Breaking News
Loading...

Friday, 6 January 2017

महंतांना मारहाण करून तोंडाला काळे फासले;जिंतूरात तणाव

प्रदिप कोकडवार
जिंतूर:-तालुक्यातील येलदरी येथे वाहनांच्या धडकेत निळा ध्वज चा ओटा तुटून ध्वज खाली पडल्याने वाहणातुन प्रवास करीत असलेल्या पाच महाराजाना दलितांणी बेदम मारहाण करून तोंडाला काळे फासले हि घटना शुक्रवार दि 6 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली
या घटनेच्या निषेधार्त दुपारी 4 नंतर   जिंतूर बंद केले
या बाबत अधिक व्रत असे कि आळंदी येथील संजय बाबा पाचपोरकर यांच्या मठातील काही महाराज जिल्हातील गौशाळेची पाहनी करिता जितुर तालुक्यातील इटोली येथिल संदीप महाराज इटोलीकर यांची गौशाला पाहून शिवाजी महाराज हत्तेकर,रघु महाराज जळगावकर,संतोष महाराज,बद्रीनाथ नवले महाराज,प्रभाकर महाराज सुरासे हे सर्वजण त्यांच्या गाडी क्रमांक एम एच 14 इ 1676 ने एलदरी मार्गे सेनगाव कडे जात होते एलदरी येथील चौकातील निळ्या ध्वजाला त्यांच्या गाडीचा धक्का लागल्याने तो खाली पडला या वेळी दलित समाजातील काही व्यक्तींनी गाडीत बसलेल्या सर्व महाराजासह चालकाला बेदम मारहाण केली अंगावर व चेहऱ्याला काळे फासून त्यांना सर्वां समक्ष उटबैठका काढण्यास भाग पाडले या घटनेची माहिती एलदरी गावात पसरताच इतर समाजाचे तरुण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमा झाले या सर्वांना मारहाण होत असताना पोलीस अधिकारी  त्या ठिकाणी हजर होते पोलीस अधिकाऱ्या समक्ष मारहाण होऊनही अधिकारी निष्क्रिय राहिल्याने तेथील नागरिकांनी राज्य रस्त्यावर ठाण मांडून रस्ता रोको केल्याने या महाराज लोकांची  सुटका पोलिसांनी करून त्यांना जिंतूर पोलीस स्थानका मध्ये आणले हि वार्ता शहरातील पाहताच सायंकाळी चार नंतर प्रचंड तणाव निर्माण झाला विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिंतूर बंद करून पोलीस ठाण्यासमोर या घटनेचा व निष्क्रिय पोलीस कर्मचारी अधिकाऱयांचा निषेध करत घटनेतील आरोपी विरोधात कार्यवाहिच्या मागणी साठी रस्त्यावरच ठाण मांडले

अतिरिक्त पोलीस दल तैनात
सदरील घटनेचे गामभीर्य पाहुन पोलिसांनी परभणी येथून दंगा नियंत्रक पथकासह अतिरिक्त पोलीस दल मागवले
तणाव पूर्ण शांतता आहे अजून कुणाविरुद्ध हि गुन्हा नोंद नसुन अटक केली नाही


No comments:

Post a Comment