तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 31 May 2017

महामार्गावरील पडलेल्या खड्डया मुळे अनेक नागरीक जखमी ..असंख्य वहानाचे हाजारो वर नुकसान.. पालम सा.बा.विभाग गार झोपेत

अरुणा शर्मा

पालम :- नांदेड महामार्गावरील मागील दीड महिण्या पासून स्टेट बँक हैद्राबाद बँके समोरील महामार्गावरील रस्त्यावर मध्य भागी 2 फुटाचा मोठा खड्डा पडला आहे.
सविस्तर वृत असे कि बँके समोरील रोडवर मोठा खड्डा पडला आहे. या खड्डया मुळे येणारया जाणारया वहान धारकाना तारे वरची कसरत करुन खड्डया बाहेर गाडी काडावी लागते. या बाबत सा.बा. विभागाला एक महिण्या पुर्वी नागरिकांनी निवेदन दिले. मात्र या विभागाला आज पर्यंत जाग आलीच नाही. माञ गेल्या 10 दिवसा पासुन खड्डा मोठा व खोल झाल्याने येणारया जाणारया एस.टि.बस, ट्राक्टर, ट्रक,छोटया गाडया, आँटो आदिं वाहना चे अतोनात मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. त्यातच मोटार सायकल धारक मात्र दोन दिवसा आड खड्डयात पडून जखमी होत आहेत. अता पर्यंत 10 ते 11 नागरीकासह महिलाना देखिल मुक्का मार लागल्याचे वृत्त हाती आले आहे. तसेच या खड्डयात रात्री आयचर गाडी फसली होती. त्या गाडीस नागरीकांनी रात्री मदत करून खड्डया बाहेर काडली. नतंर ज्ञानराज घोरपडे यांच्या टिप्पर चे मेन पाटे या खड्डयात तुटले व गाडी तेथेच थांबली त्याच वेळी अनेक नागरीकांनी मदत करुन गाडीतील माल खाली केले. व खाली गाडी बाहेर काडली तसेच अनेक छोटया वहानाचे गाडी खालील चबर फुटले आहे. तर विषेश म्हणजे या रोडवरून नांदेड कडुन येणारया छोटया गाडया कार या खड्डयात अडकुन गाडीच्या समोरील पत्तरा खराब होत आहे. असा न मोजण्या इतक्या गाडयाचे नुकसान झाले आहे. मात्र हि सर्वे बाब सा. बा. विभागास माहीत आहे. कारण या सा.बा. विभागाचे कार्यलय या खड्डया पासुन जवळच आहे. मात्र याना कुनाचेच काही घेणे देणे नाही. हे जर महामार्गावरील खड्डा नाही बुजविला तर काही दिवसातच खड्डा मोठा होऊन गाडया पलटी होणार हे निचित आहे. या खड्डया मुळे नागरीक त्रस्त आहेत. व येणारे जाणारे वहान धारक देखिल त्रस्त झाले आहेत. तरी या रोडवरील खड्डयाचे काम करण्याची मागणी डॉ. सय्यद साबेर अली, सत्तार आ. हबीब, सय्यद अकबर, डॉ. जाकेर आली, सय्यद शम्मी, सय्यद आली, हाफेज भाई, आलम भाई, सय्यद अनीस, सय्यद आय्युब अदिनी केली आहे. तरी सा.बा. विभागाने या बाबी कडे लक्ष दयावे व त्वरीत रोडवरील पडलेले मोठे  खड्डे बुजन काम करावे. अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a comment