तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 March 2017

आमदार मोहन फड यांनी पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून सेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय लांबनिवर

मोईन खान

परभणी : येथील पाथरी मतदार संघातील शिवसेना आमदार मोहन फड  यांनी पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून अखेर ‘ना’राजीनामास्त्र उपसले आहे. आज दि. १४ रोजी झालेल्या पंचायत समितीच्या सभापती निवडीनंतर आ.फड यांनी नाराजी व्यक्त करत आज पत्रकार परिषद बोलावली होती. परभणी मतदार संघातील शिवसेनेचे आ.राहुल पाटील, जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव सह संपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर यांनी येवून समजूत घातल्यानंतर तुर्तास हा निर्णय संपर्क प्रमुख येईपर्यत थाबविण्यात आला आहे.मानवत येथे झालेल्या पंचायत समितीच्या सभापती निवडीत संपर्क प्रमुखांचा व्हिप डावलून मतदान झाल्याने आमदार मोहन फड नाराज आहेत.
    आ.फड हे  अपक्ष निवडून आलेले आहेत यापूर्वी त्यांचा भाजपाला पांठींबा होता नंतर त्यांनी काहही महिन्यापुर्वी रितसर शिवसेनेत प्रवेश केला होता. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणूकीतही आ. फड यांनी दिलेल्या उमेदवारांचे नावेही कापण्यात आल्याचा आरोप यावेळी आ.फड यांनी केला आहे. मानवत पंचायत समितीच्या निवडीमध्ये आ.फड यांनी सभापती पदासाठी दत्ता जाधव यांचे नाव सुचवले हंोते. त्यांच्यानावे संपर्क प्रमुख सुभाष भोईर यांनी पक्षाचा व्हिपही काढला होता परंतू अंतर्गत गटबाजी होवून पक्षप्रमुखांचा व्हिप धुडकावून मतदान झाले. त्यामुळे आ.फड नाराज आहेत. आज दि. १४ रोजी ते शिवसेनेचा राजीनामा देणार असल्याचे सोशल मिडीयावर फिरवले जात आहे. परंतू झालेल्या पत्रकार परिषदेत आ.फड यांनी शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या विरोधात उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे.  जिल्हा परिषद निवडणूकीत तिकीट कापण्यापासून ते सभापतीपदाच्या निवडीपर्यंतचे राजकाऱण त्यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.
    दरम्यान, येत्या १९ तारखेला संपर्क प्रमुख सुभाष भोईर परभणी येथे येणार असून त्यांच्या कानावर झाला प्रकार घालून पुढील निर्णय घेणार असल्याची माहीतीही त्यांनी पत्रपरिषदेत दिली.यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते मात्र दोन्हीपैकी एकच जिल्हाप्रमुख उपस्थित असल्याने पत्रकारांच्या भुवया उंचावल्या  एकंदरीतच शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीची प्रचिती या निमित्ताने पहावयास मिळाली. तसेच जिल्हयातील सर्वात मोठी पंचायत समिती परभणी प.सं. ज्यात सेना ८, कॉग्रेस ८ व भाजप ३ व अन्य १ असे पक्षीय बलाबल असून या पंचायत समितीमध्ये भाजपाकडून आनंद भरोसे यांनी असा निरोप दिला होता की , परभणी प.सं. सभापती पदाचा उमेदवार पाथरी विधानसभा मतदार संघातील व्याप्त भागाचा दिल्यास भाजपा पूर्णपणे बिनशर्त पाठींबा देईल परंतू असे असतांना संपर्क प्रमुख आ. भोईर यांनी भलतेच नाव पुढे केल्याने या ठिकाणी नाईलाजाने कॉग्रेस व भाजप यांनी युती करून सेनेला बाजूला ठेवले. या सर्व बाबीस संपर्क प्रमुख जबाबदार असल्याचैे बोलले जाते.या सर्व प्रकारावरून आ.फड यांनी अशी नाराजी व्यक्त केली की परभणीत पहिली शिवसेना राहीली नसून आता व्यक्तीनिष्ठ शिवसेना उरली आहे. त्यामुळे येणाºया संपर्क प्रमुखाच्या बैठकीपर्यत आपण वाट पाहून पुढील निर्णय घेऊ असे सांगितले.  आपले काय

★फड हे अपक्ष आमदार आहेत त्यांनी सुरवातीला भाजपा ला पाठींबा दिला होता कांही महीन्यापुर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता पण बंडु सेनेला कंटाळून त्यांनी जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते बंडू हे शिवसेना खासदार आहेत.
आ.फड यांच्या स्विय सहाय्यक यांनीच पत्रकार परिषदेचे निमंत्रण देताना साहेब आज बंडू सेनेला कटांळून आज जय महाराष्ट्र करीत आहेत असा निरोप दिला होता पण एेनवेळी निर्णय बदलला पण खा.जाधव वर टिका करण्याचे ते विसरले नाहीत
भविष्यात पुन्हा मराठा कार्डवापरत सेनेने तिकीट डावलेतर आपले काय? असा ही प्रश्न आ फड यांच्या मनात शंका धरून आहे.

2 comments:

  1. परभणीत बंडुसेना ऊरली हे तर मान्य केल शिवबंधन बांधनार्या आमदारान हे काही कमी नाही महानगर पालीका परभणी निवडनुकी साठि भाजपाच्या हातात आयत कोलीत साहेब

    ReplyDelete
  2. आमदारांना हिच शेवटची संधी जनतेत बोलल्या जातय साहेब

    ReplyDelete