तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिन आणि दिपावली निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 14 April 2017

पुर्णेत डॉ.आंबेडकर जयंती मिरवणूकीत राडा दगडफेक व जाळपोळी नंतर संचारबंदी

पूर्णा/शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक सुरू असताना झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर संतप्त जमावाने केलेल्या जाळपोळीच्या व दगडफेकी नंतर शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाली असून यात तब्बल सहा ते सात वाहने आगीत भस्मसात झाली आहेत सदरील घटनेला सुरुवात शहरातील शिवाजी नगर परिसरातुन झाली असल्याचे समजते डॉ.आंबेडकर जयंती मिरवणूक या परिसरामध्ये सायं.07-25 वाजल्याच्या दरम्यान पोहोचताच दगडफेक व गदारोळाला सुरुवात झाल्यानंतर या घटनेचे प्रचंड संतप्त पडसाद शहरात उमटल्याचे पाहावयास मिळाले शहरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरात तणावाची स्थिती आहे.
आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र ऊत्साहात साजरी केली जातीय पुर्णा शहरातही दिवसभर विविध कार्यक्रम घेण्यात आले. सायंकाळी पाचच्या सुमारास मिरवणूकांना सुरूवात झाली. सार्वजनिक जयंती समितीची मिरवणूक छञपती शिवाजी नगर (कदम गल्ली) येथे पोहचली असतानाच गोंधळ ऊडाला. एका प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहीती नुसार या परिसरात मिरवणूकीवर दगडफेक झाली. यानंतर संतापलेल्या युवकांनी तब्बल पाच ते सहा चार चाकी वाहणे यात कोत्तावार बंधूंच्या दोन सियाज लक्झरी कार अंदाजीत किंमत 24,00000/-रुपये व एक पियाजो ॲटो व व्यापारी कच्छी यांचा पियाजो ॲटो,तर झरकर यांची मारोती ओमीनी गँसकिटची कार जाळण्यात आल्यानंतर सदरील गाडीचा भयंकर स्पोट झाला तर याच परिसरातील स्वच्छता गृहाजवळील सौदा यांची नॕनो कार,तसेच उत्तर प्रदेशातील लस्सी दुकानदारांची दुकाने,किंग पान शॉप,आदींचे प्रचंड नुकसान करण्यात आले जाळलेल्या वाहनांमध्ये चार ते पाच दुचाकी गाड्या पेटवल्याची माहिती आहे. तसेच शहरातील शिवाजी नगर(कदम गल्ली),भगतसिंघ चौक,सराफा बाजार,किंग कॉर्नर,जुना मोंढा, दुकानांची ही तोडफोड व जाळपोळ करण्यात आली असुन दगडफेकीत दहा ते बारा जण गंभीर जख्मी झाले असून त्यांना शहरातल्या शासकीय रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे
या संदर्भात पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला असता घटनेस दुजोरा देण्यात आला. मुख्यालयातून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त रवाना करण्यात आला असल्याची व शहरात आता तनावपुर्ण शांतता आहे असून शहरात घडलेल्या या घटनेमध्ये लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे

5 comments:

  1. Are daama navta samora samor ladaych manun asa karta kaa aamch bhim sainik pn kami nhi thanks all my Bhim Sainik

    ReplyDelete
  2. Are damma asel tar samora samor ya Bhim sainikan chaya....
    ,😡😤Nishedh

    ReplyDelete