तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 31 May 2017

बरंजळा लोखंडे येथे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त आठ झाडे लावुन अनोखा उपक्रम

भोकरदन — नारायण लोखंडे

भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथील शेतकरी रमेशदेवा लोखंडे यांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९२ जयंतीनिमित्त आठ झाडे लावुन विनम्र अभिवादन करण्यात आले.यामध्ये बदामाचे तिन झाडे,अशोकाचे दोन ,सप्तपंजीचे  दोन व रातरानीचे एक झाड लावण्यात आले आहे.
तसेच ५ जुन ला जागतिक पर्यावरण दिणानिमित्त अजुन स्वत विशेष दहा झाडे लावण्यात येणार असल्याचे रमेश देवा लोखंडे  यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की प्रतेकाने जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त व महापुरुषांच्या जयंतीनिमीत्त एक झाड जरी लावले तरी आपण पर्यावरनाचा समतोल राखु शकतो.यावेळी शुभम लोंखडे या सहा वर्षाच्या मुलाने सुध्दा दोन झाडे लावले.
त्यांनी हा उपक्रम हाती घेवुन एक आदर्शमय कामगिरी केली आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वञ अभिनदंन होत आहे.

प्रतिक्रिया—

आपण जर महापुरुषांच्या जयंती निमित्त डि.जे न लावता गावात झाडे लावले तर त्या रकमेत गाव झाडांनी हिरवेगार होईल.आणी त्यामुळे आपल्या महापुरुंषाच्या आठवणी स्मरणात राहील. माझ्या वडिलांनी हा जयंतीनिमित्त राबवलेला उपक्रम खुप प्रेरणा देणारा आहे,आणी मी तो यानंतर चालुच ठेवनार आहे.इतर खर्च न करता असे उपक्रम मी नेहमीच राबवण्याचा संकल्प यावेळी करतो.माझ्या वडिलामुंळे खुप प्रेरणा मिळाली.

नारायण लोखंडे     ग्रामस्थ बरंजळा लोखंडे
9545380257

No comments:

Post a comment