तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 31 May 2017

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

____________________________

प्राप्तिकर विभागाने आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडण्याची प्रक्रिया आणखी सुलभ करण्यासाठी एसएमएस सुविधा सादर केली आहे. नागरिकांनी आपल्या मोबाईल वरुन पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि नाव टाईप करून 567678 किंवा 56161 क्रमांकावर एसएमएस केल्यास काही वेळातच त्यांचे पॅन आणि आधार कार्ड एकमेकांशी जोडले जाईल, असे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे.

धक्कादायक खुलासा : काश्मीरच्या अशांती मागे पाकिस्तानचं फंडिंग.

कोकणात पावसाचा जोर वाढला, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार सरी.

सात वर्षांसाठी नवी मुंबईकरांच्या करात कोणतीही वाढनाही : गणेश नाईक

काबूल मधील बॉम्बस्फोटात 50 ठार, 300 पेक्षा अधिक जखमी.

जनावरांच्या कत्तलीवर बंदी घालणा-या केंद्र सरकारच्या आदेशाविरोधात आयआयटी मद्रासच्या प्रवेशव्दारावर आंदोलन करणा-या आंदोलकांना चेन्नई पोलिसांनी हटवले.

औरंगाबाद = समृद्धी महामार्गाविरोधात शिवसेनेचं रास्तारोको आंदोलन. सरकारने कितीही मोबदला दिला तरी महामार्गासाठी जमीन न देण्याची शेतक-यांची भूमिका आहे- अंबादास दानवे, शिवसेना जिल्हा प्रमुख.

छत्तीसगडच्या धानोरा मध्ये सुरक्षा पथके आणि माओवाद्यां मध्ये चकमक

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये भारतीय दूतावासाजवळ बॉम्बस्फोट, दूतावासातील सर्व भारतीय सुरक्षित असल्याची माहिती.

मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे ट्रक आणि टॅम्पोची समोरासमोर धडक. संगमेश्वर बसस्थानकातील चहाच्या टपरीत घुसला ट्रक. चालक गंभीर जखमी.

इंदापूर = मिनी बसचा अपघात. चार जणांचा मृत्यू.

मोरा चक्रीवादळामुळे फसलेल्या 18 जणांची नौदलाने सुटका केली.

नाशिक = दिंडोरी तालुक्यातील कोकणगाव खुर्द येथे आई, वडील आणि मुलाची निर्घृण हत्या. मंगळवार रात्रीची घटना. हत्येचं कारण अस्पष्ट.

हिंसाचार पसरु नये म्हणून सहारनपूर पोलिसांनी 74 फेसबुक अकाऊंट, 35 टि्वटर आणि 32 युटयूब अकाऊंट बंद केले.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री बनल्यानंतर योगी आदित्यनाथ आज पहिल्यांदा अयोध्येत जाणार.

रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाच्या जोरदार सरी.

उत्तर प्रदेशात धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्या प्रकरणी रेल्वे पोलीसाला अटक.

अण्णा द्रमुकच्या निवडणूक चिन्ह प्रकरणात टीटीव्ही दिनाकरनच्या जामिन अर्जावर दिल्ली न्यायालय आज निर्णय सुनावणार.

जर्मनीचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पेनच्या माद्रिद शहरात पोहोचले, तीस वर्षानंतर स्पेनचा दौरा करणारे पहिले पंतप्रधान.

सातारा = पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील पाचवड फाटा येथे मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास नऊ वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात पंधराजण जखमी, जखमींना कराडच्या कृष्णा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले

No comments:

Post a comment