तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 31 May 2017

परतूर पोलिसांचा सुपर फास्ट तपास


आशिष धुमाळ

परतूर
पाच गुन्हातील आरोपीसह ,सोने,चांदी,मुद्देमाल हस्तगत

पोलिस अधिक्षक रामनाथ पोकळे,अप्पर पोलिस अधिक्षिकि लता फड यांच्या आदेशाने गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी परतूर पोलिस विभागाने उपविभागिय पोलिस आधिकारी संतोष वाळके,पोलिस निरीक्षक महादेव राऊत पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत करण्यात आलेल्या विशेष पोलिस पथकाने दिनांक 7 मे 2017 ते 30 मे 2017 या कालावधित परतूर परिसरात विविध चोरीच्या प्रकरणातील गुन्हाचा तपास करत आरोपींना मुद्देमाला सह अटक करत गुन्हे उघडकीस आणण्याची मोठी कामगीरी बजावली.

परतूर पोलिस ठाण्यात गुरनं 25/2017 मधील जोगीनंदरसिंग शेरसिंग पटवा या कलम 394 भादवि प्रकरणातील आरोपीला परतूर पोलिसांनी ताब्यात घेतले तर 67/2017 मधील शेख खलील शेख अब्दुल रहेमान या कलम 379 भादवी प्रकरणातील मोटार सायकल चोरी करणार्‍या आरोपीला मोटर सायकल क्रमांक एम एच 21 एए 5962 या चोरलेल्या मोटर सायकलसह जेरबंद केले आहै. 84/2017 मधील चोरी प्रकरणातील आरोपी लक्ष्मण उर्फ लख्या माणीक पवार राहणार पारधीवाडा या कलम 457,380 भादवि प्रकरणातील आरोपीला पाच ग्राॅम सोने व दहा तोळे चांदी या मुद्देमाला सह अटक केले आहे .याच आरोपीला याच  कलमा नुसार दूसर्‍या चोरीच्या गुन्हात साडेतीन तोळे सोने व पंधरा तोळे चांदीसह अटक केले आहे.197/2017  मधील चोरी प्रकरणातील आरोपी सोनुसिंग प्रेमसिंग टाक राहणार परतूर या कलम 457,380 भादवी प्रकरणातील आरोपीला पाच तोळे सोन्यासह जेरबंद केले.परतूर पोलिसांनी पथक स्थापन केले व गून्हेगारी विरूध्द फास आवळतांना त्यांना मिळालेले हे मोठे यश लाभले आहे.पोलिसांच्या या पविञयामुळे गुन्हेगारांचे धाबे दणादले आहे.परतूर  परिसरात होणार्‍या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हे पथक असेच कार्यरत राहणार आहे एकही गुन्हेगार यातुन सुटणार नाही . असा गुन्हेगारांना इशारा प्रतिक्रीया देतांना पोलिसांनी पञकारा समोर व्यक्त केली .याच महिन्यात पोलिसांनी एक अल्पवयीन मुलाला सात महागड्या मोबाईल सह पकडले होते.
सदरील पथकात गोपनिय शाखेचे गुंजकर साहेब,पो.काॅ.काळे,पो.हे.का.मिलिंद सुरडकर,भिमराव राठोड,अन्नासाहेब लोखंडे,जगन्नाथ सुक्रे,आर.डी .मुतेनेपवार,पी,एम,पालवे,एम एस,वच्छेवार,शाम गायके,इरफान शेख,रवी चव्हाण ,चंपालाल घुसींगे,एस.एस.मदलवार,आर.बी.हिवराळे यांचा या पथकात समावेश होता.

No comments:

Post a comment