मा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...!

Wednesday, 28 June 2017

तभा चा ‘शालेय प्रार्थना व स्वच्छता अभियान‘ नविन्यपुर्ण उपक्रम ः स्वाती कुळकर्णी


विनोद तायडे
वाशीम,28 जून
समाजप्रबोधन व राष्ट्रप्रेमाचा वसा घेवून चालणार्‍या तरुण भारतचा शालेय प्रार्थना व स्वच्छता अभियान, हा उपक्रम नविन्यपुर्ण असून, अंतर्गत व बाह्य स्वच्छतेसाठी हा उपक्रम उपयोगी पडणार आहे. दररोज दैनिक घरी येत असले तरी, घरी येणारे दैनिक किती विद्यार्थी वाचत असतील याबाबत उपरोक्त अभियानाचे प्रमुख अतिथी राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेच्या प्राचार्य स्वाती कुळकर्णी यांनी खंत व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय लावण्याचे यावेळी त्यांनी आवाहन केले.
तरुण भारतद्वारे आयोजित शालेय प्रार्थना व स्वच्छता अभियानाचा आज, 28 जून रोजी वाशीम येलि राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत दुपारी 12 वाजता शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या प्राचार्य स्वाती कुळकर्णी उपस्थित होत्या. तसेच मंचावर उपमुख्याध्यापक सुरेश खरावन, पर्यवेक्षिका शिला वजीरे, शिक्षक अमोल काटेकर, तभाचे जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत लोहाणा, उपसंपादक भगवान कोतीवार विनोद तायडे व विशाल परसवार उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत लोहाणा यांनी प्रमुख अतिथी स्वाती कुळकर्णी यांचे वृक्षाचे रोपटे देवून स्वागत केले. मनावर संस्कार रुजविण्यासाठी बाल वयातच मुलांवर प्रयत्न केले पाहीजे. मनाची आंतरीक स्वच्छता व बाह्य परिसराची नेहमी स्वच्छता ठेवल्यास दोन्ही बाबी रोगमुक्त ठेवता येतात, असे प्रतिपादन यावेळी चंद्रकांत लोहाणा यांनी केले. तसेच तरुण भारतच्या स्पर्धेची यथोचीत माहीती यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेचे शिक्षक अमोल काटेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. तसेच यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना त्यांनी तरुण भारतच्या उपक्रमाची प्रशंसा केली. तरुण भारत ने निर्मितीपासून भारतीय संस्कती जपली आहे. सातत्याने नविन्यपूर्ण उपक्रम राबवून वाचकांची मने जिंकली, असेही ते म्हणाले.  शेवटी कार्यक्रमाचे आभार तभा चे उपसंपादक भगवान कोतीवार यांनी मानले.
छायाचित्र - शालेय प्रार्थना व स्वच्छतेची शपथ देतांना तभा ची टीम व शिक्षक तसेच विद्यार्थी

विनोद तायडे वाशिम
....8888277765.................

No comments:

Post a Comment