तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 31 January 2017

जय वैष्णवी माता एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सारोळा जि.प.शाळेत डिजिटल क्लास रुमचे उदघाटन संपन्न

कार्तिक पाटील
पाथरी- तालुक्यातील खेर्डा येथील जय वैष्णवी माता एज्युकेशन सोसायटीच्या वतीने जि.प.प्रा.शाळा सारोळा येथे डिजिटल क्लास रूमचे उदघाटन दि.30 जानेवारी 2017 रोजी संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक आबुज होते.प्रमुख पाहुणे म्हणून कैलास लोखंडे हे होते.
जय वैष्णवी माता एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पहिली डिजिटल क्लास रूम खेर्डा जि.प.शाळेत सुरू करण्यात आली आहे.यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकावर वेगवेगळ्या विषयांचे योग्य असे मार्गदर्शन त्याचप्रमाणे इग्रंजी विषयाची भिती शिक्षकांकडून दुर होत आहे.त्याबरोबरच विज्ञानाचे प्रयोगही संगणकावर शिकताना विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी निर्माण होत आहे.
या धर्तीवरच सारोळा जि.प.शाळेत जय वैष्णवी माता एज्युकेशन सोसायटीच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या वतीने डिजिटल लर्निंग पर्वाला सुरूवात झाली आहे.या डिजिटल क्लासरुम मुळे विद्यार्थ्यांना अॅनिमेटेड अभ्यासक्रम तसेच संगणकाच्या माध्यमातून सर्व शालेय विषयाचे आकलन होण्यास मदत होणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालासाहेब लांडगे,नारायण सिताफळे,अमोल आम्ले,संतोष व-हाडे,मगर जी डी,लक्ष्मण वैराळे,गंगाधर आव्हाड,विष्णू पंत यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खांदे ए ए यांनी,प्रास्ताविक संस्थेचे सचिव शरद सदाफळे यांनी केले.तर आभार शाळेचे मुख्याध्यापक बद्दे एस एच  यांनी मानले.
यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी व गावातील नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment