तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 April 2017

अखेर आ मोहन फड यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश

प्रतिनिधी
पाथरी:- पाथरी विधानसभा मतदार संघात २०१४ च्या निवडणुकीत दिग्गजांना धोबी पछाड देत अपक्ष म्हणून विजयी झालेले आ मोहनराव फड यांनी आज गुरूवार रोजी पिंप्री-चिंचवड येथे भाजपा राज्यकार्यकारीनी बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पाथरी , सेलु, मानवत, सोनपेठ तालुक्यातील विद्यमान विविध राजकीय पुढा-यांच्या (पती,मुलगा) अशांना सोबत घेत भाजपात प्रवेश केला आहे.
शिवसेनेत प्रवेशा नंतर गटबाजीला कंटाळलेल्या आ मोहनराव फड यांनी अवघ्या चार पाच महीण्यात सेनेला सेनेचे खासदार यांच्यावर गट बाजीचा थेट आरोप करत मानवत पंचायत समिती सभापती निवडी वरून सेनेला जय महाराष्ट्र करत समर्थकांचा मेळावा घेऊन भाजपा प्रवेशाचे संकेत दिले होते. मात्र हा प्रवेश कधी होणार हे स्थानिक भाजपा नेतृत्वाला ही माहीती नव्हता त्या साठी आज गुरूवारचा मुहुर्त ठरला आणि पिंपरी-चिंचवड येथे भाजपा राज्य कार्यकारीनीच्या अधिवेशनात आज हा प्रवेश सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.पाथरी विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आ मोहन फड यांच्या सह सोनपेठ,सेलू नगरपालीकेतील दिग्गज आणि मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीतील दिग्गज यांच्या सह अनेक जन भाजपाच्या गळाला लागले असून आज झालेल्या या प्रवेश सोहळ्यात काँग्रेस, शिवसेना यांच्या जि प सदस्या,नगरसेवक,म्हणून निवडून आलेल्या महीलांचे पती मुले आ मोहनराव फड यांच्या सोबत असून तांत्रीक अडचणी मुळे त्यांनी आपल्या नातेवाईकांना समोर केले असल्याचे सांगण्यात आले असून पाथरी तालुक्यातील तीन गटातून सेनेकडून निवडणूक लढलेले उमेदवार ही आ मोहनराव फड यांच्या सोबत असल्याचे आ फड यांच्या विश्वसनिय गोटातून सांगण्यात आले आहे.त्या मुळे येत्या काळात आता सत्तेच्या माध्यमातून आ मोहनराव फड हे या मतदारसंघात मजबूत बांधनी करतील असे चित्र स्पस्ट दिसत आहे मानवत, पाथरी,सोनपेठ या भागातील नगरसेवक,न प अध्यक्ष,उपाध्यक्ष जि प सदस्य यांच्या नातेवाईकांना सोबत घेत हा प्रवेश सोहळा दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पिंपरी -चिंचवड येथे संपन्न झाला असून या नंतर जिल्हाभरातील ईतरांच्या प्रवेशा साठी नजिकच्या काळात परभणी येथे भाजपाच्या दिग्गज मंडळीच्या उपस्थितीत कार्यक्रम होऊन यात अजून काही मंडळी भाजपवाशी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

No comments:

Post a Comment