Breaking News
Loading...

Tuesday, 10 January 2017

पाथरीत तणाव पुर्ण शांतता; वरिष्ठ पोलीस अधिकारी तळ ठोकून;शहरात अतिरीक्त कुमक दाखल

कार्तिक पाटील
पाथरी:- शहरात मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून मोठा तणाव निर्माण झाल्या नंतर दगड फेक झाल्याने मुख्य रस्त्यावर एकच धावपळ सुरू झाल्याने बाजार पेठ पुर्णत: बंद पडली. या वेळी नेते आणि पोलीसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.पाथरीतील तणावाची माहीती परभणी पोलीस अधिक्षक नियती ठाकर यांना देण्यात आल्याने त्या तात्काळ शहरात दाखल झाल्या आहेत. या विषयी पाथरी पोलीसांनी आरोपी ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे. शहरात शांतता सुव्यवस्था राखण्या साठी क्यूआरटी चे जवान दाखल झाले असून जमाव बंदी कलम लागू करण्यात आले आहे.या घटनेची माहीती मिळताच आ बाबाजानी दुर्रांनी आ मोहन फड यांनी जमावाला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या वेळी घटनेचे गांभिर्य आेळखून आ बाबाजानी दुर्रांनी स्वत: रस्त्यावर हातात दांडके घेऊन दंगल खोरांना शांतता राखण्याचे आवाहन त्यांच्या सहका-यां सह करत होते तर आ मोहन फड माजी जिल्हा प्रमुख बाळासाहेब जाधव ,सुरेश ढगे, रविंद्र धर्मे, मुंजाभाऊ कोल्हे, राहूल पाटील यांनी ही जमावाला शांतता राखण्याचे आवाहन केले या वेळी शहरातील शाळा महाविद्यालयात घाई गडबड दिसून आले पालकांनी आपआपल्या पाल्यांना दुपारी बारा पर्यंत घरी नेले. या वेळी ग्रामिण भागातून शहरात दाखल झालेल्यांची चांगलीच भागंभाग झाली जमाव पांगवण्या साठी अतिरीक्त पोलीसांची जीप शहरात गस्त घालत फिरत आहे. सद्या शहरात तणाव पुर्ण शांतता असून वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तळ ठोकून आहेत तर नेते मंडळी परिस्थिती बिघडू नये या साठी प्रयत्न करतांना दिसून येत आहेत.

1 comment: