तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 26 April 2017

आ मोहन फड यांच्या सह जिल्ह्यातील दिग्गज करणार थोड्याच वेळात पुण्यात भाजपा प्रवेश

प्रतिनिधी
परभणी:- शिवसेनेत प्रवेशा नंतर गटबाजीला कंटाळलेल्या आ मोहनराव फड यांनी अवघ्या चार पाच महीण्यात सेनेला जय महाराष्ट्र करत मेळावा घेऊन भाजपा प्रवेशाचे संकेत दिले होते त्या साठी आज गुरूवारचा मुहुर्त ठरला असून पुणे येथे भाजपा राज्य कार्यकारीनीच्या अधिवेशनात आज थोड्याच वेळात हा प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे.
पाथरी विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आ मोहन फड यांच्या सह सोनपेठ,सेलू नगरपालीकेतील दिग्गज आणि मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीतील दिग्गज यांच्या सह अनेक जन भाजपाच्या गळाला लागले असून थोड्याच वेळात पिंपरी-चिंचवड शहरात हा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहीती आ मोहनराव फड यांच्या जवळील सुत्रां कडून तेजन्यूज हेडलाईनला प्राप्त झाली आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, भाजपाचे राज्यातील सर्व आमदार खासदार पक्ष पदाधिकारी यांची या वेळी उपस्थिती असनार आहे.

★भाजपा पदाधिकारी मात्र अनभिज्ञ----?

जिल्हाभरात एवढी मोठी राजकीय घडामोड होत असतांना आजच्या या  प्रवेशा विषयी एकाही भाजपा पदाधिका-याला माहीती नसल्याचे सांगण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment