तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 19 November 2016

नप निवडनुकी निमित्त आ फड यांचे शिवसेना पदाधिका-यांना मार्गदर्शन

प्रतिनिधी
पाथरी:-नगरपालिका निवडणूक 1016 निमित्त निवडणूक प्रचारासाठी आ.मोहन फड यांनी काल शवीवारी शिवसेना मध्यवर्ती प्रचार कार्यालय येथे भेट देऊन आढावा घेतला या वेळी  शिवसैनिक आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले या वेळी सुरेश ढगे,सुरेश बारहाते, मानवत कृषीउत्पन्न बाजार समिती सभापती गंगाधर कदम, शिवसेना तालुकप्रमुख रविंद्र धर्मे,संजय कुलकर्णी,मुंजाभाऊ कोल्हे व शिवसैनिक

सबसे तेज,तेजन्यूज हेडलाईन्स संक्षिप्त

✍🏻  TEJ NEWS HEADLINES  ✍🏻
------------------------------------------------------

⭐एका पुजाऱ्यानं स्वतःचं सरण रचून स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना हिंगोलीत घडली आहे. विठ्ठल पोले असं या पुजाऱ्याचं नाव आहे.

⭐देशातील तरूणाईने ' स्वच्छ भारत अभियान' पुढे नेले आहे, मग ते देशासाठीचे असो किंवा काळ्या पैशाबाबतचे - पंतप्रधान मोदी.

⭐गेल्या दोन वर्षांपासून देशभरात स्वच्छतेचे महाभियान सुरू आहे - पंतप्रधान मोदी.

⭐ मुंबई = कोणी दुर्गंधी पसरवत असेल तर तुम्ही (जनतेने) त्यांना सफाईचे महत्त्व पटवले आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

⭐मुंबई = कुपोषण, बेरोजगारी, भ्रष्टाचार असो वा अस्वच्छता, या सर्व गोष्टींचा सर्वात वाईट परिणाम गरीबांवरच होतो - पंतप्रधान मोदी.

⭐मुंबई = सरकार गरिबांना सतर्क करण्याचे काम दोन वर्षांपासून करत आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

⭐गरिबी हा कोणत्याही समाजासाठी सर्वात मोठा शाप आहे - पंतप्रदान मोदी.

⭐मुंबई = तुमचा उत्साह आणि आदर्शवाद अतुलनीय आहे - पंतप्रधान मोदी

⭐ मुंबई = तुमच्यातील अनेक जण माझ्याशी मोबाइल अॅपद्वारे जोडले गेलेले आहात, तरुण वर्गाकडून मला शक्ती मिळते - पंतप्रधान नरेंद्र मोदी

⭐२०१४ साली न्यूयॉर्क मधील सेंट्रल पार्कमध्ये मी ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलचा सुंदर सोहळा अनुभवला - पंतप्रधान मोदी

⭐मुंबई = गोल्बल सिटीझन फेस्टिव्हलमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरू. बीकेसी मध्ये मोदीमोदी असा जयघोष.

⭐ मुंबई = एका ग्लोबल इव्हेंटला मिळालेला इतका उदंड प्रतिसाद पाहून आनंद वाटला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

⭐ मुंबई = ग्लोबल सिटीजन महोत्सवात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केलेे स्वच्छता राखण्याचे आवाहन

⭐मुंबई = ग्लोबल सिटीजन महोत्सवात पूनम महाजन आदित्य ठाकरे आणि मिलिंद देवरा मंचावर उपस्थित. पक्षीय मतभेद बाजूला सारून ग्लोबल सिटीझन बनूया.

⭐मुंबई = भ्रष्टाचारा विरोधात नेहमीलढणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

⭐ जम्मू काश्मीर = दोन संशयित व्यक्तींना घुसखोरी करण्यापासून रोखले, त्यांनी आमच्यावर गोळीबार केला,आम्ही प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू : मेजर कुमार

⭐ बुलडाणा = खामगावमधील आदिवासी आश्रम शाळेतील दोन फरार आरोपींना पुण्यातून अटक,  आरोपीस घेऊन तपास पथक खामगावकडे रवाना.

⭐चेन्नई = तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना आयसीयू मधून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आल्याची माहिती

⭐ ग्लोबल सिटिझन महोत्सव = बीकेसीतील कार्यक्रमास ८० हजारांहून अधिक नागरिक उपस्थित. स्थिती. Whamp British Rock Band चा कार्यक्रम सुरू.

⭐सोलापूर महानगर पालिकेत सत्ताधारी विरोधक आमने-सामने, नोटाबंदी आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख प्रकरणावरुन सभागृहात गोंधळ आणि घोषणाबाजी.

⭐ कोल्हापूर = बोलेरो गाडीतून जाणारी एक कोटी रुपयांची रोकड पकडली, सर्व पाचशे आणि हजारच्या जुना नोटा, पोलिसांकडून चौकशी सुरु.

⭐ जिल्हा, सहकारी बँकांचा पैसा आरबीआयने स्वीकारावा. दोन-तीन दिवसात निर्णय न घेतल्यास आंदोलन करू. सहकारी बँका बंद करण्याचा आरबीआयचा विचार - शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांची टीका.

⭐ जम्मू-काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये दहशतवादी व सुरक्षा दलाच्या जवानांदरम्यान चकमक सुरू. एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश. २-३ दहशतवादी अडकल्याचे वृत्त.

⭐ सिंधुदुर्ग = कसालमध्ये एसटी बसखाली चिरडून वृद्ध महिलेचा मृत्यू, मृत महिला मालवण मधील खोटले येथील होत्या रहिवासी.

⭐ गुजरात = सूरतमध्ये शेतक-यांची नोटबंदी विरोधात निदर्शने

⭐ विरार = उघड्या चेंबरमध्ये ६ वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळला, विरार पूर्वेकडील घटना.

⭐ कोरिआच्या सुंग जी ह्यूनचा पराभव करून पी.व्ही.सिंधूचा चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश.

⭐ धुळे = पिंपळनेर येथे सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे रास्तारोको आंदोलन,सामोडे चौफुली येथे रास्ता रोको , शेतमालाला रास्त भाव देण्याची मागणी, आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

⭐ अहमदनगर = महापालिकेतील संगणक आणि स्पीकर जळाले, सर्वसाधारण सभा सुरू असताना अचानक विदुत प्रवाहाचा दाब वाढल्याने घडला प्रकार. चौकशी सुरु.

⭐ इंग्लंड विरुद्धच्या दुस-या कसोटीत विराट कोहलीचे दुसरे अर्धशतक. भारत 3 बाद 98 धावा.

⭐ मुंबई = कोल्ड प्ले कॉन्सर्ट ठिकाणी सर्व कलाकारांच्या गाड्यांना परवानगी,मात्र भाजपा खासदार आणि गायक बाबुल सुप्रियो यांची गाडी अडवण्यात आली. कारण अस्प्ष्ट.

⭐पंजाब = लुधियाना मध्ये पोलिसांनी जप्त केल्या तब्बल 45 लाख रुपयांच्या चलनातून रद्द करण्यात आलेल्या जुन्या नोटा

⭐ आसाम = उल्फा दहशतवाद्यांचा जवानांवर हल्ला, घटना स्थळावरुन आरपीजी आणि आयईडी जप्त केले आहेत, हल्ल्यामागे उल्फा दहशतवादी असण्याची शक्यता, हल्ल्याचा नोटाबंदीशी काहीही संबध नाही - एल दोंगल,

⭐ नवी मुंबई परिसरात १ कोटी रुपयांच्या नोटा जप्त, गुन्हे शाखेची कारवाई.

⭐ जुहू चौपाटीवर शनिवारी सकाळी एका पंचवीस वर्षीय महिलेने तिच्या दोन वर्षांच्या बाळासह पाण्यात बुडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब जीव रक्षकांनी पहिली आणि या दोघांनाही पाण्यातून बाहेर काढून कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

⭐इंग्लंडचा पहिला डाव २५५ धावांवर आटोपला, भारताकडे २०० धावांची आघाडी, इंग्लंडवर फोलोऑन न लादण्याचा भारताचा निर्णय.

Friday, 18 November 2016

१२५ दांडी बहाद्दरांचे निलंबन

सबसे तेज,

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेतील आयुक्तांविरोधातील अविश्वास ठराव राज्य मंत्रिमंडळाने फेटाळल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी आपल्या कामाचा धडाका तसाच कायम ठेवला आहे. आज दोन नगरसेवकांचे पद रद्द केल्यानंतर आता कामावर दांड्या मारणाऱ्या 125 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निलंबन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमातील वारंवार अनुउपस्थिती राहणाऱ्या आणि ठोक मानधनावर काम करणारे 59 वाहक आणि 66 चालकांना आयुक्तांनी नोकरीवरून काढून टाकले आहे. यामध्ये वाहतूक नियंत्रक दर्जाचा एका अधिकारी आणि वाहकाला बडतर्फ करण्यात आले आहे.

एनएमएमटीला लागलेली उतरती कळा रोखण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वारंवार गैरहजर राहणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

याआधीदेखील एनएमएमटीमधील 24 कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी बडतर्फ केलं होतं. त्यानंतर 59 वाहक आणि 66 चालकांना कामावरून काढून टाकले आहे. एनएमएमटीच्या 15 पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु असून मुंढे यांच्या कारवाईमुळे एनएमएमटी प्रशासनाला चांगलाच दणका बसला आहे.

दूरदर्शनच्या कृषी सल्लागारपदी कांतराव झरीकर

प्रतिनिधी

परभणी:-मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन प्रसारित होणाऱ्या कृषी कार्यक्रम सल्लागार समितीच्या अशासकीय सदस्यपदी तालुक्यातील झरी येथील प्रगतशील शेतकरी म्हणुन  कृषी भूषण कांतराव देशमुख झरीकर यांची   नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती दूरदर्शन वाहिनी कार्यक्रम अप्पर महासंचालक शिवाजी फुलसुंदर यांच्या पत्राद्वारे  करण्यात आली आहे. प्रसार  माध्यमांचे कृषि विस्तारास सहाय्य या  केंद्रीय कृषि मंत्रालयाच्या वतीने दूरदर्शन वरुन ' कृषिदर्शन आणि आमची माती आमची माणस ' या कार्यक्रमाचे प्रसारण होत आहे. या कार्यक्रमाच्या  माध्यमावर एक प्रगतशील शेतकरी असावा या उद्देशाने कांतराव झरीकर यांची नियुक्ती केली असल्याचे सांगितले आहे. या नियुक्तीच्या माध्यमातुन शेतकऱ्याला मार्गदर्शन मिळेल. नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती मिळेल.  तसेच या कार्यक्षेत्रातील प्रयोगशील शेतकरी पुढे येतील असाही उल्लेख पत्रात केला आहे. कांतराव देशमुख झरीकर यांच्या नियुक्ती बद्दल झरी ग्रामस्थ, मित्र परिवार, अदिनी स्वागत केले आहे.

पाथरीत शिवसेनेच्या प्रचार रथाचा शुभारंभ

प्रतिनिधी
पाथरी:- नगरपालिका निवडणूक 1016 निवडणूक प्रचारासाठीच्या विजय रथाचा शुभारंभ करताना शिवसेना तालुकप्रमुख रविंद्र धर्मे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष जोगदंड,संजय कुलकर्णी, शिवजी पितळे,भरत हरकळ व शिवसैनिक

सबसे तेज,तेज न्यूज हेडलाईन्स संक्षिप्त

✍🏻 TEJ NEWS HEADLINES  ✍🏻
-----------------------------------------------------

⭐आसामच्या तीनसुकीया मध्ये लष्कर आणि उल्फा दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असून, आयईडी स्फोटामध्ये आतापर्यंत तीन जवान शहीद झाले आहेत.

⭐ भारत आणि इंग्लंड मध्ये सुरु असलेल्या दुस-या कसोटी सामन्यातील तिस-या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली असून, इंग्लंडने सावध सुरुवात केली आहे.


⭐ यवतमाळ जिल्ह्याच्या विधान परिषद निवडणूक 439 मतदार सेना भाजप युतीचे उमेदवार तानाजी सावंत आणि काँग्रेसचे शंकर बडे यांच्यात थेट सामना, जिल्ह्यात पुसद, वणी, पांढरकवडा,यवतमाळ राळेगाव ,दारव्हा,उमरखेड या सात ठिकाणी मतदान केंद्र, यवतमाळ मध्ये सर्वाधिक 160 मतदार , 439 मतदार मध्ये 224 पुरुष आणि 215 महिला मतदार.

⭐सांगली = सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटातून विधानपरिषद निवडणुकी साठी मतदानास वेग, दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी चार मतदान केंद्रे, ५७० मतदार, चौघेजण रिंगणात, मात्र मुख्य लढत काँग्रेसचे मोहनराव कदम आणि राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांच्यात.

⭐ सांगली = विधान परिषदेसाठी जिल्ह्यातील चार मतदान केंद्रांवर मतदान सुरू, विधानपरिषद निवडणुकी साठी चोख बंदोबस्त.

⭐जळगाव = विधान परिषदेसाठी जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर सकाळी 8 वाजेपासून मतदानास प्रारंभ, एकूण 549 मतदार आहेत. दुपारी 4 वाजे पर्यंत मतदान होईल.

⭐आज बँका फक्त आपल्याच ग्राहकांना सेवा देणार, ज्येष्ठ नागरिकांना हा नियम लागू नाही.

⭐झाकीर नाईकच्या मुंबईतील आयआरएफ कार्यालयात तपास करण्यासाठी एनआयए आणि मुंबई पोलिसांची पथके दाखल.

⭐दुकानं, मॉल्सच्या स्वाइप मशीन मधूनही मिळणार आता २ हजारापर्यंत कॅश, चलन तुटवडयावर मात करण्यासाठी आरबीआयची घोषणा.

⭐ पश्चिम बंगाल मध्ये कूच बेहार येथे लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात.

⭐ आसामच्या तिनसुकीया मध्ये पेनग्रीयेथे लष्कर आणि उल्फाच्या दहशतवाद्यां मध्ये चकमक सुरु आहे.

⭐मध्यप्रदेश शहाडोल येथे लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात.

⭐ राजस्थान येथे झालेल्या रेल्वे अपघातात जखमी झालेल्या दोघा प्रवाशांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले - अनिल सक्सेना, भारतीय रेल्वे प्रवक्ते.

⭐राजस्थानच्या श्रीगंगानगर मध्ये भतिंडा-जोधपूर प्रवासी ट्रेनचे डब्बे रुळावरुन घसरुन दोनजण जखमी, डब्बे रुळावरुन हटवण्यात आले असून रेल्वे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.

⭐ सांगलीमध्ये दुचाकी चालका कडून १९ लाखांची रोकड जप्त, मध्यरात्री नाकाबंदी दरम्यान पोलिसांची कारवाई, जप्त केलेल्या पैशांमध्ये ५०० आणि १ हजारच्या जुन्या नोटा.

⭐ नोटबंदी ही अशी सर्जरी आहे ज्याचा फायदा सामान्य नागरिकांना होईल. -व्यंकय्या नायडू

⭐नोटबंदीमुळे लोकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पण भविष्यात या निर्णयाचे चांगले परिणाम दिसून येतील. - अण्णा हजारे

सबसे तेज,तेजन्यूज हेडलाईन्स संक्षिप्त


💠💠
🌀सोलापूर : उमरगा चौरस्ता येथे पकडलेल्या ९१ लाख ५0 हजारांच्या रोकड प्रकरणी लोकमंगल समूहाकडून करण्यात आलेल्या खुलाशावर निवडणूक आयोगाचे समाधान झालेले नसून जप्त केलेली रोकड आणि बँक अकाउंटमधील नोंदींचे थर्ड पार्टी लेखापरीक्षण करून घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

💠💠
🌀सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मंत्रालयात सोडत काढण्यात आली. त्यात ७ जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे.

💠💠
🌀सोलापूर : गेल्या दहा दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यातील सर्व सहकारी, राष्ट्रीयीकृत बँकांच्या आवारात उसळलेली ग्राहकांची गर्दी कालपासून शाई लावण्याच्या पद्धतीमुळे एकदम ओसरली. राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांच्या 'एटीएम'मध्ये नोटा भरल्या जात असल्यामुळे सेंटर्ससमोर रांगा दिसून आल्या. 

💠💠
🌀सोलापूर : माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून शहर काँग्रेस कमिटी शनिवार दि. १९ पासून काँग्रेस भवन येथे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारणार

💠💠
🌀अक्कलकोट: नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या उमेदवार शोभा खेडगी यांच्या प्रचारार्थ अक्कलकोट येथील खासबाग भागात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी प्रकाश कोळी यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद््घाटन करण्यात आले. 

💠💠
🌀दक्षिण सोलापूर : आचेगाव  येथील जयहिंद शुगर कारखान्याने गतवर्षी २0१५-१६ साली गाळपास आलेल्या ऊसासाठी प्रतिटन १00 रुपयांचा वाढीव हप्ता देण्याची घोषणा केली आहे. कारखान्याचे चेअरमन बब्रुवान माने-देशमुख यांनी ही माहिती दिली.

💠💠
🌀सोलापूर : शहरातील एच.डी.एफ.सी. बँकेच्या शाखेत बनावट कागदपत्रे सादर करुन ८ लाख ६0 हजार ५९७ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

💠💠
🌀आज फक्त ज्येष्ठ व्यक्तींना पैसे बदलून मिळणार, इंडियन बँक असोसिएशनचा निर्णय; मात्र बँकेत नोटा जमा करणं आणि काढण्याचं काम सुरुच राहणार

💠💠
🌀नोटबंदीमुळे लोकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पण भविष्यात या निर्णयाचे चांगले परिणाम दिसून येतील. - अण्णा हजारे

💠💠
🌀नोटबंदीनंतर ICICI बँकेत जमा झाल्या 32 हजार कोटींच्या ठेवी.

💠💠
🌀अहमदनगर: कर्तव्यात कसूर केल्यामुळे महाराष्ट्र जीवनदान प्राधिकरणाचे अहमदनगर येथील कार्यकारी अभियंता ए. डी. पांडकर निलंबित, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकरांनी दिले आदेश

💠💠
🌀पेट्रोल पंप चालकांनी बँकेला चेक द्यावेत बँक त्याबदल्यात रोख रक्कम देईल जी पेट्रोल पंपावरून सामान्यांना देता येईल, एसबीआयच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी दिली माहिती

💠💠
🌀५००, २००० च्या नव्या नोटा मिळण्यास सुरूवात, देशाभरातील ३६ हजार एटीएम मध्ये सुविधा सुरू

💠💠
🌀औरंगाबाद: नोटाबंदी निर्णयामुळे ग्रंथ व्यवहार ठप्प, पुस्तक खरेदीकडे वाचकांनी फिरव

💠💠
🌀विजय माल्ल्यांचे कर्ज माफ करण्यात आल्याच्या बातम्या खोट्या, एसबीआयच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांचा खुलासा

💠💠
🌀अनधिकृत बांधकामप्रकरणी शिसेनेच्या दोन नगरसेवकांना मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंचा दणका; शिवराम पाटील, अनिता पाटील यांचे नगरसेवक पद रद्द

💠💠
🌀औरंगाबाद: कासलीवाल तापडियानगर भागात राहणारे डॉ. कैलास मागुलकर यांचे घरे चोरट्याने फोडले, ९ तोळे सोने लंपास

💠💠
🌀नोटाबंदीनंतर पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळच्या सिमेवरून भारतामध्ये होणारी बनावट नोटांची तस्करी पूर्णपणे थांबली: किरेन रिज्जू (केंद्रीय गृह राज्यमंत्री)

💠💠
🌀सत्ता कितीही शक्तिशाली असली तरी तिला नष्ट करण्याची ताकद साहित्यात आहे. डोक्यातल्या विचारांना जवान किंवा सत्ता नष्ट करू शकत नाही, हे काम केवळ साहित्य करू शकते: नितीन गडकरी

💠💠
🌀देशाच्या प्रगतीसाठी आपल्या रेल्वेने प्रगती करणे गरजेचे आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

💠💠
🌀श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धने मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदी, IPLच्या दहाव्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना करणार मार्गदर्शन.

💠💠
🌀विशाखापट्टणम कसोटी : दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडच्या 5 बाद 103 धावा. इंग्लिश संघ अद्याप 352 धावांनी पिछाडीवर

आयकर विभागाने नोटीस पाठवण्यास केली सुरूवात


५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बंद करण्याच्या निर्णयानंतर काळा पैसा असलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वित्तमंत्रालयाने एक नियम केला आहे. अडीज लाखांपर्यंतची रक्कम बँकेत सर्वसाधारण माणूस जमा करू शकतो, मात्र त्यावर जर रक्कम एखादी व्यक्ती ठेवत असेल तर त्याची चौकशी केली जाईल असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आता आयकर विभागाने देशभरात अनेकांना नोटीसा पाठवायला सुरूवात केली आहे. या लोकांच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे, त्यांनी हा पैसा कसा मिळवला आहे याची चौकशी केली जाईल आणि यासाठीच या नोटीसा पाठवल्या जात आहे.
जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आयकर विभागाने सगळ्या बँकांना ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरपर्यंतच्या कालावधीमध्ये किती लोकांनी अडीज लाखांच्यावर पैसे बँकेत जमा केले आहेत याचा तपशील मागवला आहे. हा तपशील बँकांनी पुरवायला सुरूवात केल्यानंतर त्यानुसार आयकर विभागाने नोटीसा पाठवायला सुरूवात केली आहे.
बँकेमध्ये जमा झालेल्या अडीज लाखांवरच्या पैश्याचा कोणताही तपशील जर एखाद्या व्यक्तीला, संस्थेला,कंपनीला देता आला नाही तर त्या संबंधिताविरूद्ध कारवाई केली जाणार आहे. त्या संबंधिताकडून जमा केलेल्या रक्कमेवर ३० टक्के कर,१२ टक्के व्याज आणि २०० टक्के दंड आकारला जाईल

सबसे तेज,तेजन्यूज हेडलाईन्स संक्षिप्त

1. आज फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच नोटा बदलण्याची मुभा, इंडियन बँक असोसिएशनचा महत्त्वपूर्ण निर्णय, बँकांमधील इतर व्यवहारांना मात्र परवानगी
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
2. सहकारी बँकांवरचे निर्बंध उठवले नाहीत, तर आजपासून बँका बंद, जिल्हा बँकांचा आक्रमक पवित्रा, व्यवहार होत नसल्यानं ग्रामीण भागात अडचणी
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
3. राज्यात आज विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी मतदान, पुणे, नांदेड, सांगलीसह गोंदियात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
4. परवानाधारक मद्यसेवकांना 12 ऐवजी दोनच बाटल्या मिळणार तर अवैध दारुविक्री केल्यास 5 वर्षांची शिक्षा, अण्णांच्या सुचनांचा सरकारकडून स्वीकार
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
5. देशातला 'कोल्डप्ले'चा पहिला कार्यक्रम आज मुंबईत, बिग बी, सचिन, शाहरुखसह दिग्गजांची हजेरी
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
6. विशाखापट्टणम कसोटीवर टीम इंडियाचं वर्चस्व, भारताची 455 धावांची मजल, इंग्लंडची पाच बाद 103 अशी घसरगुंडी
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
7. मुंबईतील ग्लोबल सिटिझन्स फेस्टिव्हलमध्ये आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण...
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
8. आसाममध्ये उल्फा दहशतवाद्यांसोबत सुरू असलेल्या चकमकीत एक जवान हुतात्मा, ४ जखमी
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
9. दुकानांमधील आणि मॉलमधील स्वाइप मशीनमधूनही २००० रुपयांपर्यंत रक्कम काढता येणार... बँका, एटीएमबाहेरच्या रांगा कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची महत्त्वपूर्ण घोषणा...
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
10. वरिष्ठ नागरिकांना मात्र कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून जुन्या नोटा बदलून घेता येतील...
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
11. मुंबईः झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनच्या दहा केंद्रांवर राष्ट्रीय तपास संस्थेचे छापे.

पुर्णेत काँग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचार रॅलीला प्रचंड प्रतिसाद

दिनेश चौधरी

पुर्णा:-नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकी मध्ये काँग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवार दि.18 नोव्हेंबर रोजी दुपारी 01-00 वाजेच्या सुमारास शहरातील झिरो टि कॉर्नर येथुन काँग्रेस जिल्हाध्यक्ष व मा.राज्यमंञी सुरेशराव वरपूडकर व प्रदेश उपाध्यक्ष तथा मा.खा.ॲड्.तुकाराम रेंगे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॕलीचे आयोजन करण्यात आले होते सदरील प्रचार रॕलीस प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने हळूहळू न.प.निवडणूक निकालाचे चिञ स्पष्ट होतांना दिसत असुन काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह नगर सेवक पदाच्या उमेदवारांचे ही पारडे जड होतांना दिसत आहे
शहरातील निवडणूक प्रचारात काँग्रेस पक्षाने आघाडी घेतल्याचे काँग्रेस आयोजित प्रचार रॕलीला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादावरुन स्पष्ट होत असुन नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या सौ.अनिता सुनील जाधव यांना शहरातील महिला वर्गातुन ही प्रथम क्रमांकाची पसंती मिळत असल्याचे प्रचार रॕलीतील सहभागी  महिलांच्या मोठ्या संख्येतून निदर्शनास येत आहे सदरील प्रचार रॕलीस शहरातील झिरो टि कॉर्नर येथुन काँग्रेस जिल्हा सचिव अशोक साळवे,जेष्ट नेते वहीद कुरेशी,जेष्ट नेते हुजुर साहाब,मा.नगर सेवक सुनील जाधव,ता.अध्यक्ष हनुमंत डाके,शहराध्यक्ष ॲड्.अब्बास हुसेन,सरचिटणीस मुजीब खुरेशी,सर्फराज खाँन पठान अनीस बाबूमियाँ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरीवात करण्यात आली होती या वेळी या प्रचार महारॕली मध्ये महिलांची संख्या प्रचंड प्रमाणात असल्याने शहरवासीयांचे या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित रॕलीने लक्ष वेधले होते सदरील रॕली शहरातील सर्वच भागातून वाजत गाजत फिरल्याने शहरातील वातावरण काँग्रेसमय झाल्याचे पाहावयास मिळाले सदरील प्रचार रॕली मध्ये शहरातील नगर सेवक पदाचे उमेदवार समरीन बेगम शेख अयुब,ॲड्.शेख अथरोद्दीन शेख बशीरोद्दीन,संदीप अच्युतराव कदम,अलमास फातीमा शेख अ.मुजीब,ॲड्.हर्ष गायकवाड,शांताबाई उबाळे,अ.सलीम मोहम्मद साहब,पद्मीनबाई ऐंगडे,कलीम खुरेशी,कल्पनाताई खर्गखराटे,सुप्रीयाताई सुधीर जाधव या काँग्रेस उमेदरांनीही सहभाग नोंदविला होता या वेळी शहरातील सर्वच महापुरुषांना अभिवादन करण्यात आले शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन रॕलीचा समारोप करण्यात आला यावेळी रॕलीत सहभागी हजारोंच्या जनसमुदायाला काँग्रेस उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले


स्वच्छ शहर,सुंदर शहर..? नप प्रशासन घोळतेय नागरीकांच्या जिवनात जहर


दिनेश चौधरी
पुर्णा:- नगर परिषद प्रशासनाच्या स्वच्छता विभागातील अनियंत्रित कारभारावर मुख्याधिकाऱ्यांचे कुठल्याही प्रकारचे नियंञण नसल्या कारणाने शहरातील नागरी वसाहतींमध्ये प्रचंड प्रमाणात साचलेले कचऱ्याचे ढिगार स्वच्छते अभावी तुंबलेल्या नाल्या व अस्वच्छ पाणी पुरवठ्यामुळे शहरात डासांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली असुन शहरात मलेरीया,काविळ,चिकन गुनीया,गॕस्टो,डेंगु,आदी आजारांनी ग्रस्त झालेल्या रुग्नांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसत आहै परंतू निद्रीस्त अवस्थेत असलेला आरोग्य विभाग व नगर परिषद मुख्याधिकारी मंगेश देवरे नागरीकांच्या मुलभूत नागरी सुविधांकडे सपशेल दुर्लक्ष करुन निवडणूक काळातहीं कागदोपञी झालेल्या विकासकामांची बिले काढण्यावरच जास्त लक्ष देत असल्याने नागरीकांमध्ये संताप व्यक्त होत असुन शहरातील सोनार गल्ली,महाविर नगर,टिळक रोड,तसेच जुना मोंढा,स्वस्तिक नगर,डोबी माता गल्ली,शास्ञी नगर येथील बुलढाना बँक परिसर तसेच आनंद नगर परिसरात हीं नाल्यांची साफसफाई योग्य पध्दतीने होत नसल्याकारणाने या परिसरातील नागरीक नगर परिषद प्रशासनाच्या गलथान कारभाराला वैतागून स्वतःच नाल्यांची साफसफाई करतांना पाहावयास मिळत असल्याने नगर परिषदेच्या निर्लज्य कारभाराला नागरीक ञस्त झाल्याचे दिसत असुन सोनार गल्ली परिसरातील किराणा व्यापारी रवी पळसकर यांना स्वच्छते संदर्भात विचारणा केली असता त्यांनी अत्यंत मार्मिक प्रतिक्रिया दिली असुन यावेळी ते म्हणाले मागिल साडेसात  वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यापासून सर्वञ अस्वस्थता पसरली असुन आता माञ खऱ्या अर्थाने स्वच्छता अभियान राबविण्याची वेळ आली आहे नगर परिषदेत सर्वच करांचा भरणा भरुनही न.प.प्रशासन नागरीकांना मुलभुत सुविधा पुरविण्यास असमर्थ असेल तर अश्या नगर परिषदेची व आम्ही निवडून दिलेल्या भ्रष्ट लोकप्रतिनिधींची आवश्यकताच काय..? त्यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे नगर परिषदेच्या निश्क्रिय प्रशासनाची व मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या अकार्यक्षम वृत्तीची खरचच शहरवासीयांना लाज वाटत आहे