तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 31 January 2017

वाशिम येथे माजी सैनिकांच्या घरावर सशस्त्र हल्ला;कुटूंब भयभित

विनोद तायडे
वाशिम येथील अल्लाडा प्लॉट नगरात राहणारे माजी सैनिक रमेश भगत यांच्या घरावर 3 ते 4 हल्लेखोरांनी शनिवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास सशस्त्र हल्ला केला . त्यांच्या इमारतीचे टॉवर ,त्याचे चारचाकी वाहनांची तोडफोड करून 4 लाख रुपयांचे नुकसान करून अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी  दिल्याची  फिर्याद सौ सीमा रमेश भगत यांनी शहर पोलीस स्टेशन ला दिली. पोलिसानी आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून 2 आरोपीना अटक केली आहे तर काही हल्लेखोर अद्यापही फरार असून भगत दाम्पत्य भयभीत झाले आहेत. पोलिसांनी सरक्षण देण्याची मागणी भगत दाम्पत्यांनी यांनी केली आहे.
वाशिम येथील अल्लाडा प्लॉट नेहमीच वादाच्या भोवर्यात सापडल्याचे अनेक गुन्हेगारी घटनांवरून समोर आले आहे. याचं नगरात माजी सैनिक तथा माजी सैनिक संघटनेचे सचिव  रमेश दौलत भगत यांचे घर आहे .त्यांच्या शेजारी राहणारे इंगोले यांचा त्यांच्या सोबत नेहमीच वाद होतो याआधी त्यांचा वाद पोलीस स्टेशन मध्ये मिटविण्यात आला होता. दि 28 जानेवारीला त्यांचा वाद उफाळून आला आणि शांत झाला .रात्री  9 वाजता भगत दाम्पत्य  जेवायला बसले असताना विकास उर्फ विक्की विलास गवई आणि  3 ते 4 हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर हातात तलवारी घेऊन सशस्त्र हल्ला केला .दरवाजे खिडक्या इमारतीचे काचेचे टावर चारचाकी वाहनांची तोडफोड केली भगत कुटुंब अचानक झालेल्या हल्ल्याने भयभीत झाले त्यांनी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले. हल्लेखोरांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला.  भगत यांनी पोलीस स्टेशनला  मोबाईलवरून संपर्क साधला असता  पोलिसांनी यायला उशीर केला तो पर्यंत हल्लेखोरांनी लाखो रुपयांचे नुकसान केले असा आरोप भगत यांनी केला .पोलिसांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. सशस्त्र हल्ला होऊनही पोलिसांनी  दुसऱ्या दिवासापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा केला नाही आरोपी मोकाट फिरत होते .एका नेत्याने पोलिसांना फोन करून घटनेचे गाम्भीर्य ओळखून कार्यवाही करण्याचे सुनावल्याने पोलिसांनी दुपारी पंचनामा करून 2 हल्लेखोरांना अटक केली . अद्यापही काही हल्लेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. भगत दाम्पत्य चांगलेच भयभीत झाले असून ते दहशतीखाली वावरत आहेत त्यांची झोप उडाली असून रात्रीला कुत्रा जरी भुंकले तर त्यांचा जीवाचा थरकाप होत असल्याचे सौ सीमा भगत यांनी सांगितले

No comments:

Post a Comment