तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 10 December 2016

करा तयारी स्पर्धा परिक्षेची


💎 *स्पर्धा परिक्षा/रोजगार वार्ता* 💎

      ⏰ *चालू घडामोडी* ⏰

  

🎯🎯 *_लवकरच चलनात प्लॅस्टिक नोटा येणार_*

  ♦सरकारने आता कागदाऐवजी प्लास्टिकच्या नोटा छापण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक साहित्य मिळविण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.
 ♦वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत ही माहिती दिली. क्षेत्रीय चाचण्या घेतल्यानंतर रिझर्व्ह बँक दीर्घकाळापासून प्लास्टिकच्या नोटा आणण्याची योजना आखीत असल्याचे त्यांनी सांगितले.
 ♦पाच शहरांमध्ये प्रयोग करणार क्षेत्रीय चाचणी म्हणून10 रुपयांच्या 1 अब्ज प्लास्टिक नोटा देशातील पाच शहरांत चलनात आणण्यात येणार आहेत. या पाच शहरांत कोची, म्हैसूर, जयपूर, सिमला आणि भुवनेश्वर यांचा समावेश आहे.
 ♦5 वर्षांचे सरासरी आयुष्य प्लास्टिकच्या नोटांना आहे. त्यांची कॉपी करणेही कठीण आहे. कागदी नोटांपेक्षा त्या अधिक स्वच्छही असतात.
♦ सुरक्षा धागा नसलेल्या 1 हजारांच्या काही नोटा डिसेंबर2015 मध्ये आढळून आल्या होत्या, तसेच त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
==============================

🎯🎯 *_ललिता बाबर मॅरेथॉन स्पर्धेची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर_*

🏃🏻‍♀आपल्या उमेदीच्या काळामध्ये ज्या मॅरेथॉन स्पर्धेत स्पर्धक म्हणून सहभाग घेतलेल्या ऑलिम्पियन ललिता बाबरची त्याच 'वसई-विरार महापौर मॅरेथॉन' स्पर्धेत यंदाच्या मोसमात 'ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर' म्हणून निवड झाली आहे.
 🏃🏻‍♀तसेच यंदाच्या वर्षी झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये 3हजार मीटर स्टिपलचेस प्रकारात ललिताने ऐतिहासिक कामगिरी करताना अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला होता.
🏃🏻‍♀ वसई-विरार शहर महानगरपालिका आणि वसई तालुका कला-क्रीडा महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने 11डिसेंबर रोजी होणाऱ्या या मॅरेथॉनचे यंदाचे 6 वे वर्ष असून, यासाठी वसई-विरार सज्ज झाले आहे.
 🏃🏻‍♀पूर्ण मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन आणि 11 कि.मी. अशा प्रमुख तीन गटांच्या या स्पर्धेत एकूण 35 लाखांहून अधिक रकमेची पारितोषिके पटकावण्याची संधी स्पर्धकांना आहे.
============================
🎯🎯 *_'लॉयर्स कलेक्टिव्ह'चे लायसन्स रद्द करण्यात आले_*

🚫प्रख्यात वकील इंदिरा जयसिंह यांच्या 'लॉयर्स कलेक्टिव्ह' या स्वयंसेवी संघटनेचे (एनजीओ) लायसन्स केंद्र सरकारकडून रद्द केल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
 🚫अनेक कार्यकर्त्यांनी यावर टीका केली आहे. सरकारच्या या निर्णयावर टीका करताना नाझ फाऊंडेशनच्या कार्यकारी संचालक अंजली गोपालन म्हणाल्या की, लॉयर्स कलेक्टिव्ह यांना पाठविलेल्या आदेशात सर्वात आश्चर्यचकित करणारी बाब ही आहे की, महिलांच्या विकासासाठी आणि सशक्तीकरणासाठी या संस्थेने काहीही केले नाही.
🚫 इतिहासकार आणि सामाजिक कार्यकर्त्या उमा चक्रवती यांनी आरोप केला आहे की, या संघटनांना लक्ष्य करण्याची ही एक पद्धत आहे.
 गत काही वर्षांत न्यायासाठी लढाई लढल्याबाबत जेएनयूच्या प्राध्यापक आयशा किदवई यांनी एनजीओंचे कौतुक केले आहे.
🚫 फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अ‍ॅक्टच्या (एफसीए)उल्लंघनाबाबत लॉयर्स कलेक्टिव्ह या संस्थेचे लायसन्स गृहमंत्रालयाकडून कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहे.
=============================
🎯🎯 *_लॅम्बासिंगी या गावाला आंध्रप्रदेशचे काश्मीर म्हणून संबोधतात_*

🏝दक्षिण भारत आणि उत्तर भारत ही देशाची दोन टोक आहेत. उत्तरेकडे उत्तराखंड, हिमाचलप्रदेश, जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये डोंगराळ भागात बर्फ पडणे नैसर्गिक आहे.
 🏝खास बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक इथे जातात. पण असाच बर्फ दक्षिणेकडच्या एका राज्यामध्ये पडतो.
 🏝आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम जिल्ह्यातील चिंतापालीतालुक्यातील लॅम्बासिंगी या छोटयाशा गावात काहीवेळा बर्फ पडतो.
 🏝तसेच या हिलस्टेशनला आंध्रप्रदेशचे काश्मीर म्हटले जाते. समुद्रसपाटीपासून हे गाव 1025 मीटर उंचीवर आहे.
🏝 डिसेंबर-जानेवारी महिन्यात इथे पारा शून्य डिग्रीपर्यंत घसरतो. चारवर्षांपूर्वी 15 जानेवारी 2012 रोजी वातावरणात झालेल्या बदलांमुळे इथे बर्फवृष्टी झाली होती.
 🏝वनराईने नटलेला हा प्रदेश पाहताक्षणीच नजरेत भरतो. प्रमुख इथे कॉफीचे उत्पादन घेतले जाते.
=============================
🎯🎯 *_पृथ्वीला प्रदक्षिणा मारणारे पहिले अमेरिकन जॉन ग्लेन यांचे निधन_*

✈पृथ्वीला प्रदक्षिणा मारणारे पहिले अमेरिकन अंतराळवीर जॉन ग्लेन यांचे 95 व्या वर्षी निधन झाले.
✈ 1962 साली त्यांनी केलेल्या अवकाश प्रवासामुळे ते अमेरिकन लोकांच्या घराघरात पोहचले होते. त्यांचा करिश्मा इतका होता की अंतराळवीर म्हणून निवृत्त झाल्यावर ते अनेक वर्षे लोकप्रिय सिनेट म्हणून देखील नावाजले गेले.
✈ मर्क्युरी 7 या अवकाश यानातून प्रवास केलेले ते शेवटचे अंतराळवीर होते.
✈ अंतराळवीर होण्याआधी ते फायटर पायलट होते, त्यांनी दोन युद्धामध्ये आपली सेवा प्रदान केली होती. त्यांच्या नावावर उड्डाणाचे अनेक विक्रम आहेत.
============================
🎯🎯 *_मुंबई रेल्वे भरती बोर्ड एनटीपीसी(पदवीधर) परीक्षा निकाल 2016 जाहीर_*

निकाल डाऊनलोड करण्यासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/TIURuD
=============================
🎯🎯 *_औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय लिपिक/तलाठी निवड यादी निकाल जाहीर_*

निकाल डाऊनलोड करण्यासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/Twk1mr
=============================
🎯🎯 *_लोकसेवा आयोग महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2016 प्रवेशपत्र उपलब्ध_*

प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/AxuJUm
===========================

🎯🎯 *_सांगली जिल्हाधिकारी कार्यालय लिपिक लेखी परीक्षा निकाल जाहीर_*

निकाल डाऊनलोड करण्यासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/NrHvlh

============================
🎯🎯 *_अकोला जिल्हाधिकारी कार्यालय तलाठी परीक्षा निकाल जाहीर_*

निकाल डाऊनलोड करण्यासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/oVOlSW

==============================
🎯🎯 *_ नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2016_*

पद संख्या : 08 जागा
 पद : उप. मुख्य प्रकल्प व्यवस्थापक.
 शिक्षण : बी.ई./B.Tech इलेक्ट्रॉनिक्स मध्ये.
 वेतनमान : Rs.29100-54500/-pm
 वय : 45 वर्षे.
 परीक्षा शुल्क :
खुला वर्ग : Rs.400/-
मागासवर्ग : फीस नाही.
 अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने करावा.
 पत्ता :
To,
Jt. General Manager (HR),
Nagpur Metro Rail Corporation Ltd.
Metro House, 28/2 Anand Nagar,
CK Naidu Road, Civil Lines.
Nagpur – 440001.
 अधिकृत संकेतस्थळ :www.metrorailnagpur.com
 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 डिसेंबर 2016
 अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/OqAIuI
==============================
[10/12, 1:18 p.m.] Gurushant Magi 9665877889:
🎯🎯 *_सांगली जिल्हाधिकारी कार्यालय लिपिक लेखी परीक्षा निकाल जाहीर_*
सांगली जिल्हाधिकारी कार्यालय लिपिक लेखी परीक्षा निकाल जाहीर

निकाल डाऊनलोड करण्यासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/NrHvlh

==============================
🎯🎯 *_ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स भरती 2016_*

पद संख्या : 14 जागा
 1. अध्यापक : 04 जागा
शिक्षण : एम.ए. / M.Com / एम.एस्सी / सामाजिक कार्य किंवा मानसशास्त्र, समाजशास्त्र मास्टर.
वेतनमान : Rs.20000/-pm
वय : 25-40 वर्षे.
 2. ऑफिस मदतनीस : 05 जागा
शिक्षण : बी.ए. / B.Com / B.Sc. मान्यताप्राप्त विद्यापीठातून.
वेतनमान : Rs.12000/-pm
वय : 25-35 वर्षे.
 3. Attender : 05 जागा
शिक्षण : 10वी परिक्षा पास मान्यताप्राप्त बोर्ड मधून.
वेतनमान : Rs.8000/-pm
वय : 18-25 वर्षे.
 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन करावा.
 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 डिसेंबर 2016
 अधिकृत संकेतस्थळ : https://www.obcindia.co.in/
 अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/3tz1Za
 ऑनलाइन अर्जासाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/D0X53T
==============================
🎯🎯 *_BSF अधिकारी भरती 2016_*

पद संख्या : 157 जागा 
 पद :
 1. सहाय्यक पोलीस निरीक्षक (लघुलेखक) : 36 जागा
शिक्षण : 10वी पास लघुलिपी इंग्रजी / हिंदी 80 WPM.
वेतनमान : Rs.5200-20200/- + GP 2800/-
 2. हेड कॉन्स्टेबल (Ministerial) : 121 जागा
शिक्षण : 10वी पास इंग्रजी 35 WPM, हिंदी 30 WPM टायपिंग गती.
वेतनमान : Rs.5200-20200/- + GP 2400/-
 वय : 18-25 वर्षे
 परीक्षा शुल्क :
खुला वर्ग : Rs.100/-
मागासवर्ग : फीस नाही.
 अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने करावा.
 पत्ता :
To,
"The DIG & Commandant.
STC BSF Chakur, PO-Chakur,
Dist-Latur,
Maharashtra-413513".
 अधिकृत संकेतस्थळ : www.bsf.nic.in
 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 जानेवारी 2017
 

सबसे तेज,तेजन्यूज हेडलाईन्स ताज्या घडामोडी


*📯सोलापूर*- ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर महायात्रेच्या कालावधीत वाहतूक, सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन व्यवस्थापन याबाबत पोलिस प्रशासनाच्या वतीने काटेकोर नियोजन केले जाईल. नियोजन करताना सर्व संबंधितांच्या सूचनांचा विचार केला जाईल, असे पोलिस आयुक्‍त रवींद्र सेनगावकर यांनी सांगितले.

☄☄☄☄☄
*📯सोलापूर*- मराठी शाळा टिकण्यासाठी गुणवता सुधारण्याची गरज असल्याचे मत शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी व्यक्त केले, ३६व्या राज्यस्तरीय वार्षिक कृतिसत्राचे उदघाटन

☄☄☄☄☄
*📯सोलापूर*- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून चांगला विकास होणे शक्य आहे. मात्र, दुर्दैवाने प्रशासनात बसलेल्या अधिकार्‍यांना या योजना राबविण्यात रस नसल्याची खंत सहकारमंत्री ना. सुभाष देशमुख यांनी व्यक्‍त केली. 

☄☄☄☄☄
*📯पंढरपूर*- मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशीनिमित्त शनिवारी (दि.१0) राज्यभरातील हजारो भाविकांनी पंढरीत हजेरी लावली. याच दिवशी गीता जयंती आल्याने श्री विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनानंतर भाविकांनी गोपाळपूर येथील विष्णूपदाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

☄☄☄☄☄
*📯मंगळवेढा*- गुड्डापूर येथील धनम्मा देवीचे दर्शन घेऊन मंगळवेढ्याकडे माघारी परतत असताना मंगळवेढा-उमदी रोडवर सोड्डी फाट्याजवळ खडी भरून जाणार्‍या टिपरला दुचाकीची समोरासमोर धडक बसल्याने अपघातात मोटारसायकलवरील दोघेही जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली

☄☄☄☄☄
*📯पंढरपूर*- राज्यातील विनाअनुदानित शाळांना सरसकट २० टक्के अनुदानासाठीची ७१ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद - आमदार दत्तात्रय सावंत

☄☄☄☄☄
*📯सोलापूर* - तलवारबाजी स्पर्धेसाठी निघालेल्या खेळाडूंच्या खासगी बसला अरणजवळ (ता. माढा ) अपघात, खेळाडू जखमी.

☄☄☄☄☄
*📯लातूर*ः कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी भूल दिलेल्या एका विवाहितेचा शनिवारी येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला असून, डॉक्टरांच्या बेफिकिरीमुळे पत्नी मृत पावल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे. 

☄☄☄☄☄
*📯पुणे*: नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर आणि युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दीपक पोटे यांच्या मोटारीत दहा लाख रुपयांच्या जुन्या नोटा आढळल्या

☄☄☄☄☄
*📯नवी मुंबई* - १३ वर्षाच्या विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार, मुलगी गर्भवती राहिल्यामुळे प्रकार आला उघडकीस, नेरूळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल, शिक्षक फरार

☄☄☄☄☄
*📯परभणी* : नांदेड-पुणे या ट्रॅव्हल्सला गंगाखेड जवळ अपघात; १८ जण जखमी, जखमींवर गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

☄☄☄☄☄
*📯कर्नाटकमध्ये* ५ कोटी ७० लाखांच्या नव्या आणि ९० लाखांच्या जुन्या नोटा जप्त;आयकर विभागाची कारवाई

☄☄☄☄☄
*📯तामिळनाडूच्या* माजी मुख्यमंत्री जयललिता यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची शिफारस करणारा ठराव तामिळनाडू सरकारने कॅबिनेट बैठकीत मांडला,स्मारकासाठी १५ कोटींच्या निधीला मंजुरी

☄☄☄☄☄
*📯पुणे*: जळगावचा विजय चौधरी तिसर्‍यांदा *'महाराष्ट्र केसरी'*चा विजेता;पुण्याच्या अभिजीत कटकेवर केली मात

☄☄☄☄☄
*📯कोल्हापूरचा* आघाडीचा बॅडमिंटनपटू करण अविनाश जाधव याची महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघात निवड

☄☄☄☄☄
*📯हॉकी ज्युनिअर वर्ल्ड कपमध्ये* भारताची इंग्लंडवर ५-३ ने मात

☄☄☄☄☄
*📯मुंबई कसोटी*: भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटीत तिसऱ्या दिवसाअखेर भारताचा डाव ७ बाद ४५१, *कोहली १४७ नाबाद*

सबसे तेज,तेजन्यूज हेडलाईन्स ताज्या घडामोडी संक्षीप्त


🔸नवी दिल्ली - अगुस्ता वेस्टलँड डील प्रकरणी हवाई दलाचे माजी प्रमुख एस पी त्यागी आणि इतर आरोपांनी 14 डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडी.

🔹कर्नाटकमधील हवाला दलालावर कारवाई, आयकर विभागाच्या छाप्यात 5 कोटींच्या नव्या नोटा जप्त, 90 लाखांच्या जुन्या नोटा आणि 30 किलो सोनं जप्त.

🔸सोलापूर : आंधळगांवहुन उमदीकडे निघालेल्या मोटारसायकलला कारची जोरदार धडक, 1 ठार. फटेवाडी (ता़ मंगळवेढा) फाट्याजवळील घटना़

🔹अहमदनगर : पाईपलाईन रोड येथील व्यापारी सुरेश मुनोत यांचे अपहरण करणारे दोन आरोपी पकडले. शुक्रवारी रात्री झाले होते अपहरण.

🔸भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना - चौथ्या दिवसाचा खेळ संपला, भारताच्या 7 विकेट्स गमावत 451 धावा, कोहली 147 धावांवर नाबाद.

🔹गोंदिया : तिरोडाजवळ ट्रॅक्टरची एस.टीला धडक बसून झालेल्या अपघातात १० प्रवासी जखमी.

🔸बुलडाणा: चिखली तालुक्यातील शेलगाव अटोळ येथे दोन हजारांच्या बनावट नोटा छापणा-या इसमाला अटक

🔹एआयएडीएमके पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी शशिकला यांना पक्षाचे नेतृत्व करण्याची विनंती केली - ट्विटरच्या अधिकृत अकाऊंटवरून एआयएडीएमकेने दिली माहिती.

🔸सांगली : नाबार्डकडून शनिवारी राज्यातील बहुतांश जिल्हा बँकांमध्ये तपासणी सुरू. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या दृष्टीने नाबार्डची तयारी. नाणेवारी, कोअर बँकींग, केवायसी पूर्तता याविषयीची माहिती घेण्यास सुरुवात.

🔹इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात भारताने घेतली ४ धावांची आघाडी. विराट कोहली १२२ तर जयंत ८ धावांवर खेळत असून भारताने १२९. ४ षटकांंत ७ गडी गमावून केल्या ४०४ धावा.

🔸नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावरील किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण.

🔹अंदमानातील हेवलॉक बेटावरुन आतापर्यंत २१६८ लोकांची सुटका करण्यात आली.

🔸चौथी कसोटी : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीचे शानदार शतक, १८७ चेंडूत फटकावल्या १०० धावा. भारत ७ बाद ३७०

🔹शिर्डी- साई मंदिर व परिसरात भाविकांची पाकिटे चोरणा-या महिलेला संस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी रंगेहात पकडले. सात तोळे सोने व ६९ हजार रुपये रोख जप्त. महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

🔸नवी दिल्ली: पंतप्रधानांना लोकसभेत बोलू दिले जात नाही असं म्हणणं चुकीच आहे. याउलट आम्ही त्यांना चर्चेचे आवाहन करतोय. पंतप्रधानांनी केवळ भाषण करावे आणि निघून जावे असं होता कामा नये. त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत - काँग्रेस नेते आनंद शर्मा

🔹गोंदिया : तिरोडा तालुक्यातील खैरी गावात बिबट्याच्या हल्ल्यात तरूण जखमी.

🔸लातूरः उदगीर तालुक्यातील चांदेगाव साठवण तलावात सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह. ५-६ दिवसांपूर्वीच खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज, अज्ञात आरोपीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

🔹मुंबई : शिवसेना आणि बच्चू कडूंची प्रहार संघटना विदर्भात शेतकऱ्यांसाठी एकत्र, सरकारविरोधी आंदोलन करणार,  आंदोलनात शिवसेनाही सोबत असावी यासाठी बच्चू कडूंनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची घेतली भेट
 
🔸पुणे : बारामती पालिका निवडणुकीच्या तोंडावर मंत्री महादेव जानकरांना उपरती , मी भावनेच्या भरात बोललो असेल, याबाबत मी दिलगीरी व्यक्त करतो, बारामतीच्या जनतेबद्दल नेहमीच मला प्रेम आहे, आज उमेदवारांच्या प्रचारासाठी जानकर बारामतीत

🔹मुंबई : अपक्ष आमदार बच्चू कडू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल

🔸रत्नागिरी : बिबट्याचे कातडे विक्रीसाठी घेऊन चाललेल्या एकाला पोलिसांनी केली अटक, विवेक पद्माकर सप्रे असे या व्यक्तीचं नाव , विवेक हा भू गावचा रहिवासी असल्याची पोलिसांची माहिती

🔹रायगड : जिल्ह्यातील लोणेरे इथल्या खासगी शाळेच्या कारकूनाने शाळेच्या कार्यालयातच केली आत्महत्या
 
🔸अहमदनगर : अडीच वर्षाच्या चिमुकलीला मारहाण करुन तिच्यावर अत्याचार , अहमदनगरच्या केडगांवमध्ये ही संतापजनक घटना

🔹तमिळनाडू : दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाच्या धक्क्याने आतापर्यंत 280 जणांचा मृत्यू, आयएडीएमके कुटुंबीयांना ३ लाखांची देणार मदत

🔸मुंबई : तिसऱ्या दिवसाअखेर भारत 451/7, मुरली विजय आणि विराट कोहलीची शानदार सेंच्युरी, भारताकडे आता 51 रनची आघाडी

🔹मुंबई : भारत वि इंग्लंड चौथी कसोटी, विराट कोहलीचे शतक
 
🔸नवी दिल्ली : विराट कोहली वनडे क्रमवारीत दुसऱ्या स्थानी कायम

🔹जळगावात भाजप नेते एकनाथ खडसे - मंत्री गिरीश महाजन गट आमने-सामने
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या शेवटच्या सभेत सत्ताधारी भाजप मधील माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन गटामधील दुरावा पुन्हा एकदा समोर आला.

🔸औरंगाबादच्या महापौरपदाचा उमेदवार ठरला
औरंगाबादच्या महापौर पदाचा तिढा अखेर सुटला आहे. महापौरपदी भाजपनं भगवान घडामोडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

🔹मुख्यमंत्री आज पुणे दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत.सकाळी अकराच्या सुमाराला ते लोणावळा नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार सभेला उपस्थित राहतील.

🔸पाळणाघरांची नोंदणी नसेल तर बंद होणार
पाळणाघरात  नोंदणी करणं गरजेचं आहे. नोंदणी न करणारी सर्व पाळणाघरं बंद करण्याचा इशारा ठाणे महापालिका प्रशाससाने घेतला आहे

🔹दादरमध्ये 85 लाखांच्या नव्या नोटा जप्त

🔸अम्मांच्या निधनाच्या धक्क्याने 280 जणांचा मृत्य.

सातेगावात वेडाच्या भरात महीलेने घेतली फाशी

अरुना शर्मा

पालम :-पालम तालुक्यातील सातेगाव येथे दिनांक 10 डिसेंबर रोजी सकाळी 5 च्या सुमारात गगाबाई बळीराम येवले वय 35 या महिलेने वेडयाच्या भरात घरातील छताच्या हुकास दोरी अडकउन आत्महत्या केल्याची घटनाची खबर माधव ज्ञानोबा कदम रा.सातेगाव यांनी दिली.हि महिला गेल्या दिड महिण्या पासुन वेडया सारखी वागत होती.पालम पोलीस स्टेशन येथे अकस्मत मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पालम पोलीस करीत आहे.

दहा लाखाची रोकड जप्त

पुणे:सासवड पोलिसांनी 10 लाख रुपयांची रोकड आणि ईनोव्हा कार जप्त. या कारमधे भाजपचे माजी नगरसेवक उज्वल केसकर, युवक आघाडीचे पदाधिकारी दिपक पोटे यांच्यासह चौघेजण होते. ही रोकड जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या स्वरूपात होती. हे पैसे ब्यांंकेमधे बदलून घेण्यासाठी निघालो होतो अस उत्तर केसकर यांच्याकडून देण्यात आल. मात्र पोलिसांना ते समाधानकारक न वाटल्याने हे पैसे आणि गाडी पोलिसांनी जप्त केली. त्याचबरोबर याची माहिती ईनकम ट्याक्सला  देण्यात आलीय. बारामतीत आज मुख्यमंत्र्यांची नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी सभा आहे.

नांदेड पुणे ट्रॅव्हलला मालेवाडी जवळ अपघात

अरुणा शर्मा

पालम:-नांदेडुन पुण्या कडे जाणारी MH 23 W 525 वंदना ट्रव्हलस चि गाडी मालेवाडी च्या पुला जवळील ट्रनवर गाडीचा ताबा सुटला व गाडी सरळ खडयात जाऊन पलटी झाली.यात 8 ते 10 प्रवाशी जखमी आसुन काही प्रवाश्याची प्रकृती चिंता जनक असल्याचे कळते.हि घटना राञी 10 वाजून 15 मिनटाने घटली आहे.या घटनेची माहिती मिळताच गंगाखेड चे पोलीस निरिक्षक थोरात साहेब यांनी आपला पोलीसाचा ताभा घेऊन घटना स्थळी भेट दिली. व गाडी तील प्रवाशाना बाहेर काडुन सहकारी रुग्णवाहिका बोलाऊन गंगाखेड सरकारी रुग्णाल्यात उपचारा साठी पाठवाण्यात आले.यावेळी घटनास्थळी गंगाखेड पोलीसा सह केरवाडी येथिल स्वप्नभुमिचे अजिक्य कुलकर्णी, भीमा जाधव, आशीष कुलकर्णी, प्रलाद पांचाळ आदिनि प्रवाशाना बाहेर काडुन दवाखान्यात पाठविण्यास मदत केली.

पुर्णेच्या नुतन नगराध्यक्षांनी पदभार स्विकारण्या पुर्वीच पदाला लागले ग्रहण?

दिनेश चौधरी
[काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांनी विरोधात केली याचीका दाखल]
पुर्णा /नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकी मध्ये अत्यल्प मतांनी विजयी झालेल्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा सौ.गंगाबाई सितारामअप्पा एकलारे यांनी अद्याप पदभार ही स्विकारला नसतांना त्यांच्या पदाला ग्रहन लागल्याचे दिसत असुन या निवडणूकी मध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविलेल्या पराभूत उमेदवार सौ.अनिता सुनील जाधव यांनी जिल्हा व सञ न्यायालयात दि.08 डिसेंबर 16 रोजी निवडणूक याचीका दाखल केली असून दाखल याचीकेचा क्र.EP 03/2016 असा आहे
पुर्णा पुर्व नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ दि.17 डिसेंबर रोजी संपणार असुन याच दिवशी नवनिर्वाचीत नगराध्यक्षा सौ.गंगाबाई सितारामअप्पा एकलारे या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारणार आहेत परंतू सदरील याचीके मुळे नुतन नगराध्यक्षांनी पदभार स्विकारण्यापूर्वीच त्यांच्या पदाला ग्रहन लागल्याचे दिसत आहे काँग्रेस पक्षाच्या पराभूत उमेदवार सौ.अनिता जाधव यांनी त्यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचीकेत असे नमुद केले आहे की शिवसेना उमेदवार व नवनिर्वाचीत नगराध्यक्षांनी उमेदवारी दाखल करते वेळी शपतपञात त्यांचे पती सितारामअप्पा एकलारे यांच्या नावावरील शहरालगत असलेल्या सर्वे नं.182/1/2 तसेच परभणी येथील औद्योगिक वसाहती मधील मनपा क्र.368 ही  कोट्यावधीची संपत्ती नामनिर्देशनपञ दाखल करते वेळी शपथ पञात लपवण्यात आली तसेच पुर्णा नदीच्या काठावरील सर्वे क्र.213 ही 80 आर.ही जमीन स्वतःच्या मालकीची दाखविण्यात आली होती व त्यावर राष्ट्रीयकृत बँक असलेल्या भारतीय स्टेट बँक शाखा पुर्णा या बँकेचे 300000/-रुपये रुपये कर्ज उचलल्याचा नोंद व लिंगायत समाज स्मशान भुमीचा उल्लेख ही सातबारावर आहे सदरील स्मशानभुमीच्या जमीनीचे कुठलेही दानपञ करुन न देता नगर परिषद प्रशासनाने या स्मशानभुमी यु.डी.-6 2015/16 अंतर्गत लाखों रुपयांच्या विकासनिधीतून सि.सी.रस्ता,संरक्षण भिंत,स्वागत कमान,दर्शनी गेट,आदी कामे जिल्हाधिकारी परभणी यांच्या डोळ्यात धुळ झोकुन मिळवली कशी..? ही प्रशासन तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांची फसवणूक नव्हे काय..? असेही नमूद केले आहे सौ.जाधव यांनी दाखल केलेल्या याचीकेवर न्यायालय काय निर्णय देते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून नवनिर्वाचीत नगराध्यक्षांच्या पदभार स्विकारण्यापूर्वीच त्यांच्या पदाला ग्रहण लागल्याचे दिसत आहे