तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 31 May 2017

शेतकऱ्यांच्या 'मागणी' संपाला राज्यभरातून पाठींबा मिळत

सुभाष मुळे...
------------
गेवराई, दि. 31 : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून, शेतीमालाला हमी भाव मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकरी आज 1 जून पासून संपावर जात आहेत. शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या असल्याने या शेतकरी संपाला सर्वत्र जाहीर पाठींबा मिळत आहे.
          शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे ही मागणी असून सरकार या मागणीला आजपर्यंत बगल देत सरकार दिशाभूल करीत आहे. तूर खरेदीविना शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कष्टाने पिकविलेल्या मालाला रास्त भाव मिळत नाही, कांदा व दूध उत्पादकांचे हाल झाले आहेत. अशा स्थितीत दुष्काळाचे चटके सहन केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे आवश्यक आहे, ही भूमिका शिवसेनेची कायम आहे. यासाठी " होय मी कर्जमुक्त होणारच" ही मोहीम शिवसेना राज्यभरात राबवित आहे. या मोहिमे अंतर्गत लाखों शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीसाठीचे पत्र जमा करून मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. कर्जमुक्ती व शेतीमालाला हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी आज दि 1 जून पासून राज्यातील शेतकरी स्वयंस्फूर्तीने एकत्र येऊन संपावर जात आहेत.
       या संपला गेवराई शिवसेनेचा जाहीर पाठींबा असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या संपात सहभागी होऊन आपल्या भावना शासनापर्यंत पोहचवाव्यात तसेच शेतकऱ्यां विषयी सहानुभूती असणाऱ्यांनीही या संपाला पाठींबा देऊन सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केले आहे. 

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a comment