तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Wednesday, 14 June 2017

अमेरिका = व्हर्जिनियामध्ये अंदाधुंद गोळीबार, मोठ्या राजकीय नेत्यासह 5 गंभीर.


____________________________

अमेरिकेच्या व्हर्जिनिया मध्ये कॉंग्रेसच्या एका ज्येष्ठ खासदारावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. कॉग्रेसचे ज्येष्ठ नेता स्टीव्ह स्कॅलीस यांच्यावर बंदुकधारी हल्लेखोराने गोळीबार केला आहे. या गोळीबारात स्टीव्ह स्कॅलीस यांच्यासह 5 जण गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचीही माहिती आहे.   प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यासह किमान 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी सकाळी व्हर्जिनिया मध्ये कॉंग्रेसचे सदस्य बेसबॉलचा सराव करत होते त्यावेळी स्टीव स्कॅलीस हे देखील तेथे उपस्थित होते. अचानक  एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबाराला सुरूवात केली. मीडिया रिपोर्ट्स नुसार, स्टीव्ह यांच्यासह त्यांचे तीन जवळचे सहकारीही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. हल्लेखोराने जवळपास 20 ते 23 राउंड फायरकेले. हा दहशतवादी हल्ला आहे की नाही याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.

No comments:

Post a Comment