तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Saturday, 24 December 2016

वैजापूर ग्रामिण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी शांताराम मगर

प्रतिनिधि

वैजापूर:-बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनी औरंगाबाद जिल्ह्यात अनेक पदाधिकाऱ्यांची निवड घोषित  केली असुन यामध्ये बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वैजापुर ( ग्रामीण )
तालुकाध्यक्षपदी शांताराम मगर यांची निवड करण्यात आली.
निवडीबद्दल राज्य उपाध्यक्ष सुनील गीते, भगवान जाधव, अशोक पाटील, सचिव नरेंद्र पाटील, सोलापूर जिल्हाध्यक्ष कल्याण कुसुमडे व वैजापुर तालुक्यातील ग्रामीण व शहर पत्रकार संघाकडून शांताराम मगर यांच्या निवडीबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Friday, 23 December 2016

२३ डिसेंबर राष्ट्रीय 'किसान दिन'


जगभरात कृषि प्रधान देश अशी ओळख असलेल्या भारतातील शेतकर्यांचची जगातील कृषीशी निगडीत असलेल्या क्षेत्रातात प्रगति की अधोगती सुरू आहे. शेती उद्योगाला गती देण्यासाठी शेतकर्याससाठी कृषि व्याख्याने,या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्याश व्यक्तींचा सत्कार,कृषि प्रदर्शन,मेळावे आदि उपक्रम राबवणे गरजेचे आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचा राष्ट्राच्या उत्पन्नात शेतीचा वाटा हा पन्नास टक्यांच्या आसपास होता.तो आज २२ ते २५ टक्याच्या आसपास आला आहे. आज समाजातील विविध घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करते.मात्र देशाचा व जगाचा पोशिंदा अशी मोठी बिरुदावली असलेल्या शेतकरी व शेतीच्या प्रगतीसाठी, शेतीमालच्या दरवाढीसाठी, शेतकर्याटची आर्थिक,सामाजिक स्थिति सुधारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होतात का हाही संशोधनाचा विषय आहे. आज देशात राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा होत असताना देशभरातील शेतकरी राजाची सध्याची स्थिति, त्यांचा आर्थिक स्तर, सामाजिक पत, त्यांना समाजाकडून मिळणारी वागणूक आदि बाबीचा विचार करणे यानिमित्ताने गरजेचे आहे. सरकारे आली पुन्हा बदलली मात्र शेतकरी राजाची परस्थिती मात्र जैसे थे अश्याच स्वरूपाची असते.  राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निमिताने शेतकर्याचची आर्थिक ऊंची वाढवण्यासाठी शेतीच्या पारंपारिक पद्धतीत बदल सुचवणे, ते अमलात आणण्यासाठी त्यांना तयार करने व विशेष म्हणजे शेतकरी सद्य स्थितीत भेदरलेल्या व कर्जबाजारी अवस्थेत असल्यामुळे त्याला उभे करण्यासाठी अर्थ पुरवठा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शेतकरी उभा राहिला तरच देश प्रगतीची शिखरे पार करू शजेल.
*शेतीच्या क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ला मोठी संधी आहे.* त्याकरिता तंत्रज्ञानाचा विकास व गुंतवणुकीची गरज आहे. आज जो शेतीचा थोडा फार विकास झाला आहे. त्याला मोठय़ा प्रमाणात यांत्रिकीकरण कारणीभूत आहे. १९६५-६६ सालापर्यंत शेतीतील यांत्रिकीकरणाने गती घेतलेली नव्हती. शेती ही पारंपरिक पद्धतीने माणसाची मेहनत व कष्ट तसेच बलांच्या साहाय्याने केली जात होती. नांगर, वखर, पाभर, नांगरी ही बल मशागतीची साधने, तर पाणी उपसण्यासाठी मोटांचा वापर होत होता. त्यामुळे त्या वेळी शेतीत उत्पादकताही कमी होती. लोकांच्या भुकेचा प्रश्न ही शेती सोडवू शकली नाही. पहिल्या दोन पंचवार्षकि योजनांमध्ये भर देऊनही कृषी यांत्रिकीकरणाला गती मिळाली नाही. मात्र हरितक्रांतीनंतर हे चित्र बदलले. त्यातून उत्पादकता वाढीस लागली. बहुपीक पद्धती आली. शेतीविकासाला खरी गती विजेच्या वापरामुळे मिळाली. मोटा गेल्या, विजेचे पंप आले. त्याने पिकांचा पाणीपुरवठा गतिमान झाला. देशात कृषी यांत्रिकीकरण २२ टक्के आहे. त्यापकी पंजाबमध्ये ते सर्वाधिक ७५ टक्के एवढे आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र पिछाडीवर आहे. आता पिकाला पाणी देण्याकरिता यांत्रिकीकरणाची गरज सर्वाधिक आहे. दुर्दैवाने ठिबक व स्प्रिंकलरच्या अवघ्या ४० कंपन्या आहेत. मात्र असे असले तरी आयएसआय मानांकन नसलेल्या हजारांहून अधिक ठिबक व तुषारच्या कंपन्या आहेत. आयएसआय असलेल्या ठिबकला अनुदान मिळते, इतर कंपन्यांच्या ठिबकला सरकार अनुदान देत नाही. असे असूनही शेतकरी आता या कंपन्यांकडे वळले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील आयएसआय ठिबक मक्तेदारी असलेल्या कंपन्यांपुढे संकटे आली आहेत. पूर्वीचे दोष दूर झाल्याने शेतकरी ठिबककडे वळले आहेत. त्यात जमिनीखालचे ठिबक, रेन पाइप, रेन गन, मिनी स्प्रिंकलर हे तंत्र आले आहे. या तंत्राने पाणीवापर कमी होत असून जास्त उत्पादन निघत आहे. पावसाचे पडलेले पाणी तळ्यात साठविले जाते, तळ्यात ५०० मायक्रॉनचा प्लास्टिक कागद वापरला जातो. पडलेले पाणी पकडून ते जमिनीत मुरवण्याऐवजी थेट पिकाला दिले जाते. पॉली हाऊस, ग्रीन हाऊसची संख्या वाढत आहे. अत्यंत आशादायी असे चित्र निर्माण होत असले तरी अद्याप काही ठरावीक कंपन्यांची मक्तेदारी या क्षेत्रात असून त्यामुळे स्पर्धा न झाल्याने दर कमी झालेले नाहीत. जर गुंतवणूक वाढली, नवे उद्योग उभारले गेले, तर बंदिस्त शेतीला अधिक चांगले दिवस येतील. शेतीत माती परीक्षण व पाणी परीक्षण याला महत्त्व आहे. यापूर्वी केवळ माती परीक्षणाच्या सरकारी प्रयोगशाळा होत्या. आता खासगी प्रयोगशाळा आल्या आहेत. नाशिक जिल्ह्य़ातील द्राक्ष बागायतदारांनी पाने तपासणीच्या प्रयोगशाळा उभारल्या आहेत. विशेष म्हणजे पिकावर कीड व करपा येतो. कोणता रोग आला हे तपासणाऱ्या प्रयोगशाळा कृषी विद्यापीठांमध्ये नाहीत, पण त्या शेतकऱ्यांकडे आहेत. त्याकरिता लागणारी यंत्रणा ही आयात करावी लागते. देशात त्याचे उत्पादन झाले तर किडीमुळे होणारे नुकसान टळून रसायनांचा वापर कमी होईल. आता संगणकाचा वापर शेतीत वाढला आहे. परदेशात शेतकरी हे संगणकाच्या साहय़ाने पिकांना खते व पाणी देतात. खासगी कंपन्यांचे तंत्रज्ञान त्याकरिता घेतले जाते. ते तंत्रज्ञान महागडे आहे. ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात त्यावर जोर दिला तर मात्र वेगळे चित्र पाहायला मिळेल. आज देशात एकही कीटकनाशक व बुरशीनाशक तयार होत नाही. हजारो कोटी रुपयांची ही बाजारपेठ आहे. त्याकडे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने लक्ष दिलेले नाही. ते जर आपल्याकडेच तयार झाले तर परदेशी चलन वाचू शकेल. आज काढणीपश्चात तंत्रज्ञानही विकसित झालेले नाही. प्रक्रिया क्षेत्रातही आपण पिछाडीवर आहोत. भात, डाळी, तेल व साखर एवढेच उद्योग त्यात आहेत. अन्य शेतमाल प्रक्रिया उद्योगाचे तंत्रज्ञान उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. आज जगात रोबोटिक टेक्नॉलॉजी, ड्रोन, पॉलिफोनिक, गार्डनर, एरोपॉनिक व हायड्रोएरोपॉनिक हे तंत्र आले आहेत. त्यामुळे भविष्यात शेतीचा प्रवास एका नव्या दिशेने होणार आहे. भविष्यात जागतिक तापमानवाढ, पाणीटंचाई, हवामानबदल या पाश्र्वभूमीवर कृषी अभियांत्रिकीचा वाटा अधिक असणार आहे; पण त्याकडे संशोधन संस्थाच दुर्लक्ष करीत आहे. आíथक गुंतवणूक न येण्याचे ते कारण आहे. हे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा परिस्थितीत कृषी क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ हे केवळ स्वप्न ठरू नये म्हणून प्रयत्न होणे गरजेचे आहे.

उघड्यावर कचरा जाळला तर होणार दंड

राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) देशभरात रस्त्यावर, उघड्या ठिकाणी कचरा जाळण्यावर निर्बंध लावले आहेत. यासंबंधीचा आदेश गुरुवारी जारी करण्यात आला आहे. इतकंच नाही तर या आदेशाचं उल्लंघन करणा-यांना २५ हजारांचा दंड लावण्यात येणार आहे. लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा आदेश दिला आहे. अलमित्रा पटेल यांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हा आदेश देण्यात आला.

सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना घनकचरा व्यवस्थापन नियमांचं सक्तीने पालन करण्याचा निर्देश राष्ट्रीय हरित लवादाकडून देण्यात आला आहे. यासाठी पर्यावरण मंत्रालयचाही मदत मागण्यात आली आहे. लवादाने मंत्रालय आणि राज्य सरकारांना पीव्हीसी आणि क्लोरिनेटेड प्लास्टिकवर सहा महिन्यांमध्ये बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. या प्लास्टिकचा वापर पीव्हीसी पाइप आणि प्लास्टिकच्या बाटल्या तयार करण्यासाठी उपयोग होतो. 

'सर्व राज्य सरकारांना नियमांनुसार चार आठवड्यांमध्ये कृती आराखडा तयार करण्यास सांगण्यात आलं आहे. त्यात राज्यातील घनकचरा निर्मूलनासाठीचा आराखडा द्यावा लागेल', असं लवादाने सांगितलं आहे.

नागपूरच्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार

नागपुरच्या बुटीबोरी पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या होलीक्रॉस आर्शमशाळेत एका ६ वर्षीय बालकावर अनैसर्गिक कृत्य तर २ अल्पवयीन मुलींसोबत विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुटीबोरी पोलिसांनी शाळेच्या चौकीदारासह, मुख्यध्यापिका, संस्थाचालक आणि वार्डनवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल  केला आहे. 

राज्यातील आश्रमशाळांमधील वाढत्या लैंगिक शोषणांच्या घटना ताज्या असतानाच नागपुरात हादरा देणारी बातमी पुढे आली आहे. बुटीबोरी पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या होलीक्रॉस आश्रमशाळेत एका अल्पवयीन बालकावर सातत्याने लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उजेडात आली.

याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार सदर पीडित मुलगा हा होलीक्रॉस शाळेतील सहाव्या इयत्तेत शिकतो. तसेच याच शाळेच्या वसतिगृहात तो वास्तव्याला आहे. या शाळेतील चौकीदार होमदेव पडोळे याने या बालकावर काही दिवसांपूर्वी अनैसर्गिक अत्याचार केला. तसेच यासंदर्भात कुणाला सांगितल्यास तुला ठार मारील, अशी धमकी दिली.

शिक्षणासाठी घरापासून लांब राहणारा हा चिमुकला या घटनेमुळे घाबरून गेला. काल त्याचे वडील त्याला भेटण्यास आल्यावर पीडित चिमुकल्याने वडिलांना घडलेली सर्व हकीकत सांगितली.

या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतरही होलीक्रॉस शाळेने आरोपीच्या विरोधात कुठलीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे शाळेतील महत्त्वाच्या लोकांचे आपसात संगनमत असल्याचे निदर्शनास येताच पीडित मुलाच्या वडिलांनी बुटीबोरी पोलिसात तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपी चौकीदार होमदेव पडोळे, शाळेच्या मुख्याध्यापिका पल्लवी पाटील, वॉर्डन अभिलाषा साठे  आणि संस्थाचालक अरुण भुसकुले यांच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांन्वये गुन्हा दाखल केला.

या घटनेच्या निषेधार्थ काल आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाळेत जावून विचारपूस केली असता २ मुलींनीही त्यांच्यासोबत विनयभंग झाल्याची कबूली दिली. त्यामुळे शाळेतील बाकी विद्यार्थिनींवर ही लैंगिक शोषणाचा प्रकार झाला, असा प्रश्न निर्माण होतोय एकंदरीतच या घटनेने पुन्हा एकदा राज्यातील आदिवासी शाळा आणि वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर टांगला आहे.

माजी न्यायधिशाला ३ वर्ष तुरुंगवास

⭕ब्रेकिंग न्यूज;

पुणे-अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी माजी न्यायाधीशाला शिक्षा

माजी न्यायाधीश नागराज शिंदे ला ३ वर्ष तुरुंगवास

तसेच १० हजार रूपयांचा दंड

अखेर पीडित मुलीला मिळाला न्याय

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी धूमाकूळ घालत ४०-५० ट्रक पेटवले

गडचिरोली:- जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर गेल्या तीन महिन्यांपासून लोह खनिज उत्खननाचं काम सुरु होतं. मुंबईतील लायड अँड मेटल नावाच्या कंपनीला सरकारने २००७ साली लीज देण्यात आली होती. मात्र, या प्रकल्पाला नक्सलवाद्यांनी तीव्र विरोध केला होता.

काही वर्षांपूर्वी याच पहाडीजवळ नक्षलवाद्यांन लायड कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या केली होती. त्यानंतर २०१६ ला भाजप सरकारने हा प्रकल्प पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या तीन ते चार महिन्यांपूर्वी लायड या कंपनीने सुरजागड पहाडीवर उत्खनन सुरु केले होते.

लायड कंपनीने सुरु केलेल्या उत्खननाचा स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता आणि नक्षलवाद्यांनीही या प्रकल्पाचा विरोध केला होता. त्यानंतर आज दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान गणवेशधारी नक्षलवाद्यांनी लोह खनिजाची वाहतूक करणाऱ्या तब्बल ४० ते ५० ट्रक दिले पेटवुन

मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत शहरा पासून ५० किमी रस्त्यांच्या कामांना निरूपयोगी प्लास्टीक बंधनकरारत-पंकजा मुंडे


मुंबई दि.23 : राज्यात मुख्यमंत्री  ग्रामसडक योजनेंतर्गत घेण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामापैकी जी कामे 5 लक्ष लोकसंख्येच्या शहरापासून 50 कि.मी. त्रिजेच्या आत येतात अशा रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामात निरुपयोगी प्लास्टीकचा वापर बंधनकारक करण्यात येणार असून त्यापेक्षा जास्त अंतरासाठी काम केल्यास त्याचे स्वागतच करण्यात येईल असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

   सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत निरुपयोगी प्लास्टीकचा वापर या संबंधित आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.  यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव विवेक नाईक, उप सचिव रघुनाथ नागरगोजे यांच्यासह मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.  

   ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, राज्यातील व देशातील वाढते शहरीकरण व त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारा प्लास्टीक घनकचरा व घनकचऱ्याची सुरक्षितपणे विल्हेवाट करण्यासाठी निर्माण होणारे पर्यावरणविषयक प्रश्न तसेच रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात निरुपयोगी प्लास्टीकचा वापर केल्याने रस्त्याच्या टिकाऊपणामध्ये होणारी वाढ, शहरांच्या गटारातील प्लास्टीक निघाल्यामुळे गटारे तुंबणार नाहीत. रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा निरुपयोगी प्लास्टीकचा वापर केल्यास 8 ते 10 टक्के बचत होऊ शकते. यामुळे केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानेही पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कामातही उष्णमिश्रीत डांबरीकरणात निरुपयोगी प्लास्टीकचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
प्लास्टीक जमा करुन त्यावर प्रक्रिया करणाऱ्या महिला बचत गटांचा समावेश केल्यास महिला बचत गटांना रोजगार निर्माण होऊ शकतो. यासाठी महिला बचत गटांना या प्रक्रियेत आणण्याचा प्रयत्न करण्यात यावा असेही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी निर्देश दिले. 

'कॅशलेस'च्या भानगडीत ग्राहकांना चूना !


जळगाव -देशभरात सध्या कॅशलेस 
सेवासुविधांचा बोलबाला सुरु असताना जळगावात मात्र याच कॅशलेस व्यवहारातून एका महिला ग्राहकाची फसवणूक झाल्याची घडली घटना

आशिष शिंदे यांनी डॉमिनोज पिझ्झा येथून पिझ्झा, कटलेटसह इतर पदार्थांची ऑर्डर दिली. शिंदे यांचे एक हजार १८५ रुपयांचे बिल झाले, स्वॅप मशीन बंद असल्याने डॉमिनोज मधील कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या लिंकवर ऑनलाईन पेमेंट करण्यास सांगितले, त्यानुसार शिंदे यांनी पत्नीच्या आयसीआय बँकेतील खात्यातून पैसे अदा केले. मात्र पेमेंट झाले नसल्याचे कारण सांगून पुन्हा त्यांना पेमेंट करण्यास सांगितले. त्यामुळे शिंदे यांच्या पत्नीने पुन्हा एक हजार १८५ रुपयांचे पेमेंट केले. असे दोन वेळा पेमेंट केल्याने त्यांच्या खात्यातून दोन हजार तीनशे सत्तर रुपये विड्रॉ झाले. 

दुसऱ्या दिवशी शिंदेनी बँकेत जाऊन खात्यातील रक्कमेची माहिती घेतली असता त्यांच्या खात्यातून वीस हजार, पाच हजार, आणि नऊ हजार असे ऑनलाईन विड्रॉ करून एकूण ३४ हजार रुपयांची रक्कम परस्पर खात्यातून काढण्यात आल्याचं लक्षात आले

त्यामुळे शिंदे यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार अर्ज दिला असून या प्रकरणी चौकशी सुरु आहे.पोलिसांत तक्रार देऊन अजूनही ठोस कारवाही केलेली नाही. नोटबंदीनंतर देशात कॅशलेस व्यवहाराचे वारे वाहू लागले आहेत

मोबाईल डेबिट कार्डद्वारे साधा भाजीवालाही पेमेंट स्वीकारत आहे. मोबाईलवर विविध कंपन्यांनी अॅप कार्यान्वित केले आहे. नागरिकही आता हळूहळू कॅशलेस व्यवहाराकडे वळू लागले आहेत, मात्र अशा प्रकारे ऑनलाईन खरेदीद्वारे फसवणूक होण्याचेही प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने कॅशलेस पद्धतीने व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत

'इस्रायल'च्या मदतीने "कमवा व शिका" योजना-फुंडकर

महाराष्ट्रात कृषी क्षेत्रात नवनवीन प्रकल्प राबविण्यासाठी राज्य शासन व इस्त्रायलच्या सहकार्याने ‘कमवा व शिका’ योजना सुरु करून विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण देण्याबाबत विचार करण्यात येत आहे, अशी माहिती कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिली. मंत्रालयात आज इस्त्रायलच्या शिष्टमंडळाने कृषिमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त भागामध्ये इस्त्रायलच्या सहकार्यातून कृषिविषयक प्रकल्प राबवावेत. तसेच खारपाण पट्ट्यामध्ये क्लायमेट रेझिलियंट तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे कृषी मंत्री श्री.फुंडकर यांनी सांगितले.

प्रा डॉ कच्छवे यांची कुलगुरू मार्फत निवड

राधेशाम वर्मा
सोनपेठ:-येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. मारोती कच्छवे यांची अभ्यासक्रम तयार करण्यासाठी स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डाँ.पंडीत विद्यासागर यांच्या मार्फत निवड झाली असून वाणिज्य पदवीच्या तृतीय वर्षातील " बँकीग अँड फायनान्स "  या विषयाचा अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर विद्यापीठाने सोपवली आहे. याबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम, माजी आ. व्यंकटराव कदम, प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते, व सर्व प्राध्यापक,प्राध्यापीका व शिक्षकेत्तर कर्मचारी आदिजनांन कडून अभिनंदन करण्यात येत आहे.तसेच सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्शाव होताना दिसत आहे.

सोनपेठकरांची चाकरवाडीला महापंगत सोहळा

राधेशाम वर्मा
सोनपेठ:- तालुक्यातून प्रती वर्षा प्रमाणे वर्ष १६ वे ह.भ.प.वै.ज्ञानेश्वरमाऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या दरबारात मार्गशीष व दर्शवेळा अमावस्यादि.२९ डिसेंबर गुरुवार रोजी सोनपेठ तालुक्यातून भाविक-भक्तांच्या वतीनेमहापंगतीचे आयोजन करण्यात आले आहे,तरी भाविक-भक्तांना कळविण्यात अत्यंतआनंद होतो कि महापंगती साठी अन्न-धान्य जमा करण्याचा सुसंकल्प भक्तजणांनी केला आहे तरी दि.२८ डिसेंबर बुधवार रोजी पर्यंत धान्य चाकरवाडीलापोहचविण्याची जबाबदारी खालील भक्तांनी स्वीकारली आहे तसेच भाविक-भक्तांनाया संधीचा लाभ व्हावा व फुल ना फुलाची पाकळी म्हणून यथाशक्ती अन्नदानकरण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधून आपण हि सत्कार्यासाठी सहकार्य करालसंपर्क मा.आ.व्यंकटराव कदम,भागवताचार्य श्री कृष्ण महाराज जोशी,दत्तात्रयभाडूळे पाटील,विठ्ठलराव पुरबुज,अरुणराव लांडे,सुर्यकांत (नाना)वडकर,मल्लिकार्जुन सौंदळे,निवृत्तीसा बोबडे,मार्तंडराव जोजारे,रमाकांतदेशमुख डिघोळकर,उमेशअप्पा महाजन,ज्ञानेश्वर गर्जे आदींशी साधावा असेआवाहन अखंड अभिषेख व महाप्रसाद मंडळ श्री औदुंबर दत्त मंदिर समितीने केलेआहे.

सोनपेठ येथील सर्व बँक व्यवस्थापक व रोखपालांची नार्को टेस्ट करा


राधेशाम वर्मा
सोनपेठ:-शहरातील सर्वच राष्ट्रीय कृत  बँक जसे हेद्राबाद स्टेट बँक,भारतीय स्टेट  बँक व महाराष्ट्र ग्रामीण  बँक या सर्वच ठिकाणी ५००व १००० रुपये बदलण्यासाठी तसेच आपली जमा रक्कम काढण्यासाठी दररोज गर्दीउसळत आहे,ग्राहकांना पिण्याचे पाणी नाही कि सूचना फलक लावलेले नाहीतग्रामीण भागातील ग्राहक तासनतास लाईन मध्ये उभे राहून रोखपाल विविध कारणसागुण ग्राहकांना वेटीस धरत आहेत शेवटी व्यवस्थापक यांना बोला म्हणून वेळमारून न्हेत आहे,प्रस्तुत प्रतिनिधी जात-मोक्यावर जावून अनेक ग्राहकांशीहितगुज करत असताना व्यवस्थापक पोलिसांना प्रचारान करून ग्राहकांना उचलूनपोलीस स्टेशन ला घेवून जात आहेत एक सामाजिक कार्यकर्ता जेव्हा पोलीसप्रशासनाला जाब विचारतो कि सी.सी.ती.व्ही फुटेज पाहून गुन्हा दाखल करूतेव्हा त्या ग्राहकाला पोलीस प्रशासन सोडून देत आहे याचा अर्थ ग्राहकबोलताना म्हणतात कि पोलीस प्रशासन देखील या मध्ये सामील आहे त्यांनापाहिजे तेवड्या नोटा बदलून तसेच रक्कम मिळत असल्यावर या व्यवस्थापकालाआयते मोकळे रान मिळत असून आपले हित-संबंध जोपासून कामाच्या वेळेच्या नंतरकाही व्यापारी लोकांना नोटा-बदलून अथवा रक्कम वितरण होत आहे,याव्यवस्थापकाचे काळे धंदे लपवण्यासाठी रोखपाल याला हि आपले हित-संबंधजोपासण्यास मोकळीक मिळत आहे असे ग्राहकात बोलल्या जात आहे,याव्यवस्थापकाची व रोखपाल ची नार्को टेस्ट घेतल्यास दुध का दुध व पाणी कापाणी होईल अशी ग्राहकात चर्चा आहे संबंधित अधिकारी दखल घेवून हे शुभकार्य करतील का? असा सवाल ग्राहकांना सतावत आहे हे जाणून-बुजून कृत्रिमटंचाई दाखवून ग्राहकांच्या रोषास बळी पडत आहेत,त्यांना पोलीस प्रशासनाचीसाथ मिळाल्याने सर्व सामान्य ग्राहक आपल्या आब्रूला घाबरून कोठेही वाछताकरत नाहीत त्याचा गैरफायदा या दुकडीलामिळताना दिसत आहेत.सर्वत्र सूचनाफलक लावले तर सर्व ग्राहक एकमेकांशी हितगुंज करून त्या पद्धतीने व्यवहारकरतील परंतु सूचना फलक नसतील तर मार्गदर्शन कोणी करायचे असा सवालग्राहकातून विचारला जात आहे,शेवटी आपलेच पैसे कुणाची रजिस्ट्री,कोणाचेलग्न,कोणाचे घर बांधकाम,कोणाचे व्यापार म्हणून शेवटी अच्छे दिन आणे वालेहे म्हणून वाट मोकळी करताना ग्राहक दिसत आहे.वरिष्ठ अधिकारी यांची नार्कोटेस्ट घेणार का ? यांची चौकशी करणार का ? यांना दंड करणार का ? असे अनेकसवाल ग्राहक करताना दिसत आहेत.