Breaking News
Loading...

Saturday, 3 December 2016

जागतीक अपंग दिना निमित्य वृद्धाश्रम फलकाचे अनावरण

अरूना शर्मा

पालम (अरुणा शर्मा) :-साविञीबाई फुले बहुउदेशिय सेवाभावी संस्था संचलित रणरागिनी वृध्दश्रमाच्या फलकाचे अनावरण विजय महाराज जोशी हस्ते करण्यात आले.
  या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन बालासाहेब शिंदे (चेअरमन) हे होते.तर प्रमुख पाहुणे प्राध्यापक एम.डी.रायभोळे सर, संरपच विठल जाधव, रणजित ताडपल्ले, मुक्तिराम शिंदे, महेद्रसिंग चंदेल, मारोती चव्हाण व संयोजक सविता चव्हाण संस्थापक उत्तम काळे यांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा पार पडला रणरागनी वृध्दाश्रमची सुरूवात २६ जानेवारी २०१७ पासुन कांदलगाव ता.पालम जि.परभणी येथे लोकसहभागातील  होणार असुन जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधुन हा सोहळा पार पडण्यात आला.सदरील वृध्दश्रमात महाराष्ट्रातील कोठल्याही वृध्दाची (गरजु) राहणे जेवणे दवाखाना व्यवस्था संयोजकाच्या वतीने करण्यात येत असुन टप्प्याटप्प्याने पालम, गंगाखेड या ठिकाणी शाखा स्थापन करणार आहेत.५०० वृध्दांना या वृध्दाश्रमात सर्वसोयीनुसार राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.असे संयोजकानी कळविले आहे.गावागावात गरजु वृध्द नागरीक असेल तर वृध्दाश्रमात प्रवेशासाठी खालील मोबाईल क्रमांकावर नोंद करावी.मो.क्र.9623843838

पालम तालुक्यात शेतक-याची आत्महात्या

अरूना शर्मा

पालम:-दि.२ डिसेंबर रोजी मौजे बनवस येथील शेतकरी सुधाकर रुस्तुमराव कदम वय ५४ वर्ष रा.बनवस ता.पालम येथील सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंपाळून शेतकर्याने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना मौजे बनवस येथील दि.२ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.
     पालम तालुक्यातील बनवस येथील शेतकरी सुधाकर रुस्तुमराव कदम वय-५४ वर्ष यांनी शेतातील सततचा मागील तीन वर्षापासुनचा दुष्काळ आणि यावर्षीची अतिवृष्टीमुळे शेती पिकली नाही.त्यामुळे आर्थिक कोंडी झाल्याने ञस्त होते.बँकेचे घेतलेले कर्ज कशाने फेडायचे व संसाराचा गाडा कंसा चालवाचा यांच्या चिंतेने अस्व स्थ होते.त्याचा मनात खंत घरुन शुक्रवारी सकाळी ७ वा. च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.मयत झालेल्या सुधाकर कदम यांना दोन एकर कोरडवाहू शेती आहे.त्याच्याकडे ग्रामिण बँकेचे ६० हजाराचे कर्ज घेतले होते.ते कर्जकशाने फेडायचे त्यामुळे ते सतत चिंता करत होते. त्यामुळे आज अखेर गळफास घेतला आणि तो मयत पावला.यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.या घटनेची पालम पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली.तसेच पालम तालुक्यात आठवडयात ही दुसरी घटना घटली आहे.

जि प पं स निवडणुक सावता परीषदेची बैठक

अविनाश घोगरे
घनसावंगी:-आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकित सावता परिषदेची काय भूमिका राहील या विषायांवर चर्चा करण्यासाठी रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे जिल्ह्यातील सावता परिषदेच्या सर्व पदाधिका-यांची बैठकीचे अंबड येथील शासकीय विश्रामगृह येथे रविवार दि ४डिसेबर रोजी दुपारी दोन वाजता आयोजन केले आहे या बैठकिस सावता परिषदेचे दोन्ही  जिल्हाधायक्ष रमेश आढाव व अजित बुलबुले उपस्थित राहणार आहेत तर सर्व पदाधिका-यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन घनसावंगी तालुका उपाध्यक्ष रामजी गाढवे यांनी केले आहे

पालम एकात्मिक बालविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभाराच्या चौकशीची मागणी

अरूना शर्मा

पालम :- पालम तालुक्यातील एकात्मीक बालविकास कार्यालया अंतर्गत तालुक्यातील संपूर्ण अंगणवाडयाचा कारभार चालतो. परंतु मागील काही वर्षापासून पालम तालुक्याला एकात्मीक बालविकास अधिकारी (C.D.P.O) मिळाली नाही.पालम तालुक्याला प्रभारी (C.D.P.O) असल्यामुळे गायकवाड यांच्याकडे पदभार असल्यामुळे गायकवाड यांचा तालुक्यातील अंगणवाडयावर वचक राहिला नाही. तसेच दि.2-12-2016 रोजी पालम शहरातील संपूर्ण अंगणवाडया बंद आहेत. त्यांचे कोणतेही कारण नाही, किंवा मीटिंग नसताना (C.D.P.O) च्या मनमानी कारभारामुळे संपूर्ण पालम शहरातील अंगणवाडया बंद  केल्या होत्या. अंगणवाडी क्र.1 मधील कार्यकर्ती यांनी मदतनिस वारंवार गैरहजर असल्याचे अर्ज दिले. परंतु त्या मदतनिसच्या अर्जाची कुठेही न दखल घेता अर्ज केराच्या टोपलित टाकला व  गयर हाजर आसरेल्या त्या  मदतनिसचा पगार काढला. त्यामुळे मिलीभगत असल्यामुळे खाऱ्या काम करणाऱ्या कार्यकर्ती व मदतनिस यांना अन्याय सहन करावा लागत आहे. तरी एकत्मीक बालविकास अधिकारी गायकवाड यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी पालम तहसीलदार यांना एका निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. या निवेदनावर पालम येथील नगर पंचायतचे नगरसेवक संजय थिट्टे, मंगेश जोंधळे, विठ्ठल टोम्पे, सामाजिक कार्यकर्ते राहुल शिंदे, बाबासाहेब एंगडे, सूर्यकांत रायबोळे, कैलास झुंजारे, अनिल शिंदे, नारायण लोंढे, नागनाथ भालेराव, भीमराव रायबोळे, हरीभाऊ आसले, गजानन शेंगूळे अदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

'छिन...ताता..छिनता' नाटीकेचे सादरी करण

प्रदिप कोकडवार
जिंतूर--महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचणालयांच्या वतीने चोदाव्या राज्य बाल नाट्य स्पर्धेत बालक मंदिर पूर्व माध्यमिक शाळेचे 'छिन... ताता...छीता'या बाल नाट्य प्रयोग औरंगाबाद येथिल तापडिया रंग मंदिरात दी.5 (सोमवार)रोजी साय पाच वाजता सादरीकरण होणार आहे.
          नागेश कुलकर्णी लिखित या नाटिकेतिल नायिका समाजात हरवलेल्या संस्कृतीचा शोध घेत असते. नाच गाण्याच्या विश्वात रमलेल्या समाजात संस्कृति कुढेच सापडत नाही. समाजाच्या विविध स्तरावर संस्कृतीचा शोध घेणाऱ्या या नायिकेला खऱ्या संस्कृतिची ओळख  विवेकानंदाच्या उपदेशातूनच होते अस्या आशयाने भरलेल्या या नाटीकेचे दिग्दर्शन विनोद पाचपिले,नेपथ्य-सुभाष चोपडे, संगीत-मदन मोरे,प्रकाशयोजना प्रसाद घुगे तर मार्गदर्शन उपेन्द्र दुधगाँवकर यांनी केले आहे.या नाटिकेत शाळेतील  वैष्णवी पाचपिले,रिना दराडे,मेघा राठोड,ईश्वरी अंभोरे,शिवानी चोपडे,श्रुति गीते,ऐश्वर्या घुगे,तन्वी पाचपिले,मयूरेश देशपांडे,प्रेम सावर गांवकर,योगेश घंदारे, ओमकार काले,वैभव कुरकुटे, प्रथमेश मितकरी,आंनद भिसे यांनी काम केले आहे.

कै रमेश वरपूडकर महाविद्यालयाचे जिल्हास्तरावर यश

प्रतिनिधी
सोनपेठ : येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या वतीने अविष्कार २०१६ साठी पाठवण्यात आलेल्या संशोधन प्रकल्पापैकी विज्ञान विभागातील बिंजाकुरणाच्या प्रक्रियेवर विद्युतीकरणाचा परिणाम या संशोधन प्रकल्पास स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी येथे आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या वतीने अविष्कारसाठी तीन संशोधन प्रकल्पाची निवड करून जिल्हास्तरीय महोत्सवासाठी ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी येथे पाठवण्यात आले होते, त्यात लोप पावत चाललेल्या म्हणी व वाक्प्रचारांचा अभ्यास (कला), सोनपेठ तालुक्यातील सालगड्यांच्या समस्यांचा अभ्यास ( वाणिज्य ) व बिजांकुरणावर विद्युतीकरणाचा परिणाम विज्ञान तीन शाखेतून पाठवलेल्या प्रकल्पापैकी विज्ञान शाखेतील प्रकल्पाला जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळाला असून यासाठी सुनिता भोसले, सोनाबाई कांबळे, सुनिता बारड, सुप्रिया मुंडे, अविनाश आगळे व रावसाहेब गायकवाड, या विद्यार्थ्यांसह प्रा. डॉ. एम. बी. पाटील, प्रा. डॉ. एस. व्ही. रणखांब आदींचे प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते, प्रा. डॉ. बी.एम. काळे, प्रा. डॉ. एम.डी. कच्छवे, प्रा.डॉ. एस. डी. सोनसळे, प्रा. व्ही. के . जायभाये यांच्यासह सर्वांनी अभिनंदन केले.

अपंगाना त्वरीत घरकूले वितरीत करण्याची प्रहार संघटनेची मागणी

प्रतिनिधी
सोनपेठ:-महाराष्ट्र शासनाच्या १९९५च्या निर्णयानुसार शहरासह ग्रामीण भागातील अपंगांना त्वरित घरकुले वितरीत करत विविध मागण्या अपंगांसाठी ज्या योजना आहेत त्या योजना तत्काळ देण्याची मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने आज जागतिक अपंग दिना निमित्त एका निवेदनाद्वारे तहसिलदारांकडे करण्यात आली आहे.या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,अपंगाना शासकीय योजनेचा विनाअट लाभ देण्यात यावा,सर्व अपंगांना निराधार योजनेची वीनाअट पगार चालु करण्यात यावी,अपंगाना शासकीय सेवेत वीनाअट घेण्यात यावे यासह विविध मागण्याचा यात समावेश आहे.ग्रामीण भागासह शहरातील अपंगांना त्याचे हक्क अबाधित राहवेत व त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने१९९५साली एक निर्णय लागु करत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निधीतील ०३%रक्कम ही अपंगाच्या न्याय हक्कासाठी खर्च करण्यात यावी यात आर्थिक वर्षे२०१५-१६व१६-१७मधील जो निधी सर्व ग्रांमपंचायतमधील निधी अपंगाच्या नावे आलेले घरकुल सर्व तालुक्यातील ग्रामसेवकाना पत्रक देऊन वितरीत करण्याचे आदेश देण्यात यावेत व ज्या ग्रांमपंचातमध्ये अपंगाची नोंद झालेली नसेल अशा ग्रांमपंचातमध्ये अपंगाची नोंद करुन अपंगाच्या नावे येणाऱ्या विविध योजना व शासनाकडून येणारी मदत अपंगांना लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनावर तालुकाध्यक्ष अशोक मस्के,सुग्रीव दाढेल,सदाशिव भंडारे,कुमार मस्के,अशोक पांचाळ,नंदकिशोर शिंदे,विनोद मोटेकर,प्रमोद पारवे,गणेश हारगुळे,सुरेश मुंडे यांच्यासह अपंगाच्या स्वाक्षऱ्या आहेत.


६ डिसेंबर निमित्त अदिलाबाद-दादर स्पेशल ट्रेन

आशिष धूमाळ
परतूर:-6 डिसेंबर डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मृती दिन्नानिमित्त दादर येथे जाणार्‍या प्रवाशांसाठी आदिलाबाद ते दादर दरम्यान रेल्वे व्दारे स्पेशल ट्रेन धावणार असुन या ट्रेनचा प्रवास 5 डिसेंबर रोजी सकाळी 10:00 वाजता  आदिलाबाद येथुन सुरू होऊन परतूर स्टेशनला हि ट्रेन त्याच दिवशी सायंकाळी 5:30 वाजता येईल व परतीच्या प्रवासाला 6 डिसेंबर रोजी राञी 9:45 मिनिटांनी दादर येथुन निघुन परतूर स्टेशन येथे 7 डिसेंबर रोजी पहाटे 7:00 वाजता पोहचेल. प्रवाशांनी या स्पेशन ट्रेनचा लाभ घेण्याचे आवाहन परतूर रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर मिनाकुमार यांनी केले आहे.

सेलूत अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अतिप्रसंग

राम सोनवने
सेलु:-शहरात एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याचा प्रकार घडला आहे.
  शहरातील राजीव गांधी नगर भागात राहणा-या अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने अतिप्रसंग केल्याची तक्रार पिडीत मुलीच्या आईने पोलिस ठाणे सेलु येथे दि. 1डिसेंबर रोजी सायंकाळी 4:30वाजता दिली. त्यानुसार पिडीत मुलगी ही तीच्या भावासोबत सरपण वेचण्यासाठी गेली असता सदरील आरोपी यांनी पिडीत मुलीच्या भावास खाऊचे अमिष दाखवुन शहरात पाठवले व पिडीत मुलीस दोन आरोपींनी मोटार सायकलवर जबरदस्तीने बसवुन डिग्रस रोड ने कच्च्या रस्त्याने नेत रस्त्याच्या आड बाजुला नेवुन या दोन आरोपीनी आळीपाळीने अतिप्रसंग केला. पिडीत मुलीने आरडाओरड केली असता तीचा गळा दाबुन थापड बुक्याने मारहाण केली नतंर मोटार सायकलवर बसवुन गावाच्या जवळ आणुन सोडले व हे दोन ही आरोपी पळुन गेले. हा घडलेला प्रकार पिडीत मुलीने तिच्या आईस सांगीतला त्यानुसार पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन पोलिस ठाणे सेलु येथे गुरनं. 373/16 नुसार कलम 376(ड), 363,323भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला व दोन ही आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली. सदरिल घटनेचा तपास पोलिस उपविभागीय अधिकारी रेणुका वागळे व पोलिस निरिक्षक जे. जे. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण औटी व हे. काँ. मुंढे रामेश्वर हे करीत आहेत.

राज्यमंत्री दिपक केसरकर यांचा बुलढाणा जिल्हा दौरा

जावेद खान

बुलडाणा, दि.3: राज्यमंत्री ,गृह (ग्रामीण) वित्त व नियोजन तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग यांचा बुलडाणा जिल्हयादौरा पुढील प्रमाणे 4 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 7 वाजता शेगांव रेल्वे स्टेशन येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, सकाळी 7.10 शासकीय विश्रामगृह शेगांव येथ आगमन व राखीव, सकाळी 8.15 वा श्री गजानन महाराज समाधी दर्शन शेगांव, सोईनुसार खामगावकडे प्रयाण, सकाळी 9.30 वाजता पाडा तालुका खामगांव जिल्हा बुलडाणा येथे आगमन व स्वर्गीय कै. निबांजी कोकरे अनुदानित आदिवासी आश्रम शाळेला भेट, सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह खामगाव येथे  जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्या सोबत चर्चा, सकाळी 11 वाजता खामगांव येथून मोटारीने अमरावती मार्गे नागपूर कडे ते  प्रयाण करतील

Friday, 2 December 2016

पाटाचे पाणी पाथरीच्या शिवारत;पण चा-या गाळाणे आणि झाडा झूडपांनी भरलेल्या

कार्तिक पाटील
पाथरी:- तीन वर्षाच्या कोरड्या दुष्काळा नंतर या वर्षी खरीप चांगल्या पैकी आला आहे. परतीच्या पावसाने सप्टेबर महिण्यात मराठवाड्यात सर्वदूर दमदार हजेरी लावण्याने जमिनीतील पाणी पातळी वाढली सोबतच धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे परभणी जिल्ह्या साठी वरदान असलेले जायकवाडी धरण या वर्षी ८०% वर भरले आहे. हे पाणी आता रब्बी पिकांना मिळणार असल्याने शेतकरी वर्गात आनंद आहे जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून सोडलेले रब्बी पिका साठीचे पाणी शुक्रवारी पाथरी शिवारातील सिमुरगव्हाण हून पूढे परभणी तालुक्या कडे आगेकूच करत आहे . टेल टू हेड अशा पाणी पाळ्या मिळणार असल्याने अजून किमान पंधरा विस दिवस तरी पाथरी तालुक्यातील शेतक-यांना पाण्याची प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे दिसते. हीच पाणी पाळी पंधरा नोहेंबर पर्यंत मिळाली असती तर गव्हू,हरबरा,कापसा साठी संजिवणी ठरले असते असे शेतकरी सांगत आहेत आता हे पाणी ज्वारी, गहू,हरबरा या पिकांना शेतकरी घेतील असेही सांगीतल्या जाते. या वर्षी शेती साठी मोठ्या प्रमाणात जायकवाडीचे पाणी येणार असले तरी चा-यांची परीस्थीती अतिषय वा झालेली असल्याने गाळ आणि झाडे झूडपे वाढलेल्या चा-यां मधून शेतक-यांना पाणी मिळणे कठीण असल्याचे चित्र दिसून येत आहे या विषयी जायकवाडी पाटबंधारे उपविभाग पाथरी च्या वतिने बी ५९ या मुख्य कॅनाॅल आणि उप चा-यां मधील गाळ काढण्यात आलेला नसल्याने पाणी मिळवण्या साठी शेतक-यांची मारामार होणार असेही सांगातल्या जात आहे. पाणी येण्या आगोदर जेसीपी यंत्राच्या साह्याने चा-यां मधील गाळ काढण्यात यावा अशी अपेक्षा शेतकरी ठेऊन आहेत तरच शेतक-यांना रब्बी पिकांना पाणी मिळेल अन्यथा पाणी उशाला- कोरड घशाला अशी परिस्थिती उद्भवनार असल्याचे चित्र पाथरी तालूक्यात पाहावयास मिळणार आहे.

सबसे तेज, तेजन्यूज हेडलाईन्स ताज्या घडामोडी संक्षीप्त


⭕- जम्मू काश्मीरमधील कुलगम जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अद्याप चकमक सुरु आहे
___________________________________
 
⭕- नवी दिल्ली - धुक्यामुळे विमान उड्डाणांवर परिणाम, दिल्ली - लखनऊ विमानाचं उड्डाण रद्द
___________________________________
 
⭕- आजपासून टोलनाक्यांवर टोलवसुलीला सुरुवात, नोटाबंदी निर्णयानंर बंद करण्यात आली होती टोलवसुली, टोलनाक्यावर जुन्या नोटा स्विकारण्यात येणार नसून 2000 हून जास्त टोल असेल तरच 500 ची नोट स्विकारण्यात येणार
___________________________________
 
⭕- नवी दिल्ली - धुक्यामुळे 81 ट्रेन उशिराने धावत असून 13 ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत, 40 ट्रेन्सचं वेळापत्रक बदलण्यात आलं आहे
___________________________________
 
⭕- कोल्हापूर- मध्यरात्री 1च्या सुमारात कागल बस्तवडे येथे गाडी खाणीत पडून अपघात, 18 जणांपैकी 11 तरुणांना वाचवण्यात यश, कामावरून घरी परतत असताना झाला अपघात
___________________________________
 
⭕- गुरुदासपूर - बामियालमधील ढिंडा पोस्टजवळ बीएसएफनं दहशतवाद्यांच्या घुसखोरी डाव उधळला, पाकिस्तानच्या एका दहशतवाद्याचा खात्मा
___________________________________

⭕- आजपासून टोलधाड पुन्हा सुरु, टोल नाक्यांवर लांबच लांब रांगा, 200 च्या वरच्या टोलसाठी 500 ची जुनी नोट घेणार, अफरातफरीची शक्यता
___________________________________
 
⭕- अहमदाबादच्या एका कुबेराकडे तब्बल 13 हजार 820 कोटींची माया, इन्कम टॅक्स कायद्यातील बदलानंतर उत्पन्न घोषित करुन फरार
___________________________________

⭕- चलनकल्लोळाचा आणखी एक बळी, नागपुरात एटीएमच्या रांगेत कामगार नेत्याचा मृत्यू
___________________________________

⭕- नागपुरात केमिकल कंपनीला भीषण आग, 18 जखमी, 6 जण गंभीर, तर 3 तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
___________________________________

⭕- औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानात समृद्धी वाघिणीकडून 3 बछड्यांना जन्म, पांढऱ्या बछड्यामुळे वन्यजीव अभ्यासकांना आश्चर्याचा धक्का
___________________________________
 
⭕- फॉर्म्युला वनचा नवा विश्वविजेता निको रोसबर्गचा निवृत्तीचा निर्णय, विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर पाचच दिवसांत निवृत्ती, चाहत्यांना धक्का.

सबसे तेज,तेजन्यूज हेडलाईन्स ताज्या घडामोडी संक्षीप्त


⭕- जम्मू काश्मीरमधील कुलगम जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अद्याप चकमक सुरु आहे
___________________________________
 
⭕- नवी दिल्ली - धुक्यामुळे विमान उड्डाणांवर परिणाम, दिल्ली - लखनऊ विमानाचं उड्डाण रद्द
___________________________________
 
⭕- आजपासून टोलनाक्यांवर टोलवसुलीला सुरुवात, नोटाबंदी निर्णयानंर बंद करण्यात आली होती टोलवसुली, टोलनाक्यावर जुन्या नोटा स्विकारण्यात येणार नसून 2000 हून जास्त टोल असेल तरच 500 ची नोट स्विकारण्यात येणार
___________________________________
 
⭕- नवी दिल्ली - धुक्यामुळे 81 ट्रेन उशिराने धावत असून 13 ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत, 40 ट्रेन्सचं वेळापत्रक बदलण्यात आलं आहे
___________________________________
 
⭕- कोल्हापूर- मध्यरात्री 1च्या सुमारात कागल बस्तवडे येथे गाडी खाणीत पडून अपघात, 18 जणांपैकी 11 तरुणांना वाचवण्यात यश, कामावरून घरी परतत असताना झाला अपघात
___________________________________
 
⭕- गुरुदासपूर - बामियालमधील ढिंडा पोस्टजवळ बीएसएफनं दहशतवाद्यांच्या घुसखोरी डाव उधळला, पाकिस्तानच्या एका दहशतवाद्याचा खात्मा
___________________________________

⭕- आजपासून टोलधाड पुन्हा सुरु, टोल नाक्यांवर लांबच लांब रांगा, 200 च्या वरच्या टोलसाठी 500 ची जुनी नोट घेणार, अफरातफरीची शक्यता
___________________________________
 
⭕- अहमदाबादच्या एका कुबेराकडे तब्बल 13 हजार 820 कोटींची माया, इन्कम टॅक्स कायद्यातील बदलानंतर उत्पन्न घोषित करुन फरार
___________________________________

⭕- चलनकल्लोळाचा आणखी एक बळी, नागपुरात एटीएमच्या रांगेत कामगार नेत्याचा मृत्यू
___________________________________

⭕- नागपुरात केमिकल कंपनीला भीषण आग, 18 जखमी, 6 जण गंभीर, तर 3 तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
___________________________________

⭕- औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानात समृद्धी वाघिणीकडून 3 बछड्यांना जन्म, पांढऱ्या बछड्यामुळे वन्यजीव अभ्यासकांना आश्चर्याचा धक्का
___________________________________
 
⭕- फॉर्म्युला वनचा नवा विश्वविजेता निको रोसबर्गचा निवृत्तीचा निर्णय, विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर पाचच दिवसांत निवृत्ती, चाहत्यांना धक्का

करा तयारी स्पर्धा परिक्षेची


💎 चालू घडामोडी व दिनविशेष 💎
३.१२.२०१६

💥 अर्थसत्ता 💥
💎 भारताचा वृद्धी दर ७.६ टक्के राहणार
💎 राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख चित्रा रामकृष्णन यांचा राजीनामा

💥 क्रीडा 💥
💎 सायनाचा पराभव
💎 रोसबर्गची निवृत्ती
💎 ‘सी हॉक्स’ टीमचा ओपन वॉटर स्वीमिंग’मध्ये जागतिक विक्रम

💥 आंतरराष्ट्रीय 💥
💎 ट्रम्प यांनी न केलेली स्तुती त्यांच्या तोंडी घातल्याने पाकचा मुखभंग!
💎 उत्तर कोरियावर नवे निर्बंध

💥 राष्ट्रीय 💥
💎 कर्करुग्णांच्या संख्येत वाढ
💎 'बौद्धांना मिळणार नवी जातप्रमाणपत्रे '
💎 केंद्र सरकारच्या जाहिरातींवर आतापर्यंत १,१०० कोटींचा खर्च

💎 💎 दिनविशेष 💎 💎

💥 💥 डिसेंबर ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३७ वा किंवा लीप वर्षात ३३८ वा दिवस असतो.

💥 💥 जागतिक दिन
वकील दिन - भारत.

💥 💥 ठळक घडामोडी
१८१८ - इलिनॉय अमेरिकेचे २१वे राज्य झाले.
१९७१ - पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.
२००९ - सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात तीन मंत्र्यांसह २५ ठार.

💥 💥 जन्म
१३६८ - चार्ल्स सहावा, फ्रांसचा राजा.
१८५४ - विल्यम मिल्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१८८४ - डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती.
१८८४ - टिब्बी कॉटर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१८९९ - इकेदा हयातो, जपानी पंतप्रधान.
१९०५ - लेस एम्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९२३ - ट्रेव्हर बेली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९२५ - केन फन्स्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९३७ - बिनोद बिहारी वर्मा, मैथिली लेखक.
१९५८ - रिचर्ड रीड, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
१९६३ - ऍशली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
१९७४ - चार्ल विलोबी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९७६ - मार्क बाउचर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

💥 💥 मृत्यू
११५४ - पोप अनास्तासियस चौथा.
१७६५ - लॉर्ड जॉन फिलिप सॅकव्हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९१२ - प्रुदेन्ते होजे दि मोरे बारोस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.

💥 💥 दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चुका नसतीलच असे सांगता येणार नाही.

💥 महाराष्ट्र 💥

💎 भारताचा वृद्धी दर ७.६ टक्के राहणार
► वाढलेली गुंतवणूक आणि रचनात्मक सुधारणांमुळे वस्तू उत्पादनात झालेली वाढ या बळावर २०१७ मध्ये भारताचा वृद्धी दर ७.६ टक्के राहील, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
► संयुक्त राष्ट्रांच्या आशिया आणि पॅसिफिक आर्थिक आणि सामाजिक आयोगाने (ईएससीएपी) ‘आशिया आणि पॅसिफिकसाठी आर्थिक सामाजिक सर्वेक्षण-२०१६’ या नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
► त्यात देण्यात आलेल्या माहितीनुसार, २०१६-१७ आणि २०१७-१८ या आर्थिक वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था ७.६ टक्के दराने वृद्धी पावेल.
► सध्या भारतातील गुंतवणुकीस गती मिळाली आहे.
► सुधारणांमुळे वस्तू उत्पादन क्षेत्रात मजबुती येत आहे.
► याचा फायदा मिळून २०१७ मध्ये भारताचा वृद्धी दर ७.६ टक्के होईल.
► रचनात्मक सुधारणांचा लाभ खाजगी क्षेत्रालाही होईल.
► २०१६ च्या एप्रिल-जून तिमाहीत स्थिर गुंतवणुकीत घट झाल्यामुळे वृद्धी कमी झाली आहे.
► तथापि, ती पुन्हा झेप घेईल. चीनमधील आर्थिक वाढीचा दर किंचित घसरून ६.४ टक्क्यांवर येईल.
► मागणी, सेवा आणि उच्च मूल्य वर्धित व्यवहार यांची सांगड घालताना चीनला कसरत करावी लागणार आहे.
► आशिया-पॅसिफिक विभागातील उच्च आणि स्थिर वृद्धीचे श्रेय मात्र भारत आणि चीनलाच आहे.