तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 28 February 2017

माळीवाडा जिल्हापरिषद शाळेत पहिल्याच दिवशी ५५ प्रवेश

कार्तिक पाटील
पाथरी:- काम करण्याच्या इच्छा आणि गुणवत्ता देण्याची जिद्द असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही, अशाच काहिशा मानसिकते मधून पाथरी येथिल माळीवाडा जि प शाळेने पुढील शैक्षणिक वर्षाचा पहिलीचा वर्ग चार महिने आधिच सुरू केला आहे. विषेश म्हणजे या वर्गात आज एक मार्च रोजी पहिल्याच दिवशी ५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
वेळोवेळी प्रयोग राबवण्यात व विद्यार्थ्यां मधील गुणवत्ता वृध्दिंगत करण्या साठी माळीवाडा येथील जि प शाळेचे नाव या पुर्वीच राज्यभरात गाजले आहे. या शाळेने विविध पुरस्कार प्राप्त करून राज्य भरात नाव लौकीक मिळवला आहे.
पहिली वर्गाचे आैपचारीक उदघाटन
नगरसेवक गोविंद हारकळ , विस्तार अधिकारी मुकेश राठोड, केंद्रप्रमुख रोहिदास टेंगसे, अध्यक्ष अमरताई विरकर, अंजली चिंचाणे, सोनाली गरड, विरकर ताई, घोलप ताई, इखे ताई, नाईक ताई, विठ्ठल विरकर, विश्वंभर गिराम, बालाजी सोगे, आणि मुख्याध्यापक सुभाष चिंचाणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पहिली प्रवेश पात्र मुलांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मुलांना कमरेचे बेल्ट, वही, पेन, व बिस्कीट पुडा देऊन प्रोत्साहन दिले. चार महिने आगोदरच सुरू करण्याच्या वर्गातील मुलांना शिकवण्या साठी डी डी जामकर, श्रीमती गिराम, यांची नियिक्तीही करण्यात आली या वेळी रोहीदास टेंगसे, मुकेश राठोड व सुभाष चिंचाणे यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. या वेळी शालेय व्यवस्थापण समिती  माळीवाडा साठी गोविंद हारकाळ यांची नियुक्ती करण्यात आल्या मुळे शाळेच्या वतिने त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला. या वेळी गावातील पालक व शिक्षक उपस्थित होते

सोनपेठ येथे बारावीची परीक्षा शांततेत सुरु


राधेश्याम वर्मा

सोनपेठ
सोनपेठ तालुक्यात दि.२८ फेब्रुवारी १७ ठीक ११ वाजता येथील एक केंद्र श्री
महालींगेश्वर कनिष्ठ महाविद्यालय येथे पहिल्या दिवशी इंग्रजी एकून
विद्यार्थी या केंद्रात ४३८ यामध्ये १) श्री महालींगेश्वर कनिष्ठ
महाविद्यालय,सोनपेठ, २) कै.र.व.कनिष्ठ महाविद्यालय,सोनपेठ, ३) कै.बाजीराव
देशमुख कनिष्ठ महाविद्यालय,शेलगाव,व नव्यानेच परळी तालुक्यातील एक ४)
राजश्री शाहू महाराज कनिष्ठ महाविद्यालय,कौडगाव,ता.परळी या चार कनिष्ठ
महाविद्यालय चे प्राध्यापक मंडळी एकून १६ हॉल मध्ये प्रत्येकी २८
विद्यार्थी एका टेबलवर दोन विद्यार्थी सुरक्षित अंतरावर नियोजन बद्ध
१०:३० वाजेपर्यंत सर्व विद्यार्थी आपल्या-आपल्या पद्धतीने परीक्षा स्थळी
दाखल झाले होते दुसरीकडे दुसरे केंद्र तालुक्ल्यातील उखळी बु.येथील
महात्मा फुले कला,विज्ञान कानिस्ठ महाविद्यालय येथे एकून विद्यार्थी २५८
असून या ठिकाणी १) महात्मा फुले कला,विज्ञान कानिस्ठ महाविद्यालय,उखळी
बु.२) संचारेश्वर कनिष्ठ महाविद्यालय,नैकोटा.व ३) मातोश्री सुमित्राबाई
कदम कनिष्ठ महाविद्यालय,खडका असा तीन कनिष्ठ महाविद्यालयाचा समावेश असून
एकून ७९६ विद्यार्थी शांततेत परीक्षा देत आहेत तसेच बंदोबस्त सहायक पोलीस
निरीक्षक सदानंद येरेकर यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील दोन्ही
केंद्रावर चागल्या स्वरूपाचा दिसून आला यामध्ये विशेष बाब म्हणजे श्री
महालींगेश्वर कनिष्ठ महाविद्यालय,सोनपेठ येथील १६ हॉल मध्ये
सी.सी.टी.व्ही कँमेरे जोडलेले असून पालक हि विद्यार्थी यांना निरोप देवून
बाहेर कोणीही दिसून येत नव्हते,परीक्षा साठी एक बैठे पथक केंद्र प्रमुख
गणपत कोटलवार यांच्या नेतृत्वात तैनात असून,शिक्षण विभागाचे तसेच महसूल
विभागाचे फिरते पथक लक्ष ठेवून आहे,शेवटचा पेपर दि.२० मार्च १७ सोमवार रोजी समारोप होणार असून तब्बल एक महिना हा परीक्षेचा काळ दिसून येत आहे.

पर्यावरण रक्षण काळाची गरज - प्रा. डॉ. दयानंद उजळंबे


राधेश्याम वर्मा
----------------------------------------------
सोनपेठ : येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीराचे गवळी पिंपरी येथे  उद्घाटन करताना मानवाने नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर योग्य प्रमाणात करून पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक असल्याचे मत संत जनाबाई महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. दयानंद उजळंबे यांनी केले. ते कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते, प्रमुख पाहूणे रा. से. यो. चे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. प्रकाश सुर्वे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हशिप्र चे अध्यक्ष परमेश्वरराव कदम होते.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवशीय विशेष शिबीराचे उद्घाटन गवळी पिंपरी येथे झाले यावेळी प्रमुख वक्ते म्हणून दयानंद उजळंबे यांनी उपस्थितांना पर्यावरण रक्षणा विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थिती म्हणून परभणी जिल्हा रासेयो चे समन्वयक प्रा. डॉ. प्रकाश सुर्वे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. रासेयोच्या या विशेष शिबीरात श्रमदान, बौद्धीक सत्र, खेळ, योगासने व व्याख्याने, पशूचिकित्सा शिबीर आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीर सात दिवसांचे असून शिबीराची सांगता ३मार्च रोजी होणार आहे. या वेळी, प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते, सरपंच गोपाळ भोसले,  पत्रकार सुभाष सुरवसे मंचावर उपस्थीत  होते, प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. एम. डी. कच्छवे, सुत्रसंचालन प्रा. डॉ. शिवाजी अंभुरे, कु. प्रतिक्षा कदम व श्रद्धा भोसले यांनी स्वागत गित म्हटले, तर आभार प्रा. डॉ. सुनिता टेंगसे यावेळी क्रिडासंचालक गोविंद वाकणकर, विद्यार्थी प्रतिनिधी अविनाश आगळे, महेश भोसले व वैष्णवी देशपांडे यांच्यासह सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व सर्व प्राध्यापक व गावकरी  या कार्यक्रमात सहभागी झाले होते

विकासासाठी कटी बद्ध आ.विजय भांबळे

प्रतिनिधी
चारठाणा:-नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या उमेदवाराला भरघोस मते दिली परंतु आनेकानी  सोबत राहुन जे  गदारीचे   राजकारण केले आशाना आपल्या जवळ थारा नाही असा घणघणाती टोला आ.विजय भांबळे  यांनी मतदार बांधवाचे अभार व सिमेंट रस्ताकामाच्या भुमीपुजना प्रंसगी बोलतानी केले.                                    जितुर तालुक्यातील मोहाडी येथे आ.विजय भांबळे यांनी मंगळवार २८ फेब्रुवारी रोजी मतदारांशी संवाद      साधुन त्याचे  आभार व्यक्त केले व मागील काही दिवसापासून  रेंगाळत पडलेल्या पुल ते देविमंदीर ६०० मिटर सिमेंटरस्त्यासाठी २० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असुन त्यांचे भुमीपुजन आ.विजय भांबळे यांच्या हस्ते पार पडले त्याच बरोबर दलीत वस्तीतील ८१ मिटर रस्यासाठी ४ लाखांचा निधी मंजूर करण्यात त्या कामाला देखील लगेच सुरवात होणार आहे.या कार्यक्रमास राष्ट्रवादी ओ.बी.सी.सेल जिल्हाअध्यक्ष नानासाहेब राऊत, विश्वनाथ राठोड, सलीम काझी तहसीन देशमुख   यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना आ.विजय भांबळे म्हणाले की पक्षात राहुन ज्यांनी आमच्या सोबत गदारी केली अशांना या पुढे आपल्या जवळ स्थान नाही. आपण येणार्या दोन वर्षात आपल्या मतदारसंघातील संपुर्ण रस्त्याचे  डांबरीकरण करणार असल्याचे ग्वाही त्यांनी या वेळी दिली.  सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपसरपंच प्रदीप गडदे, पंढरीनाथ कांचगुडे,जिजाभाऊ कांचगुडे,        राम कांचगुडे,पंडीत गडदे,ज्ञानेश्वर रूपनर, विष्णू झारकड,रामप्रसाद देवकर,विठल कांचगुडे, दत्तराव गडदे यांच्या सह आदींचीया वेळी उपस्थितीती होती

विशेष मागास प्रवर्गावर झालेला अन्याय दुर करा

तहसिलदारांना दिले निवेदन
गंगाखेड...प्रतिनिधी.. महाराष्ट्र शासनाने विशेष मागास प्रवर्गास सामाजुक,आर्थिक,शैक्षणिक,मागासलेपणाचा विचार करुन आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.शासनाने २% आरक्षण जाहीरही केले.या निर्णयात वारंवार बदल करुन साळी,कोष्ट्री,कोळी या जाती पोटजातीसह समाविष्ट केल्या.सथर निर्णायावर वारंवार बदल करुन यामध्ये अनेक जातीचा समावेश या प्रवर्गात करण्यात आला.तरीही आरक्षणात वाढ करण्यात आलेली नाही.यापुढे शासनाने नविन कोणत्याही जातीचा या प्रवर्गात समाविष्ट करु नयेत.या अंतर्गत २५% आरक्षणाची तरतुद आसुनही उत्पन्नाची मर्यादा १ लाख आसल्याने कोष्टी,माळी व साळी  समाजावर आज पर्यंत अन्यायच होत राहीला आहे.हीमर्यादा एस.सी.किंवा एस.टी.प्रमाणेच एस.बी.सी.साठी नसावेत. तसेच उच्च शिक्षणासाठी व्यवसायिक शिक्षणासाठीही स्वतंत्र एस बी सी आरक्षण द्यावेत.संवैधानिक अनुसुची झालीच पाहीजेत,जन्माने व कर्माने विणकर यांना साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागु करावी,विज कनेक्शन सवलत देण्यात यावी,एस.बी.सी.साठी स्वतंत्र आर्थिक महमंडळ मिळालेच पाहीजेत,यंत्रमाघ विज दर १ रु.पर युनिट झालाच पाहीजेत.तसेच या समाजाच्या समाज मंदीरास जागा व २ हजार रुपये अनुदान प्राप्त झालेच पाहीजेत. अदिसह विविध मागण्याचे निवेदन कोष्टी,माळी,साळी समाजाच्या वतीने यापूर्वीही अनेकवेळा  देण्यात आले आहे.याची शासनाने दखल न घेतल्यामुळे आज हजारो नागरीकांनी तहसिलदार यांना देण्यात आले आहे.या मागणयाची दखल शासनाने  दि.१४ मार्च पर्यंत न घेतल्यास दि.१५पासुन प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व मुंब ई मैदानावर एस.बी.सी चे नागरीक प्रांणांतिक उपोषण करावे लागेल.येत्या अर्थसंकल्पात १०% तरतुद व्हायला पाहीजेत.तसेच आरक्षण शैक्षणीक सेवाप्रवेश पदोन्नती व राजकीय क्षैत्रातही मिळालेच पाहीजेत.अदि.संदर्भात निवेदन दिले असुन या निवेदनावर विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीचे मराठवाडा युवा उपाध्यक्ष मकरंद चिनके,चंद्रकांत वरवडे,सुनिल मेहत्रे,एकनाथ लाटणे,अशोक घटे,विष्णु भैरट,राम लबडे,संजय मेहेत्रे ,अजय घटे,संतोष मेहत्रे,चंद्रकांत नांदे,बाबुराव गुरसाळी,कृष्णा ईदाते,महारुद्र ईदाते,सजू वरवडे,सतिष टकले,अमोल आसमार,भगवान आसमार,किशोर आळणे,कुनाल सोनट्टके,ज्ञानेश्वर भैरट,बंटी दैठणकर,विनायक साखरे,अदिसह हजारो नागरीकांच्या स्वाक्षर्या आहेत.

शिवरायांचा वर्तनव्यवहार आपल्या अनुकरनात हवा!- प्रा. रामप्रसाद देशमुख


-------------------------------------------------
जिंतूर :
          जातीयता हा केवळ महाराष्ट्रालाच नाही तर राष्ट्राला लागलेला कलंक आहे. शिवाजी महाराजानी कधीच जातिव्यवस्थेचे समर्थन केले नाही की कोणत्या जाती धर्माविरुद्ध लढा दिला नाही. त्यांनी लढा दिला तो समाजातील शोषित समाजावरील अन्यायविरुद्ध म्हणून आज साडे तीनशे वर्षानंतर ही शिवाजी महाराज हे अनन्यसाधारण व्यक्तिमत्व आहे असे प्रतिपादन प्रा. रामप्रसाद देशमुख यांनी केले. तालुक्यातील वरूड(नृ) येथे शिवजयंती महोत्सवानिमित्त *उठ युवका जागा हो शिवचरित्राचा धागा हो* या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार राम बोरगावकर तर प्रमुख अतिथी म्हणून शब्द सह्याद्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ दुर्गादास कान्हड़कर यांची उपस्थिती होती.
               पुढे बोलताना व्याख्याते प्रा. रामप्रसाद देशमुख म्हणाले की, ज्यांना माणस जोड़ता आली त्यांना देश घडवता येतो. शिवाजी महाराजानी माणस जपली. त्यांच्यासाठी माणस मरायला तयार होती म्हणून त्यांना स्वराज्य निर्माण करता आले. शिवरायांचा स्त्री विषयक दृष्टिकोन आदरात्मक होता.  शिवाजी महाराज स्त्रियांचा प्रचंड आदर करत. आजही स्त्रियांची देवी रुपात पूजा केल्या जाते मात्र मानवतेच्या रुपात ती होताना दिसत नाही हे आपल्या समाजाच दुर्दैव आहे. शिवकाळात माणसांची उंची जास्त होती. आज परिस्थिती उलट आहे. इमारतींची उंची वाढली पण माणसांची कमी झाली,ही चिंतेची बाब आहे. स्वतःला शिवरायांचे भक्त म्हणणारी तरुण पिढी आज शिक्षणापासून दूर होऊन व्यसनाधिनतेच्या वाटेने मार्गस्थ झालेली दिसून येते. शिवरायांच्या आचार विचारांचा विचार करुन तरुण पिढीने शिक्षणाच्या माध्यमातून जातीअंताच्या दिशेने वाटचाल केल्यास शिवशाही अवतरायला नक्कीच वेळ लागणार नाही. लोक कालानुरूप सर्व बदल स्विकारतात मात्र समाजव्यवस्थेतील बदल स्विकारण्याची मानसिकता अजूनही दिसून येत नाही.
          या कार्यक्रमास गावातील नागरीक, शब्दसह्याद्री प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्र संचलन विजय ढाकणे यांनी केले तर आभार डॉ.विवेक थिटे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवछत्रपती युवा संघटनेच्या सर्व सदस्यानी परिश्रम घेतले.

राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

कौसडी प्रतिनिधी

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय केरवाडी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला शाळेत या दिना चा योग साधुन अंपुर्व विज्ञान मेळावा व साहित्य संमेलन भरवण्यात आले या अंपुर्व विज्ञान मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विज्ञानातील प्रयोग व
स्वता  साहीत्य निर्मीती करून प्रदर्शनास लावले होते
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुर्यकांतजी कुलकर्णी प्रमुख पाहुणे शि.गो.देशपांडे होते तसेच प्रमुख उपस्थितीत श्री यरमाळ सर,मुख्याध्यापक पोळ सर,रामदास सर,सारंग सर व इतर सर्व शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी पालक व नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय स्वंयसेवक काबळे राष्ट्राला उपस्थित होते तसेच कार्यक्रम स्थळी अनिकेत, जाधव संदीप गडगीळ, पंकज कुलकर्णी, उषा किरडे,संगीता पौळ,सुरेखा चामले,अनंत बडवणे व आदी उपस्थित होते

पुर्णेत गंगाखेड शुगर कारखाण्याची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल


चौधरी दिनेश
पुर्णा/तालुक्यात शासकीय तसेच खाजगी भुखंडावर व वादग्रस्त खाजगी मालमत्तेवर डोळा ठेऊन बोगस कागदपञांच्या आधारे भुखंड हडपण्याचे व विक्री करण्याचे प्रकार वाढतांना दिसत असून न.प.प्रशासनातील लाचखोर अधिकारी कर्मचारी व भुखंड माफियांच्या टोळ्या संगणमताने भुखंडांचे श्रीखंड बनवून चाखतांना दिसत असतांना जिल्हा प्रशासन माञ जाणीवपूर्वक डोळे झाक करतांना पहावयास मिळत आहे असाच काहीसा प्रकार घडल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून गंगाखेड शुगर अँड एनर्जी विजय नगर माखनी या कारखान्यास पुर्णेत अॉफिस टाकण्यासाठी जागेची आवश्यकता असल्याचे कळाल्यानंतर शहरातील न.प.च्या हद्दीमध्ये वादग्रस्त असलेल्या मालमत्ता क्र.4/10/313 (जुना) ज्याचा नवीन क्र.4/10/356 या 982.5 चौरस फुट जागेवरील दोन दुकाने नगर परिषदेचे  बोगस नाहरकत प्रमाणपत्र हस्तगत करुन सदरील जागेचे मालक व ताबेदार असल्याचे भासवून दि.31/10/2015 रोजी दहा लाख रुपयात स्टेट बँक अॉफ इंडिया शाखा गंगाखेड या बँकेच्या चेक क्र.593797 द्वारे जागेचा मोबदला घेऊन हा चेक स्वतःच्या बँक खात्यात जमा करुन घेऊन येथील नासीर अबुबकर थारा व त्यांची पत्नी सौ.थारा यांनी गंगाखेड शुगर एनर्जीली खरेदीखत करुन दिले होते सदरील जागा वादग्रस्त सर्वे नं.16 मध्ये येत असतांना व त्याबाबत मा.विद्यमान न्यायालयात वाद (तामिली दरखास्त) प्रलंबीत असल्या बाबत लपवली या मालमत्तेचा वाद दिवानी न्यायालय कनिष्ठ स्तर पुर्णा न्यायालयात सय्यद कमाल अहेमद व सय्यद अहेमद हुसेन यांनी वादपञ सादर करुन त्यांचा दिववानी दावा क्र.9/2004 व 12/1997 हा होता या वादपञाचा निकाल हा सय्यद कमाल अहेमद व सय्यद अहेमद हुसेन यांच्या बाजुने लागलेला असुन सदरील जागेचा ताबा तिन महिण्याचे आत सय्यद कमाल अहेमद व सय्यद अहेमद हुसेन यांना देण्याचा आदेश ही खरेदी दारा पासून लपवून सदरील वादग्रस्त मालमत्ता वाईट उद्देशाने विक्री करुन खरेदी दाराची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले असून वास्तविक पाहाता  जागा विक्रेत्या सौ.थारा यांचे पती नासीर थारा यांना सदरील मालमत्ते संदर्भातील संपूर्ण माहिती होती परंतू सौ.थारा व नासीर थारा यांनी वादग्रस्त मालमत्ते संदर्भातील कुठलीही माहिती होऊ न देता गंगाखेड शुगर कारखाण्याची फसवणूक करुन कारखान्याचे दहा लक्ष रुपये हडप केले व नगर परिषदेचे बोगस नाहरकत प्रमाणपत्राच्या आधारे वादग्रस्त मालमत्तेचे खरेदी करुन दिले व फसवणूक केली असल्याची तक्रार गंगाखेड शुगर कारखान्याचे पिआरओ हनुमंत शिवाजीराव लटपटे यांनी दि.27 फेब्रुवारी 2017 रोजी पुर्णा पोलीस स्थानकात दाखल केल्याने सौ.थारा व त्यांचे पती नासीर थारा यांच्या विरोधात कलम 420,406,464,423,424,34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून न.प.तील बोगस नाहरकत प्रमाणपञ तयार करुन देणाऱ्यांवरही सह आरोपी म्हणून गुन्हे दाखल होतील काय ? असा प्रश्न नागरीकांमध्ये उपस्थित होतांना दिसत आहे या प्रकरणी पुढील चौकशी पो.नि.एस.आर.कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.विशाल बहात्तरे हे करीत आहेत

ज्ञानरचनावाद समजून घेताना

अलीकडे "ज्ञानरचनावाद"  हा शब्द  शिक्षणप्रक्रियेत अनेक वेळा वापरला जात आहे .हा ज्ञानरचनावाद एकदम आला कोठून ? हा प्रश्न आपल्या  मनात येतो .राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF२००५) याचा तो पाया आहे ‘त्याच प्रमाणे बालकांचा मोफत व सक्तीचा  शिक्षणाचा हक्क अधीनियम  2009 (RTE ) मधील कलम  २९ मधेही ज्ञानरचना वादाची तत्त्वे आढळतात. त्यामुळे त्याची ओळख करून घेणे व वर्गाध्यापनामध्ये  त्याचा जास्तीत जास्त वापर  करणे  प्रत्येक शिक्षकाचे आद्य कर्त्यव्य आहे .
  
    आपण  नव्या अनुभवांना सामोरे जातांना त्या अनुभवाच्या आशयांचा आपल्या पूर्वानुभवाच्या आधारे  अर्थ लावून  आपण जगत  असलेले  विश्व समजवून  घेणे , या भूमिकेवर ज्ञानरचनावादी तत्त्वज्ञान आधारलेले आहे .
  
   ज्ञानरचनावादी  शिक्षण  प्रक्रियेसंदर्भात प्रामुख्याने पियाजे ,जोहन ड्य़ूई,वायगोटस्की ,ब्रुनर आणि यांच्या विचारंशी  साम्य
असलेल्या  आणखी  काही शास्त्रज्ञानी आपले  विचार मांडलेले आहेत .

   ज्ञानरचनावादाची प्रस्तुती  वेगवेगळ्या शब्दात विविध तज्ञांनी केली असली तरी त्यात कोठेही  विरोधाभास  आढळत नाही .त्या  सर्व तज्ञ्यांच्या विचार नुसार  ज्ञानरचना वादाची  काही प्रमुख  तत्वे  आपणास सांगता येतील .
. ज्ञान हे स्थिती शील static नसून गतिशील DYANAMIC आहे .
. मनुष्य स्वतः शिकत असतो ,आपल्या ज्ञानाची रचना करत असतो .
. पूर्वानुभवाच्या  आधारे  मनुष्य  ज्ञान रचना करतो .
. सामाजिक , भाषिक व सांस्कृतिक आंतरक्रीयेद्वारे ज्ञानाची निर्मिती होते .
. स्थानिक  परिस्थितीचा / परिसराचा  मोठा वाट ज्ञान रचनेत असतो.
    
     *ज्ञानरचानावादी  अध्ययन*–अध्यापनासाठी  या  तत्त्वांचा समावेश वर्गातील  अध्यन –अध्यापन प्रक्रीये मध्ये करावा लागेल . त्यासाठी प्रथम आपण वर्गातील ज्ञानरचनावादी  अध्ययन- अधायापन   प्रक्रिया समजून घेवू.
*ज्ञानरचनावादी वर्गाध्यापन*

ज्ञानरचनावादी विचारसरणीनुसार नुसार शिकण्याची प्रक्रिया पुढील  तीन बाबीच्या  सम्यन्व्यातून घडून येते .

*पूर्व ज्ञान*
शिकवण्याची प्रक्रिया  हि सतत  चालणारी प्रक्रिया आहे. त्यानुसार  या संज्ञेचा  अर्थ  बालक  विशिष्ट नवीन  घटक शिकण्यापूर्वी  त्या घटका संदर्भातील त्याची  आधीची
समज  असा घेता येईल . वर्गातील प्रक्रियेत  शिक्षकाला  मुलाच्या पूर्वज्ञानाचा  विचार करून  अध्ययन – अनुभवाची  निवड व रचना करावी लागेल .

*शिकण्याची तयारी*
       शिकणाऱ्यांची  शिकण्याची  तयारी करण्यासाठी त्याची  शिकण्याची इच्छा  व त्याची पात्रता  या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे शिकतांना  त्याची भावनिक अवस्था  कशा प्रकारची आहे  हेही  महत्त्वाचे ठरते .भावनिक स्थिरतेतून  भावनिक प्रसन्नतेकडे जाणारी  बालकांची  मन: स्थिती  हि शिकण्यासाठी  योग्य  स्थिती असते .

*अध्ययन  अनुभव*
       बालकाला  ज्या अनुभावाद्वारे  नवीन ज्ञान प्राप्त  होणर असते तो अध्ययन-अनुभव ; म्हणजे  जो अनुभव  आजवर  त्याने घेतलेला नव्हता असा अनुभव, नवीनता हे त्यांचे वैशिष्ट आहे .या अनुभावाद्वारे नविन माहिती कशा स्वरुपात विद्यार्थ्यांसमोर येते यालाही महत्त्व आहे .अध्ययन –अनुभव  जितके संख्येने  जास्त , विषयाला / आशयाला सुसंगत  व समर्पक तेवढा  अध्ययनाच्या प्रक्रियेत नेमकेपणा येतो .असे अध्ययन – अनुभव विचारपूर्वक  विद्यार्थांना पुरवणे हि जबाबदारी  शिक्षकाची आहे .
    अश्या  प्रकारे  विद्यार्थ्यांचे  पूर्वज्ञान ,त्यांची शिकण्याची तयारी  आणि अध्ययन –अनुभव यांचा  योग्य समन्वय वर्गामधील अध्ययन –अध्यापन प्रक्रियेमध्ये घडवून आणावा लागेल. वर्गामध्ये शिक्षक  जे सांगतील  तसेच विध्यार्थी  करतात .शिक्षक  बोलतात तेच विध्यार्थी  ऐकतात .जोडवर्ग ,मोठे वर्ग , विषयांची  संख्या ,वेगवेगळया चाचण्या ,जोडीला एखादे  दुसरे अशैक्षणिक   काम या परिस्थितीमध्ये  वेळेत “पोर्शन “ संपवायची कसरत शिक्षक करत असतो . या प्रक्रियेत मुलांना  किती  समजले ,त्यांना काय वाटते , कोणती  गोष्ट त्यांना  कठीण जाते , त्यांना  काही अडले  आहे का,  यांसारख्या  गोष्टीना  वेळच मिळत नाही  किंवा दिला जात नाही . लहान मुले  उपजतच बहुविध  क्षमतेची  असतात . ती त्यांच्या  अंगभूत क्षमंतानुसार  व गतीनुसार शिकतात  आणि वेगवेगळ्या  पद्धतीने  ज्ञानाच उपयोजन करतात .बालमानसशास्र आणि शिक्षणशास्राने आपल्याला शिकवलेले
हे  धडे  वर्गावर्गात  मात्र दूर्लक्षिले  जातात .शालामंध्ये  बहुतेक वेळा व्याख्यानपद्धती ,फलक लेखन , पाठांतर ,सराव .गृहपाठ  या चाकोरीतून जाणे शिक्षकांना  व त्याची सवय झालेल्या विद्यार्थी, पालक , यांना सोयीचे जाते .अशा पदधतीने  अनेक वर्ष  शिक्षणाची प्रकिया  पार पडत आहे .परंतु याचा अंतिम निष्कर्ष मुले खरेच काही शिकतात का? शिकत  नसतील ,तर तो विद्यार्थ्यांचा  क्षमतेचा ,बुद्धीचा  किवा शिक्षकांच्या  कौशल्याचा दोष मानला जातो.हे कुठे तरी थांबायला हवे.म्हणून शिक्षकांनी ज्ञानरचनावादातील तत्वानुसार कृतीशिल अध्ययन व अध्यापन करून काल सुसंगत "रचनावादी शिक्षण" प्रक्रियेमध्ये हिरिरीने सहभागी होऊन एक आदर्श व सशक्त भावी पिढीतील युवा भारत घडवून आणण्या साठी अंग झटकून या ज्ञानरचनावादी कार्ययज्ञात सहभाग   घ्यायला हवा.शासनाने आपल्या साठी आश्वासक परिस्थिती निर्माण केली आहे चला आपल्या सगळ्यांच्या महत्तप्रयत्नाने "प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र *"घडवूया*...                                                                     *लेखक -योगेश बळीराम ढवारे* *सहशिक्षक श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू*.                   *भ्रमणध्वनी -9561953738*..