तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 26 November 2016

सबसेतेज ,तेजन्यूज हेडलाईन्स ताज्या बातम्या संक्षिप्त


💤⚜💤
☀सोलापूर: जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांसाठी रविवारी २७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार असून, २०२ जागांसाठी एकूण ७३१ उमेदवार रिंगणात आहेत. यात ४८ उमेदवार हे थेट नगराध्यक्षपदासाठी आपले नशीब आजमावत आहेत.

💤⚜💤
☀पंढरपूर - शहरातील दारू अड्डे उध्वस्त; जुनी पेठ, गोसावी बोळ, मटण मार्केटच्या मागे आणि तानाजी अभंगराव यांच्या पडीक जागेत सापडली दारू, पंढरपूर पोलीसांची कारवाई.

💤⚜💤
☀सोलापूर : फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झालेल्या तक्रारदाराला वरिष्ठांशी बोलून सहकार्य करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करुन पहिल्या हप्त्यात तीन लाख रुपयांची लाच स्वीकारणारा शहर गुन्हे शाखेचा पोलीस नाईक संतोष पालकर व अल्ताफ कुरेशी हा खासगी इसम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले.

💤⚜💤
☀सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे तालुका पोलिसांनी छापा मारुन ६५हजार रुपयांचा विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला. नान्नज-मार्डी रोडवरील एका बियर शॉपीच्या मागे हा साठा सापडला. 

💤⚜💤
☀सोलापूर: शनिवार आणि रविवार हे दोन दिवस बँकांसाठी सुटीचे दिवस असतानादेखील शहर-जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ४२ शाखा असंघटित कामगारांचे बँक खाते काढण्यासाठी खुल्या होत्या.

💤⚜💤
☀सोलापूर : जि. प. सदस्य उमाकांत राठोड यांना दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी ३ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता छत्रपती रंगभवन येथे शोकसभेचे आयोजन , माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह विविध मान्यवर या शोकसभेत सहभागी होणार

💤⚜💤
☀सोलापूर : माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्यांनी केलेल्या जाचाला कंटाळून २६ वर्षीय महिलेची आत्महत्या. एकाविरोधात गुन्हा दाखल.

💤⚜💤
☀सोलापूरातील माढा तालुक्यातील लऊळ येथे शेळ्यांच्या गोठयाला अचानक लागलेल्या आगीत तब्बल ३२ शेळ्यांचा मृत्यु झाला.

💤⚜💤
☀उस्मानाबाद - पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू, उस्मानाबाद शहारा जवळील घटना.

💤⚜💤
☀मुंबई : राज्यातील २५ जिल्ह्यांमधील तब्बल १६४ नगरपालिका आणि १७ नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी आज (रविवार) मतदान होत आहे. भाजपा-शिवसेना युतीचे सरकार राज्यात सत्तारूढ झाल्यानंतर प्रथमच एवढय़ा मोठय़ा संख्येने निमशहरी मतदार मतदान करणार आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर होणार्‍या या निवडणुकीचा कौल कोणाला मिळतो, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

💤⚜💤
☀मुंबई विमानतळावर पकडली २ कोटींची सोने तस्करी आणि ७.५० लाखांची रोकड

💤⚜💤
☀रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या शिफारसीनुसारचं सरकारने ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला - रवीशंकर प्रसाद, केंद्रीय कायदा आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री.

💤⚜💤
☀इचलकरंजीः महिला पोलीस हवालदाराला १ हजाराची लाच घेताना एसीबीने पकडले. प्रभावती सावंत असे पकडण्यात आलेल्या महिलेचे नाव.

💤⚜💤
☀नोटाबंदीच्या निर्णयामुळे मुंबईत ड्रग्चा गैरव्यवसाय ठप्प झाला असून, गुन्ह्यांचा आलेख कमी झाला आहे - मनोहर पर्रिकर, संरक्षणमंत्री.

💤⚜💤
☀पुणेः दारू पिऊन पुणे स्टेशन येथे झोपलेल्या अहमदनगर कोतवाली ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्याजवळील पिस्तुल चोरून नेणाऱ्या गुन्हेगाराला बंडगार्डन पोलिसांनी केली अटक.

💤⚜💤
☀अमरावतीः मिनी बस उलटली, अपघातात दोघांचा मृत्यू, २२ जण जखमी.

💤⚜💤
☀अहमदनगर: जिल्ह्यातील ७ नगरपालिका व १ नगरपंचायतीसाठी आज रविवार (२७ नोव्हेंबर ) होणार मतदान; सोमवारी होणार मतमोजणी.

💤⚜💤
☀हैदराबादः २०, ५०, १०० आणि दोन हजार रुपयांच्या नवीन बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला अटक.

💤⚜💤
☀हाँगकाँग ओपन सुपर सीरिजः चेउंग नगान यीचा पराभव करीत पी. व्ही. सिंधूची फायनलमध्ये धडक.

💤⚜💤
☀भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीः पहिल्या दिवसाचा खेळ संपला. इंग्लंडच्या ८ बाद २६८ धावा..

☀सोलापूर सोने चांदी बाजार भाव

💰प्रति १0 ग्रॅम सोने-२९,०००
💍प्रति १ कि.चांदी-४३,०००

पालीके साठी मतदानाला उत्साहात सुरूवात

प्रतिनिधी
जिंतूर:-थेट नगराध्यक्ष आणि 23 सदस्य पदासाठी मतदान सुरु झाले शहरात 39 मतदान केंद्र आहेत पैकी आठ अति संवेदनशिल तर 3 संवेदनशिल मतदान केंद्र जाहीर केले आहेत
प्रत्येक मतदान केंद्रा वर कडक बंदोबस्त असून या साठी एस आर पी एफ ची 1तुकडी आणि पोलीस अधिकारी बंदोबस्त तगडा आहे
या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे
5;30 वाजे पर्यंत मतदान करता येणार आहे
मतदान सकाळी थँडी मुळे कमी होत आहे 10 नंतर वाढं होईल
निवडणूक निर्णय अधिकारी सुदर्शन गायकवाड Dysp अनिल कांबळे यांनी मतदान प्रकिये वर बारीक लक्ष ठेवले आहे

पंतप्रधान पीक विम्यात महाराष्ट्र देशात अव्वल

६७ लाख शेतकऱ्यांना सुमारे सतरा हजार कोटी रुपयांचे विमा संरक्षण

राज्यातील शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिल्याने पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये देशभरामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक अव्वल आला. राज्यातील सुमारे ६७ लाख शेतकऱ्यांनी सुमारे सतरा हजार कोटी रुपयांचे विमा संरक्षण काढले आहे.

ही माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार अहमद पटेल यांच्यासह अनेकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कृषिराज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली. त्यानुसार, २०१६च्या खरीप हंगामासाठी देशातील ३ कोटी २६ लाख शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेतला. त्यामध्ये एकटय़ा महाराष्ट्रातील ६६ लाख ७९ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. म्हणजे हे प्रमाण वीस टक्क्यांहून अधिक आहे. तसेच या ६६ लाख ७९ हजारांमध्ये कर्जाने वाकलेल्या २१ लाख शेतकऱ्यांचाही समावेश आहे. या सर्वाचा एकूण १६,९६४ कोटी रुपयांचा पीक विमा उतरविला आहे.
राज्यातील कृषी खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत प्रामुख्याने मराठवाडा, खानदेश व विदर्भातील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे. आत्महत्याग्रस्त असलेल्या उस्मानाबाद, यवतमाळ, लातूर, बीडसारख्या जिल्ह्य़ांमध्ये सरासरी ९० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना विमा संरक्षणाखाली आवर्जून आणले आहे. जलयुक्त शिवार मोहिमेपाठोपाठ या विमा योजनेसाठी राज्याने खास प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.

देशाचा विचार करता ३ कोटी २६ लाख शेतकऱ्यांचा ३८० लाख हेक्टर क्षेत्रासाठी १ लाख ३७ हजार ५३५ कोटींचा विमा उतरविला आहे. २०१५च्या खरिपामध्ये हेच प्रमाण ३ कोटी ९ लाख शेतकरी, ३३९ लाख हेक्टर क्षेत्र आणि विमा रक्कम ६९,३०७ कोटी रुपये होती. म्हणजे विम्याचे कवच मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या एका वर्षांमध्ये साडेपाच टक्क्यांनी, शेतीचे क्षेत्र बारा टक्क्यांनी आणि विम्याची रक्कम थेट शंभर टक्क्यांनी म्हणजे दुपटीने वाढली. महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थान (५३ लाख शेतकरी व १२ हजार कोटींचे कवच), मध्य प्रदेश (३२ लाख शेतकरी आणि वीस हजार कोटींचे कवच), आंध्र प्रदेश (१५ लाख शेतकरी व साडेचौदा हजार कोटींचे कवच) आणि उत्तर प्रदेश (३० लाख शेतकरी व १४ हजार कोटींचे कवच) यांचा समावेश आहे.

पाच वर्षांत २२ हजार हेक्टर शेतीवर गंडांतर

२००८ ते २०१४ या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रातील २२ हजार हेक्टर शेतीवर औद्योगिकीकरणाने गंडांतर आणल्याची माहिती राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात मिळाली. २००८-०९मध्ये राज्यातील २ कोटी ११ लाख ४९ हजार हेक्टर क्षेत्र शेतीखाली होते. हे क्षेत्र २०१३-१४मध्ये २२ हजार हेक्टरने घटून २ कोटी ११ लाख २७ हजार हेक्टरवर आले. त्यामुळे एकूण भूभागाशी असलेले शेतीचे प्रमाण ६८.७३ टक्क्यांवरून ६८.६६ टक्क्यांवर घसरले. थोडक्यात ०.०७ टक्के शेतीचे रूपांतर बिगरकृषी जमिनीमध्ये झाले. याच कालावधीत संपूर्ण देशामध्ये मात्र ६ लाख ९ हजार हेक्टर शेतजमीन (१८ कोटी २४ लाख ५९ हजारांवरून १८ कोटी अठरा लाख ५० हजार हेक्टरवर) बिगरकृषी कारणांकडे वळविली गेली.

औद्योगिकीकरणामध्ये महाराष्ट्राशी स्पर्धा करणाऱ्या गुजरातमध्ये मात्र या पाच वर्षांमध्ये शेतजमिनीवर गदा न आल्याचे आकडेवारीतून दिसते आहे. २००८ आणि २०१४ या दोन्ही वर्षांमध्ये एकूण भूभागाशी शेतीचे असलेले प्रमाण ५३.३० टक्के एवढे कायम राहिले. दुसरीकडे आसाम, पंजाब आणि झारखंड आदी राज्यांमध्ये शेतीचे क्षेत्र आश्चर्यकारकरीत्या वाढले.

Friday, 25 November 2016

लाचखोर महिला उपजिल्हाअधिकारी अटकेत

प्रतिनिनिधी
जालना/अंबड : अंबडच्या उपविभागीय अधिकारी सविता चौधर-पालवे व एका खासगी व्यक्तीला ३ लाखांची लाच घेताना शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. लाचेच्या रकमेत ५० हजारांच्या नव्या तर अडीच लाखांच्या जुन्या नोटांचा समावेश आहे.
अंबड- घनसावंगी तालुक्यात गोदापात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा होत आहे. वाळू उपशामुळे नदीपात्रात खड्डेच खड्डे झालेले आहेत. ग्रामस्थांनी वाळूउपशाला विरोध करूनही वाळू वाहतूक होत आहे. गेल्या आठवड्यात अंबड व घनसावंगीच्या महसूल पथकाने अवैध वाळू उपसा करून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. यातील दोन ट्रक जप्त करून त्यांच्यावर कारवाईसाठी उपविभागीय अधिकारी सविता चौधर यांच्याकडे अहवाल पाठविण्यात आला होता.

जप्त वाहने सोडण्यासाठी वाळू वाहतूकदार ट्रक मालकांकडे चौधर यांनी ८ लाखांची मागणी केली होती. तडजोडीअंती ५ लाख रूपयांची लाच घेण्याचे चौधर यांनी मान्य केले. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार वाहतूकदाराने यासंबंधी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रार दाखल होताच या विभागातील पथकांनी अत्यंत गुप्तपणे लाचेच्या मागणीची पडताळणी करून सापळा लावला. पाच लाखांपैकी ३ लाखांची रक्कम घेताना चौधर आणि खाजगी इसम सखाराम शिंदे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

देशातील केंद्रीय पीक संशोधन केंद्र


१)केंद्रीय ऊस संशोधन केंद्र.
       =लखनौ (उत्तरप्रदेश)
२)केंद्रीय गहू संशोधन केंद्र.
       =कर्नाल (हरियाणा)
३)केंद्रीय आवळा संशोधन केंद्र
       =फैजाबाद (उत्तरप्रदेश)
४)केंद्रीय नारळ संशोधन केंद
       =कासरगोड (केरळ)
५)केंद्रीय केळी संशोधन केंद्
      =कळांडूथोराई (तामिळनाडू)
६)केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र
      =सांगोला, सोलापूर
७)केंद्रीय द्राक्ष संशोधन केंद्र
      =मांजरी (पुणे)
८)केंद्रीय दूध संशोधन केंद्र
      =कर्नाल (हरियाणा)
९)केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र
      =सिमला
१०)केंद्रीय संत्री संशोधन केंद्र
      =नागपूर
११)केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र
      =अंबिकानगर (गुजरात)
१२)केंद्रीय गवत व चारा संशोधन केंद्र
      =झाशी (मध्‍यप्रदेश)
१३)केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्र
      =पुणे
१४)केंद्रीय काजू संशोधन केंद्र
      =पहूर
१५)केंद्रीय ताग संशोधन केंद्र
      =बराकपूर (पश्चिम बंगाल)
१६)केंद्रीय तंबाखू संशोधन केंद्र
      =राजमहेंद्री (आंध्रप्रदेश)
१७)केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र
      =नागपूर
१८)केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र
      =इंदोर (मध्‍यप्रदेश)
१९)केंद्रीय कापूस संशोधन केंद्र
      =नागपूर
२०)केंद्रीय ज्‍वारी संशोधन केंद्र
      =राजेंद्रनगर (आंध्रप्रदेश)
२१)केंद्रीय अळंबी संशोधन केंद्र
      =सोलन
२२)केंद्रीय उंट संशोधन केंद्र
      =जोरबीट (राजस्‍थान)
२३)केंद्रीय ताग संशोधन केंद्र
      =बराकपूर (पश्चिम बंगाल)
२४)केंद्रीय लाख संशोधन केंद्र
      =रांची (झारखंड)
२५)केंद्रीय फळ संशोधन केंद्र
      =गणेशखिंड (पुणे)
२६)मसाला पीक संशोधन केंद्र
     =केरळ
२७)इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर सेमीअॅरिड ट्रॉपिक्‍स
     =हैदराबाद (आंध्रप्रदेश)

पालीका निवडणुक निमित्ताने परतूर शहरात दोन दिवस दारूबंदी

प्रतिनिधी
परतूर:-नगर पालिका निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणुन जिल्हाधिकारी जालना यांनी मुंबई दारूबंदी कायदा 1949 चे कलम 142 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार परतूर  नगर पालिका हद्दीतील निवडणुकीची मतमोजणी संपे पर्यंत मद्य(दारू) विक्रीसाठी बंद ठेवण्याचे (कोरडा दिवस) आदेश जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले आहे.

सबसे तेज,तेजन्यूज हेडलाईन्स संक्षिप्त

🌀- सोलापूर - माळशिरस व सदाशिवनगर येथील जुगार आडा, मटका , दारू आड्यावर धाड, सुमारे 2 लाख 25 हजार रु चा मुद्देमाल जप्त
___________________________________

🌀- सोलापूर : शासनाने काही प्रमुख गोष्टींसाठी ५00 च्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले असले तरी आता महापालिकांचा कर भरण्यासाठी मुभा दिलेली नाही. फक्त पाण्याचे बिल भरण्यासाठी पाचशेच्या नोटा स्वीकारल्या जातील, अशी माहिती आयुक्त विजयकुमार काळम - पाटील यांनी दिली
___________________________________

🌀- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हैदराबादमध्ये डीजीपी / आयजीपी कॉन्फरन्सला करणार संबोधित
___________________________________
 
🌀- ठाणे - वाशी रेल्वे सेवा विस्कळीत, कोपरखैरणे आणि घणसोली स्थानकांदरम्यान रुळाला तडे, वाशीहून ठाण्याला जाणारे दोन्ही मार्ग बंद
___________________________________
 
🌀- नवी दिल्ली - पहारगंज परिसरात 25 वर्षीय तरुणाचा इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न, जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल
___________________________________

🌀- मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, टिटवाळा-अंबिवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प
___________________________________

🌀- नोटाबंदीवर एबीपी माझाचा सगळ्यात मोठा सर्व्हे, 94 टक्के लोक नोटाबंदीच्या बाजूने, अंमलबजावणीचा त्रास होत नसल्याचीही भावना
___________________________________

🌀- देशभरातील बँका आज आणि उद्या बंद, पैसे काढण्यासाठी एटीएमवरच भिस्त, सुट्ट्या पैशांचा प्रश्न बिकट
___________________________________

🌀- आमच्याकडे कंदीपेढेवाले मोदी आहेत, खासदार उदयनराजेंकडून पंतप्रधानांची खिल्ली, भीतीपोटी भाजप नेते नोटबंदीवर बोलत नसल्याची टीका
___________________________________

🌀- जालन्यातील अंबड उपविभागीय अधिकारी सविता चौधरींना 3 लाखांची लाच घेताना अटक, वाळू वाहतुकीवरची कारवाई टाळण्यासाठी लाच
___________________________________

🌀- मुंबईसह जगाला हादरवून सोडणाऱ्या 26/11 च्या काळ्या आठवणींना 8 वर्षे पूर्ण, कल्याणमध्ये रांगोळीतून मृतांना श्रद्धांजली
___________________________________

🌀- मोहालीमध्ये आजपासून भारत-इंग्लंडदरम्यान तिसरा कसोटी सामना, भारताच्या फिरकीसमोर टिकण्याचं इंग्लंडपुढे आव्हान
___________________________________

🌀- जम्मू काश्मीर - नारवाल येथे झोपडपट्टीत लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू, 80 हून अधिक झोपडपट्ट्या जळून खाक
___________________________________
 
🌀- ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल वाहतूक सुरू, कोपरखैरणे-घणसोली दरम्यान रुळाला तडे गेल्यामुळे वाहतूक झाली होती ठप्प.

सबसे तेज,तेजन्यूज हेडलाईन्स ताज्या बातम्या संक्षीप्त

📯 मुंबईसह जगाला हादरवून सोडणाऱ्या 26/11 च्या काळ्या आठवणींना 8 वर्षे पूर्ण, कल्याणमध्ये रांगोळीतून मृतांना श्रद्धांजली...

📯 उस्‍मानाबाद : जाहीर प्रचार आज संपणार, आता वैयक्‍तीक भेटीतून मतदारांशी संवाद; उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील आठ पालिकेत 166 सदस्‍यांसाठी 286 मतदान केंद्राची व्‍यवस्‍था...

📯 उस्‍मानाबाद : शहरातील राघूचीवाडी व केकस्‍थळवाडी येथील नागरिकांचा मतदानावर बहिष्‍कार... पालिकेकडून कोणत्‍याही सुविधा दिल्‍या जात नसल्‍याने घेतला निर्णय...

📯 मुंबई : राज्‍यभरात 40 कोटींची रोकड जप्‍त... एकट्या उस्‍मानाबादमध्‍ये 10 कोटी रुपये केले जप्‍त...

📯 नळदुर्ग : कॉंग्रेसच्‍या राजवटीत इतिहासप्रसिध्‍द नळदुर्ग शहराची वाताहात झाली, शहराचा चेहरा मोहरा बदलण्‍यासाठी व जनतेच्‍या विकासासाठी राष्‍ट्रवादीच्‍या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्या - राष्‍ट्रवादीच्‍या स्‍टार प्रचारिका कु. सक्षणा सलगर यांचे नळदुर्गवासियांना आवाहन...

📯 नळदुर्ग : शहरवासियांनी आपल्‍या इज्‍जतीसाठी “पर्यायाने नळदुर्ग बचावसाठी” व हायटेक नळदुर्ग शहर करण्‍याकरीता एकवेळा राष्‍ट्रवादीला संधी देऊन राष्‍ट्रवादीच्‍या सर्व उमेदवारांना विजयी करण्‍याचे अशोक भाऊ जगदाळे यांचे भावनिक आवाहन....

📯 कळंब : शिराढोण (ता. कळंब) येथील पाणीपुरवठा योजनेत गैरव्‍यवहार केल्‍याप्रकरणी माजी सरपंच कांचन खडबडे व तत्‍कालीन ग्रामसेवक सुरेश धावारे यांच्‍याविरुध्‍द गुन्‍हा दाखल...

📯 लोहारा : तालुक्‍यातील होळी गावातील वार्ड क्रमांक दोन व चार मधील संलग्‍न शौचालयाचे पाईप फुटले, दुर्गंधीने ग्रामस्‍थ बेजार... लक्ष देण्‍याची मागणी....

📯 तुळजापुर : गंजेवाडी (ता. तुळजापुर) येथे आगीत होरपळलेल्‍या प्रथमेश या 12 वर्षीय मुलाचा सोलापूर येथे उपचारादरम्‍यान मृत्‍यू... महिनाभर दिली झुंज...

📯 नळदुर्ग : कॉंग्रेससह विरोधकांना या निवडणुकीत दारुण पराभव करुन नळदुर्गच्‍या बाहेर, त्‍याही पुढे जावून उस्‍मानाबाद जिल्‍हयातून तडीपार करा - जि.प. सदस्‍या कांचनमाला संगवे यांचे नळदुर्ग येथील जाहीर सभेत आवाहन....

📯 नळदुर्ग : कॉंग्रेसने भाजप-सेनेशी हातमिळवणी करुन अतिक्रमणाच्‍या नावावर गोरगरीबांची घरे व बाजारपेठेतील दुकानांवर बुलडोजर फिरवून शहराला स्‍मशानभूमी करणा-यांना मतदारांनी घरचा रस्‍ता दाखवा - राष्‍ट्रवादीच्‍या महिला शहराध्‍यक्षा संगीता गायकवाड यांचे आवाहन...

📯 देशभरातील बँका आज आणि उद्या बंद, पैसे काढण्यासाठी एटीएमवरच भिस्त, सुट्ट्या पैशांचा प्रश्न बिकट...

📯 सोलापूर : घर व दुकान जागा बळकाविण्‍यासाठी तरुणाचे अपहरण केल्‍याप्रकरणी एमआयएमचे जिल्‍हा प्रभारी तथा शहराध्‍यक्ष तौफिक शेख यास तीन दिवसाच्‍या पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे न्‍यायालयाचे आदेश...

📯 मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत दिलीप पाडगावकर यांच्या निधनाने एक सव्यसाची व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली...

📯 मुंबई : भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन...

📯 आमच्याकडे कंदीपेढेवाले मोदी आहेत, खासदार उदयनराजेंकडून पंतप्रधानांची खिल्ली, भीतीपोटी भाजप नेते नोटबंदीवर बोलत नसल्याची टीका...

📯 कोल्हापूर : जिल्ह्यातल्या बड्या नेत्याचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट...

📯 पुणे : पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, नवीन 41 प्रभागांपैकी पंधरा प्रभागांमध्ये फेरबदल...

📯 जालना : जप्‍त केलेल्‍या वाळूच्‍या प्रकरणात तडजोड करण्‍यासाठी तक्रारदाराकडून तीन लाख रुपयांची लाच घेताना अंबड येथील उपविभागीय अधिकारी सविता चौधर यांना अटक..

📯 नवी दिल्‍ली : विरोधकांना पुरेसा वेळ मिळाला नाही म्‍हणून नोटबंदीवर टीका - पंतप्रधान नरेंद्र मोदी...

📯 सातारा : काँग्रेस आमदार जयकुमार गोरेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल, महिलेला अश्लील मेसेज, इमेज आणि व्हिडिओ पाठवल्याचा आरोप...

📯 हैदराबाद : आयएसआएसकडून प्रेरणा घेणाऱ्या 67 तरुणांना आत्तापर्यंत अटक केली, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचं वक्तव्य...

📯 कोल्‍हापूर : संगनमताने नेत्‍याच्‍या मुलाला जागा दिली - नगरसेवक सुनील कदम यांचा मनपा प्रशासनावर आरोप... जागा मनपाची नाही; प्रशासनाचा खुलासा... चौकशीनंतर सभेत माहिती देऊ - आयुक्‍त...

📯 मोहाली : टीम इंडिया - इंग्लंड यांच्यात आज मोहालीत तिसरी कसोटी...

उपविभागीय अधिकारी सविता चौधर यांना लाच घेतांना अटक

जालना :
अंबड : वाळूमाफियाकडून तीन लाख रुपयांची लाच घेताना अंबडच्या उपविभागीय अधिकारी सविता चौधर-पालवे  याना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. वाळूची वाहने सोडविन्यासाठी केली होती पैशाची मागणी.

वैजूरा शिवारात आढळला अनोळखी वृद्धेचा मृतदेह

प्रतिनिधि
परतूर:- तालुक्यातील वैजुडा शिवारातील वाकडी ( निम्म दुधणा प्रकल्पाच्या) पाण्यात एका साठ ते सत्तर वर्षाच्या अनओळखी महिलेचे प्रेत काही वेळा पुर्वी  मिळुन आले आहे वृध्द महिले विषयी काही माहिती अथवा परिसरातील वृध्द महिला बेपत्ता असल्यास परतूर पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्याशी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा 9011571807.

मुख्यमंत्र्यांची उद्या आघाडीच्या प्रचारार्थ जाहीर सभा

प्रतिनिधी
परतुर:-शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या  उमेदवार  सौ मंदाताई बबनराव लोणीकर व नगरसेवक पदाच्या  उमेदवाराच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची परतुर गाव तेथे दिनांक 26/11/2016 ठीक दोन  वाजता  सभा होणार आहे
   तर प्रमुख उपस्थितीत म्हणुन  पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री  बबनराव  लोणीकर हे राहणार आहेत
  सभेला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन  राहुल  भैय्या  लोणीकर मित्र मंडळ च्या  वतीने करण्यात आले