तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 31 January 2017

सासूने भरला जावायाचा दंड


विनोद तायडे
वाशिम:-मालेगाव तालुक्यात गुडमोरिंग पथक गावोगाव जाऊन उघड्यावर शौच कारणार्यावर धडक कार्यवाही करत आहेत. मालेगावात तालुक्यातील जामखेड येथे  खैरखेडा येथील देविदास लठाळ पाहुणा म्हणून आलेल्या जावायावर  जामखेड येथे  उघड्यावर शौच करणे महागात पडले .गुड मॉरिंग पथकाने   दि 31 जानेवारी ला पहाटे 5 वाजता  उघड्यावर शौच करताना  जावई देविदास लठाळ याना रंगेहात पकडले जावायाला 1200 रुपये दंड भरण्याचे सांगताच त्याने गुडमोरिंग पथकाशी वाद घातला . गुड मॉरिंग पथकाने त्यांना जऊळका पोलीस स्टेशन ला नेले .घटनेची माहिती सासूला होताच सासू त्वरित पोलीस स्टेशला पोहचल्या. गुड मॉरिंग पथकाची विनवणी करू लागल्या . जावायाजवळ दंड भरण्यासाठी पैसे नसल्याने सासूने उधार पैसे घेऊन जावायाचा 1200 रुपये दंड भरून जावायाची पोलीस स्टेशन  मधून सुटका करून घेतली .जावायानो सावधान सासुरवाडीत उघड्यावर शौचास बसाल  तर  गुडमोरिंग पथकाच्या तावडीत सापडाल तुमच्यावर हि देविदास लठाळ सारखी पंचाईत  होण्याची वेळ येईल  . सदर कार्यवाही गुड मॉरिंग पथकाचे विजय नागे ,ग्रामविकास अधिकारी आर टी राऊत,ग्रामसेवक दिलीप वाहोकार,चंदू पडघाण,सोनल इंगळे,एस डी राऊय आदींनी केली

मराठा समाजाचा आंदोलनात आ विजय भांबळे सहभागी

प्रदीप कोकडवार
जितुर:-जिंतूर येथे आरक्षण च्या मागणी साठी येथील नांदेड-जालना रोड वर साठे चौकात सकाळी ११ ते १ वाजे पर्यन्त चक्का जाम आंदोलन करुन मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाच्या महिला पुरुष व युवक एकत्र आले होते या वेळी विशेष म्हणजे आमदार विजय भांबळे हे देखील उपस्थित होते आंदोलन ठिकाणी पोलीस बन्दोबस्त ठेवण्यात आला होता
    सर्व प्रथम जिजाऊ वन्दना करण्यात आली शिंदे सैनिक,बाळू काजळे, प्रभाकर लिखे, बालाजी  शिन्दे शिवानी घोरपड, बाळू काजळे, यांनी मनोगत वयक्त केले या वेळी तहसीलदार बोरगवकर, उपविभागय पोलिस कांबळे पोलिस निरक्षक शेख उस्मान अदी हजर होते

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आपली भूमिका मांडणार

मुंबई:-मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आपली भूमिका मांडणार आहेत. उद्या दादर, शिवाजी मंदिर मध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे, त्यावेळी राज ठाकरे आपली भूमिका मांडणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, शिवसेनेशी युती करण्याच्या घडामोडींवर राज ठाकरे पहिल्यांदाच भाष्य करणार आहेत. मनसे कडून उमेदवारांची यादी घोषित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेने युती करण्याचे फेटाळल्या नंतर आज दिवसभर राज ठाकरे यांनी इच्छुकांशी साधला संवाद साधला. महापालिका निवडणुकीत मनसे आता काय भूमिका घेते याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे. पक्षात सुरु असलेल्या नगर सेवकांच्या गळतीवर राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

पदवीधर मतदारांना मतदानासाठी तीन तासांची सुट्टी

·        पदवीधर विधान परिषद निवडणूक

·        खाजगी आस्थापना कामगार, कर्मचारी यांना सुविधा

    बुलडाणा दि‍.31 - अमरावती विभाग पदवीधर विधान परिषद मतदारसंघ निवडणूक 2017 जाहीर झाली आहे. या निवडणूकीसाठी 3 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीत मतदानासाठी 3 फेब्रुवारी 2017 रोजी पदवीधर मतदारांनी मतदान करण्यासाठी खाजगी आस्थापनावर असलेल्या कामगार व कर्मचारी यांना तीन तासाची सुट्टी देण्यात येणार आहे. तरी खाजगी आस्थापनांनी तीन तासांची कामगारांना सुट्टी द्यावी. याबाबत जिल्हाधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आदेश दिले आहेत

जय वैष्णवी माता एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सारोळा जि.प.शाळेत डिजिटल क्लास रुमचे उदघाटन संपन्न

कार्तिक पाटील
पाथरी- तालुक्यातील खेर्डा येथील जय वैष्णवी माता एज्युकेशन सोसायटीच्या वतीने जि.प.प्रा.शाळा सारोळा येथे डिजिटल क्लास रूमचे उदघाटन दि.30 जानेवारी 2017 रोजी संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक आबुज होते.प्रमुख पाहुणे म्हणून कैलास लोखंडे हे होते.
जय वैष्णवी माता एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पहिली डिजिटल क्लास रूम खेर्डा जि.प.शाळेत सुरू करण्यात आली आहे.यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकावर वेगवेगळ्या विषयांचे योग्य असे मार्गदर्शन त्याचप्रमाणे इग्रंजी विषयाची भिती शिक्षकांकडून दुर होत आहे.त्याबरोबरच विज्ञानाचे प्रयोगही संगणकावर शिकताना विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी निर्माण होत आहे.
या धर्तीवरच सारोळा जि.प.शाळेत जय वैष्णवी माता एज्युकेशन सोसायटीच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या वतीने डिजिटल लर्निंग पर्वाला सुरूवात झाली आहे.या डिजिटल क्लासरुम मुळे विद्यार्थ्यांना अॅनिमेटेड अभ्यासक्रम तसेच संगणकाच्या माध्यमातून सर्व शालेय विषयाचे आकलन होण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालासाहेब लांडगे,नारायण सिताफळे,अमोल आम्ले,संतोष व-हाडे,मगर जी डी,लक्ष्मण वैराळे,गंगाधर आव्हाड,विष्णू पंत यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खांदे ए ए यांनी,प्रास्ताविक संस्थेचे सचिव शरद सदाफळे यांनी केले.तर आभार शाळेचे मुख्याध्यापक बद्दे एस एच  यांनी मानले.
यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी व गावातील नागरिक उपस्थित होते.

पुर्णा तालुक्यात चक्काजाम आंदोलनाला अभुतपूर्ण प्रतिसाद

दिनेश चौधरी
पुर्णा/ तालुक्यातील झिरोफाटा या ठिकाणी हजारोच्या संख्येत जमलेल्या सकल मराठा समाजाच्या वतीने आज मंळवार दि 31जानेवारी रोजी सकाळी 11 ; 00 वाजेच्या सुमारास चक्काजाम आंदोलन करण्यात आले,सदरील आंदोलन अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध पध्दतीने तालुक्यातील तमाम मराठ समाजाने या आंदोलनात सहभाग नोंदवला 'एक मराठा लाख मराठा,जय जिजाऊ जय शिवराय या गगनभेदी घोषनांनी अवघा झिरोफाटा परिसर दुमदूमला होता आरक्षण प्रश्नावर मराठा समाज बांधवांनी राजकीय पक्ष,संघटना,गट,तट मतभेद बाजुला ठेऊन सदरील चक्काजाम आंदोलनात स्वयंस्फृर्तीने सहभाग नोंदवल्याचे यावेळी दिसून आले यावेळी तालुक्यातील ताडकळस येथील शहीद जवान बालाजी अंबोरे यांना श्रद्धांजली ही अर्पण करण्यात आली मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे,नगर जिल्ह्यातील कोपर्डी प्रकरणातील नराधमांना लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी,स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागु करुन शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे आदींसह अन्य विस मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यात सर्वञ चक्का जाम आंदोलन असल्याने रस्त्यावर तुरळकच वाहने दिसत होती सदरील आंदोलन तब्बल दोन तास चालले यावेळी मराठा समाजास आरक्षणाची आवश्यकता का आहे यावर साहेबराव कल्यानकर व कुंडलीक जोगदंड,निळकंठ पारवे,बाळासाहेब काळे,बालाजी टोपे यांनी मार्गदर्शन केले यावेळी आंदोलकांच्या वतीने देण्यात निवेदन शासनाच्या वतीने मंडल अधिकारी व पुर्णा पोलीस स्थानकाचे पो.नि.एस.आर.कोल्हे यांनी स्विकारले सदरील आंदोलन शांततेत पार पडावे याकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी ए.जी.खान,पो.नि.एस.आर.कोल्हे यांनी महत्वाची भुमीका बजावली आंदोलन यशस्वी करण्यासाठी सुहास कदम,खुशाल किरडे,गणेश शिंदे बरबडीकर,कुंडलीक जोगदंड,कैलास पारवे गौरकर,आदींनी विशेष परिश्रम घेतले यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने लोकमत या वृत्तपञाची होळी करुन निषेध करण्यात आला

130 लग्न आणि 203 मुलं असणार्या मौलानाचा मृत्यु.


नायजेरियातील मौलवी मोहम्मद बेलो अबूबकर यांचं वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं. एका खास कारणासाठी त्यांचं नाव नेहमी चर्चेत होतं. त्यांनी एकूण 130 महिलांशी लग्न केलं  होतं. लग्न करणं हे पवित्र आहे आणि त्यासाठीच मला या जगात पाठवण्यात आलं आहे' असं त्यांचं म्हणणं होतं. आजारपणा मुळे त्यांचं शनिवारी निधन झालं. मात्र, त्यांना कोणत्या आजाराने ग्रासलं होतं हे कळू शकलं नाही.   डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसां पासून बेलो आजारी होते आणि शेवटचा श्वासत्यांनी आपल्या राहत्या घरीच घेतला. ''कोणताही पुरूष जेवढे हवे तेवढे लग्न करू शकतो असं कुराणामध्ये म्हटलं आहे'' असं ते मध्यंतरी म्हणाले होते. त्यामुळे चांगलाच वादही निर्माण झाला होता.   2008 साली त्यांच्यावर अनेक मौलवींनी टीका केली होती. मात्र,  लग्न करत राहणं हे माझं पवित्र ध्येय आहे असं ते म्हणायचे . त्यांनी एकूण 130 लग्न केली असून त्यांच्या पश्चात 203 मुलं आहेत.

शिस्त आणि संयमाचे दर्शन घडवत पालम येथे तीन तास रास्ता रोको

अरुणा शर्मा

पालम :-"एक मराठा लाख मराठा' चा एक सुरात गगण भेदी नारा देत कोपर्डी प्रकरण ,मराठा आरक्षण,स्वामी नाथन आयोगाची अंमलबजावणी आणि इतर मागण्या घेऊण आज पालम तालुक्यातील सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला होता शिस्त आणि संयमाचे दर्शन घडवत पालम ते गंगाखेड तसेच पालम ते नांदेड या मुख्य रस्त्यावर तब्बल तिन तास शांततेत रास्तारोको चक्काजाम आंदोलन करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा वाहणाच्या लांबच लांब लागल्या होत्या.राज्यभर लाखोंचे मराठा क्रांती मोर्चे निघाल्या नंतर राज्यस्तरीय मराठा समन्वय समिती ने दुस-या टप्प्यात मंगळवार ३१ जानेवारी रोजी सकल मराठा समाजाच्या विविध मागण्या माण्य करण्यासाठी राज्यभर मराठा समाजाने रस्त्यावर उतरून रास्ता रोको करत चक्काजाम  आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्या अनुशंगाने आज पालम तालुक्यातील सकल मराठा समाज सोमवारी रस्त्यावर उतरलेला दिसून आला यात पिंपळगाव चौकाच्या ठिकाणी पालम तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी अतिषय शिस्त, संयम आणि शांती चे दर्शन घडवत "एक मराठा लाख मराठा" चा गगण भेदी नारा देत आज सोमवार ३१ जानेवारी रोजी रास्ता रोको केला व समस्त आंदोलकांच्या वतीने पिंपळगाव चौकात तहसिलदार यांना निवेदन देले व आमच्या मागण्या तात्काळ मान्य करा अन्यथा ६ मार्च रोजी होणा-या आंदोलनाला शासन आणि प्रशासन दोन्ही जबाबदार राहतील असा ईशारा या वेळी दिला. 
* यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात रहेमतुला पठाण व वाहेत खॉ पठाण यांच्या वतीने आंदोलनात मोफत पाणी पाउच वाटप करण्यात आले.
* स.पोलीस निरक्षक रविद्र बोरसे यांच्या
मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.आंदोलना दरम्यान कुठेही अनुस्चित प्रकार घडला नाही .आंदोलन शांततेत व मराठा मोर्चाने घालवुन दिलेल्या आचार संहितेत पार पडले. आंदोलनाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

सकल मराठा समाजाच्या 709 कार्यकरत्यांवर मुबंई पोलिस कायदा कलम 68 व 69 प्रमाणे कार्यवाही


सुधीर बागुल
वैजापुर - औरंगाबाद ग्रामीण जिल्याचे कार्यक्षेत्रात आज दि 31 जानेवारी मंगळवार रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे ईतर अनेक मागण्या संदर्भात जिल्याचे पोलिस ठाणेच्या कार्यक्षेत्रात 27 ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले प्रसंगी कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही सदरचे आंदोलन शांततेत पार पडले असुन जिल्हा पोलिस दलाचे वतीने योग्य तो चोख बन्दोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान मराठा समाजाचे काही कार्यकरते यांनी चक्काजाम करण्याच्या प्रयत्नात असतांना त्यांच्या विरुद्ध मुबंई पोलिस कायदा कलम 68 प्रमाणे कायदेशीर कार्यवाही करत ताब्यात घेवुन कलम 69 प्रमाणे सोडण्यात आले जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात आयोजित करण्यात आले चक्का जाम आंदोलनात 9705 सकल मराठा समाजाचे कार्यकरते हजर होते त्या पैकी 709 कार्यकरत्यांवर मुबंई पोलिस कायदा कलम 68 व 69 प्रमाणे कार्यवाही करण्यात आली
सदर आंदोलन अनुषंगाने मा. पोलिस अधिक्षक सो.  यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य तो बंदोबस्त लावण्यात आला होता.

देऊबाई ढगे यांचे निधन

वैजापुर - वैजापुर तालुक्यातील खंडाळा येथे  जेष्ठ महीला
देऊबाई महादु ढगे वय ८२ यांचे सोमवार दि.३० रोजी सायंकाळी
७ वाजता निधन झाले
त्यांच्या पश्चात तिन मुले, सुना,
दोन मुली, जावई, नातवंडे असा
परीवार आहेत
भिवसन ढगे,पंढरीनाथ ढगे,
विठ्ठल ढगे, यांच्या त्या मातोश्री होत्या

वाशिम येथे माजी सैनिकांच्या घरावर सशस्त्र हल्ला;कुटूंब भयभित

विनोद तायडे
वाशिम येथील अल्लाडा प्लॉट नगरात राहणारे माजी सैनिक रमेश भगत यांच्या घरावर 3 ते 4 हल्लेखोरांनी शनिवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास सशस्त्र हल्ला केला . त्यांच्या इमारतीचे टॉवर ,त्याचे चारचाकी वाहनांची तोडफोड करून 4 लाख रुपयांचे नुकसान करून अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी  दिल्याची  फिर्याद सौ सीमा रमेश भगत यांनी शहर पोलीस स्टेशन ला दिली. पोलिसानी आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून 2 आरोपीना अटक केली आहे तर काही हल्लेखोर अद्यापही फरार असून भगत दाम्पत्य भयभीत झाले आहेत. पोलिसांनी सरक्षण देण्याची मागणी भगत दाम्पत्यांनी यांनी केली आहे.
वाशिम येथील अल्लाडा प्लॉट नेहमीच वादाच्या भोवर्यात सापडल्याचे अनेक गुन्हेगारी घटनांवरून समोर आले आहे. याचं नगरात माजी सैनिक तथा माजी सैनिक संघटनेचे सचिव  रमेश दौलत भगत यांचे घर आहे .त्यांच्या शेजारी राहणारे इंगोले यांचा त्यांच्या सोबत नेहमीच वाद होतो याआधी त्यांचा वाद पोलीस स्टेशन मध्ये मिटविण्यात आला होता. दि 28 जानेवारीला त्यांचा वाद उफाळून आला आणि शांत झाला .रात्री  9 वाजता भगत दाम्पत्य  जेवायला बसले असताना विकास उर्फ विक्की विलास गवई आणि  3 ते 4 हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर हातात तलवारी घेऊन सशस्त्र हल्ला केला .दरवाजे खिडक्या इमारतीचे काचेचे टावर चारचाकी वाहनांची तोडफोड केली भगत कुटुंब अचानक झालेल्या हल्ल्याने भयभीत झाले त्यांनी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले. हल्लेखोरांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला.  भगत यांनी पोलीस स्टेशनला  मोबाईलवरून संपर्क साधला असता  पोलिसांनी यायला उशीर केला तो पर्यंत हल्लेखोरांनी लाखो रुपयांचे नुकसान केले असा आरोप भगत यांनी केला .पोलिसांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. सशस्त्र हल्ला होऊनही पोलिसांनी  दुसऱ्या दिवासापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा केला नाही आरोपी मोकाट फिरत होते .एका नेत्याने पोलिसांना फोन करून घटनेचे गाम्भीर्य ओळखून कार्यवाही करण्याचे सुनावल्याने पोलिसांनी दुपारी पंचनामा करून 2 हल्लेखोरांना अटक केली . अद्यापही काही हल्लेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. भगत दाम्पत्य चांगलेच भयभीत झाले असून ते दहशतीखाली वावरत आहेत त्यांची झोप उडाली असून रात्रीला कुत्रा जरी भुंकले तर त्यांचा जीवाचा थरकाप होत असल्याचे सौ सीमा भगत यांनी सांगितले

शिस्त आणि संयमाचे दर्शन घडवत सेलू येथे तीन तास रास्ता रोको

प्रतिनिधी
सेलू="एक मराठा लाख मराठा' चा एक सुरात गगण भेदी नारा देत कोपर्डी प्रकरण ,मराठा आरक्षण,स्वामी नाथन आयोगाची अंमलबजावणी आणि इतर मागण्या घेऊण आज सेलू तालुक्यातील सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला होता शिस्त आणि संयमाचे दर्शन घडवत सेलू ते मंठा तसेच सेलू ते परभणी आणि सेलू ते परतुर या मुख्य रस्त्यावर तब्बल तिन तास शांततेत रास्तारोको चक्काजाम आंदोलन करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा वाहणाच्या लांबच लांब लागल्या होत्या.राज्यभर लाखोंचे मराठा क्रांती मोर्चे निघाल्या नंतर राज्यस्तरीय मराठा समन्वय समिती ने दुस-या टप्प्यात मंगळवार ३१ जानेवारी रोजी सकल मराठा समाजाच्या विविध मागण्या माण्य करण्यासाठी राज्यभर मराठा समाजाने रस्त्यावर उतरून रास्ता रोको करत चक्काजाम  आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला होता त्या अनुशंगाने आज सेलू तालुक्यातील सकल मराठा समाज सोमवारी रस्त्यावर उतरलेला दिसून आला यात सेलू रायगड कॉर्नर प्रमुख ठिकाणी सेलू तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी अतिषय शिस्त, संयम आणि शांती चे दर्शन घडवत "एक मराठा लाख मराठा" चा गगण भेदी नारा देत आज सोमवार ३१ जानेवारी रोजी रास्ता रोको केला व समस्त आंदोलकांच्या वतीने पाच मुलींच्या हस्ते नायब तहसिलदार आसाराम छड़ीदारांना निवेदन रूपी स्मरणपञ देत आमच्या मागण्या तात्काळ मान्य करा अन्यथा ६ मार्च रोजी होणा-या आंदोलनाला शासन आणि प्रशासन दोन्ही जबाबदार राहतील असा ईशारा या वेळी दिला.   मुलींनी शेतकरी व मराठा समाजावर कशा प्रकारे अन्याय होतो हे पटऊण दिले.
★स्वच्छते कडे लक्षरास्ता रोको आंदोलन कर्त्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थळावरून निघण्यापुर्वी या ठिकाणी पाणी पाउच आणि ईतर कचरा गोळा केला
★ डीवासपी रेणुका वाघळे यांच्या
मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.आंदोलना दरम्यान कुठेही अनुस्चित प्रकार घडला नाही .आंदोलन शांततेत व मराठा मोर्चाने घालवुन दिलेल्या आचार संहितेत पार पडले. आंदोलनाची सांगता राष्ट्रगीताने झाली समस्त मराठा समाजाच्या वतीने पोलिस प्रशासनेचे आभार व्यक्त करण्यात आले.

सोनपेठ तालुक्यात चक्काजाम आंदोलनाला प्रतिसाद.


राधेशाम वर्मा
-----------------------------------------------
सोनपेठ ( प्रतिनिधी  ) सोनपेठ तालुक्यात चार ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले,आंदोलन शांततेत पार पडले सकाळी 10.30 वाजता आंदोलनाला सुरूवात झाली. आरक्षण प्रश्नावर मराठा समाज बांधवांनी पक्ष,संघटना,गट,तट बाजुला ठेऊन चक्काजाम  आंदोलनात भाग घेतला.शहरातील शिवाजी चौक येथे आंदोलन करण्यात आले.या वेळी जिल्ह्यातील बालाजी अंबोरे शहीद जवानाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.मराठा समाजाचा राज्यात चक्का जाम असल्याने रस्त्यावर तुरळक  वाहने दिसत नव
होती.तालुक्यातील डिघोळ,खडका,व परळी - गंगाखेड राज्यमार्ग  रोड वरील उक्कडगाव मक्ता येथे चक्का जाम करण्यात आला.दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे अनेकभागात वाहतुक ठप्प झाली होती.यावेळी  तहसिलदार जिवराज डापकर यांनी शिवाजी चौक येथे जाऊन आंदोलकांचे निवेदन स्विकारले. राष्टगीताने आंदोलनाची सांगता झाली.

वैजापुर येथे मराठा समाजाच्या वतीने चक्का जाम


सुधीर बागुल
वैजापुर - मराठा समाजाच्या वतीने आज 31 जानेवारी मंगळवार रोजी अनेक ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले या अनुषंगाने वैजापुर व शिवुर बंगला येथे आंदोलन करण्यात आले
या वेळी कोपर्डी प्रकरण ,मराठा आरक्षण,स्वामी नाथन आयोगाची अंमलबजावणी आणि इतर मागण्या घेऊण आज वैजापुर व शिवुर बंगला येथे मराठा समाज रस्त्यावर उतरला होता  वैजापुर येथे
मुख्य रस्त्यावर असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ रस्त्यावर तब्बल दोन तास शांततेत रास्तारोको चक्काजाम आंदोलन करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा वाहणाच्या लांबच लांब लागल्या होत्या.राज्यभर लाखोंचे मराठा क्रांती मोर्चे निघाल्या नंतर राज्यस्तरीय मराठा समन्वय समिती ने दुस-या टप्प्यात मंगळवार ३१ जानेवारी रोजी मराठा समाजाच्या विविध मागण्या माण्य करण्यासाठी राज्यभर मराठा समाजाने रस्त्यावर उतरून रास्ता रोको करत चक्काजाम  आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला होता त्या अनुशंगाने आज वैजापुर तालुक्यात  मराठा समाज मंगळवार रोजी रस्त्यावर उतरलेला दिसून आला.

सोशल जस्टीस फोरम अध्यक्षपदी श्रीधर ढगे खामगांव: फुले शाहू आम्बेडकर यांच्या पुरोगामी विचारांशी बांधिलकी जपत पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार बांधवानी सोशल जस्टिस फोरम महाराष्ट्रची स्थापना केली. फोरमच्या अध्यक्षपदी श्रीधर ढगे यांची निवड करण्यात आली आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संपादीत 'मूकनायक' या वर्तमानपत्राचा पहिला अंक 31 जानेवारी 1920 रोजी प्रकाशित झाला. आज मूकनायक या वर्तमानपत्राला 97 वर्ष झाली आहेत.त्याचे औचित्य साधुन सोशल जस्टीस फोरम ची स्थापना करण्यात आली आहे भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात बाबासाहेब आंबेडकर याचे योगदान मोलाचे आहे. समाजातील पिडीत वंचीत घटकाला स्वत:चा आवाजच नव्हता, त्या समाजाच्या भावनांना वाट करून देण्याचे काम या 'मूकनायक' वर्तमानपत्राने ने केले. समाजातील दुरितांची अवस्था पाहून डाॅ. आंबेडकर व्यथित झाले. त्यांची मानसिकता ओळखून छत्रपती राजर्षी शाहु महाराजांनी मूकनायक करीता मदतीचा हात पुढे केला आणि व्यवस्थेच्या विरोधात बुलंद आवाज करणाऱ्या 'मूकनायक' चा जन्म झाला.समाजात पिढ्यानपिढ्या पीड़ित, शोषित वंचित असलेल्या लोकांच्या वेदनेला 'मूकनायक'ने मग वाचा मिळवून देण्याचे काम केले.सोशल जस्टीस फोरम सुद्धा वंचितांचे प्रश्न मांडनार आहे.लवकरच सोशल जस्टिस फोरमची कार्यकारणी जाहिर करण्यात येईल असे श्रीधर ढगे यांनी सांगितले.

सोशल जस्टीस फोरम अध्यक्षपदी श्रीधर ढगे
खामगांव: फुले शाहू आम्बेडकर यांच्या पुरोगामी विचारांशी बांधिलकी जपत पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार बांधवानी सोशल जस्टिस फोरम महाराष्ट्रची स्थापना केली. फोरमच्या अध्यक्षपदी श्रीधर ढगे यांची निवड करण्यात आली आहे.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संपादीत 'मूकनायक' या वर्तमानपत्राचा पहिला अंक 31 जानेवारी 1920 रोजी प्रकाशित झाला. आज मूकनायक या वर्तमानपत्राला 97 वर्ष झाली आहेत.त्याचे औचित्य साधुन सोशल जस्टीस फोरम ची स्थापना करण्यात आली आहे

भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात बाबासाहेब आंबेडकर याचे योगदान मोलाचे आहे.    समाजातील पिडीत वंचीत घटकाला स्वत:चा आवाजच नव्हता, त्या समाजाच्या भावनांना वाट करून देण्याचे काम या 'मूकनायक' वर्तमानपत्राने ने केले.
समाजातील दुरितांची अवस्था पाहून डाॅ. आंबेडकर व्यथित झाले. त्यांची मानसिकता ओळखून छत्रपती राजर्षी शाहु महाराजांनी मूकनायक करीता मदतीचा हात पुढे केला आणि व्यवस्थेच्या विरोधात बुलंद आवाज करणाऱ्या 'मूकनायक' चा जन्म झाला.समाजात पिढ्यानपिढ्या पीड़ित, शोषित वंचित असलेल्या लोकांच्या वेदनेला 'मूकनायक'ने मग वाचा मिळवून देण्याचे काम केले.सोशल जस्टीस फोरम सुद्धा वंचितांचे प्रश्न मांडनार आहे.लवकरच सोशल जस्टिस फोरमची कार्यकारणी जाहिर करण्यात येईल असे श्रीधर ढगे यांनी सांगितले.