तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Friday, 16 December 2016

मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाअध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल पंतंगे यांचा सत्कार

सुजित शिंदे
कळंब:-महाराष्ट्र १ या  वृत्त वाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी निवड झालेबाद्द्ल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक भवन कळंब येथे  सत्कार करण्यात आला.
       दि १६ रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे  यांच्या हस्ते श्री पतंगे यांचा मराठी पत्रकार संघाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी निवड झालेबाद्द्ल सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी बोलताना पतंगे म्हणाले कि,  पत्रकारिता हा लोकशाहीच पाया असून  तो भक्कम करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकाराना सक्षम करण्यासाठी आपला भर राहणार आहे. यावेळी  आयबीएन लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी बालाजी निरफळ,पत्रकार परमेश्वर  पालकर, राज्यचिटणीस भक्तराज दिवाने, सामाजिक कार्यकर्ते कचरू टाकले, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष दत्ता पवार, कळंब तालुका पतसंस्थेचे उपाध्यक्ष भूषण नान्नजकर, पतसंस्थेचे संचालक गणेश कोठावळे, सतीश एडके, नागेश टोणगे, सचिव संतोष ठोंबरे  उपस्थित होते.

        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप मगर, दीपक गाडे, संतोष पावळ, जनार्धन धुमाळे, शिंदे यु सि, अशोक दिकले, मुकुंद नांगरे, बालाजी पवार, नारायण बकले, भास्कर चव्हाण, प्रशांत घुटे  सेवक रामभाऊ खुर्द, आदींनी परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सूत्र संचालन भक्तराज दिवाने तर आभार प्रदर्शन नेताजी वाघ यांनी मानले. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील शिक्षक बहुसंखेने उपस्थित होते.

'कॅशलेस' बाबत हिवराळात मार्गदर्शन

हिवरा राळा येथे कॅशलेस बाबत मार्गदर्शन करताना मंडलधिकारी --- लोखंडे यावेळी सरपंच कल्याण कबाडे ग्रामसेवक  यु व्ही पाटील तलाठी डी जी गिरी विजया बँक मॅनेजर व गावकरी

एमपाएससी;पीएसआयच्या परिक्षेची तयारी करणा-या उमेदवारांना दिलास;वय मर्यादा वाढली

नागपूर : राज्य सरकारने एमपीएससीमार्फत घेतल्या जाणाऱ्या पीएसआय पदाच्या परीक्षेसाठी खुल्या गटाची कमाल वयोमर्यादा 28 वरुन 31 तर आरक्षित गटाची 33 ते 34 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे पीएसआय पदाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विदयार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

याच वर्षी एप्रिल महिन्यात कमाल वयोमर्यादा पाच वर्षांनी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यामुळे 28 वर्ष वय असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. गेली अडीच वर्षे या पदाची जाहिरात आलेली नव्हती, पण सरकारने वयोमर्यादा वाढवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर या विद्यार्थ्यांनी जोमाने तयारी सुरु केली होती.

काही दिवसापूर्वी पीएसआय पदासाठी निघालेल्या जाहिरातीमध्ये वयोमर्यादा 28 ठेवण्यात आली होती. जाहिरातीमधील कमाल वयोमर्यादा पासून अनेकांची स्वप्न भंगली. त्यामुळे सरकारने वाढीव वयोमर्यादा द्यावी अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला होता. मुख्यमंत्र्यांनी वयोमर्यादा वाढवल्याची घोषणा करुनही चुकीची जाहिरात काढली गेली.

याविरोधात हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच धनंजय मुंडे, सतीश चव्हाण आणि आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी औचित्याच्या मुद्द्यारे वयोमर्यादा वाढवण्यासाठी मागणी केली होती. त्यावेळी सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी पीएसआयची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देऊ असे आश्वासन दिले होते.

चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत निवदेनाद्वारे वयाची अट वाढवली असल्याचे जाहीर केले आहे. तसंच मुख्यमंत्री या निर्णयावर राज्यपालांची सही घेतील आणि त्यानंतर लगेचच याचे नोटिफिकेशन सरकारतर्फे काढण्यात येईल.

दाभोळकर-पानसरे हत्या प्रकरणी अहवालावर हायकोर्टाची नाराजी

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या अहवालावर हायकोर्टानं सीबीआयवर नाराजी व्यक्त केली आहे. दोन राज्यातून वेगवेगळे अहवाल प्राप्त झाल्याने निष्पक्ष बॅलेस्टिक अहवालाची प्रतीक्षा असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.

फरारी आरोपींविरोधात काहीच का केलं जात नाही, असंही दाभोलकर आणि पानसरे यांच्या वकिलांनी विचारलं आहे. सारंग अकोलकर आणि विनय पवार हे 2009 पासून फरारी आहेत. बॅलिस्टिक रिपोर्टबद्दलच बोललं जातं, पण या फरारींबदद्ल काही केलं जात नाही, असं दाभोलकर आणि पानसरेंचे वकील अभय नेवगी यांनी कोर्टात म्हटलं.

कोर्टाने या अहवालावर नाराजी व्यक्त केली आहे. वेगवेगळ्या तपास संस्थांमध्ये समन्वय नसल्यानं तपास पुढे जात नसल्याचं चित्र आहे, असं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं आहे.

सबसे तेज,तेजन्यूज हेडलाईन्स,ताज्या घडामोडी संक्षीप्त


💢- उस्मानाबाद - येडशी येथून पाच तोळयांचे सोने लंपास. बंद घरावर चोरट्यांचा डल्ला. शुक्रवारी सायंकाळची घटना
----------------------------------------------------------

🎿☀🌀
💢- गोंदिया - नक्षलवाद्यांना जुन्या नोटा बदलून देण्यासाठी मदत करणारे गोंदियातील काही व्यापारी पोलिसांच्या ताब्यात
----------------------------------------------------------

🎿☀🌀
💢- अकोला - मनीषा जनार्धन घोड़े (रा पांगरताटी ) या नववीत मधे शिकत असलेल्या या मुलीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली
----------------------------------------------------------

🎿☀🌀
💢- नाशिक - शहराच्या मध्यवर्तीत असलेल्या सीबीएस चौकातील शहर वाहतूक शाखेच्या पोलीस चौकीस आज सायंकाळच्या सुमारास आग लागली
----------------------------------------------------------

🎿☀🌀
💢- अंधेरीतील डी.एन.नगर येथून सुमारे एक कोटी चाळीस लाख रुपयांची रोकड जप्त. जप्त करण्यात आलेल्या सर्व नोटा नव्या चलनातील
----------------------------------------------------------

🎿☀🌀
💢- नोटाबंदीवर सर्व स्तरातील लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, तात्काळ प्रतिक्रिया पाठिंबा देणारी होती, पण जेव्हा त्याच लोकांना रांगेत भेटलो तेव्हा ते दुखी होते - शरद पवार
----------------------------------------------------------

🎿☀🌀
💢- पेट्रोल आणि डिझेल महागलं, पेट्रोलच्या किंमतीत 2 रुपये 21 पैसे तर डिझेलच्या किंमतीत 1 रुपये 79 पैशांची वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार
----------------------------------------------------------

🎿☀🌀
💢- महादेव जानकरांनी निवडणूक अधिका-यावर दबाव टाकल्या प्रकरणी गडचिरोली पोलिसांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र, जानकरांना हजर राहण्याबाबात निर्देश देण्यासाठी पत्र, अधिवेशन सुरु असल्यानं अध्यक्षांना पत्र
----------------------------------------------------------

🎿☀🌀
💢- भारत ज्युनिअर हॉकी विश्वचषकाच्या फायनलमध्ये, शूट आऊटमध्ये ऑस्ट्रेलियावर केली मात, शूटआऊटमध्ये 4-2 असा विजय
----------------------------------------------------------

🎿☀🌀
💢- मालेगांव (वाशिम) तालुक्यातील मुंगळा येथील एका शेतशिवारात समाधान मोतीराम भुरकाडे (४५) यांनी आत्महत्या केल्याची घटना १६ डिसेंबर रोजी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही
----------------------------------------------------------

🎿☀🌀
💢- मोदींचा निर्णय म्हणजे गरीबांकडून पैसे घ्या आणि श्रीमंतांना द्या, - राहुल गांधी
----------------------------------------------------------

🎿☀🌀
💢- लातूर - औसा रोडवरील ढाब्यावर जेवणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी. एकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल
----------------------------------------------------------

🎿☀🌀
💢- गोवा - नोटाबंदी ही काळ्या पैशाविरोधातील लढाई नव्हे तर देशातील 99 टक्के प्रामाणिक लोकांवरील हल्ला रोखीने व्यवहार करणाऱ्या, गरीब लोकांवरील हल्ला - राहुल गांधी
----------------------------------------------------------

🎿☀🌀
💢- वर्धा - 500 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. यात एका आरोपीला 10 तर दुसऱ्याला 5 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा निकाल जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी दिला
----------------------------------------------------------

🎿☀🌀
💢- सर्व पैसा काळा नाही, सर्व काळा पैसा रोख नाही. नोटाबंदीने गरिबांना टार्गेट केलं - राहुल गांधी.

राजकीय पक्षांच्या खात्यावर कितीही पैसे भरा,शुन्य टॅक्स


नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर खात्यावर जमा होत असलेल्या पैशांवर सरकारची करडी नजर आहे. मात्र त्याचवेळी राजकीय पक्षांना  सरकारने भलतीच सूट दिली आहे. कारण राजकीय पक्षांच्या खात्यात जमा होणाऱ्या 500 आणि हजाराच्या जुन्या नोटांवर कोणताही टॅक्स लागणार नाही.

एकतर राजकीय पक्षांना पहिल्यापासूनच आयकर कायद्यातून सूट आहे. त्यातच नोटाबंदीनंतरही त्यांच्या खात्यावर कितीही नोटा जमा झाल्यास, त्यांना कोणताही कर लागणार नाही.

एकीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या खात्यात किती रक्कम जमा होते त्यावर सरकार आणि इन्कम टॅक्स विभागाचं लक्ष आहे. अतिरिक्त रक्कम जमा करणाऱ्यांना मोठा दंड आणि टॅक्स लावण्यात येत आहे. मात्र राजकीय पक्षांच्या खात्यावरील रकमेबाबत विचारणाही होणार नाही.

सबसे तेज,तेजन्यूज हेडलाईन्स ताज्या घडामोडी संक्षीप्त


🎿सोलापूर- जिल्ह्यातील दुष्काळी निधी व रब्बी पीकविम्याची रक्कम एका महिन्यात शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करणार असल्याची ग्वाही  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी विधानसभेत याविषयी लक्ष्यवेधी सूचनेद्वारे सभागृहात प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.

💠💠
🎿सोलापूर रेल्वे विभाग अंतर्गत येणारी सर्व रेल्वेस्थानके कॅशलेस करण्यात आली असून रेल्वेस्थानकावर तिकीट काढताना रोख रक्कम देण्याची गरज यापुढे पडणार नाही. तसेच रोजची सुट्या पैशांची कटकट देखील यामुळे थांबणार आहे. सोलापूर विभातील १४ रेल्वेस्थानकांवर 'कॅशलेस'ची व्यवस्था करण्यात आली असून, उर्वरीत रेल्वेस्थानकांवरही 'पॉईट ऑफ सेल' मशिन बसविण्याचे काम सुरू आहे

💠💠
🎿सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागाकडून सुरु असलेली ऑनलाईन समायोजनाची प्रक्रिया रद्द करुन नव्याने ऑनलाईन समायोजनाची प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. चूकीच्या पध्दतीने झालेली शिक्षक समायोजन प्रक्रिया रद्द करण्यासाठी आ. प्रणिती शिंदे यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता.

💠💠
🎿सोलापूर : जिल्हा परिषद सेस फंडाचा आतापर्यंत केवळ २५ टक्के निधी खर्च झाला आहे. डिसेंबर अखेरपर्यंत निधी खर्च न झाल्यास अखर्चित राहणारा निधी ग्रामीण भागातील विविध कन्सक्ट्रीव कामांसाठी तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात येणार-  जि.प. उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख . 

💠💠
🎿मोहोळ : सन २०१४ मध्ये विविध स्वरूपातील रोजगार हमी योजनेमधील घोटाळा व मोहोळ पंचायत समितीमधील विहीर घोटाळ्याची चौकशी विभागीय आयुक्त स्तरावरून सुरू , रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी एस. के. बर्गे हे दोन दिवसांपासून या चौकशीसाठी मोहोळमध्ये तळ ठोकून आहेत. 

💠💠
🎿उस्मानाबाद - येडशी येथून पाच तोळयांचे सोने लंपास. बंद घरावर चोरट्यांचा डल्ला. शुक्रवारी सायंकाळची घटना.

💠💠
🎿पेट्रोल-डिझेल महागले, पेट्रोल २ रुपये २१ पैश्यांनी तर डिझेल १ रुपये ७९ पैश्यांनी महाग, शुक्रवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू

💠💠
🎿मुंबई : नोटबंदीनंतर बँक खात्यांमध्ये लाखो रुपयांची माया ठेवणार्‍या खातेधारकांवर आता रिझर्व्ह बँकेने कठोर निर्बंध लावले आहेत, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम असणार्‍या खातेधारकांना पैसे काढताना पॅन क्रमांक लिहिणे सक्तीचा केला आहे. जर पॅन क्रमांक नसेल तर एक पैसाही त्या खातेधारकाला बँकेतून मिळू शकणार नाही

💠💠
🎿अहमदनगर: थिंक ग्लोबल फाउंडेशनचा पहिला सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार लेखक व अर्थतज्ज्ञ अच्युत गोडबोले व लेखिका दीपा देशमुख यांना प्रदान

💠💠
🎿अंधेरी पश्चिमेतील डी. एन. नगरमध्ये सुमारे १ कोटी रुपये जप्त, सर्व नोटा नवीन चलनातील; तीन जणांना अटक

💠💠
🎿आदिवासी विभागाच्या खरेदीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची विधानसभेत मागणी

💠💠
🎿कवितेचा अभ्यासक, आस्वादक झालो म्हणून या पदापर्यंत पोहोचलो, आयुष्यभर माझे मन कवितेत राहिले म्हणून समाधानी: अक्षयकुमार काळे (अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष)

💠💠
🎿शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाही, ४ हजार कोटी रुपये विम्या कंपन्यांच्या घशात; विमा कंपन्यांकडून शासनाची फसवणूक झाल्याचा राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप

💠💠
🎿यंदाचे हिवाळी अधिवेशनात दोन्ही सदनांमध्ये मागील १५ वर्षातील सर्वात कमी काम झाले, लोकसभेत १५.७५ टक्के तर राज्यसभेत २०.६१ टक्केच काम झालं: सरकार

💠💠
🎿पुणेः नागपूर मेट्रोपेक्षा पुणे मेट्रोचे काम जलदगतीने करणार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांचा दावा

💠💠
🎿महाराष्ट्र केसरी विजय चौहानला एका आठवड्यात सरकारी नोकरी देणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

💠💠
🎿पुण्यात झालेल्या ६२व्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत ५६ किलो गटात कोल्हापूरच्या अंकिता शिंदेला सुवर्ण

💠💠
🎿ज्युनियर वर्ल्डकप हॉकी: भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून फायनलचे तिकीट पक्का केले, शूट आऊटमध्ये ४-२ने भारताचा विजय

💠💠
🎿पी. व्ही सिंधूने रिओ ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा वचपा काढला, स्पेनच्या कॅरोलिना मरिनचा दुबई सुपर सिरीजमध्ये २१-१७, २१-१३ने केला पराभव

💠💠
🎿भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना - नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसाखेर इंग्लंडच्या चार गडी बाद २८४/४ धावा, जडेजाने ३ तर ईशांतने एक विकेट घेतली.

मोबाईल चोर गुन्हेशाखेच्या जाळ्यात

सचिन पवार
औरंगाबाद:- मोबाईल चोरी करणार्‍या भामट्यास गुन्हेशाखेच्या पोलिसांनी 24 तासाच्या आत मुसक्या आवळल्या. भारत सुभाष टाकळे (28 रा.विजयंतनगर, देवळाई परिसर) असे या आरोपीचे नाव आहे. 

गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक प्रशांत आवारे व त्यांचे पथक गस्तीवर असतांना खबर्‍यामार्फत माहिती मिळाली की चौरंगी हॉटेल मधुन मोबाईल चोरणारा इसम काळा टी शर्ट व निळी जिन्स पॅन्ट अंगात घालुन शिवाजी नगर भागात वाणी मंगलकार्यालयाशेजारी उभा आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी हजर झाले. त्यांना त्या वर्णणाचा इसम आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेउन विचारपूस केली असता त्याने मोबाईल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याचा अभिलेख तपासला असता मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुढील तपासकामी आरोपीला मुकुंदवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले. सदरील कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रशांत अवारे, मच्छिंद्र ससाणे, योगेश गुप्ता, सिध्दार्थ थोरात, नंदलाल चव्हाण, धर्मराज गायकवाड, रमेश भालेराव आदींनी केली.

रिसोड येथिल मैत्रेय सर्व्हीस या कंपनीच्या संचालकावर कार्यवाही कधी होणार

महेंद्र महाजन
रिसोड:-विमा फायनान्स कंपनी चे अनेक बचत एजन्ट तयार केले आहे त्यांनी अनेक लोकांना दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिश  दाखवुन या कंपनी ने साडेसहा वर्ष मध्ये दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिश दाखवुन लाखो रुपये चा  विमा लोका कडून घेतल्या आहेत आज या फायनान्स कंपनी चे मुदत संपऊन दोन वर्ष झाले आहे तरी ही ग्राहकना त्यांनी गुंतवणूक केली आहे त्यांना आशा होती की आपण गुंतवणुक केल्याली रक्कम आपल्या केव्हा मिळाले याची आशा लागली आहे तसेच
         रिसोड मध्ये फायनान्स कंपनी चे 2008 जाळे पसरविले आशा संचालक कारवाई कधी होणार हा प्रश्न सरवान पदत आहे आशा खाजगी कंपनी वर करवाई झाली पाहिजे

अवैद्य धंद्यांच्या बातम्या प्रकाशित केल्याने जिंतूरात पत्रकारावर हल्ला

प्रदिप कोकडवार
पत्रकार बळीराम भराडे गावगुंडाकडून मारहाण
 जिंतूर:-तालुक्यातील वझर येथील दैनिक देशोन्नतीचे वार्ताहर *बळीराम भागोजी भराडे* यांनी देशोन्नतीमध्ये वझर परिसरात मोठ्या प्रमाणात चालत असलेल्या अवैध धंद्याच्या बातम्या प्रकाशित केल्याने वझर येथील गावगुंड भगवान सखाराम मते याने अवैध धंद्याच्या बातम्या का लावतोस हे निमित्त समोर करून बळीराम भराडेवर भ्याड हल्ला चढवल्याने ते गंभीर जखमी झाला असून बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे पत्रकारावर होणाऱ्या वारंवार हल्ल्याचा जाहीर निषेध तीव्र जिंतूर ता प्रेस क्लब आणि पत्रकार परिषद ने केला आहे या बाबत ता मध्ये वाढलेल्या अवैध धंद्या बाबत आणि या प्रकारा बाबत पो उप वि अधिकारी यांना पत्रकार संघटना भेटून कार्यवाही ची मागणी करणार आहेत

नगराध्यक्षांना तीन नवे अधिकार

नागपूर :नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपने आघाडी घेत सर्वाधिक 57 नगराध्यक्ष निवडून आणले. त्यानंतर आता सरकारने  नगराध्यक्षांच्या अधिकारामध्ये वाढ केली आहे. नगराध्यक्षांना आता तीन नवे अधिकार देण्यात आले आहेत.

या नव्या निर्णयामुळे जिथं भाजपचं संख्याबळ कमी आहे, अशा ठिकाणी भाजपला सत्तेचा गाडा हाकणं सोपं जाणार आहे.

नगराध्यक्षांच्या अधिकारामध्ये वाढ केल्याची घोषणा आज नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधानसभेत केली.

यंदा थेट जनतेमधून नगराध्यक्षांची निवड झाली. त्यामुळे नगराध्यक्षांना हे विशेष अधिकार देण्यात आले आहेत.

*नगराध्यक्षांचे नवे अधिकार*

1) पहिली सर्वसाधारण सभा बोलवण्याचा अधिकार (यापूर्वी हा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होता )

2) नामनिर्देशीत सदस्यांची नावं जाहीर करण्याचा अधिकार (म्हणजे नगराध्यक्षांच्या अनुपस्थितीत नामनिर्देशीत सदस्य कोण असणार हे ठरवण्याचा अधिकार नगराध्यक्षांना)

3) पीठासीन अधिकारी म्हणून काम बघण्याचा अधिकार

पेट्रोल,डिझेलच्या दरात मोठी वाढ

मुंबई:पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल प्रती लिटर 2 रुपये 21 पैशांनी महागलं आहे. तर डिझेलच्या दरात 1 रुपये 79 पैशांनी वाढ झाली आहे.

मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.

नोटाबंदीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात होईल, असा अंदाज लावला जात होता. मात्र पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवली जात होती. ती शक्यता आज खरी ठरली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर दुप्पटीने वाढले आहेत. त्यामुळेच पेट्रोल-डिझेल महागलं आहे.

जिवन विद्यामिशन सदगुरू श्री वामनराव पै प्रबोधन

राधेशाम वर्मा
सोनपेठ:-तालुक्यात एका स्टाँल द्वारे जीवनविद्या मिशन नवी मुंबई शाखेअंतर्गत उपकेंद्रा तर्फे ता. सोनपेठ जि परभणी येथे विश्वसंत सद्गुरु वामनराव पै यांची ग्रंथ संपदा ग्रंथदिंडी अभियाना मार्फात उपलब्ध करुन देण्यात आली तसेच प्रबोधन करण्यात आले.1952 पासून सद्गुरु सातत्याने व निरपेक्षपणे लोकांचे अज्ञान अंधश्रद्धा निराशावाद व दैववाद नष्ट करुन त्यांना सुख शांती समाधान सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने ग्रंथनिर्मीती व्याख्याने इ द्वारा समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत.दर रविवारी सकाळी 8 वा सह्याद्री वाहीनी वर सद्गुरुंची प्रवचने दाखवली जातात.त्यासाठी सद्गुरुंनी कधीही बिदागी रॉयल्टी गुरुदक्षिणा घेतली नाही.सद्गुरुंनी लहान मुले,विद्यार्थी,युवा,वैवाहीक जीवन,ज्येष्ठ नागरिक सर्वांना उपयुक्त तत्वज्ञान अत्यंत सोप्या भाषेत सर्वांना रुचेल अशा भाषेत लिहीले.अशा सद्गुरुंच्या ज्ञानाने सुखी झालेले नामधारक आज समाजातील प्रत्येकाला सुखी करण्या साठी हे ग्रंथ महाराष्ट्राच्या देशाच्या नव्हे विश्वाच्या काना कोप-यात ग्रंथदिंडी घेवून जातात..निरपेक्ष सद्गुरुंचे निरपेक्ष नामधारक!!! आपल्या पर्यत मुंबई वरुन ही ग्रंथ संपदा आणण्या साठी श्री भानुदास भोर,श्री वसंत पाटील,श्री चंद्रसेन धपाटे,भूषण सरदार,सुभाष सावंत तसेच श्री जालिंदर शेळके साहेब यांचे सहकार्य लाभले.यावेळी तालुक्यातुन अनेकांनी ग्रथ खरेदि करुन प्रचंड असा प्रतीसाद दिला.

वैद्यनाथ बँकेच्या त्या नोटांची चौकशी करा-धनंजय मुंडे

नागपूर, दि. 16 :- वैद्यनाथ बँकेच्या मुंबईत पकडलेल्या 10 कोटी रूपयांच्या नोटा बँकेच्याच आहेत का? बँकेच्या नावाखाली संचालक मंडळाचा, असा सवाल उपस्थित करत या काळ्या- पांढऱ्या नोटांची चौकशी करण्याची मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी केली आहे.

मुंबईत काल 10 कोटी रूपयांच्या पकडण्यात आलेल्या नोटांच्या संदर्भात प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले की, सदर बँकेची मुख्य शाखा परळी वैजनाथ, जि.बीड येथे असताना इतकी मोठी रक्कम मुंबईला नेण्याचे कारण काय? बँकांची रक्कम बँकेच्या गाडीतून घेऊन जाण्याऐवजी ती खाजगी गाडीतून घेऊन जाण्याचे प्रयोजन काय? एवढी मोठी रक्कम घेऊन जात असताना सुरक्षा रक्षकाची का भासली नाही?, असे प्रश्न उपस्थित केले. पकडण्यात आलेली रक्कम वैद्यनाथ बँकेची होती की? त्यांच्या चेअरमन, संचालकांची ?, असा खोचक सवाल उपस्थित करतानाच या संपूर्ण प्रकरणाची निपक्षपणे चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. या प्रकरणात बँकेच्या सामान्य कर्मचाऱ्यांना बळी दिला जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.