तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 30 April 2017

रोडवर झाड पडल्याने अपघाताची शक्यता

रजनिकांत वानखडे

सोनाळा फाड्यावर जवळ आडजात झाड रोडवर पडल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही
सोनाळा फाटा ते सोनाळा गावांचे अंतर हे तिन किलोमिटरचे असुन फाड्यानजदीक एक आड जातीचे झाड हे सदर रोडवर पडले असुन आपघाताची दाट शक्यता तत्पुर्वी या झाडाची विल्हेवाट लावणे अवश्यक आहे
सद्या लग्नसराई जोरात सुरु असुन बरेच वाहन हे रोडवर चालत असुण आडजातीचे झाड हे रोडवर पडले आहे तरी संबधीताने लक्ष देणे गरजेचे आहे

पेठ बाभळगावच्या शेतकरी कुटूंबाला स्व नितिन महाविद्या लयाची आर्थिक मदत

★जन्मभूमी फाऊंडेशनच्या आवाहनाला प्रतिसाद
पाथरी:- तालुक्यात पेठ बाभळगाव येथिल शेतक-याचे घर २७ एप्रिल रोजी अचानक लागलेल्या आगित संपूर्ण जळून खाक झाले होते यात संसारोपयोगी साहीत्य आणि ६लाख रुपये किंमतीचा शेतमाल,अवजारे आणि एक बैल भाजला होता या कुटूंबाला आज पाथरी येथिल स्व नितिन वरिष्ठ  महाविद्या विद्यालयाच्या वतिने रोख बाराहजार सातशे रुपयांची मदत प्राचार्य डॉ राम फुन्ने यांच्या हस्ते देण्यात आली.
गुरूवारी सायंकाळी आगीत बाभळगाव ता पाथरी येथिल पांडूरंग यादव या अल्पभूधारक शेतक-याच्या घराला आग लागून संपुर्ण संसार उघड्यावर आला होता या नंतर सर्व प्रथम जन्मभूमी फाऊंडेशन ने या गरीब शेतकरी कुटूंबाला रोख आर्थिक मदत करून ईतरांनी या शेतक-याला मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून आज पाथरी येथिल स्व नितिन महाविद्यालयाच्या वतिने १२ हजार ७०० रुपयाची रोख मदत करुन शेतक-यां प्रति संवेदना दाखवली तर लिंबा येथिल योगेश्वरी साखर कारखाण्याच्या वतिने कार्यकारी संचालक प्रकाश सेठ सामत यांनी रोख पंधरा हजार रुपये या शेतकरी कुटूंबाला दिले तर शेजारी राहाणा-या विधवा महीलांना दोन हजार पाचशे रुपयाची मदत केली.या जन्मभूमी फाऊंडेशन च्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकजन या गरीब शेतकरी कुटूंबाला जमेल तशी आर्थिक मदत करत आहेत या वेळी स्व नितिन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ राम फुन्ने, यांनी या बरोबरच यादव यांच्या मुलाच्या पुणे येथिल शिक्षणा साठी तेथिल प्राचार्यांशी चर्चा करून अजून मदत करणार असल्याचे या वेळी सांगून या कुटूंबाला धीर दिला या वेळी प्रा डॉ जगन्नाथ बोचरे, प्रा डॉ मारोती खेडेकर प्रा मधूकर ठोंबरे, जन्मभूमी फाऊंडेशन चे सचिव किरण घुंबरे , प्रकाश सेठ सामत, शेतकी अधिकारी मोकाशे , जि प सदस्य सोगे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन आशोकराव गिराम, ग्रामविकास अधिकारी संदिपान घुंबरे, मुंजाभाऊ धर्मे, आदी ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

सबसेतेज,तेजन्यूज हेडलाईन्स

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

____________________________

अझलन शहा हॉकी स्पर्धेत भारताचा न्यूझीलंडवर 3-0 ने विजय.

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांची कोईमतूर येथील "कोडानड इस्टेट' हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या अकरा जणांना मल्लपुरम पोलिसांनी अटक केली आहे.

ब्राह्मण समाजाला आरक्षण नसल्यामुळे ते परदेशात जात असतील तर त्यांनी आरक्षण घ्यावं आणि इथेच राहावं, असं वक्तव्य आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी केलं आहे.आमच्या आरक्षणाला धक्का न लावता इतरांना आरक्षण द्या, अशी आमची जुनी मागणी आहे. पण आमचे आरक्षण काढण्याचा प्रयत्न केला तर सगळेजातील पण आमचं आरक्षण जाणार नाही, असंही रामदास आठवले म्हणालेत.

परभणीत 13 लाख 14 हजार 550 रुपयांच्या तुरीसह चोरट्यांनी भरलेला तुरीचा ट्रक पळवला आहे. वसमत रोडवरील एमआयडीसी परिसरातील ही घटना आहे. यामध्ये 9 शेतकऱ्यांचा माल चोरीला गेला.

पेट्रोल एक पैसा प्रति लीटर, तर डिझेल 44 पैसे प्रति लीटरने महाग.

पुणे = जुन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, घरांचे पत्रे उडून गेले,विजेचे खांबही कोसळले, वाऱ्यामुळे मोठं नुकसान.

54 व्या राज्य पुरस्कारांची घोषणा, दशक्रिया सिनेमाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार.

श्रीनगरमधील पोलीस स्टेशन बाहेर ग्रेनेड हल्ला.

पुणे = हिंद केसरी कुस्ती परतीची उपांत्य फेरी, अभिजीत कटकेची फायनल मध्ये धडक.

इंदापूरच्या भीमा नदीत 4 डॉक्टर बुडाल्याची माहिती, 7 ते 8 डॉक्टर असलेली बोट भीमा नदीत उलटली, एकाचा आढळला मृतदेह, शोधमोहीम सुरू.

सांगली = वसंत चव्हाण या सराफ व्यापा-याच्या डोळ्यात चटणी टाकून त्याच्या कडील 5 लाख रुपये व 94 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चौघांनी लुटले. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी जवळील घटना, शनिवारी रात्री उशिराने उघडकीस आली ही घटना.

नाशिक = शिवाजीवाडी येथील टायर गोदमावर विजेची तार पडल्याने लागली भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश.

सोलापूर = उजनीच्या कालव्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, बोरगाव येथील घटना. ओम लोणी (वय 13) व प्रसन्न लोणी (वय 10) अशी मृत मुलांची नावं, एकूण चार मुलं गेली होती वाहून, दोघांना वाचवण्यात यश.

सोलापूर = तपास कामात हलगर्जीपणा करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक डाके निलंबित. पोलीस अधीक्षक एस. विरेश प्रभू यांची कारवाई.

यवतमाळ = रिक्षाचालक संतोष शिंदेने जिल्हाधिकारी कक्षेसमोर घेतले विष, शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. थकित कर्जासाठी महिंद्रा फायनान्सकडून सुरू होता तगादा, जाचाला कंटाळून चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न.

नंदुरबार = तळोदा तालुक्यातील पाच गावांमध्ये गारपीट. शहादा तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाच्या हलक्या सरी.

हैदराबाद पोलिसांनी रद्द केलेल्या 500 व 1000 नोटा असलेले तब्बल4.41 कोटी रुपये केले जप्त. 8 जणांना अटक.

आपण महापुरुषांना जातीच्या आधारावर वाटून घेतले आहे, केवढं पाप केले आहे -योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

नंदुरबार मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालसाठी लवकरच प्रयत्न सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महात्मा फुले जन आरोग्ययोजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला मोफत आरोग्य सुविधा देण्याचे लवकरच सुरू करू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नंदुरबार = अशा शिबिराच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचण्यास मदत होते - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नंदुरबार = एका दिवसांत 2 लाखाहून अधिक रुग्णांची तपासणी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नंदुरबारच्या महाआरोग्य शिबिराचे गिनीझ बुक मध्ये नोंद व्हावी, असं हे शिबीर आहे. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सांगली = शिवाजी विद्यापीठ टीचर्स असोसिएशनच्या (सुटा) बैठकीत अभुतपूर्व गदारोळ,एकमेकांच्या अंगावर धावले सदस्य,पत्रकारांनाही केली धक्काबुक्की.

सांगली = तडीपार गुंड रवींद्र मानेची हत्या, पोलीस करत आहेत पुढील तपास.

नाशिक = सिडको भागातील माऊली लॉन्स येथे नवे दारू दुकान बंद पाडले, महिलांचा रुद्रावतार.

नाशिक = चांदवड, मालेगाव परिसरात तुफान पाऊस, शेतक-याच्या कांदा, द्रा़क्ष पिकांचे नुकसान

उल्हासनगरच्या खेमाणी मार्केटमधील धाग्याच्या कारखान्याला भीषण आग.

उत्तर प्रदेश मध्ये आता कायद्याचे राज्य असेल, आता कोणाचीही जमीन अवैधरित्या बळकावता येणार नाही : योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री उत्तर प्रदेश

चंद्रपूरच्या महापौरपदी भाजपच्या अंजली घोटेकर विजयी, तर उपमहापौरपदी भाजपचेच अनिल फुलझेले बिनविरोध.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विकलांगांच्या कार्यक्रमात विकलांगांना प्रतिमहिना 300 ते 500 रुपये पेन्शन देण्याची केली घोषणा.

तामिळनाडू =  राज्यात चांगला पाऊस पडावा यासाठी रामेश्वरम मध्ये महायज्ञाचं आयोजन

स्वयंचलित हवामान केंद्र उभारून गावापर्यंत माहिती पाेहोचविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य, शेतकऱ्यांच्या नावावर तूर विकणाऱ्या व्यापाऱ्यांची गय करणार नाही- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

पाण्यासाठी महीलांचा घाटनांदूर ग्रा प वर पुन्हा मोर्चा


तेज न्युज हेडलाईन्स

गणेश जाधव
घाटनांदूर : येथील गणेश नगर, जि प शाळेमागची झोपडपट्टी,पोष्टऑफीस एरीया,रेल्वे गेट वरील भागआदी भागात गत एक वर्षापासून नळाला पाणीच येत नाही , वारंवार सांगून विनंती करूनही ग्रा प काहीही करत नसल्याने अखेर दि२९ शनिवार रोजी दुपारी १२वाजता  महीलांनी ग्रा प वर मोर्चा काढून ग्रामविकास अधिकारी बी डी जांबळे यांना लेखी निवेदन देत आपली कैफीयत  मांडली. व ठिय्या आंदोलन केले
घाटनांदूर येथे नियोजना अभावी कमी अधिक  प्रमाणात सर्वत्रच पाणी पुरवठयाचे तिन तेरा वाजलेले आहेत . पुस पाणी पुरवठा योजना दुरुस्ती साहीत्याचा अभाव असयल्याने बंद आहे . तर स्थानिक पाणी पुरवठा योजना सक्षम असूनही पाणी मिळत नाही . गणेश नगर, जि प शाळेमागची झोपडपट्टी,पोष्टऑफीस एरीया,रेल्वे गेट वरील भाग  आदी ठिकाणी नळ योजनेचे  गत एक वर्षा पासून पाणी येत नाही . कधी आले तर चार दोन घागरीच्या वर पाणी मिळत नाही . या बाबत वारंवार तेथील महीलांनी ग्रा प सदस्य सरपंच यांना विनंती करूनही सुधारणा झालीच नाही ,नव्हे कोणी लक्ष सुद्धा दिले नाही . याचा अखेर उद्रेक होवून दि २९ एप्रिल शनिवार रोजी महीलांनी ग्रामपंचायत वर मोर्चा काढला , व ठिय्या आंदोलन करून ग्रामविकास अधिकारी बी डी जांबळे यांना लेखी निवेदन देवून येत्या चार दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली .ग्रामाविकास अधिकारी बी डी जांबळे वगळता सरपंच वा इतर सत्ताधारी सदस्य उपस्थित नव्हते ,ग्रा प सदस्य प्रदिप जाधव एकमेव सदस्य उपस्थित होते .या प्रसंगी सौ मिणाताई जाधव,सौ अनुराधा जाधव,सौ सुनंदा नंन्नवरे,सौ  शेख,सौ लक्ष्मीबाई मोरे,सौ शिला नानजकर,सौ सविता जाधव,सौ संगीता मानवतकर,सौ कुलकर्णी, सौ देवके,सौ पांचाळ, श्रीमती सय्यद, श्रीमती साळुंके, श्रीमती दहीवाळ,सौ गायकवाड, यांच्यासह वामण जाधव, अभय जाधव, महेश गायकवाड,आदी  सहभागी झाले होते ,या प्रसंगी लोकमतशी बोलताना ग्रामविकास अधिकारी बी डी जांबळे म्हणाले की जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने पूस पाणी पुरवठा योजनेकडे लक्ष देणे गरजेचे आहे .

कारंजा नगर परिषदेमध्ये जाहिरात रोस्टरच्या नियमाचे उल्लंघन


जिल्हा रोस्टर डावलून जिल्हयाबाहेरील वृत्तपत्रांना जाहिराती

फुलचंद भगत
मंगरुळपीर-
यादीवर नसलेल्या व रजिस्ट्रेशन नसलेल्या जवळच्या स्थानिक वृत्तपत्रांना टेंडरच्या जाहिराती
मुख्याधिक़ारी व रोस्टर अधिकार्‍यावर कारवाईची स्मॉल ऍन्ड मिडीयम न्युजपेपर असोसिएशन जिल्हा शाखेची मागणी
जिल्हाधिकार्‍यांसह माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्र्यांना पुराव्यासहित तक्रार करणार
जिल्हाध्यक्ष संदीप पिंपळकर यांची माहिती- जिल्हयातील कारंजा नगर परिषदेमध्ये गेल्या सहा महिन्यापासून शासन निर्णयानुसार ठरवून दिलेल्या जाहिरात रोस्टरच्या नियमाचे सर्रास उल्लंघन केल्या जात असून आपल्या मर्जीतील जवळच्या वृत्तपत्रांना आर्थिक व्यवहार करुन कारंजा नगर परिषदेतील संबंधीत रोस्टर अधिकार्‍यांकडून सर्रास टेंडरच्या जाहिराती वितरीत केल्या जात आहेत. यातही जी वृत्तपत्रे शासनमान्य जाहिरात यादीवर नाहीत किंवा ज्या वृत्तपत्रांना आर.एन.आय. दिल्लीचा रजिस्ट्रेशन क्रमांक नाही वा जी वृत्तपत्रे शासनाच्या लेखी बंद आहेत अशा जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील अनेक वृत्तपत्रांना मोठमोठ्या लाखो रुपये कामाच्या जाहिराती मनमानीपणे व रोस्टर डावलून दिल्या जात आहेत. या प्रकाराची जबाबदारी संबंधीत रोस्टर अधिकारी व मुख्याधिकारी यांच्याकडे असून त्यांना ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतरही मुख्याधिकारी हे नियमाला डावलून जाहिरात वितरण करणार्‍या संबंधीत अधिकार्‍यांवर कोणतीच कारवाई करायला तयार नाहीत. त्यामुळे या सर्व प्रकारात मुख्याधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल चौकशी व संबंधीतांवर कारवाईसाठी स्मॉल ऍन्ड मिडीयम न्युजपेपर असोसिएशन जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यासह महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय आणि मुख्यमंत्र्यांना पुराव्यानिशी तक्रार देणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पिंपळकर यांनी दिली. तसेच या प्रकरणी  कारवाई न झाल्यास शासनमान्य यादीवर असलेल्या व नेकी आणि निष्ठेने जिल्हा, तालुका, शहर व ग्रामीण भागात स्वखर्चाने वृत्तपत्रे प्रकाशित करुन शासकीय योजना जनसामान्यांपर्यत पोहचविणार्‍या वृत्तपत्रांना न्याय देण्यासाठी वेळ पडल्यास न्यायपालिकेत याचिका दाखल करण्याचा निर्णयही पिंपळकर यांनी जाहीर केला.

सहकार क्षेत्र ही महाराष्ट्राला मिळालेली देणगी-राज्यमंत्री अर्जुन खोतकर

रामु चव्हाण

वसमत येथे गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी लि च्या वसमत शाखेचा उद्घाटन समारंभ पार पडला या शाखेचा शुभारंभ नामदार अर्जुनराव खोतकर ( राज्यमंत्री वस्त्रोद्योग, दुग्धव्यवसाय, मस्त्य व पशुसंवर्धन राज्यमंत्री, महाराष्ट्र) यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना खोतकर म्हणालेकी महाराष्ट्राला सहकार क्षेत्राच वरदान मिळाले आहे यात साखर कारखाना, दुधसंघ , सुतगिरणी सह अनेक सहकारी उद्योगामुळे महाराष्ट्राचे नाव देशात गाजत आहे. सहकार क्षेत्रामुळे अनेक कुटुंबाला आधार मिळाला आहे  यामुळे सहकार हा महाराष्ट्राचा प्राण आहे वसमत शहरात आज या संस्थेच्या 21 व्या शाखेचे
आय.एस.ओ प्रमाणित, अत्याधुनिक कोअर बँकिंग सुविधेसह गोदावरी अर्बन मल्टिस्टेट
क्रेडिट को-ऑप सोसायटी लि,नांदेड वसमत शाखेचे उदघाटन ३0 एप्रिल २०१७ रोजी
सायंकाळी ०६:०० वाजता आयोजित करण्यात आला होता यावेळी  शाखेचे उदघाटन ना.अर्जुनभाऊ खोतकर,
वस्त्रोद्योग, दुग्धव्यवसाय, मस्त्य व पशुसंवर्धन राज्यमंत्री, महाराष्ट्र
राज्य यांच्या हस्ते व, आमदार डाॅ जयप्रकाशजी मुंदडा यांच्या अध्यक्षतेत खाली करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून जयप्रकाश दांडेगावकर माजी सहकार राज्यमंत्री, मार्गदर्शक
म्हणून आमदार हेमंत पाटील संस्थापक गोदावरी अर्बन,तर  सौ.राजश्री हेमंत पाटील
अध्यक्षा- गोदावरी अर्बन , तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.शिवाजीराव माने माजी खासदार,गजाननराव घुगे माजी आमदार, विनोदकुमार झंवर उद्योगपती, श्री.विक्रम पतंगे सिनेट सदस्य, श्री.पोरजवार श्रीनिवास
नगराध्यक्ष, श्री.सुभाष लालपोतू, उद्योगपती यांची प्रमुख  उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  धनंजय तांबेकर, व्यवस्थापकीय संचालक,
व्ही.एन.नखाते
(ठवकर), उपसरव्यवस्थापक, सुरेखा दवे, प्रशासकीय अधिकारी, शाखा व्यवस्थापन समिती
, अशोक चोपडे, शाखाधिकारी आणि समस्त संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

अमरसिंहाच्या मार्गदर्शनातून गेवराईत वैभवशाली सोहळा - ना. धनंजय मुंडे

सुभाष मुळे...
-----------
गेवराई, दि. 30 : करोडो रुपयांच्या लग्न सोहळ्याला लाजवेल असा अभुतपुर्व आणि वैभवशाली विवाह सोहळा जर कोण घेत असेल तर ते फक्त शारदा प्रतिष्ठान आहे. आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनातून हा वैभवशाली व अभुतपुर्व सामुहिक विवाह सोहळा असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी केले.
       गेवराई येथील शारदा प्रतिष्ठानचा १९ वा सामुहिक विवाह सोहळा हजारो वऱ्हाडी, मान्यवर व संत महंत यांच्या उपस्थितीत रविवार, दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता संपन्न झाला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे, माजीमंत्री शिवाजीराव पंडित, राष्ट्रवादी सेलचे प्रदिप दादा सोळुंके, माजी सभापती व गटनेते बजरंग सोनवणे, महेंद्र गर्जे, प्रतिष्ठानचे कार्यवाह आ. अमरसिंह पंडित, जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह पंडित, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. सुरेशराव हात्ते यांच्यासह संत, महंत सर्वश्री ह.भ.प. महादेव महाराज पुरी, ह.भ.प. लक्ष्मण महाराज फड, मृदंगाचार्य आप्पासाहेब कोठुळे, ह.भ.प. चंद्रहास महाराज, ह.भ.प. तिर्थराज महाराज पठाडे, ह.भ.प. विठ्ठल महाराज पंडित, ह.भ.प.दत्ता महाराज गिरी, ह.भ.प. रघुनाथ महाराज खेर्डेकर, ह.भ.प., ज्ञानेश्वर महाराज जोशी, ह.भ.प. नवनाथ महाराज गिरी, ह.भ.प.सोपान महाराज जंगले, ह.भ.प.निंबाळकर महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या प्रास्ताविकपर भाषणात बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित म्हणाले की, गेल्या १८ वर्षापासून काळाची गरज ओळखून शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामूहिक विवाहाचा हा यज्ञ अखंडपणे चालु आहे. दुष्काळजन्य परिस्थितीत शारदा प्रतिष्ठानने गोरगरिबांच्या मुला मुलींच्या विवाहाची जबाबदारी घेतली असुन आतापर्यंत पंधराशे परिवाराचे संसार प्रतिष्ठानने उभे केले. हुंडाप्रथेला मुठमाती देण्यासाठी आ. अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानने हि चळवळ सुरु केली आहे. आजच्या या विवाह सोहळ्यात उच्च शिक्षित बरोबरच दिव्यांग ताईही सहभागी झाले ही आनंदाची आणि समाधानाची बाब आहे असे सांगुन आपण दिलेल्या प्रेम आणि आशिर्वादाच्या बळावर शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक समाज विधायक कामे केली जातील, त्यासाठी शारदा प्रतिष्ठानच्या चळवळीला आपल्या सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले. या वेळी संत महंतांच्या वतीने माऊली संस्थानचे  ह.भ.प.नामदेव महाराज शेंबडे यांनी नव वधू- वराना शुभेच्छा देऊन शारदा प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले.
       यावेळी बोलताना ना. धनंजय मुंडे म्हणाले की, आ. अमरसिंह पंडित यांच्या सामाजिक उपक्रमांतून आम्हाला काम करण्याची उर्जा मिळते. कर्ज काढून विवाह करण्याच्या प्रथा आणि परंपरा आपण बंद करून अशा उपक्रमात आपण सहभागी झाले पाहिजे. शिवाजीराव पंडित दादांची शिकवण आणि या हजारो वऱ्हाडींचा अशिर्वाद आ. अमरसिंह पंडीत यांच्या पाठीशी आहे. भविष्यकाळात ही शक्ती त्यांच्या पाठीशी उभा राहील असेही ते म्हणाले. सायंकाळी ठीक साडे सहा वाजता मंगलमय वातावरणात ५७ जोडपी विवाहबद्ध झाले. हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाठात संपन्न झाला. नव वधू वर यांना प्रतिष्ठानच्या वतीने कपडे, मनी मंगळसूत्र, बुट, चप्पल, संसारपयोगी साहित्य देण्यात आले. या सामुहिक विवाह सोहळ्यासाठी जयभवानी देवी मंदिर परिसर गर्दीने गजबजला होता. दुपारी १२ वाजता भोजनाला प्रारंभ झाला. विवाह सोहळ्यास आलेल्या मंडळीच्या भोजनाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माधव चाटे यांनी केले.
      यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष  भाऊसाहेब नाटकर, माजी सभापती आप्पासाहेब गव्हाणे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष डिंगाबर येवले, बप्पासाहेब मोटे, पाटीलबा मस्के, सभापती जगन पाटील काळे, संभाजीराव पंडित, जालिंदर पिसाळ, बबनराव मुळे, आवेज शरीफ, महंमद गौस, सुनिल पाटील, जगन्नाथ शिंदे, रामदास मुंडे, अंकुश गायकवाड, श्रीराम आरगडे, कुमार ढाकणे, आनंद सुतार, रुषीकेश बेद्रे, समाधान मस्के, पाडुरंग गाडे,अॅड. एच.एस.पाटील, डॉ. प्रशांत मुदकोंडवार, तात्यासाहेब मेघारे, धनंजय सुलाखे, बापु तारुकर, प्रताप कुडके, नारायण पवार, गोरख कोकाटे आदी मान्यवरासह पदाधिकारी, कार्यकर्ते, वऱ्हाडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
 
╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

पेट्रोल चोरीमुळे दरवर्षी ग्राहकांना २५० कोटी रूपयांचा चुना

नवी दिल्ली– रिक्षाच्या मीटरपासून इव्हीएमपर्यंत लागलेली ‘टँम्परिंग’ची कीड आता पेट्रोल पंपावरच्या मशीनपर्यंत येऊन ठेपली आहे. गाडीत पेट्रोल भरताना आपले लक्ष डिस्पेन्सरमध्ये वेगाने फिरणाऱ्या लीटरच्या आकड्याकडे असते, त्यानुसारच आपण पैसे भरतो. पण या मशीनच्या आत इलेक्ट्रॉनिक उपकरण बसवून दर वेळी १० टक्के कमी पेट्रोल देऊन ग्राहकांना लुटण्याचा प्रकार उत्तर प्रदेशात उघडकीस आला आहे. या पेट्रोल चोरीमुळे दरवर्षी ग्राहकांना २५० कोटी रूपयांचा चुना लावला जात आहे!

पेट्रोलियम मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दरवर्षी ३.५ कोटी ग्राहक एकूण ५९,५९५ सरकारी पेट्रोल पंपावरून २,५०० रूपयांचे पेट्रोल-डिझेल खरेदी करतात. उत्तर प्रदेश पोलिसांनी पकडलेली चोरी ही तर या आकडेवारीच्या तुलनेत कणभरही नसेल. उत्तर प्रदेश एसटीएफने सात पेट्रोल पंपांवर धाडी घातल्या. या सर्व ठिकाणी पेट्रोल चोरींसाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बसवण्यात आल्याचे आढळले.