मा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...!

Tuesday, 21 March 2017

गटबाजीला कंटाळून आ मोहनराव फड यांचा अखेर शिवसेनेला 'जय महाराष्ट्र

कार्यकर्ता मेळाव्यात २६ मार्च रोजी होणार पुढील वाटचालीचा निर्णय

मोईन खान

परभणी:-शिवसेनेत गटबाजी नेहमीच पहवयास मिळत आहे .शिवसेनेत अंतर्गत गटबाजी उफाळून येवून अखेर अपक्ष असलेले व शिवसेनेत प्रवेश केलेले आ. मोहन फड यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र घातल्याचे आज परभणी येथील निवास स्थानी घेतलेल्या पत्रपरिषदेत सांगीतले. 

नुकतेच तीन महिन्या पुर्वी शिवसेनेत दाखल झालेले अपक्ष आमदार मोहन फड यांची सेनेत 'असून अडचण नसून खोळंबा' अशी परिस्थिती झाल्याने त्यांनी पत्रकार परिषदेत आपण शिवसेना पक्ष सोडत असल्याचे जाहीर करत पक्षांतर्गत होत असलेली गटबाजी आणि या गटबाजी मुळे आपले आणि आपल्या कार्यकर्त्याचे होत असलेले नुकसान टाळण्या साठी आपण शिवसेना सोडली असे त्यांनी यावेळी सांगीतले आहे. पक्ष सोडण्याच्या मागे पाथरी मतदार संघाचे मानवत पंचायत समितीचे सभापती प्रकरण मुख्य असल्याचे त्यांनी सांगीतले आहेे या पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आ.फड यांनी त्यांचे कार्यकर्ते असलेले दत्ता जाधव यांचे नाव पुढे केले तसेच संपर्क प्रमुखाच्या पत्रावर व्हीप इतर सदस्यांसाठी आणला होता परंतू इतर सदस्यांनी व्हीप नाकारून सेनेच्या गटातील दुस-या उमेदवारास सभापती केल्याने याप्रकरणी जबाबदार असलेले खा. संजय जाधव , जि.प्रमुख डॉ. संजय कच्छवे.मानवत ता.प्रमुख विष्णू मांडे व इतर नव निर्वाचित ४ पंचायत समिती सदस्य यांच्यावर कार्यवाही होणे अपेक्षीत असतांना पक्षाकडून काही दखल घेतल्या गेली नाही. शिवसेने तील अंतर्गत गटबाजीला कंटाळून आपण शिवसेना पक्ष सोडणार असल्याचा निर्णाधार करून पक्ष सोडत आहे. आपण सामान्य कार्यकर्त्याच्या व जनतेच्या प्रचंड मेहनतीतुन विजयी झालो असून गटबाजीच्या राजकारणात आपणाला स्वारस्य नसल्याचे सांगून यामुळेच आपण पक्ष सोडत असल्याचे सांगून आपली भूमिका २६ मार्च रोजी इंद्रायनी मित्र मंडळ व कार्यकर्ते यांच्यासोबत मेळावा घेवून पुढील राजकारणाची दिशा ठरविणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 


3 comments:

  1. झकास निर्णय साहेब

    ReplyDelete
  2. है निवडणुका पुरता वापर करून घेणारी आहेत याच्या आधी माहीती नव्हती का आता काय उपयोग

    ReplyDelete