तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 31 March 2017

हत्ता (ना.)येथे रिक्त असलेले तंटामुक्ती अध्यक्ष पद नेमण्याची मागणी!

विश्वनाथ देशमुख सेनगांवकर

सेनगांव: सेनगांव तालुक्यातील हत्ता (ना.) येथील तंटामुक्ती अध्यक्ष पद हे गेल्या दोन वर्षापासुन रिक्त असुन ते पद लवकरच भरण्याची मागणी होत आहे.
सेनगांव तालुक्यातील हत्ता(ना.) येथील तंटामुक्ती अध्यक्ष पदी दत्तराव जयवंतराव नाईक यांची निवड करण्यात आली होती परंतु त्यांचे सुमारे दोन वर्षापासुन निधन झाल्याने हि जागा रिक्त झाली असुन ह्या जागेवर तंटामुक्ती अध्यक्ष पद भरण्याची मागणी नागरीकातुन होत आहे परंतु याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत आहे. हत्ता (ना.) गांवची लोकसंख्या जवलपास तिन हजारापर्यंत आहे. तंटामुक्ती अध्यक्ष पद रिक्त असल्याने गांवात तंटे वाढल्याचे प्रमाण वाढले असुन तंटे मिटवायला अध्यक्षच नाहीत म्हणुनच येथे तंटामुक्ती अध्यक्ष नेमण्याची मागणी नागरीकातुन जोर धरत आहे.

कधी देणार कर्ज माफी : आणखी किती बळी घेणार हे सरकार


मोईन खान

परभणी : प्रतनिधी
परभणीत सर्व पक्षीय संघर्ष यात्रा काढून शेतकरी कर्जमाफीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह,समाजवादी पार्टी,शेकाप सर्व विरोधी पक्षांनी काढलेली संघर्ष यात्रा परभणीत दाखल झाली. यावेळी विरोधी पक्ष नेते विखे पाटील,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजीतपवार, समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी आदींनी येथील जाहीर सभेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, राज्याच्या विविध भागात रोज शेतकरी आत्महत्या करतायेत पण सरकार शेतक-यांना दिलासा देण्यासाठी काहीच करत नाही. मागील सरकारच्या काळात प्रचंड दुष्काळी परिस्थिती होती तरीही १० लाख जनावरे चारा छावणीत सांभाळली. शेतकºयांसाठी राज्याची तिजोरी उघडी केली होती. भाजप सरकारने उद्योगपतींची १ लाख १७ हजार कोटींची कर्ज माफ केली, पण शेतकºयांचे ३० हजार कोटी रूपयांचे कर्ज हे सरकार माफ करत नाही. शेतकºयांना मदत करण्याची सरकारची मनस्थिती नाही. धनदांडग्याना हजारो कोटी रुपए माफ तर बळीराजाला का नाही असा सवाल अनेकांनी केला.
याच सभेत बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगीतले की सरकार केवळ घोषणाबाजी करीत आहे. केवळ पोस्टरबाजी करून चालणार नाही शेतकºयांच्या हितासाठी निर्णय घ्या. जनतेला भूलथापा देऊन सत्तेवर आलेल्या सरकारने एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. या सरकारच्या काळात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. निवडणूकीत आश्वासन देऊनही सरकार शेतीमालाला हमी भाव देत नाही. खासगी बाजार समित्या आणून शेतक-यांची लूट करण्याचे काम या सरकारने सुरु केले आहे. या सरकारचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे अन खान्याचे दात वेगळे आहे. अशा सरकारला जनतेनी धडा शिकवला पाहीजे.आमच्या आमदारांनी शेतकºयांसाठी आवाज उठवल्यास त्यांना ३१ डिसेंबर पर्यंत निलंबीत करण्यात आले.
समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आझमी यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. अच्छे दिन के सपने दिखाकर लोगों को फसाया गया कब आएंगे अच्छे दिन. लोकांचे अच्छे दिन काही आले नाहीत. भाजप सरकारच्या काळात भ्रष्टाचार वाढला असून विरोधकांचा आवाज दाबून हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. शेतकºयांचा सातबारा कोरा केल्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
भाजप सरकारच्या काळात ९ हजारांपेक्षा जास्त शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. तरी मुख्यमंत्री म्हणतात कर्जमाफीची योग्य वेळ आलेली नाही. नेमक्या किती शेतक-यांनी आत्महत्या केल्यावर कर्जमाफीची योग्य वेळ ये़णार आहे? असा खडा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला केला आहे.
आडानी,अंबानी,रिलायन्स या धनदांडग्याचे हजारो कोटीचे कर्ज माफ करण्यात येते तर शेतकºयांचे का नाही असा सवाल विरोधीपक्ष नेते पाटील यांनी केला.

आजपासून काय स्वस्त, काय महाग : बँक खातेदार, करदात्यांसाठी काय नवीन?

नवी दिल्ली : ग्राहकांसाठी नवीन आर्थिक वर्षांची सुरुवात आजपासून होत आहे. १ एप्रिल अनेक नवीन गोष्टी बऱ्या वाईट आहेत. आजपासून काय स्वस्त होणार आणि महाग होणार, टॅक्समध्ये सुटसुटीतपणा तर पैसे ठेवी व्याज दरात कपात  होणार आहे.

★आजपासून स्वस्त

- रेल्वे तिकीट
- घर खरेदी
- मध्यमवर्गीयांना करात सवलत
- लेदर सामान
- नैसर्गिक गॅस
- निकल, बायोगॅस
- नायलॉन
- सौरऊर्जा बॅटरी व पॅनल
- पवन चक्की
- भूमी अधिग्रहणाची नुकसानभरपाई होणार करमुक्त

★काय झाले महाग?

- मुंबई - पुणे एक्स्प्रेस टोल, 36 टक्के दरवाढ
- पानमसाला, गुटखा उत्पादन शुल्क १० वरून १२ टक्के होणार
- सिगारेटवरील उत्पादन शुल्क प्रति हजार २१५ वरून ३११ रुपये होणार
- वाहनांचा विमा महाग होणार असून विमा दरात ५० टक्क्यांची वाढ अपेक्षित

कर्जाचा डोंगर सर होत नसल्याने मोरेवाडी येथील शेतकर्याची आत्महत्या

राहुल गायसमुद्रे
वडवणी:-गेल्या वर्षापुर्वी दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांने या वर्षी पाऊस झाला आता आपण उत्पन्नातुन कर्जाची परतफेड करू अशी आशा धरली होती परंतु पाहीजे तसे उत्पन्न झाले नाही आणि जे झाले त्याला भाव न मिळाल्याने कर्जाचा डोंगर सर होत नाही हे लक्षात आले त्यामुळे  वडवणी तालुक्यातील मौजे मोरेवाडी  येथील अल्पभूधारक शेतकरी कोंडीराम किसन खराडे  वय ४० वर्ष रा.मोरेवाडी यांनी शेतातील राहत्या घराजवळील झाडाला फाशी होवुन आपली जीवन यात्रा संपवली.
अवघा मराठवाडा गेली काही वर्षे दुष्काळात होरपळला मात्र गेल्या वर्षी थोडाफार पाऊस झाल्याने मोठ्या आशेने कष्ट करुन उत्पन्न काढण्याचा प्रयत्न केला परंतु पाहीजे तसे उत्पन्न झाले नाही.आणि जे उत्पन्न निघाले त्याला चांगला भाव मिळाला नाही. त्यामुळे  वडवणी तालुक्यातील मौजे मोरेवाडी  येथील अल्पभूधारक शेतकरी कोंडीराम किसन खराडे यांनी यावर्षी निसर्गाच्या भरवश्यावर शेतात पेरणी केली. परंतु थोडयाफार प्रमाणात झालेल्या पर्जन्यामानामुळे पाहीजे तसे पिक आले नाही . आणी सरकाने पिकाला चांगला भाव मिळवुन दिला नाही परिणामी झालेल्या नुकसानीची चिंता व बाजारात उत्पादनाला चांगला भाव मिळत नसल्याने डोक्यावर वाढता कर्जाचा बोजा त्यास स्वस्त बसू देत नव्हता. कर्ज फेडण्यासाठी आता जमीन विकण्याशिवाय पर्याय नाही हि खंत त्यास विवंचनेत टाकणारी होती. याच विचारात दि.३१ मार्च २०१७ रोजी सकाळी ०४ वाजेच्या च्या सुमारास मोरेवाडी शिवारातील आपल्या शेतात राहत्या घराजवळील झाडाला  गळफास घेऊन आपली जीवनयाञा संपवली.सदर शेतकर्याचे नावे असलेल्या शेतीवर महाराष्ट्र  बँकेचे ८०,०००(ऐशी  हजार ) पिककर्ज व सावकारी कर्ज असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. एकीकडे अस्मानी तर दुसरीकडे सुल्तानी संकटात सापडल्याने स्वतःकडील अल्पशेतीवर कर्ज कसे फेडावे अश्या चिंतेत असताना हि घटना घडली. त्यांच्या मृत्यू पश्चात् पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परीवार आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामाकेला. उत्तरीय तपासणी नंतर मयताचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी उशिरा शोकाकुल वातावरणात शेतकऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, या दु:खातून सावरण्यासाठी शेतकऱ्याच्या नातेवाईकांना शासनाने तातडीने मदत देवून हातभारलावावा आणि पिककर्ज माफ करावे अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.

वाहन खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या


परभणी : प्रतिनिधी
न्यायालय निर्णयाच्या दणक्यानंतर बी एस ३ इंजिन असणाºया वाहनांची खरेदी विक्री आणि नोंदणीवर १ एप्रिल पासून बंदी घालण्याचे आदेश दिल्या नंतर परभणीत दुचाकी वाहनाच्या वितरकाकडुन गाड्यांवर भरपुर सुट जाहीर करण्यात आली. त्यामुळे वाहन खरेदीसाठी शहरातील विशेषत: वसमतरोडच्या शोरुमवर ग्राहकांच्या उड्या पडल्या. सलग दुसºया दिवशीही ही गर्दी कायम राहिली असुन हाणामारीचे प्रसंग देखील घडले आहेत.
प्रदुषण कमी करण्यासाठी बीएस ३ ऐवजी बीएस ४ वाहनाचे उत्पादन करण्याच्या सुचना कंपन्यांनी पाळल्या नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने बीएस ३ वाहन विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय दिला. या वाहनाची नोंदणी १ एप्रिल पासुन करु नये असे आदेशात म्हटले आहे या आदेशामुळे शहरातील वाहन विक्रेत्यांना मोठा आर्थीक फटका बसणार होता. त्यामुळे अनेक कंपन्यांनी वाहन विक्रेत्यांकडे उपलब्ध बीएस ३ वाहनांच्या किंमतीत गुरुवारी सकाळी मोठी सुट जाहीर केली. भरघोस सुट मिळणार असल्याची माहिती समजताच वाहन विक्रेत्याकडे वाहन खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या पडल्या. मागणी असलेले वाहन संपल्यामुळे विक्रेत्यांचे कर्मचारी आणि ग्राहकामध्ये बाचाबाची झाली. दुकानदारांनी आपले शटर बंद केले. कंपनीकडुन सुट देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने अनेकांचे वाहन खरेदीचे स्वप्न पुर्ण झाले आहेत.  एका वाहनामागे पाच हजारापासुन अठरा हजारा पर्यंत सुट मिळत असल्याने शहरातील शोरुमवर ग्राहकांची अक्षरश: उडी पडली. गुरुवारी दुपारी २ वाजल्या पासुन ग्राहकांच्या गर्दीस प्रारंभ झाला. पैशासाठी फायनान्स कंपन्यांची दारे ठोठावण्यात आली. तसेच ग्राहकांची पैसे जमवण्यासाठी शहरातील एटीएमवर देखील रांगाच रांगा लावल्या होत्या. परभणी शहरातील होंडा कंपनीकडुन
आॅफर जाहीर होताच गाड्या
खरेदीसाठी परभणीत ग्राहकांच्या उड्या पडल्या. सर्वत्र चर्चेचा विषय वाहनांवरील सुट ऐकावयास मिळत होता.

मुरुमखेडा गाव नकाशातुन बेपत्ता

प्रतिनिधी

येलदरी कॅम्प:-जिंतूर तालुक्यातील मुरुमखेडा या गावाचे पुनर्वसन होवुन साठ वर्ष उलटले मात्र आज पर्यंत देखील भुमीअभिलेख व तहसील विभागाने मुरुमखेडा हे गाव शासनाच्या नकाशात न घेतल्या मुळे आश्चर्य वाटत आहे.मुरुमखेडा ता.जिंतुर हे गाव येलदरी धरणा मध्ये १९५४ साली गेले होते.
या धरणाला मुरुमखेडा येथील ग्रामस्थांनी रहाती घरे व शेत जमीनी प्रशासनाला दिल्या व त्या नंतर  शेतकºयांनी शासनाच्या पुनर्वसानाची प्रतिक्षा न करता वैयक्तिक जमीनी घेवुन घराचे बांधकामे करुन आपला उदरनिर्वाह केला.मात्र शासनाने आज पर्यंत ना मुरुमखेडा गावाचे पुनर्वसन केले ना शेतकरÞ्यांना घरे बांधुन दिली.शासनाच्या नियमानुसार कुठलेही गाव जर एखाद्या धरनामध्ये जात असेल तर त्या गावाचे पुनर्वसन करने हे प्रशासनाचे कर्तव्य असते.
मात्र गेल्या साठ वर्षाच्या कार्यकाळात देखील आजपर्यंत देखील ग्रामस्थांना ना घरे मिळाली.ना गायरान जमीन मिळाली.मागील काळात गावातील सर्व गावकºयांनी स्वत:जमीनी खरेदी करुन घरे बांधली व त्या ठीकानी ग्राम पंचायत निर्माण झाली.
निवडणुका झाल्या गावामध्ये मुलभुत सुविधा आल्या. रस्ते, नाल्या, पाणी, वीज  सर्व काही झाले परंतु महाराष्ट्राच्या ईतिहासात हे मुरुमखेडा गावच नसल्याचे निदर्शनास आले आहे. शेतकºयांनी  आपल्या मालकीच्या जमीनी,घरे,शासनाला दिली त्या शासनाने गावाचे पुनर्वसन न करता ग्रामस्थांना वा-यावर सोडले व गावाचे नावच नकाशातुन गायब केले या मागील प्रशासनाचा हेतु अद्याप कळालेला नाही.परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालय,भुमी अभिलेख जिंतुर.व तहसिल कार्यालया कडे मुरुमखेडा गावाचा नकाशाच नसल्या मुळे ग्रामस्था समोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे

वार्षिक कृती आराखडा कार्यशाळा संपन्न


परभणी : प्रतिनिधी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्­तार शिक्षण संचालनालयाच्­या वतीने मराठवाडयातील अकरा कृषि विज्ञान केंद्राच्­या शास्­त्रज्ञांकरिता दोन दिवसीय वार्षिक कृति आराखडा  कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. बी. व्­यंकटेश्­वरलु यांच्­या हस्­ते झाले.
 प्रमुख पाहुणे म्­हणुन हैद्राबाद येथील विभागीय प्रकल्­प संचालक तथा मुख्­य शास्­त्रज्ञ डॉ.  दत्­तात्री हे होते तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ.
दत्­तप्रसाद वासकर, विस्­तार शिक्षण संचालक डॉ. भोसले, डॉ. देशमुख आदीसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, मराठवाडयातील अकरा कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ उपस्थित होते.अध्­यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. बी. व्­यंकटेश्­वरलु यांनी मराठवाडयातील शेतक-यांनी शेतीला जोडधंदयाची जोड दिल्­यास निश्चितच शेतक-यांना एक चांगले आर्थिक पाठबळ मिळुन उत्­पन्­नात शाश्­वती प्राप्­त होऊ शकते, शेतकरी आत्­महत्­या रोखण्­यासाठी मदत होईल. यासाठी कृषि विज्ञान केंद्रांनी पुढाकार घेऊन पशुसंवर्धन व दुग्धव्­यवसाय सुरू करण्­यास शेतक-यांना प्रोत्­साहित करावे. कृषि विज्ञान केंद्रात चारा पिके व व्­यवसायिक प्रशिक्षणावर भर देण्­याच्­या सल्­लाही त्­यांनी दिला. मुख्­य शास्­त्रज्ञ डॉ. के.
 दत्­तात्री यांनी कृषि विज्ञान केंद्राचे पोर्टल अद्यावत करण्­याचे व प्रत्­येक विषय विशेषज्ञांच्­या कार्याची माहिती दिली.
 सर्व कृषि विज्ञान केंद्र शास्­त्रज्ञांनी विद्यापीठातील संकरित गौ पैदास केंद्रातील विविध चारा पिकांच्­या प्रात्­यक्षिक प्रक्षेत्राची पाहणी कराण्­याचे आवाहन केले.गतवर्षी राबविण्­यात असलेल्­या अभियांत्रिकी उपकरणे, रूंद सरी वरंबा पध्­दत व नगदी पीके या तीन सुत्री कार्यक्रमाचा आढावा घेतला.

संस्कृती पतसंस्था कार्यालय उदघाटन


परभणी : शहरातील स्टेशनरोड यादव कॉम्प्लेक्स येथे संस्कृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या नुतन कार्यालयाचे उद्घाटन माजी महापौर प्रताप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हेमंतराव जामकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रवि पतंगे, विजय अग्रवाल, विजय जामकर, अजय गव्हाणे, विशाल बुधवंत, सुशील देशमुख, शिवाजी भरोसे, संजयराव देशमुख, इंद्रजीत वरपुडकर, समीर अंबिलवादे, विष्णु शहाणे, पत्रकार सुरज कदम, प्रवीण चौधरी, संतोष सावंत, सचिव प्रदीप कनकदंडे, संतोष कनकदंडे, संजय किनीकर, सोनी आदी उपस्थित होते.

पाणपोईचे उदघाटन


परभणी : परभणी शहरातील गांधी पार्क येथे हनुमान युवक मित्रमंडळाच्या वतीने आयोजीत पाणपोईचे उद्घाटन मित्र मंडळाचे अध्यक्ष नागेश फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अजय फुलारी, सचिन स्वामी, अमित पाचलिंग, उमेश कुलकर्णी, दीपक जावकर , विशु डहाळे, धनंजय जोशी, महेश पाचलिंग, सचिन टिकुळे, संतोष अग्रवाल, उदय जैन, गंगाधर फुलारी, अशोक डहाळे आदी उपस्थित होते.

रस्त्यावर साहित्य


परभणी :  शहरातील शिवाजी नगर गौतमनगरकडे जाणाºया रस्त्यावर जागेजागी बांधकाम साहित्य पडलेले आहे. या रस्त्यावर गिट्टी पडलेली असल्याने दुचाकी घसरण्याचे प्रकार वाढत आहेत. याकडे लक्ष देवुन अनेक दिवसापासुन रस्त्यावर पडलेले साहित्य उचलण्याची मागणी होत आहे.
निवडणूक अधिकारी नियुक्त
परभणी : महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी पाच निवडणुक निर्णय अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी सुनिल महिंद्रकर,उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी बोरकर यांची नियुक्ती केली आहे.

नवे आर्थिक वर्ष, नवे नियम, आज पासून 'या' 12 गोष्टी बदलणार.


____________________________

2016-17 हे आर्थिक वर्ष संपून आज पासून म्हणजे 1 एप्रिल पासून 2017-18 या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. आज पासून अनेक आर्थिक नियमां मध्ये बदल होणार आहेत. या बदलांचा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम होणार आहे. पाहूया आज कोणत्या कोणत्या गोष्टीं मध्ये बदल होणार आहे.

___________________________

01 ) इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं अधिक सोपं झालं असून, आजपासून नवीन फॉर्म मिळणार आहे.
__________________________

02 ) पीपीएफ आणि अल्प बचत ठेव योजनांवरील व्याज दरात घट, पहिल्या तिमाहीसाठी 0.1 टक्क्यांची कपात.

________________________

03 ) 2 लाखांपर्यंतचेच रोख व्यवहाराची सुविधा मिळेल. त्यापेक्षा जास्त रोखीचे व्यवहार केल्यास, तुमचा व्यवहार ज्या रकमेचा असेल, तेवढाच दंड होईल. म्हणजे जर कोणी अडीच लाख रुपये रोख भागवले, तर त्याला अडीच लाख रुपयांचाच दंड होईल.
__________________________

04 ) ट्रेन मध्ये आजपासून विकल्प सेवासुरु होणार, तिकीट कन्फप्म नसल्यास, त्याच मार्गावरील पर्यायी ट्रेन मध्ये सीट मिळणार, सुविधा फक्त ऑनलाईन तिकिटांसाठीच असेल.
________________________

05 ) राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील दारुची दुकानं बंद होणार.

__________________________

06 ) एसबीआयच्या ग्रहकांना आजपासून किमान बॅलन्स ठेवणं बंधनकारक, शहरां मध्ये किमान 5 हजार रुपये, तर ग्रामीण भागात किमान एक हजार रुपयांची मर्यादा
________________________

07 ) मोटार गाड्यांवरील थर्ड पार्टी इन्शुरन्सचा हप्ता जवळपास 50 टक्क्यांनी वाढणार आहे. विमा हप्त्याचे नवे दर लागू होतील.
_________________________

08 ) पीक विमा योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड बंधनकारक.
__________________________

09 ) सेन्सॉर बोर्ड आजपासून ऑनलाईन होणार, आता सिनेनिर्माते बोर्डाच्या वेबसाईटवरच संबंधित पेपर जमा करु शकतात.

________________________

10 ) दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरु, हैदराबाद, कोची आणि अहमदाबाद विमानतळांवर आजपासून प्रवाशांच्या हँडबॅगवर सुरक्षा टॅग लावलं जाणार नाही.

_______________________

11 ) स्मार्ट फोन, पान-मसाला, सिगरेट, चांदीचे दागिने, कार, मोटरसायकल महाग.
_________________

12 ) नैसर्गिक गॅस, रेल्वे तिकीट, आरओ,पीओएस मशिन, चामड्याच्या वस्तू स्वस्त

सोलापुरात शाळेची बस पलटून चालकाचा मृत्यू, 30 ते 40 विद्यार्थी जखमी.


____________________________

मंगळवेढा तालुक्यात शाळेच्या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसचालकाचा मृत्यू झाला असून 30 ते 40 विद्यार्थी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. जुनोनी माध्यमिक हायस्कूलची ही बस होती. विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना बस पलटी होऊन हा अपघात झाला. प्रत्यक्ष दर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यात खड्डा आल्याने चालकाचा बस वरील ताबा सुटला आणि बस पलटी झाली. नंदेश्वर ते जुनोनी मार्गावरसकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघाता नंतर जखमी चालकाला रुग्णालयात नेलं जात असतानाचा त्याचा मृत्यू झाला. 30 ते 40 विद्यार्थी गंभीर जखमी असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांना हवे पोलिसांप्रमाणे वेतन


मुंबई - शासकीय वाहन म्हणून ओळखली जाणारी एसटी व त्याच एसटीतील प्रवाश्यांच्या सेवेसाठी अहोरात्र २४ तास सेवा देणार्या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न बनला  आहे. संघटनेच्या अज्ञानीपणामुळे झालेले चुकीचे कामगार वेतनकरार व एसटीच्या तोट्याचा संबंध कर्मचारी वेतनाशी जोडल्यामुळे वेतन हे अतिशय तुंटपुंज्या अवस्थेतील आहे. त्यामुळे या महागाईच्या भस्मासुरात एसटी कर्मचारी हा दिवसोंदिवस होरपळत आहे. त्यांच्या दैनंदिन गरजा भागविणे ईतपतही वेतन त्यांना दिले जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण व सरकारविरोधात रोष दिसुन येत आहे. पंतप्रधान आवास योजनेतील सरकारी नोकरदार वर्गाला स्वतचे घर असावे म्हणावे म्हणून वार्षिक उत्पन्न ३ ते ६ लाखापर्यत असणार्या आर्थीक दुर्बल घटक असलेले सरकारी नोकरदार वर्गासाठी ही योजना लागु केली आहे. परंतु एसटी कर्मचाऱ्यांचे वार्षीक उत्पन्न १ लाखापेक्षा जास्त नसल्याने हे कर्मचारी कोणत्या घटकात मोडले जातात. वेतन तर नाहीच पन सुविधा सुध्दा नाही म्हणून नोकरी आहे की वेठबिगारी. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागेही परिवार आहे त्यांच्याही अपेक्षा आहे याचेतरी भान सरकारने ठेवावे. एसटी महामंडळातील संघटना फक्त श्रेयवादासाठी चढाओढ करीत असुन त्यांना कर्मचाऱ्यांच्या भविष्याबद्दल थोडीही आपुलकी नसल्याने या संघटनानी कर्मचारी वार्यावरच सोडले की काय असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थीत होतो.

एसटी महामंडळाची स्वायतत्ता प्रणाली ही फक्त नामधारी असुन एसटीचे खाते हे गृहविभाग अंतर्गत येत असल्याने एसटीचे बाबतचे सर्व धोरणात्मक निर्णय हे गृह- परिवहन विभागाच्या मंजुरीने घेतले जातात. पोलिसखातेप्रमाणेच एसटी महामंडळ हे सुध्दा गृहविभागाच्या अंतर्गत असुन पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचारीही अत्यावश्यक सेवेतील महत्वाचे घटक असुन दोघेही जनतेचे सेवक आहे. तरिही पोलिसांना मिळणारे वेतन आणि एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार्या वेतनात तब्बल ५५% टक्काची तफावत असुन ती तफावत दुर करून पोलिसांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन लागु करावे. त्यासाठी चारवर्षाची करारपध्दत कायमस्वरूपी रद्द करून आयोगाप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांची वेतन स्वरचना करावी तसेच मेडीकल कँशलेस योजना त्वरीत लागु करावी ही मागणी कर्मचारी वर्गातुन जोर धोरत आहे.  राज्यावर ४ लाख कोटीचे कर्ज असतांना पोलिस कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देणारचा ना मग एसटी महामंडळावर १ रूपया कर्ज नसतांनाही उलट प्रवाशी सवलतमुल्याचेच कित्येक कोटी शासनदरबारीच एसटीचेच घेणे असल्याने आणि एसटी हा सरकारने जनतेसाठी चालवलेला उपक्रम असुन स्वतंत्र व्यवसाय नसल्याने एसटीच्या नफा तोटाचा संबंध कर्मचारी वेतनाशी न जोडता सरकारने एसटीचे दायित्व स्विकारून प्रवाशी जनतेला अधिक या एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातुन जास्तीत जास्त चांगल्याप्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न करून एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांप्रमाणेच शासकीय वेतन द्यावे. तसेच सरकारने एसटीचे दायित्व स्विकारण्यावर प्रामुख्याने विचार करावा. असे संघर्षमित्र विजय नानकर यांनी  बोलतांना सांगितले.
                   विजय सुर्यवंशी ,पाथरी