तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 5 November 2016

ट्रक-बसचा समोरा समोर अपघात 16 प्रवाशी जखमी;पाथरी-माजलगाव महामार्गावर घटना

कार्तिक पाटील

गंभीर जखमींना जिल्हा रुग्नालयात हलवले

पाथरी:-गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रक व बसच्या झालेल्या भिषण अपघातात ट्रक व बस चालकासह बस मधील 16 प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार 5 नोहेंबर रोजी सायंकाळी सात च्या सुमारास घडली असुन जखमीवर पाथरी ग्रामीण रुग्नालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ परभणी जिल्हा रुग्नालयात हलवण्यात आले आहे 
   याबाबत सविस्तर वृत्त असे कि शनिवार 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास पाथरी माजलगाव महामार्गाने पाथरी आगाराची लातुर हुन पाथरी कडे येणारी  MH-20 BL-2853 क्रमाकांची बस व पाथरी कडून माजलगावकडे गॅस सिलेडर घेऊन जाणारा ट्रक MH-14 -4236 यांच्या झालेल्या भिषण अपघातात दोन्ही गाड्यांच्या चालका सह बसमधील 16 प्रवाशी गंभीररीत्या जखमी झाले यावेळी ढालेगाव येथील नागरीक अर्जुन अतकरे ,दिपक अतकरे ,सरपंच बळीराम भदगै ,अटोचालक बाजीराव जाधव ,भास्कर शेजुळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखर्मांना ऑटोने व 108 ऑम्बुलन्सने पाथरी ग्रामीण रुग्नालयात दाखल केल या रूग्नावर् पाथरी ग्रामीण रुग्नालयात उपचार सुरु आहेत तीद्यांजनांची प्रकृती गंभींर असल्याने त्यांना पुढील  उपचारार्थ परभणी जिल्हा रुग्नालयात हलवण्यात आले आहे.

रॅपिड अॅक्शन फोर्स चे पथ संचलन;कोणत्याही पकिस्थितीला तोंड देण्यास पोसीस प्रशासन सज्ज

प्रदिप कोकडवार

जिंतूर:-न प निकडणूक आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या साठी पोलीस प्रशासन  सज्ज असल्या च दाखवत आज जिंतूर शहरात शहरातू रॅपिड एक्शन फोर्स टीम च संचलन करण्यात आलं प्रथम येथील पो स्टे या ठिकाणी शस्त्र प्रदर्शन आणि फोर्स ची कवायत करण्यात आली शहरात फोर्स च पंथसंचलन प्रमुख रस्त्यावरून मार्ग क्रमन करीत शस्त्र प्रदर्शन करण्यात आले
पोलीस प्रशासन कोणत्याही अडचणीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे असं कळविण्यात आले आहे

घनसावंगीत एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या

अविनाश घोगरे
घनसावंगी:-चोरट्यांनी घनसावंगी येथे काल गुरवार (ता 3) रात्री धुमाकुळ घालत एकाच रात्रीतुन 3 घरफोड्या केल्यामुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहे या 3घरफोड्यातुन चोरट्यांनी रोख रक्कम आणी सोने चांदीचे दागिने असा 2लाख 50हजाराचा ऐवज लंपास केला आहे शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सदर घरफोड्या झाल्या प्रविणकुमार जोगड हे घरात झोपलेले असतांना चोरट्यांनी मध्यरात्री 2ते 3वाजेच्या दरम्यान दाराचा कडीकोंडा तोडला चोरटे घरात येताच प्रविणकुमार जोगड व त्यांचा परिवार जागा झाला चोरट्यांनी तलवार व चाकुचा धाक दाखवत कपाटातील सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम असा 1लाख 90हजार मुद्देमाल लंपास केला बाहेर निघतांना चोरट्यानी  मोबाईल व दाराला बाहेरुन कडी लावली आणी पसार झाले यानंतर प्रकाश वैद्य व ज्ञानेश्वर उढाण यांच्या ही घरी असाच प्रकार घडला चोरट्यानी घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केल्यानंतर प्रकाश वैद्य यांच्या खिशातील रोख 1हजार रुपये लंपास केले त्यानंतर ज्ञानेश्वर उढाण यांच्या घराकडे चोरट्यानी आपला मोर्चा वळविला तेथून रोख 10 हजार रूपये सोन्य चांदीचे दागिने असा 40ते 50 हजाराचा ऐवज लंपास केला या प्रकरणी  प्रविणकुमार  जोगड यांच्या फिर्यादीवरुन घनसावंगी पोलीस ठाण्यात भादवी कलम 392,457,380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास  डि वाय एस पी  रमेस सोनवणे व पो नि उ तुळशिदास धुमाळ हे करीत आहेत

पुर्णा नपा निवडणूकीत विकासाच्या प्रश्नावर सर्वच पक्षांचे मौन

दिनेश चौधरी

जातीय आधारावरील मत विभाजनावर माञ गंभीर
पुर्णा:-नगर परिषद निवडणूकीत राजकीय षडयंञांना पुन्हा एकदा सुरुवात झाली असुन शहराच्या विकासाच्या प्रश्नावर सर्वच राजकीय पक्षांनी मौन वृत धारण केल्याचे दिसत असले तरी जातीय आधारावर मतांचे विभाजन कसे करता येईल यावर शहरात मातब्बर राजकारणी विवीध प्रकारचे षडयंञ रचतांना दिसत असल्याचे बोलले जात आहे याच षडयंञाचा भाग म्हणून विशिष्ट समाजामध्ये दहशत निर्माण करुन त्या समाजाची एकगठ्ठा मते आपल्या कधीही न भरणा-या झोळीमध्ये कशी पाडून घेता येईल यावर शहरात मागील अनेक वर्षापासून राजकारणात सक्रिय राहुन गब्बर झालेल्या व तरी ही दारिद्रय रेषेत असलेल्या एका प्रस्थापित राजकारण्याने केल्याची जोरदार चर्चा शहरात होतांना दिसत आहे येत्या 27 नोव्हेंबर 2016 रोजी होणाऱ्या नगर परिषद नगराध्यक्ष व 20 सदस्यांच्या निवडी साठी मतदान होणार असुन मतदारांच्या खरेदी विक्रीचे दर ही ठरवल्या जात आहे शहरातील मातब्बर प्रस्थापितांचा जास्त भर खान पान आणी मदीरा दानावर जास्त दिसत असल्याने शहरातील मदीरालयांमध्ये रांगा लागतांना दिसत असुन मदीरालयांतून मनसोक्त मदीरामय होऊन मार्गावर आलेले मद्यविर मंञी बनून शहराच्या विकासाचे आराखडे तयार करतांना दिसत आहेत नगराध्यक्ष पदाची निवडणूक जनमतातून होणार असल्याने नगराध्यक्षपद  आपल्याच पक्षाकडे यावे या करिता सर्वच पक्षांनी कंबर कसली असली तरी ही शहराच्या विकासाचा मुळ मुद्दा माञ राजकीय पक्षांच्या अजेंड्यातून सद्या तरी अदृश्य झाल्याचे दिसत आहे नगर परिषदेत सतत साडेसात वर्षापासून सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात भाजपा-शिवसेनेची सत्ता असतांना ही जिल्ह्यातील अन्य नगर परिषदांच्या तुलनेत सर्वात जास्त विकासनिधी प्राप्त झाला परंतू करोडो रुपयांचा निधी प्राप्त झाल्यानंतर हीं शहराचा विकासमाञ सत्ताधारी रा.काँ.ला करता आला नाही त्यामुळे विकासाच्या मुळ मुद्द्याला बगल देऊन रा.काँ.नेते नगर परिषद निवडणूकीत जातीय मत विभाजनाचा आधार घेतांना पहावयास मिळत आहे तर काँग्रेस पक्षानेही शहरातील सर्व प्रभागांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देऊन रा.काँ.च्या प्रस्थापितांपूढे खंबीर पर्याय उभा केल्याचे दिसत असुन नगराध्यक्ष पदासाठी जनसामान्यांमध्ये चांगली छवी असलेला उमेदवार दिल्याने समविचारी पक्ष असलेल्या रा.काँ.च्या नेत्यांच्या पाया खालची वाळु सरकतांना दिसत आहे मागील निवडणूकीत सत्ताधारी रा.काँ.पक्षाने शहरवासीयांना दिलेले 'स्वच्छ शहर सुंदर शहराचे' विकासाचे आश्वासन फोल ठरले असून विकासाच्या नावावर शहर भकास करण्याचे काम सोईस्कर झाल्याने साडेसात वर्षे सत्तेची फळ मनसोक्त चाखणा-या न.प.तील सत्ताधारी रा.काँ.ची शहराला लागलेली साडेसाती दुर करण्याची हिच खरी संधी असल्याचे मत शहरातील जागृत मतदारांमध्ये व्यक्त होतांना दिसत आहे तर राज्यातील सत्तेत सत्ताधारी असलेल्या  शिवसेना-भाजप या समविचारी पक्षांची न.पा.निवडणूकीत युती न झाल्याने दोन्ही पक्षांनी शहरातील प्रभागांसह नगराध्यक्ष पदासाठी ही स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने दोन्ही पक्षांच्या पारंपारिक मतांचे विभाजन दोघांच्या पतनास कारणीभूत ठरु शकते एकंदर या निवडणूकीत माञ शहरातील जागृत मतदार शहराच्या विकासाच्या मुद्द्यासह सर्वच बाबींचा गांभीर्याने विचार करतांना दिसत असुन जागृत मतदार शहरातील मातब्बर भ्रष्ट प्रस्थापितांच्या कागदी गांधीवादाला माञ या निवडणूकीतून हद्दपार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे

Friday, 4 November 2016

तेजन्यूज हेडलाईन्स ताज्या बातम्या

💤⚜💤
☀- सोलापूर - लोकमान्य नगर येथील गाझी जहागिरदार व अन्य 7 जणांवर सिव्हील रुग्णालयात घुसुन सालार कंपनीच्या जमावाकडून तलवार, सत्तुरने प्राणघातक हल्ला, घटनास्थळी पोलिस दाखल
___________________________________

💤⚜💤
☀- भारत - पाकिस्तान परस्परांबरोबर लढण्यावर जेवढा पैसा खर्च करत आहेत तो पैसा आपण विकासावर खर्च केला पाहिजे - मेहबूबा मुफ्ती

 💤⚜💤
☀- बनावट बियाणामुळे पीक नुकसानीचा सामना करणा-या शेतक-यांसाठी तेलंगण सरकार कायदा आणणार
___________________________________

 💤⚜💤
☀- अमेरिकेच्या कारवाईत अफगाणिस्तानमधल्या अल कायदाचा नेता क्वातानी ठार
___________________________________

 💤⚜💤
☀- ओडिशा- पुरी रेल्वे स्टेशनवरून तीन बालमजुरांची केली सुटका
___________________________________

💤⚜💤
☀- बुलडाण्याच्या आश्रमशाळेत सहा मुलींवर अत्याचाराचा संशय, मात्र अजूनही वैद्यकीय तपासणी बाकी, आदिवासी मंत्री विष्णु सावरांना घेराव आणि काळे झेंडे
___________________________________

💤⚜💤
☀- बॉम्बे हाऊसबाहेर तीन फोटोग्राफर्सना बेदम मारहाण, सायरस मिस्त्रींची छायाचित्रं घेताना सुरक्षारक्षकांची गुंडगिरी, रतन टाटांकडून दिलगिरी
___________________________________

💤⚜💤
☀- पेट्रोलपंप चालकांचं आंदोलन तूर्तास मागे, आजही पेट्रोलसाठी रांगा लागणार
___________________________________

💤⚜💤
☀- चणाडाळीचे भाव वधारल्याने मुंबईकरांचा वडापाव महाग, सर्वसामान्यांच्या पोटाला चिमटा
___________________________________

💤⚜💤
☀- मुलांची गळती रोखण्यासाठी काढलेला सेल्फीचा उपचार अजबगजब, शिक्षण तज्ज्ञांकडून नव्या निर्देशाचे वाभाडे, माझाचा विशेष रिपोर्ट
___________________________________

💤⚜💤
☀- महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून मुंबईत छटपूजेचं आयोजन, जुहूमध्ये मुख्यमंत्री हजर राहणार, तर मनसेची भाजपवर टीका
___________________________________

💤⚜💤
☀- वन रँक वन पेन्शन प्रकरणी मोदी सरकारकडून धूळफेक, राहुल गांधींचा आरोप तर प्रेतांवर राजकारण सुरु असल्याचा व्ही. के सिंहांचा पलटवार
___________________________________

💤⚜💤
☀- लोढा समितीने आर्थिक नाड्या आवळल्याने बीसीसीआयची गोची, इंग्लंडच्या टीमला स्वत:चा खर्च उचलण्याची विनंती

तेजन्यूज हेडलाईन्स ताज्या बातम्या


➿➿
🔱सोलापूर : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देगाव , प्रतापनगर व कुमठे येथे सांडपाण्यावर आधारित टरसरी ट्रीटमेंट प्लांट (मलशुद्धीकरण केंद्र)चे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून हा भारतातील पहिला ऐतिहासिक प्लांट आहे, या कामाचे नियोजन पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मार्फत करण्याचे नियोजन आहे- आयुक्त विजयकुमार काळम-पाटील . 

➿➿
🔱पंढरपूर : कार्तिकी यात्रा सोहळ्यामध्ये भरविण्यात येणारा जनावरांचा बाजार एक वर्षासाठी प्रायोगिक तत्वावर वाखरी येथील २0 एकरांवर भरविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी घेतला आहे. 

➿➿
🔱पंढरपूर : कार्तिक वारीमध्ये दर्शन रांगेतील भाविकांना सेवासुविधा पुरवण्यावर मंदिर समितीचा प्रयत्न ,दर्शनरांगेतील भाविकांना जागेवर चहा व स्वच्छ पिण्याचे पाणी देण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांनी सांगितले. 

➿➿
🔱अक्कलकोट: भांडखोर सासर्‍याने सुनेवर कुर्‍हाडीचा घाव घालून तिचा खून केला. ही घटना वागदरी (ता. अक्कलकोट) येथे शुक्रवारी पहाटे घडली. घटनेनंतर संशयित आरोपी सासरा फरार 

➿➿
🔱दक्षिण सोलापूर : वळसंग येथील महाराजा लॉजवर धाड टाकून तेथील तीन परराज्यातील महिलांची सुटका करुन चार जण ताब्यात, सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कारवाई.

➿➿
🔱मोहोळ : टीव्ही, फ्रीज, रोख रक्कम व सोने घेऊन ये, नाही तर नांदविणार नाही, असे म्हणून विवाहित महिलेस शारीरिक व मानसिक त्रास देऊन हकलून दिल्याप्रकरणी मोहोळ पोलिसांत पती, सासू, सासरे व सवत या चार जणांवर विवाहितेच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल 

➿➿
🔱सोलापूर : मुलीला त्रास देणारा जावई बाळू शंकर ढवण (रा. बिटले, ता. मोहोळ) याचा खून केल्याप्रकरणी पत्नी छाया, सासरा औदुंबर प्रल्हाद सलगर, सासू सुमन आणि उत्तम डोके  या चौघांची प्रमुख जिल्हा न्यायाधीश विभा कंकणवाडी यांनी निर्दोष मुक्तता केली

➿➿
🔱अकलूज : डोंबाळवाडी-अकलूज रोडवर प्रवासी वहातूक करणा-या टमटममधील महिला मुमताज मोईनुद्दीन नदाफ (वय ४0) चाल्लत्या टमटममधून पडून जागीच ठार झाल्या.ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहाला घडली. 

➿➿
🔱पेट्रोलपंप चालकांचं आंदोलन तूर्तास मागे, डिझेलमध्ये १० पैसे तर पेट्रोलमध्ये १३.८ पैसे कमिशनची वाढ. तेल कंपन्या आणि डिलर्समध्ये लेखी करार (मीडिया रिपोर्ट)

➿➿
🔱पुणेः दिवाळी संपताच महावितरणने दिला वीजग्राहकांना वीजदरवाढीचा झटका, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने या वर्षासाठी १.४९ टक्के दरवाढीला दिली मान्यता. एक नोव्हेंबरपासून दरवाढ लागू

➿➿
🔱अहमदनगरः तुकाराम मुंडे प्रकरणात लोकभावनेचा आदर न करता मुख्यमंत्र्यांनी राज्यात वेगळा पायंडा पाडला, राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप

➿➿
🔱पुणेः कोथरुडमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या आईवर ब्लेडने वार, ४२ वर्षीय महिला गंभीर जखमी. आरोपीला अटक

➿➿
🔱अहमदनगरः अस्वस्थ वाटू लागल्याने नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मतदारसंघातील विकास कामांच्या उद्घाटनांचा दौरा सोडला अर्धवट, पुढील दोन दिवसांचे कार्यक्रमही रद्द

➿➿
🔱बुलडाणा कोकरे आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीला मनोधैर्य योजनेतून मदत देण्याचे महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

➿➿
🔱अहमदनगर: विविध प्रलंबित मागण्यांसाठी ७ नोव्हेंबरपासून ग्रामसेवक करणार कामबंद आंदोलन, ग्रामसेवक संघटनेच्या बैठकीत निर्णय

➿➿
🔱पुणेः गेल्या महिन्यात पुणे रेल्वे स्टेशनवर महाराष्ट्र एक्स्प्रेसला झालेल्या अपघाताच्या चौकशीसाठी नेमलेली समिती पुढील आठवड्यात रेल्वे प्रशासनाला अहवाल सादर करणार

➿➿
🔱मुंबईः तोंडाच्या कँन्सरविषयी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी पुस्तीका प्रकाशित करणार, केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी नड्डा यांची माहिती

शिरोळ तालुक्यातील गुरूदत्तचा उसाचा पहिला हप्ता ३५००-आ उल्हास पाटील

तेजन्यूज हेडलाईन,न्यूज नेटवर्क

कोल्हापूर, दि. 4- गुरूदत्त शुगर्स लि.  टाकळीवाडी ता.  शिरोळ या साखर कारखान्याने आज उसाला पहिली उचल 3500 रू.  जाहीर केली.  आमदार उल्हास पाटील व गोकुळचे माजी चेअरमन दिलीप पाटील यांनी शिष्टाई केली. 

        खासदार राजू शेट्टी यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी आमदार उल्हास पाटील यांनी ही खेळी केली.  त्यामुळे सकल ऊस परिषदेनेही याला मंजुरी देत शिरोळ तालुक्यात जल्लोष केला.  शिरोळचे आमदार उल्हास पाटील शेतकरी चळवळीपासून फारकत घेतल्यापासून आंदोलनापासून दूर गेले होते.  तसेच माधवराव घाटगे यांच्याशी जवळीक असल्याने शेतकर्यांच्यात रोष  होता.  आगामी जि.  प.  निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही घोषणा केली आहे. गुरूदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे म्हणाले की,  आमदार उल्हास पाटील,  दिलीप पाटील,  सकलचे नेते यांना आमचा पाठिंबा असून पहिली उचल 3500 रू. ची विनाकपात जाहीर करत आहोत.  इतर कारखान्यांनीही शेतकर्यांच्या कल्याणासाठी त्वरीत 3500 रू.  ची पहिली उचल जाहीर करावी.  दरम्यान देशातील सर्वाधिक उचल देणार कारखाना म्हणून गुरूदत्त शुगर ठरला आहे. 

बुलढाणा अत्याचार प्रकरणी संबंधीत खात्याच्या मंत्र्यावरही गुन्हे दाखल करा-चित्राताई वाघ

खामगाव येथील नानाभाऊ कोकरे आश्रमशाळेची पाहणी.
मुंबई – दि. 4 नोव्हेंबर 2016
बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील पाळा येथील रामचंद्र शिक्षण संस्थेच्या नानाभाऊ कोकरे आश्रमशाळेत, इयत्ता चौथीत शिकणाऱ्या आदिवासी मुलींवर बलात्कार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.  आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी या आश्रमशाळेस भेट देऊन पाहणी केली व तपास अधिकाऱ्यांची भेट घेऊन संबधित आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
    यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या की आदिवासी मुलींवरील अत्याचाराचे हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. या घटनेला स्थानिक प्रशासनाचा निष्काळजी पणा सोबतच संबधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे.त्यामुळे आदीवासी खात्याचे प्रमुख म्हणून विष्णू सावरा, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. सरकार हे कस्टोडियन असतं त्यामुळे आश्रम शाळेतील अशा शोषणाची जबाबदारी संबंधित मंत्र्यांचीच आहे. नैतिकच नव्हे तर कायदेशीररित्याही तेच जबाबदार आहेत, मग अशा मंत्र्यावर देखील खटला का दाखल करण्यात येऊ नये असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.
       सदर पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रात्री उशीरा हिवरखेड वरुन खामगाव व पुढे अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु महिला डॉक्टर नसल्याने या मुलीची वैद्यकीय तपासणी ही पुरुष डॉक्टरकडून करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांची देखील हकालपट्टी झाली पाहिजे.
       पुढे त्या म्हणाल्या राज्यातील सर्वच आश्रमशाळांमधून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जावेत, जे जिल्हा पोलीस मुख्यालयाशी जोडून त्याचे चोवीस तास परिक्षण करण्यात यावे. आश्रमशाळांतील सर्व विद्यार्थींनींचे समुपदेशन व वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी यावेळी चित्राताई वाघ यांनी केली.

विविध वृत्त...

"व्हीएसआय'ला भेट देणारे
मोदी पहिले पंतप्रधान

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याजवळील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला (व्हीएसआय) येत्या 13 नोव्हेंबर रोजी भेट देणार आहेत. नगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेच्या नियमावलीत हा दौरा अडकण्याची शक्‍यता व्यक्त होत होती. मात्र पंतप्रधान कार्यालयाने दौऱ्यावर आज शिक्कामोर्तब केले आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील हे या संस्थेचे संस्थापक होते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त येथे कृषी प्रदर्शन आणि शेतकरी मेळावा ठेवण्यात आला आहे. त्याचे उद्‌घाटन मोदी करणार आहेत. या पूर्वी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी येथे भेट दिली होती. मोदी हे भेट देणारे पहिले पंतप्रधान ठरतील.
.........................

राखी सावंतविरुद्ध गुन्हा दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे असलेला ड्रेस घातल्याबद्दल मॉडेल राखी सावंत हिच्याविरुद्ध राजस्थानमधील कान्क्रोली येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राखीने हा ड्रेस ऑगस्ट महिन्यात घातला होता. याची छायाचित्रे व्हायरल झाल्याने तिच्यावर तेव्हा टिकाही झाली होती. मात्र भाजप अध्यक्ष अमित शहा यांची परवानगी घेऊनच मोदींची छायाचित्रे वापरल्याचा दावा राखीने केला होता. मात्र राजस्थानमधील एका वकिलाला हा खुलासा न पटल्याने त्याने फिर्याद दिली. पंतप्रधानांची बदनामी केल्याबद्दल आणि आक्षेपार्ह पोषाख केल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गेली बरेच दिवस राखीचे नाव चर्चेत नव्हते. ते अशा रीतीने चर्चेत आलेच.
.................

"जळगाव पॅटर्न'चा विक्रम
भंडारा-गोंदियात मोडणार

विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातील निवडणुकीत गेल्या काही वर्षांपासून "कोटीच्या कोटी उड्डाणे होत आहेत. काही वर्षांपूर्वी जळगाव येथील निवडणूक याच मुद्यावरून गाजली होती. यात शंभर कोटींचे उड्डाण झाल्याचे बोलले गेले. राष्ट्रवादीचे मनीष जैन यांना एकनाथ खडसे यांच्या मुलाला पराभूत केले होते.अशीच परिस्थिती भंडारा-गोंदियात होण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्र्यांचे विश्‍वासू परिणय फुके हे भाजपकडून, खासदार प्रफुल्ल पटेल यांचे विश्‍वासू राजेंद्र जैन हे राष्ट्रवादीचे तर; आमदार गोपालदास अग्रवाल यांचे चिरंजीव प्रफुल्ल हे कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. या तीन तगड्या उमेदवारांमध्ये "बुल फाईट' होणार आहे. याची जाणीव खुद्द मुख्यमंत्र्यांनाही झाली असावी. पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना या निवडणुकीत "जळगाव पॅटर्न'चा रेकॉर्ड ब्रेक होण्याची शक्‍यता त्यांनी बोलून दाखविली. यामुळे येथील मतदार "लक्ष्मीदर्शना'त आकंठ बुडण्याची शक्‍यता आहे.
................

सहकारमंत्र्यांच्या संस्थेने
थकविले 36 लाख रुपये

राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल मल्टिस्टेट सोसायटीने सोलापूर महापालिकेचा 36 लाख रुपयांचा मिळकत कर थकविला आहे. ार्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या महापालिकेपुढे थकबाकीदारांकडील कर वसुलीचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शहर व हद्दवाढ भागातील 171 जणांकडे तब्बल 26 कोटी रुपये थकीत आहेत. कर वसुलीसाठी महापालिकेच्यावतीने 15 नोव्हेंबरपासून कारवाईची धडक मोहीम हाती घेण्यात येणार आहे. कारवाई होण्यापूर्वीच थकीत रक्कम जमा करण्याची तत्परता सहकारमंत्री देशमुख दाखवणार का? इतर महापालिका थकबाकीदारांच्या घरापुढे बॅंड वाजवतात. तसा प्रयोग सोलापूरने करायला काय हरकत आहे.

शिक्षकांना विद्यार्थ्यांची उपस्थिती दाखवण्या साठी काढावा लागणार सेल्फी


    नवीन वर्षे २०१७, जानेवारी पासून सूरवात

 
नव्या वर्षापासून राज्यातील विद्यार्थ्यांची आता सेल्फी हजेरी लागणार आहे.

विद्यार्थ्यांची उपस्थिती दाखवण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढावा लागणार आहे.

विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून शिक्षकांनी वरिष्ठांना द्यावेत, असे निर्देश शिक्षण विभागानं दिले आहेत.

जानेवारीपासून प्रत्येक सोमवारी सेल्फी हजेरी काढली जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीचे प्रमाण वाढत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची अनुपस्थिती टाळण्यासाठी सेल्फीचा उतारा शोधण्यात आला आहे.

अशी लागणार सेल्फी हजेरी?

शिक्षकांनी 10-10 विद्यार्थ्यांचा गट करायचा

शिक्षकांनीआपल्या मोबाईलवरून विद्यार्थ्यांसोबत सेल्फी घ्यायचा

सेल्फीतल्या विद्यार्थ्यांची नावं त्यांच्या आधार क्रमांकासह सरल प्रणालीत अपलोड करायची

त्यातून कोणता विद्यार्थी गैरहजर राहतो हे शोधलं जाणार