तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 12 November 2016

गुत्तेदार,महावितरण वादात शेतक-याची अडवणूक

राम सोनवने

◼महिन्यापासुन बंद रोहित्रामुळे शेतकरी आडचणीत
परभणी(प्रतिनिधी) :सेलु तालुक्यातील रायपुर येथील शेतक-याना एेन रब्बी हंगामात महावितरण व गुत्तेदार यांच्या वादामुळे नाहक त्रासाचा सामना करावा लागत असुन महिन्यापासुन जळालेले रोहित्र मिळत नसल्याने शेतकरी आडचणीत सापडले आहेत.
                                 रायपुर येथील चव्हाळ डी. पी मागील महिन्यापासुन बंद आसल्याने रब्बी हंगामातील गहु, हरभरा, ज्वारी ह्या पिकांना पाणी देण्यात येताना आडचणी येत आहेत. या रोहित्रावर एकुण सहा शेतक-याचे विद्युत पंप आहेत व या शेतक-यानी महावितरण कडे त्यांची विद्युत देयके महावितरणकडे भरणा केली आहेत. या डीपी वर एकुण 50 एकर जिरायती जमिन आहे.सध्या रब्बी पिकाची पेरणी करण्यात येत आहे. त्यामुळे गहु पिकासाठी पाण्याची आवश्यकता आसते. परंतु गुत्तेदार व महावितरणच्या मनमानी कारभारामुळे हे रोहित्र या शेतक-याना बदलुन देण्यात येत नसुन हे बंद रोहित्र मागिल चार वर्षापुर्वी देण्यात आले होते. महावितरणकडुन या रोहित्राची पाच वर्षाची वारंटी असते असे सांगीतले जाते तर गुत्तेदाराकडुन केवळ तीन वर्षाची वांरटी आसल्याचे सांगुन हे बंद पडलेले रोहित्र शेतकरी यांना बदलुन देण्यात आले नसल्याने शेतकरी रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी आडचणीत सापडला आसुन रोहित्र कधी मिळते याची प्रतिक्षा शेतकरी यांना लागली आहे. केवळ गुत्तेदार व महावितरणच्या वादामुळे या शेतक-या रोहित्र मिऴत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.

नोटा बदलन्यात सर्वसामान्य व्यस्त; पालीका प्रचार मंदावला

राम सोनवने

◼तिस-या दिवशी ही बैकांमध्ये गर्दी,
◼शनिवार आठवडी बाजार पण व्यवहार ठप्प.
सेलु:पाचशे, हजारांच्या नोटा चलनातुन बंद केल्यामुळे त्या नोटा बैकेमध्ये जमा करण्यासाठी सामान्य नागरीकांनी तिस-यी दिवशी गर्दी केली होती.
      देशातील काळ्या पैशाला आळा बसावा, तसेच नकली नोटांचे बाजारपेठेतुन समुळ उच्चाटन करण्याच्या हेतुने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार 8नोव्हेबरच्या मध्यरात्री पासुन 500व1000 च्या नोटांची चलनातील किंमत शुन्य केली. आणी सर्वत्र एकाच चर्चेला उधान आले एवढेच नव्हेतर अनेक नागरीकांची 1000,500च्या धास्तिने झोप उडाल्याचे चित्र समोर आले. दि. 10 नोव्हेंबर पासुन बैकेत जुन्या नेटा बदलुन भेटत असल्याने नागरीकांनी त्या नोटा बदलण्यासाठी बैकेत गर्दी केली होती. दोन दिवसाचा कालावधी उलटुन ही तिस-या दिवशी सकाळ पासुनच बैकेच्या बाहेर नोटा बदलण्यासाठी बैकेत सामान्य नागरीकांनी रांगा लावुन गर्दी केली होती. यामध्ये महिलांनी सुद्धा रांगेत उभे राहुन नोटा बदलत असल्याने या नोटा बदलामध्ये सर्व सामान्याची परेशानी होत आहे.परंतु शासनाच्या निर्देशानुसार केवळ 2000 हजार रुपयेच केवळ खातेदाराना देण्यात येत असल्याने दोन हजारात व्यवहार कसा होईल हेच नागरीकांना समजत नव्हते.
             
◼बाजार दिवस, व्यवहार ठप्प.
आठवडी बाजार आसल्या कारणाने शहरामध्ये ग्रामिण भागातुन नागरीक बाजारासाठी येत आसतात त्यामुळे नागरीकांनी नोटा बदलण्यासाठी शहराकडे सकाऴी लवकरच प्रयाण केले होते व बैकेत रांगेत नोटा बदलण्यासाठी नंबर लावला होता. परंतु दुपार पर्यंतबैकेतुन पैसे मिळत नसल्याने बाजार करण्यासाठी आलेल्या नागरीकांना खाला हाताने घराकडे जावे लागले, आठवडी बाजार असुन सुद्धा केवळ पैसाचा तुटवड्याने बाजारात गर्दी नव्हती यामुळे व्यवहार ठप्प आसल्याचे दिसत होते.

तेजन्यूज हेडलाईन्स ताज्या बातम्या संक्षिप्त

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻
_______________________________

⭐ लोकांना त्रास होऊ नये म्हणून पंजाब नॅशनल बँकेने एम्स रुग्णालयाबाहेर मोबाईल एटीएम व्हॅनची सेवा सुरु केली.

👌🏻 हिंगोली = सेनगाव तालुक्यातील रिधोरा येथे शेतकरी शिवाजी श्रीराम रोडगे यांची कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या,


⭐कुठल्याही पूर्व तयारी शिवाय नोटा रद्द करण्याचा निर्णय धोकादायक असून बँकेत १०० रुपयाच्या नोटाच उपलब्ध नाहीत, हा निर्णय रद्द केला पाहिजे - ममता बॅनर्जी, पश्चिम बंगाल मुख्यमंत्री.

⭐ कुठल्याही पूर्व तयारी शिवाय नोटा रद्द करण्याचा निर्णय धोकादायक असून बँकेत १०० रुपयाच्या नोटाच उपलब्ध नाहीत, हा निर्णय रद्द केला पाहिजे - ममता बॅनर्जी, पश्चिम बंगाल मुख्यमंत्री

⭐ ठाणे = महापालिका विविध करांच्या देयकांसाठी 500, 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची मुदत 14 नोव्हेंबरपर्यंत, तीन दिवस कार्यालये खुली राहणार


⭐ सध्याच्या एटीएम मशीन्स मध्ये ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा देण्याची रचना आहे, नव्या नोटांसाठी एटीएमच्या रचनेमध्ये बदल करण्यात येईल, त्यासाठी काही दिवसांचा वेळ लागेल, हे सर्व आधी केले असते तर गुप्तता राहिली नसती - अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री.


⭐धुळे = नोट बंदीचा आरटीओ कार्यालयाच्या महसूलावर परिणाम, तीन दिवसात आरटीओच्या प्रादेशिक कार्यालयाच्या महसुलात 75 टक्क्यांपर्यंत घट.


⭐एकटया स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये २ कोटी २८ लाखाचे व्यवहार झाले, ४७८६८ कोटी रुपये एसबीआय मध्ये डिपॉझिट झाले - अरुण जेटली,


⭐लोकांनी जे सहकार्य केलं आणि संयम दाखवला त्याबद्दल मी लोकांचे आभार मानतो - अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री.03:19PM - पहिले काही दिवस अडचणी येणार हे स्वाभाविक आहे कारण ८६ टक्के चलन बदलले आहे - अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री.


⭐सोलापूर = महानगर पालिकेची थकबाकी न भरणा-यांचे गाळे व दुकाने सील करण्याचे आदेश, कारवाई सुरू झाल्याची पालिका आयुक्तांची पत्रकार परिषदेत माहिती


⭐ सोलापूर = पंढरपूर नगरपालिका निवडणूक, नगराध्यक्षपदाचा अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत वाढ, निवडणूक आयोगाचा निर्णय, चिन्ह वाटप 16 नोव्हेंबर रोजी होणार.

⭐जम्मू काश्मीर = शस्त्रसंधी उल्लंघनात जखमी झालेला जवान शहीद, केरन सेक्टरमध्ये रात्री झालेल्या फायरिंगमध्ये झाला होता जखमी.

⭐भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना- चौथ्या दिवशी भारत 488 धावांवर ऑल आऊट, भारत 49 धावांनी मागे.


⭐नाशिक = लेखा नगरयेथील 'स्टेट बँके'समोर रांगेतील 2 जेष्ठ नागरिक वाढत्या उन्हामुळे चक्कर येऊन पडले.

⭐ जुन्या नोटा बदलण्याचा निर्णय अत्यंत तकलादू, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची सरकारवर टीका.


⭐ जळगाव = सलग चौथ्या दिवशी एटीएम बंद असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल. प्रत्येक बँकां समोर लांबच लांब रांगा.

⭐कोल्हापूर = ट्रक-बाईकमध्ये जोरदार धडक, अपघातात आजी-नातवाचा जागीच मृत्यू, करवीर तालुक्यातील घटना, तानुबाई वेध, भरत पाटील मृतांची नावे

⭐ नोटा बंद करणं हा उपाय नाही, भ्रष्टाचार करणारे त्यानंतरही भ्रष्टाचार करतील, आणि आता 2000 च्या नोटेची वाट पाहत आहेत - अखिलेश यादव, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री.


⭐नोटबंदी प्रकरण : नागरिक आता ज्या समस्यांना तोंड देत आहेत त्या अल्पकालीन आहेत, देशासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. नोटबंदी निर्णयाचा परिणाम माझ्या सिनेमावर झाल्यास, मला काहीही अडचण नाही - आमीर खान


⭐ जपान = हे खूप मोठे स्वच्छता अभियान आहे, कुणाला त्रास देण्यासाठी हे अभियान नाही - पंतप्रधाननरेंद्र मोदी


⭐ जपान = आधी गंगा नदीमध्ये कुणी एक रुपयादेखील टाकत नव्हते, पण आता त्याच गंगेत 500, 1000 रुपयांच्या नोटा वाहत आहेत - पंतप्रधान नरेंद्र मोदी

⭐ जपान = देशाच्या गरिबांनी श्रीमंती दाखवली, श्रीमंतांची गरिबी तर खूपदा पाहिली आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी


⭐ जपान = काळ्या पैशातून कुणाचीही सुटका नाही, सध्याची योजना पूर्ण झाल्यानंतर 30 डिसेंबरनंतर काळा पैसा बाळगणा-यांना ठिकाणावर आणण्यासाठी दुसरी योजना येणार नाही, याची हमी नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संकेत


⭐ जपान = काळा पैसा बाळगणा-यांची सुटका नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी

⭐ जपान = चलनातून 500, 1000 रुपयांच्या नोटा रद्द, त्रास होऊन देखील जनता निर्णयाच्या बाजूने -नरेंद्र मोदी.

⭐ पिंपरी = बँका बाहेर नागरिकांची चेंगराचेंगरी, नोटा बदलण्यासाठी उभे असताना चेंगराचेंगरी, नागरिकांच्या चेंगराचेंगरीत बँकेचे दार निखळलं, देहूरोड हद्दीतील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील प्रकार.

Friday, 11 November 2016

गुंज संस्थानचे पिठाधिश छन्नूभाई देसाई महाराजांचे निधन;आज गुंज मध्ये अंत्य संस्कार

दत्त उपासनेचे साधक, हजारोंनी घेतला होता अ

कार्तिक पाटील

पाथरी:-श्री दत्त उपासनेचे उपासक, हजारो भाविकांना अनुग्रह देवून नवीन पिढीमध्ये दत्तभक्तीचा प्रसार करणारे श्रीक्षेत्र गुंजचे (ता.पाथरी) येथील योगानंद महाराज संस्थानचे पिठाधीश प.पू.श्री.छनुभाई देसाई महाराज (वय ८९) यांचे शुक्रवारी (दि.११) सायंकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी िनधन झाले. त्यांच्या पार्थिवावर श्रीक्षेत्र गुंज येथे शनिवारी (दि.१२) सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट्रासह गुजरात व देशभरात त्यांचा भक्तवर्ग आहे. 

योगानंद सरस्वती स्वामी महाराजांचे पुतणे असलेले छनुभाई देसाई महाराजांनी समर्थ सदगुरु चिंतामणी महाराजांच्या नंतर गुंज संस्थानाच्या कार्याची धुरा स्विकारली. चिंतामणी महाराजांनी संस्थानच्या कार्यास जी गती दिली होती, तीचा वेग, व्याप्ती, भक्तगणांचा विश्वास, उपासनेची काटेकोरता हे सर्व सांभाळणे अवघड होते. परंतू, छनुभाईंनी आपल्या असीम निष्ठेने, कृपाप्रसादाने, शांत व संयमीपणे संस्थानच्या कार्यास प्रारंभ करून हे कार्य नेटाने चालविले. नऊ जुलै १९९१ रोजी त्यांचा पट्टाभिषेक करण्यात आला.  सदगुरुंच्या उपासनेचा वारसा पुढे चालविण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला. चिंतामणी महाराजांनी त्यांना व त्यांच्या पत्नी मंजुळाबाई यांना श्रीक्षेत्र गुंज येथे अनुग्रह दिला. दत्त संस्थानातील उपासनेची चालत आलेली पद्दत तशीच चालू राहील, याकडे छनुभाईंनी लक्ष दिले. हजारो भक्तांना अनुग्रह देवून नवीन पिढीमध्ये दत्तभक्ती वाढविली. दत्तमंदिरांच्या सभामंडपाचे नूतनीकरण करून त्यास संगमरवराने सुशोभित केले. भक्तांना निवासाची सुविधा व्हावी, म्हणून सर्व सोयींनीयुक्त असे भक्तनिवास बांधले. 

योगानंद सरस्वती स्वामी महाराज व चिंतामणी महाराज यांच्या संगमरवरी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याबरोबरच परभणी येथील वसमत रस्त्यावरील चिंतामणी महाराजांच्या मंदिरातही मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करून भव्य अशा मंदिराचे निर्माण त्यांनी केले. पुण्यतिथी उत्सवासाठी, श्राद्धविधी, समाराधना सर्व भक्तांना पाहता यावी, म्हणून प्रशस्त सभागृह गुंज येथे बांधले. जुन्या प्रसादालय व पाकशाळेचे नुतनीकरण करून एकाच वेळी हजार ते १२०० भक्त भोजन करू शकतील, असे भव्य प्रसादालय निर्माण केले. संस्थानचा कारभार संगणकीकृत केला. शेतीसाठी आधुनिक यंत्रणा उपलब्ध करून दिली. मंदिरासमोर नयन मनोहर असे उद्यान तयार केले. सध्या मंदिराच्या महाद्वाराचे व दर्शनी इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. 

मागील काही दिवसांपासून ते वृद्धापकाळाने आजारी होते. औरंगाबाद येथील उपचारानंतर त्यांना श्रीक्षेत्र गुंज येथे आणण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी (दि.११) सकाळपासूनच गुंजकडे भाविक रवाना होत होते. सायंकाळी त्यांच्या निधनाची वार्ता समजताच भाविक मोठ्या संख्येने गुंजकडे रवाना झाले. 

तेजन्यूज हेडलाईन्स ताज्या बातम्या संक्षीप्त

★परभणी:-पाथरी तालुक्यातील तिर्थक्षेत्र गुंज येथील पिठाधिष छन्नू महाराज यांचे शुक्रवारी सायंकाळी निधन आज १० वा होणार अंत्य संस्कार

⭕- सोलापूर - पंढरपूर येथे एका दिवसात 13 लाख 61 हजार 590 रुपये कर वसूल
___________________________________

⭕- भारतीय रिझर्व्ह बँकेने ५०० आणि १००० हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यास जिल्हा मध्यवर्ती बँकांना केली मनाई. नागरी सहकारी बँकांना दिली परवानगी
___________________________________

⭕- काळवीट शिकार - सुप्रीम कोर्टाची सलमान खानला नोटीस, सलमानच्या सुटकेविरोधातील राजस्थान सरकारच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी
___________________________________

⭕- पुणे: महापालिकेला सकाळी आठपासून सायंकाळी पाचपर्यंत मिळाले २१ कोटी ५८ लाखांचे उत्पन्न. ७ हजार ७५८ थकबाकीदारांनी भरली थकबाकी
___________________________________

⭕- मुंबईत मिठाची कमतरता असल्याची अफवा, नागपाडा परिसरात मीठ खरेदीसाठी मोठी गर्दी (टीव्ही रिपोर्ट)
___________________________________

⭕- मुंबईत मिठाची कमतरता असल्याची अफवा, नागपाडा परिसरात मीठ खरेदीसाठी मोठी गर्दी (टीव्ही रिपोर्ट)
___________________________________

⭕- औरंगाबाद: विश्व भारती कॉलनी येथे गळा चिरून महिलेचा खून, अश्विनी शिंदे असे महिलेचे नाव, पोलिस घटनास्थळी दाखल
___________________________________

⭕- मुंबई: बेस्टची ११ वीज बिल भरना केंद्र आज रात्री १२ वाजेपर्यंत चालू राहतील. वीज बिलाच्या रुपात ररोज अंदाजे २.५ ते ३ कोटी रूपये बेस्टकडे जमा होतात
___________________________________

⭕- आयकर विभागाची 'बाहुबली' चित्रपट निर्मात्याच्या कार्यालयात धडक; तपास अजूनही सुरूच (एएनआय)
___________________________________

⭕- केंद्र सरकारने जुन्या नोटांनी बिले भरण्यासाठी १४ नोव्हेंबरपर्यंत दिली मुदतवाढ

जिंतूर मध्ये नगराध्यक्ष पदासाठी १० तर प्रभागां साठी ९३ उमेदवार

प्पदिप कोकडवार
जिंतूर:-न प निवडणुकी साठी शहराचं लक्ष लागलेल्या या निवडनुकीत नगराध्यक्ष पदासाठी 10 उमेदवार असून यात प्रमुख लढात काँग्रेस राष्ट्रवादी भाजप आणि आघाडी अशी होईल अशी शक्यता आहे
तर नगरसेवक पदासाठी 124 अर्ज प्राप्त झाले  होते 104 अर्ज वैध ठरले तर 11  उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत त्या मुळे आता 23 जागे साठी 93 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत
या  बाबत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेर चा दिवसा होता
नगराध्यक्ष पदा साठी
काँग्रेस राष्ट्रवादी भाजप  बसपा एम आय एम आणि  अपक्ष उमेदवार आहेत

----

पालीका निवडणूकीतील अध्यक्ष पदाचे २ तर प्रभागां साठी ११ उमेदवारांची माघार

राम सोनवने

◼प्रभागासाठी129,अध्यक्ष पदासाठी 11 उमेदवार.

सेलु:-पालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी  पालिका निवडणुकीतील इच्छुकांनी उपविभागीय कार्यालयात उमेदवारी अर्ज माघार घेतले आहेत.
      शुक्रवार 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी पालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी प्रशासकीय इमारत परिसरात काही उमेदवारांनी अर्ज परत घेतले.यामध्ये प्रामुख्याने काही उमेदवारांनी दोन दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते व ते परत घेण्यात आले. त्यामुळे उमेदवारी माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अध्यक्षपदासाठीचे 2 तर प्रभागासाठीच्या 11 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज परत घेतले आहेत.
◼अध्यक्ष पदासाठी 11 उमेदवार.
सेलु नगरपालिका निवडणुकीतील अध्यक्षपदासाठी विनोद बोराडे(जनशक्ती विकास आघाडी), श्याम भावसार(अपक्ष), श्रीनिवास उघडे(अपक्ष), पवन आडळकर(काँग्रेस), गणेश भिसे(मनसे),संदिप लहाने(शिवसेना), प्रसाद खारकर(भाजपा) शेख सोहेल(अपक्ष),  विष्णु ढोले(रिपाई गवई गट) ,तडवी पठाण इम्तियाज(एम. आय. एम), शेख कौसर(राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे.
◼अध्यक्षपदांचे 2 ची , तर प्रभागासाठीचे 11 जणांची माघार.
पालिका निवडणुकीत उमेदवारी दाखल केलेल्या उमेदवारापैकी अध्यक्षपदाच्या उमेदवारीतुन 1.आशोक खताळ, 2.पठाण अमजद यांनी उमेदवारी अर्ज वापस घेतले असुन प्रभागासाठीच्या उमेदवारापैकी 11 उमेदवारांनी उमेदवारीतुन माघार घेतली असल्याने सध्या पालिका निवडणुकीत अध्यक्षपदासाठी 11 उमेदवार, तर प्रभागासाठी 129 उमेदवार निवडणुक लढवणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
◼आज चिन्हांचे वाटप .
पालिका निवडणुकीतील अपक्ष उमेदवारांना निवडणुक चिन्हाचे वाटप सकाळी 11 वाजेपासुन करण्यात येणार असल्याने ख-या अर्थाने पालिका निवडणुकीत सर्वच राजकिय पक्षासह उमेदवार प्रचारात मग्न राहणार आहेत.

◼निवडणुक आयोगाच्या धास्तीने खर्चाचा हिसोब सादर.
पालिका निवडणुकीतील उमेदवारांनी दररोज आपला खर्च सादर करावा असे निर्देश निवडणुक आयोगाने दिले असल्याने उमेदवार दररोज आपल्या खर्चाचा हिशोब कार्यालयात दाखल करत आहेत. जवळपास सर्वच उमेदवारी त्यांच्या खर्चाचा हिशोब कार्यालयात सादर केला आहे

पुर्णा व्यापार पेठेत हजार-पाचशे रुपयांच्या चलन बंदीचा भयंकर असर


दिनेश चौधरी
पुर्णा / केद्र शासनाने 1000/500 रुपयांच्या नोटा रद्द केल्याने शहरातील व्यापारपेठ संपूर्णपणे ठप्प झाल्याचे चिञ आज पहावयास मिळाले सर्वात मोठी आर्थिक उलाढाल होणाऱ्या सराफा बाजार तसेच आडत व्यापार पेठेत हीं आज शुकशुकाट जानवला तर शहरातील अनेक व्यापारी चिंतामग्न अवस्थेत आपल्या प्रतिष्ठानांवर बसलेले पहावयास मिळाले आडत व्यापारपेठेत तर मागील दोन दिवसापासून बिट न झाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे सर्वच व्यवहारांमध्ये 1000/500 रुपयांच्या नोटांचा सर्रास वापर होत असल्याने 100/50 रुपयांच्या नोटा आणाव्यात तरी कुठून असा गंभीर प्रश्न व्यापारी वर्गामध्ये उपस्थित होतांना ही आज पहावयास मिळाला शहरातील सराफा बाजार,आडत व्यापारपेठ,कपडा मार्केट संपुर्णतःठप्प झाल्याचे आज पहावयास मिळाले शहरातील बसस्थानक,रेल्वेस्थानक तसेच बाजारपेठेत ही खाजगी दलालांनी गोरगरीब रोजमजूर शेतकरी व सामान्य मजबूर नागरीकांच्या मजबूरीचा फायदा घेऊन शेकडा 20% ते 25% कपात करुन 1000/500 रुपयांच्या नोटा बदलून देण्याचा अनोखा धंदा सुरु केल्याचे ही ऐकावयास मिळाले शहरात सर्वञ नागरीकांचा व ग्राहकवर्गाचा अभाव जानवत असतांना माञ सर्वात जास्त गजबज माञ शहरातील भारतीय स्टेट बँक,स्टेट बँक अॉफ हैद्राबाद,महाराष्ट्र बँक,मराठवाडा ग्रामीण बँक व एटीएम समोर व्यापारी सर्वसामान्य नागरीकांनी तसेच शेतकरी मजुरांनी ही आपल्या जवळील 1000/500 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी मोठ मोठ्या रांगा लावलेल्या पहावयास मिळाल्या सदरील बँकांच्या परिसरात कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नयें याकरिता पो.नि.रामराव गाडेकर यांनी खबरदारीचा उपाय म्हणून चोख बंदोबस्त ठेवला आहे

नोटा बदलून मोदींनी जनतेचा विश्वासघात केला-उद्धव ठाकरे

तेजन्यूज नेटवर्क
 
शुक्रवार,  11  नोव्हेंबर  2016

मुंबई:-पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अचानक नोटा रद्द करण्याचा निर्णय चुकीचा आहे. नोटा बदलण्यासाठी मुदत वाढवायला हवी, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं. मोदींनी अचानक नोटा बदलून लोकांच्या विश्वासाची प्रतारणा केली, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

500 आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

*स्वीस बँकेवर सर्जिकल स्ट्राईक कधी?*

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “काळा पैसा बाहेर यायला हवा यात दुमत नाही. मात्र अचानक नोटा रद्द केल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. 500-1000 रुपयांच्या नोटांवर सर्जिकल स्ट्राईक केला, मग स्वीस बँकेवर सर्जिकल स्ट्राईक कधी?”

तसंच नोटा बदलण्याला विरोध नाही, नागरिकांना होणारा त्रास थांबवा, नोटा बदलण्याची मुदत वाढवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

*जनतेचा सर्जिकल स्ट्राईक भारी पडेल*

मोदींच्या निर्णयामुळे नेत्यांना त्रास नाही, सामान्य लोकांना त्रास होत आहे. मोदींकडून लोकांच्या विश्वासाशी प्रतारणा झाली. अचानकपणे नोटा रद्द केल्याने सामान्य लोकांना त्रास होत आहे. जनतेने जर सर्जिकल स्ट्राईक केले, तर भारी पडेल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

*जनतेला रस्त्यावर आणून मोदी जपानला*

नोटा रद्द केल्याने देशभरात एटीएम आणि बँकांसमोर सामान्य लोकांच्या रांगा लागल्या आहेत. नोटा बदलण्याच्या आधीच बँकांमध्ये नोटा उपलब्ध करायला हव्या होत्या. सामान्य जनतेला रस्त्यावर आणून देशाचे पंतप्रधान जपानला गेले. जनतेने विश्वासाने निवडून दिलंय, त्यांचा विश्वासघात करु नये, असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

एटीएम मधून पैसे काढण्या साठी राहूल गांधी रांगेत

तेजन्यूज नेटवर्क

शुक्रवार,  11  नोव्हेंबर  2016

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील संसद मार्ग एसबीआय शाखेत राहुल गांधी पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहिले. बँकेतून नोटा बदलून घेण्यासाठी आज देशभरातील बँकांसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याला काँग्रेस उपाध्य राहुल गांधी देखील अपवाद नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून पाचशे आणि हजारच्या नोटा रद्दबातल करण्याचा निर्णय जाहिर केल्यानंतर सर्वसामान्य व्यक्तींपासून राजकीय व्यक्तींपर्यंत पैसे बदलून घेण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे.

कालपासून देशभरातील बँकात नव्या पाचशे आणि हजारच्या नोटा मिळण्यास सुरुवात झाल्याने ग्राहकांची नोटा बदलून घेण्यासाठी उडी पडली आहे. 30 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा ग्राहकांना बदलता येणार आहेत.

दरम्यान राहुल गांधींना रांगेत पाहून दिल्लीकरांच्याही भुवया उंचावल्या. एसबीआयच्या एटीएमसमोर मोठ्या प्रमाणात रांग असल्याने राहुल गांधींनी नागरिकांशी गप्पा मारत बँकेचा व्यवहार केला.