजी प्रभागासाठी 22 ,28 आक्टोंबर रोजी प्रभागासाठी 67 तर अध्यक्ष पदासाठी 6उमेदवारी अर्ज दाखल झाले असुन आज शनिवार 29 आक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे त्यामुळे पालिका निवडणुकीतील सर्वच उमेदवारांना आज उमेदवारी दाखल करणे आवश्यक आहे.
◼अध्यक्ष पदासाठी 7 नामांकन
सेलु नगरपालिका निवडणुकीतील अध्यक्षपदासाठी विनोद बोराडे यांचे 2 ,श्याम भावसार, श्रीनिवास उघडे, पवन आडळकर, आशोक खताळ आदी 6 इच्छुकांनी 7उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

◼उमेदवारी निश्चितीस विलंब
पालिका निवडणुकीत प्रभागासाठी व अध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार निश्चीतीसाठी सर्वच राजकिय पक्ष व नेतृत्वाची कसोटी लागत आहे. अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत म्हणजेच 29 आक्टोंबर पर्यत पुर्णपणे उमेदवारी निश्चित होवु शकली नाही. उमेदवारी निश्चित करतांना अनेक कसोट्यासह इच्छुक उमेदवारांची आर्थिक क्षमता पाहिल्याजात असल्या कारणाने प्रत्येकासाठीस उमेदवारी निश्चिती हा यक्ष प्रश्न झाला आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीतील उमेदवारी निश्चितीसाठी विलंब होत आहे.

राकाँ नेत्यांचा घरोबा;सोनपेठ मध्ये माजी प्रभारी नगराध्यक्षांचा भाजपाशी तर जिंतूरात नगसेवकाचा काँग्रेस पक्षाशी


प्रतिनिधी

सोनपेठ:-नगर परिषदे च्या मागील  पंचवार्षीक सार्वञीक निवडणुकी मध्ये राष्ट्रवादी काॅग्रेस चे जेष्ठ नेते आमदार बाबाजानी दुर्रानी यांचे खंदे समर्थक तथा नगर पालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष श्री बालाप्रसादजी मुंदडा यांनी पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री नामदार श्री बबनरावजी लोणीकर यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी मधे नुकताच प्रवेश केला.राष्ट्रवादीच्या धेय्यधोरनाला व नेतृत्वाला कंटाळून भारतीय जनता पार्टी मधे पक्षात जाहीर प्रवेश केला.

गत अनेक वर्षापासून राष्ट्रवादी पक्षासोबत पक्षाची धूरा सांभाळत असताना राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने एन निवडणूकीत धोका दिल्यामुळे राष्ट्रवादी चे निष्ठावंत खंदे समर्थक बालाप्रसद मुंदडा यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकत भारतीय जनता पार्टी मधे पक्षात जाहीर प्रवेश केला.पक्षाच्या वतीने श्री बालाप्रसादजी मुंदडा यांचा पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री नामदार श्री बबनरावजी लोणीकर यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी मधे प्रवेश केला अस्ता पक्षाच्या वतीने बालाप्रसादजी मुंदडा यांचा पक्षप्रवेशावेळी जंगी सत्कार करन्यात आला व जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे. परभणी जिल्ह्याचा बोज्या खांद्यावर घेतल्यामुळे भाजपा या पक्षात त्यातच सोनपेठ तालुक्यात नवचैतंन्य निर्माण झाल्याचे दिसत आहे.प्रवेशा वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अभय चाटे, माजी जिल्हाध्यक्ष रबदडे मामा, बाबासाहेब जामगे, बाबासाहेब फले आदि होते.बालाप्रसद मुंदडा यांचा
भारतीय जनता पार्टी मधे प्रवेश केल्यामुळे सोनपेठ शहरासह तालुक्यात नवचैतन्या निर्माण झेले असून होउ घातलेल्या नगर परिषद निवडणूकीत यांचे परिनाम कोनाला बसेल? हे निवडणूकी दरम्यान स्पष्ट दिसेल असे चर्चीले जात आहे.

★जिंतुर येथिल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक हाजी खलील कुरेशी व कार्यकर्त्यांनी आपल्या समर्थकसह माजी नगराध्यक्ष सचिन भैय्या गोरे याच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला.           नगरसेवक हाजी खलिल कुरेशी हे मागील 2011 मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस च्या उमेदवारी वरुन बहुमताने निवडून आले होते.त्यानी आगामी नगरपालिका निवडणुकीला लक्षात घेऊन अचानक आपल्या कार्यकरत्यासह काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राकॉपा ला मोठा झटका दिला आहे.यावेळी कुरैशी यांच्या सोबत अकबर कुरेशी,दस्तगीर कुरेशी,मौला कुरेशी,मजीद कुरेशी.अय्यूब खान,याखुब खान,महबूब खान आदि कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी त्यांचे स्वागत करुन् सत्कार करतांना माजी नगराध्यक्ष सचिन भैया गोरे ,अँड.गोपाळ रोकड़े.राजेश राठोड,रेहान लाडले,सय्यद मगफिर,अख़लाक़ काजी,बाबुराज आदिंची उपस्थिति होती

शेतकरी सर्व सामान्यां साठी धडपडणारे युवा नेतृत्व

शेतकरी सर्व सामान्यां साठी धडपडणारे युवा नेतृत्व

८०% समाजकारण २०%राजकारण हा मुलमंत्र घेत तालुक्यातील उच्च शिक्षित तरून युवा नेतृत्व म्हणून जगदिश परमेश्वरराव कोल्हे उदयास येत असून नुकतीच त्यांची राष्ट्रवादी किसान सभा पाथरी तालुका अध्यक्ष पदी नियिक्ती झाली असून या संधीचा फायदा घेत शेतकरी हिता साठी जगदिश कोल्हे यांनी तालुक्यात अती पावसाने नुकसान झालेल्या शेतक-यांच्या पिकांचे पंचनामे करून पिकविमा तात्काळ देण्याची मागणी पाथरी तहसील दारांना करून पिकांचे पंचनामे करण्यास भाग पाडले तर सोयाबीन पिकाची काढणी केल्या नंतर बाजारात व्यापारी कमी दराने सोयाबीनची खरेदी करत असल्याने शासकिय खरेदी सुरू करण्या साठी उपजिल्हा अधिका-यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. शेतकरी आणि सर्व सामान्यांच्या प्रश्नांची जान असलेले हे पाथरी तालुक्यातील कासापुरी या गावचे उच्चशिक्षित तरून नेतृत्व म्हणून उदयास येत आहे.
      

Thursday, 27 October 2016

तुटलेल्या विजतारा जोडून द्या अन्यथा आंदोलन-जगदिश कोल्हे

कार्तिक पाटील
पाथरी:-जून महिन्यामध्ये झालेल्या वादळी पावसामध्ये पाथरी तालुक्यातील  शेतकऱ्यांच्या शेतातील विजेचे पखां पडून त्या वरील विज तारा तुटल्या आहेत या तारांची त्वरित दुरुस्ती करून शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी किसान सभा रस्त्यावर उतरून आंदोलन करील असा इशारा राकाँ किसान सभेचे पाथरी तालुका अध्यक्ष जगदिश कोल्हे यांनी महावितरण ला दिलेल्या निवेदनात दिला आहे.
जून महिन्यात पाथरी तालुक्यात प्रचंड वादळी वारे होऊन विजेंच्या खांबांची मोडतोड होऊन शेतातील विज पुरवठा खंडित झाला होता या चार पाच महिण्या पासून तूटलेल्या विजतारा अद्याप पर्यंत जोडण्यात आलेल्या नाहित आता शेतक-यांना रब्बी साठी च्या पिकाला पाणी द्यावे लागणार आहे त्या साठी विजेची आवश्यकता लागणार असून या तारा महावितरण तात्काळ जोडणी करून द्याव्यात यासाठी राष्ट्रवादी किसान सभा पाथरीच्या वतीने  महावितरणचे उपकार्यकारी अभियंता  पांडे यांना निवेदन देण्यात आले आहे. तुटलेल्या तारा जोडा अन्यथा राष्ट्रवादी किसान सभेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा या निवेदना व्दारे देण्यात आला आहे या वेळी उपकार्यकारी अभियंता पांडे  यांनी या विषयी वरीष्ठां कडे पाठपुरावा करून त्वरित विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे.
या वेळी निवेदन देन्या साठी राकाँ किसान सभेचे तालुका अध्यक्ष जगदिश कोल्हे, वैजनाथ जिजा कोल्हे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पाथरी,सुदाम कोल्हे, सुनील कोल्हे, विठ्ठल कोल्हे, पांडुरंग नवघरे विठ्ठल गायकवाड व शेतकरी उपस्थित होते

तेजन्यूज हेडलाईन्स,ताज्या बातम्या संक्षिप्त स्वरूपात

✍🏻 TEJ NEWS HEADLINES  ✍🏻

--------------------------------------------------------------------

⭐ पिंपरी = बदलत्या हवामानामुळे शहरात साथीचे आजार वाढले असून दहा महिन्यात डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रूग्ण वाढले आहेत.डेंग्यूचे १८९ तर चिकुन गुनियाचे ३२ रूग्ण आढळून आले आहेत.

⭐नाशिक = मालेगाव तालुक्यातील देवारपाडे शिवारात कुंटनखान्यावर छापा; दोघाना पोलीस कोठडी.

⭐ मुंबई- मालाड आणि कांदिवलीतील 3 हजार कुटुंबीयांना दिलासा, 10 ते 100 किलोमीटर अंतरापर्यंत बांधकामास परवानगी, संरक्षण विभागाच्या परिसरालगत बांधकाम, बांधकामासाठी स्थानिक लष्कराची संमती आवश्यक

⭐ कणकवली = सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरातील जळकेवाडी येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्या प्रकरणी सुनील साहेबराव जगताप याच्या पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी संपली. त्यामुळे त्याला ओरोस येथील जिल्हा न्यायालयात पुन्हा हजर केले असता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

⭐ हिंगोली = महावितरण कंपनीने एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान पकडलेल्या वीजचोरीतील ३५६ प्रकरणांपैकी दंड न भरणा-या २५ जणांवर वीजचोरी केल्याचे गुन्हे जालना येथील महावितरणच्या पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले.

⭐ अमित शाह म्हणजे खोटं बोलण्याचा आजार, रणदीप सुरजेवाला यांची टीका.

⭐गुजरात = बस अपघातात लष्कराचे 17 जवान जखमी, 3 जणांची प्रकृती चिंताजनक.

⭐ धुळे = शिरपुर पालिका निवडणुकीत भाजपा तर्फे अमृता मनोज महाजन याना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

⭐ वसई- बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक मार्शल लोपीस यांच्या विरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नानभाट गावात २२ ऑक्टोबरला लोपीस यांनी अश्लील शेरेबाजी करून विनयभंग केल्याची तक्रार एका महिलेने केल्यानंतर लोपीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

⭐ नाशिक - तळेगाव येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणी 325 पानी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. दोषारोपपत्र 15 दिवसात दाखल करू शकलो नाही. घटनेच्या 19व्या दिवशी दाखल केले असून एक महिन्यात खटल्याच्या कामकाजाला सुरूवात होणार असल्याची माहिती विशेष जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी दिली.

⭐ व्होडाफोनची ग्राहकांना दिवाळी भेट. 29 ऑक्टोबरपासून व्होडाफोनची देशभरातीलग्राहकांना रोमिंग फ्री सेवा.

⭐पालघर जिल्ह्यात 10 ते 15 किलोची स्फोटकं सापडली,पुढील तपास मुंबई एटीएस करत आहे.

⭐ राज्य शासनाचे साहित्य पुरस्कार जाहीर. 32 लेखकांना साहित्य पुरस्कार.सुहास बहुळकरांच्या चरित्रविषयक पुस्तकाला पुरस्कार, प्रभा गणोरकरांच्या 'व्यामोह' काव्य संग्रहाला पुरस्कार,शिक्षण विषयक लेखनासाठी हेरंब कुलकर्णींना पुरस्कार, संदेश कुलकर्णींना मँटुकले दिवस पुस्तकासाठी पुरस्कार.

⭐ नवी दिल्ली = सिद्धूने आपमध्ये जाण्यासंबंधी अजून अंतिम निर्णय घेतला नाही- नवजोत कौर

⭐उत्तर प्रदेश = अखिलेश यादव यांनी मुस्लिमांसाठी काहीच केलं नाही, मौलाना कल्बे जवाद यांचा आरोप.

⭐ शिर्डी = साईबाबांच्या झोळीतून चोरी करणा-या दिनकर डोखेला राहाता न्यायलाने ३ वर्षाची कारावासाची शिक्षा आणि १हजार रुपयेदंडाची शिक्षा सुनावली आहे़ ८ जुलै २०१४ रोजी साई मंदिरात सुरु असलेल्या दानपेटीची मोजनी दरम्यान डोखे याने ४ ग्रॅम सोने ३६ ग्रॅम चांदीच्या वस्तु चोरल्या होत्या़.

⭐ नवी दिल्ली = जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात- विकास स्वरूप, प्रवक्ते, परराष्ट्र मंत्रालय

⭐ सिंधुदुर्ग = वनखात्याच्या तीन अधिका-यांवर गुन्हा दाखल. वनक्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षकाचा समावेश; बनावट कागदपत्रांद्वारे केली होती वरिष्ठांची फसवणूक.

⭐ श्रीनगर = जम्मू-काश्मीरच्या मेंढरसेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन.

⭐ मुंबई = आकाश कंदील उडवण्यावर मुंबई पोलिसांनी घातली बंदी, आकाशात कंदील उडवल्यास कलम 188 भादंवि अंतर्गत होणार कारवाई.

⭐ काश्मीर मधल्या कुपवाडा मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद

⭐ राष्ट्रपती प्रणव मुखर्जी दोन ते चार नोव्हेंबर दरम्यान नेपाळ दौ-यावर जाणार.

⭐सायरस मिस्त्री यांना नेतृत्व करण्याचे सर्वाधिकार देण्यात आले होते, पदावरुन हटवल्या नंतर ते आता आरोप करत आहेत, टाटा सन्सच्या संचालकांचा विश्वास ते गमावून बसले होते - टाटा सन्स.


⭐कोल्हापुरातून कमी आसन क्षमतेची विमानसेवा तात्काळ सुरू करणे शक्य : विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकारी सुजॉय डे यांची माहिती.

⭐ पुणे = गंभीर गुन्हे दाखल असलेल्यासराईत गुन्हेगाराला परिमंडल दोनचे उपायुक्त पंकज डहाणे यांनी दोन वर्षांकरिता तडीपार केले आहे.

⭐ पुणे = फरासखाना पोलिसांच्या तपास पथकाने गणेश पेठेतील डुल्या मारुती चौकात कारवाई करीत दोन गावठी कट्ट्यांसह 9 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी मंगेश मारुती जोरीला अटक केले आहे.


⭐ अहमदनगर = नगर-पुणे महामार्गावर चास येथील वळणावर कंटेनर उलटला; एक ठार, पाच जखमी

⭐ नवी दिल्ली = पाकिस्तानच्या पकडलेल्या दोन गुप्तहेरांना दिल्ली कोर्टानं12 दिवसांची सुनावली पोलीस कोठडी.

⭐ कोल्हापूर = राज्यात सुरु असलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गडहिंग्लज तालुक्यातील कौलगे फाट्यावर धडक कारवाई करीत सुमारे पन्नास लाखांचा अवैध गोवा बनावटी विदेशी मद्यसाठा जप्त केला.

⭐ वसई = दीडशे वर्षांपूर्वीची 14 लाख 89 हजार रुपयांची प्राण्यांची शिंगे आणि सुळे विकण्यासाठी आलेल्या सलीम तांबे आणि गुलाम शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली.

⭐ यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, वसंतराव नाईकांचे नातू निलय नाईक यांचा भाजपामध्ये प्रवेश.

⭐मुंबई = शिवसेना-भाजपामध्ये युतीसाठी सकारात्मक चर्चा, स्थानिक स्वराज संस्थांत युतीसाठी हालचाली, मुख्यमंत्री-रावसाहेब दानवे-उद्धव ठाकरेंनी केली फोन वरुन चर्चा.