तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 31 July 2017

पत्रकार मारहाण प्रकरणी यांच्या पत्रकार रत्यावर पोलिस प्रशासनाचा काळ्या फिती लावुन तिव्र निषेध

अनिल घोरड
माजलगांव  (प्रतिनिधी)
पीक विमा भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना मारहाण केल्याचा फोटो व शूटिंग काढत असलेल्या दैनिक लोकाशाचे सिरसाळा प्रतिनिधी मिलिंद चोपडे यांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उप-निरीक्षक सुनिल अंधारे,पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल शिनगारे यांना तात्काळ निलंबित करण्याच्या मागणीसाठी माजलगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून तहसील कार्यालयावर आज सकाळी११ वाजता सोमवार दि.१ऑगस्ट रोजी मुक मोर्चा काढण्यात आला.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, सिरसाळा येथील पत्रकार मिलिंद चोपडे यांना माजलगांव शहर पोलिसांनी व्हि.डि.ओ.शुटींग का करतो म्हणुन मारहाण केली त्यानंतर चोपडे हे पत्रकार असल्याचे कळाल्यानंतर सुडबुध्दीने पुन्हा जास्तच गंभीर व अमानुष मारहाण केली.माजलगांव शहर पोलिसांचे हे कृत्य अत्यंत घृणास्पद असुन या विरोधात आज तहसिल कार्यालयासमोर काळी फित लावुन या घटनेचा तिव्र निषेध मुक मोर्चाद्वारे करुन संबंधित पोलिस अधिकारी उपनिरीक्षक सुनिल अंधारे आणि स्वप्निल शिनगारे यांना तात्काळ दोन दिवसात निलंबित करण्यात यावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे मुक मोर्चा काढुन जिल्हाधिका-यांना घेराव घालण्यात येईल अशी मागणी माजलगांव तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार उमेश मोगरेकर,दिनकर शिंदे,तुकाराम येवले,किशोर प्रधान,कमलेश जाब्रस,महेंद्र मस्के हरिष यादव,पुरुषोत्तम करवा,उमेश जेथलिया प्रा सुदर्शन स्वामी भास्कर गिरी वैजनाथ घायतीडक ज्योतिराम पांढर पोटे बाळासाहेब अडगळे दत्ता येवले,सुभाष बोराडे,दिगंबर सोळंके,तानाजी सिरसट,विष्णु उगले,अनिकेत भिलेगावकर,रविंद्र राऊत,रविकांत उघडे,विजय मस्के,शेख मुजफ्फर,अरविंद ओव्हळ,वाजेद पठाण,बाबासाहेब मनेरे, आदीं च्या सह्या निवेदनावर  आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या प्रमुख पदी संवेदनशील ओमप्रकाश शेटे हेच हवे.. परतूरचे सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांचे कॅबिनेट मंत्री ना.लोणीकर यां

परतुर/वार्ताहार
ओमप्रकाश शेटे यांचा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा पदभार त्यांच्या कडेच ठेवा अशी मागणी परतुर येथील सामाजिक कार्यकर्ता संतोष जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे

गेल्या 65 वर्षात महाराष्ट्र राज्याला पहिली वेळेस कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस हे मिळाले
पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावर चालणारे मुख्यमंत्री सुदैवानेच या राज्याचा लाभले व त्यांनी मुख्यमंतकक्षाची जवाबदारी तहान-भुक-विसरुन काम करणा-या संवेदनशील ओमप्रकाश शेटे यांच्या वर दिली..तेव्हा पासून म्हणजेच 3 वर्षापासुन सतत ओमप्रकाश शेटे यांनी डोळ्यासमोर रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवाहे ब्रिदवाक्य समजुन मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत महाराष्ट्रातील हजारो गोरगरीब रूग्णाला संकटकाळी उपचारासाठी कोट्यावधीची मदत राज्य शासनाच्या माध्यमातुन मिळवुन दिली....मग यात आपल्या परतूर मतदार संघातील मुख्यमंत्री महोदयांनी गंभीर दखल घेतलेला पण दुर्दैवाने निधन झालेला चिमुकला सय्यद फैजान याच्या यकृत प्रत्यारोपणसाठी तर ओमप्रकाश शेटे यांनी दिवस-रात्र अनेक ट्रस्टला विनंती करुन त्याच्या लिव्हर ट्रांसप्लांट साठी जमवलेली 15 लाखाची एवढी मोठी रक्कम जमा केली होती व केवळ सोशल मिडीया वर आवाहनाला प्रतिसाद देत तो बार्शिचा नवविवाहित गंभीर जखमी अमोल काळे या तरुणाला उपचारासाठी केलेली तातडीची मोठी अमुल्य मदत...
ओमप्रकाश शेटे ह्यांची असे अनेक संवेदनशील व माणुसकी साठी केलेली कार्ये महाराष्ट्र राज्य नेहमी पाहतो..महाराष्ट्रातील कोणताही रुग्ण मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षात आला कि त्याला कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे कधिच त्याला मदती शिवाय रिकाम्या हाताने परत पाठवत नाहि.जर एखाद्या वेळी एखादा गरीब रुग्ण शासनाच्या मदत योजनेत बसत नसेल तर ओमप्रकाश शेटे हे चक्क स्वतःच्या खिशातून त्या गरीब रुग्णास आर्थिक मदत करतात.....
   मग मला महाराष्ट्र राज्याचा एक सामान्य नागरिक म्हणून प्रश्न पडतो की ओमप्रकाश शेटे यांचा पोटचा मुलगा गंभीर आजारी असतांनाही ओमप्रकाश शेटे हे संत गाडगेबाबा प्रमाणे रुग्णासाठी प्रामाणिक धड़पड करतात स्वतःच्या मुलाच्या आजाराची चिंता करित नाहि ना बायकोची,एवढ्या निस्वार्थी माणसाला बदलण्याची जेव्हा बातमी जेव्हा माझ्या कानावर आली तेव्हा माझ्या पायाखालची जमिन सरकली...
   तरी मा.ना.लोणीकर साहेब आपण महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी या नात्याने ओमप्रकाश शेटे यांची मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षावर नियुक्ती हि कायम ठेवावी हि आपणास आपणास माझी राज्यातील गोरगरीब रूग्णाच्या वतिने श्री जाधव यांनी निवेदनाव्दारे मागणी  केली आहे

गोंदियातील एक बोकड चक्क दूध देतो.

_________________________

गोंदिया = गाई-म्हशी शेळी दूध देतात, हे तुम्हा-आम्हाला माहित आहे. मात्र, बोकड दूध देतो, असं म्हटलं तर….? ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल, पण हे खरं आहे. गोंदियातील एक बोकड चक्क दूध देतो. गोरेगाव तालुक्यामधील पिपरटोला गावातील कटरे कुटुंबीय हे गेल्या 50 वर्षांपासून शेळी पालनाचा व्यवसाय करत आहेत. कटरे कुटुंबाकडे सध्या 40 हून अधिक दुभत्या बकऱ्या शेळ्या आहेत. त्यामुळे प्रजननासाठी बोकडाची गरज भासते.तीन महिन्यांपूर्वी पिपरटोला गावात मेंढी पालन करणारे लोक आले होते. उच्च दर्जाच्या शेळ्या उत्पादित करण्यासाठी त्यांच्या कडून कटरे कुटुंबीयांनी तोतापुरी प्रजातीचा बोकड खरेदी केला. इतर बकऱ्यांप्रमाणे बोकडाला देखील आंघोळ घालून उन्हात उभे केले असता, बकऱ्याच्या स्तनातून दूध टपकायला लागले. पहिल्या दिवशी या ‘अजूबा’ नावाच्या बोकडाने 150 मिली दूध दिले. दूध देणाऱ्या अजूबा बोकडा विषयी गोरेगावच्या पशु वैधकीय अधिकऱ्यांना माहिती देण्यात आली. डॉक्टरांनी बोकडाची वैद्यकीय तपासणी केली असता, बोकडाला गानोकोमोसटिया नावाचा आजार झाला असल्याने आणि बोकडाच्या शरीरातील हार्मोन्स मध्ये बदल झाल्याने बोकड दूध देत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणेआहे.पहिल्यांदाच बोकड दूध देत असल्याचे आढळलं आहे, असे डॉक्टर सांगतात. वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीमसह बोकडाची वैद्यकीय तपासणी करूनत्याचा अहवाल वरिष्ठ अधिकऱ्यांना पाठवून या बोकडावर संशोधन करु आणि याचा खर्चही पशु संवर्धन विभाग उचलेल, अशीही माहिती पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. 25 हजार रुपयांना खरेदी केलेल्या या बोकडाला आज दीड लाख रुपयांपर्यंतची मागणी आहे. मात्र, पशु संवर्धन विभागाने या बोकडावर संशोधन करण्यासाठी दत्तक घेण्याची तयारी दर्शवल्याने शेळी मालक सतीश कटरे यांनी बोकडाची विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे.

गोकुळचं गायीचं दूध दोन रुपयांनी महागलं.

_________________________

गोकुळच्या गायीच्या दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. उद्या 1 ऑगस्ट पासून गोकुळचे नवे दर लागू होतील. फक्त गायीच्या दुधाच्या विक्री दरात वाढ केली जाणार आहे. म्हशीच्या दुधाच्या दरात कोणताही बदल होणार नाही. कोल्हापूर मधील गोकुळ दूधसंघानं गायीच्या दुधाच्या विक्रीदरात वाढ केली आहे. त्यामुळे उद्यापासून गोकुळ गायीच्या दुधासाठी ग्राहकांना 2 रुपये जास्त मोजावे लागतील. कोल्हापूर मध्ये सध्या गायीचं दूध 38 रुपये प्रतिलीटर विकलं जातं. उद्यापासून त्याचा विक्रीदर 40 रुपये होणार आहे. मुंबईतही या दुधाच्या दरवाढीचा फटकाबसणार आहे. मुंबईत गोकुळचं टोन्ड दूधसध्या 40 रुपयांना विकलं जातं. ते उद्यापासून 40 रुपयांना विकलं जाईल. तसंच गोकुळ लाईफ दूध सध्या 42 रुपयांना विकलं जातं, ते 44 रुपयांना विकलं जाईल.

शेतीतला ‘सचिन’, मिरची लागवडीतून 4 महिन्यात 6 लाखांचं उत्पन्न!


_________________________

तासगाव मधील कवठे एकंद गावातील सचिन जाधव या तरुण शेतकऱ्याने भर उन्हाळ्यात मल्चिंग पेपरवरती सिझलिंग हॉट जातीच्या मिरचीची लागवड केली आहे. या मिरचीतूनआतापर्यत 14 टनाचे उत्पादन घेत 6 लाखांचा फायदा मिळवला आहे. शेतीच्या नावान नाक मुरडणाऱ्या शेकडो तरुणांसमोर सचिनने आदर्श निर्माण केला आहे. तासगाव तालुका हा तसा द्राक्ष बागेसाठी प्रसिद्ध आहे. याच तालुक्यतील कवठे एकंद गावामधील जेमतेम बारावी शिकलेल्या सचिन जाधव या तरुण शेतकऱ्याने द्राक्ष शेतीला पर्यायी पीक घेतलं आहे. घरची 3 एकर ऊस आणि द्राक्षबागेची फायदा कमी तोटाच अधिक असणारी शेती होती. म्हणून आता पीक बदलून बघूया म्हणून त्याने फेब्रुवारी महिन्यात सिझलिंग हॉट जातीच्या मिरचीची एक एकर क्षेत्रावरबेडवर मल्चिंग पेपरद्वारे लागवड केली. एका एकरा मध्ये 9 हजार रोपे लावली. सचिनच्या या मिरची शेतीतल्या प्रयोगला 75 व्या दिवशी फळ मिळालं. मुंबई बाजारपेठ मध्ये मिरचीला 50 ते 55 रुपये किलो भाव मिळाला. एक तोडा दहा दिवस चालतो. यासाठी 25 ते 30 महिलांना तो रोजगारही देतो. 32 किलोच्या बॉक्स मधून हा माल मुंबईस जातो. 4 महिन्यात त्यांनी सहा लाख रूपयांचे उत्पन्न काढले. अजून दीड महिने मिरचीचा तोडा सुरू राहील. यातून त्याला मिरचीचे उत्पन्न 7 टन मिर्चीतून 4 लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. सचिनला कमी वेळात द्राक्षबागे पेक्षा जास्त फायदा हा मिरचीतून झाला आहे. त्याला या उत्पादनात त्यांना कृषी सल्लागार एससी नरले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

= सचिनच्या सिझलिंग हॉट जातीच्या मिरचीची वैशिष्ट्यं आणि अर्थशास्त्र:

1) सिझलिंग हॉट जातीच्या मिरचीचे झाड हे साडेचार ते पाच फूट असते.

2) भरपूर उंचीमुळे झाडाला मोठ्या प्रमाणावर पीक येते.

3) सिझलिंग हॉट जातीची मिरची ही दिसायला लांबलचक आणि आकर्षक दिसते.

4) सचिनला या पिकातून 5 महिन्यात निव्वळ 5 लाखांचा नफा मिळाला.

5) कमी क्षेत्र, कमी खर्चत जास्त उत्पादन हे या मिरचीचे वैशिष्ट्यं आहे.

घाटकोपर मध्येच सुनिल शितपची आणखी 4 अनधिकृत बांधकामं.

_________________________

घाटकोपर मधील साईदर्शन इमारत दुर्घटनेचा आरोपी सुनिल शितपचे आणखी कारनामे आता बाहेर आले आहेत. कोसळलेल्या साईदर्शन इमारतीच्या मूळ ढाच्यात शितपने विनापरवानगी फेरफार केल्याने इमारत कोसळली. मात्र, सुनिल शितपने केलेलं हे एकच आणि पहिलं बेकायदेशीर काम नाही. साईदर्शन कोसळली त्याच्या अवघ्या एकते दीड किमीच्या परिघातच शितपच्या अनधिकृत कारनाम्यांचे नमुने आपल्याला पाहायला मिळतात.ज्या ठिकाणी घाटकोपर मधली साईदर्शन इमारत कोसळली, त्याच्या अवघ्या एक ते दीड किमीच्या परिसरातच सुनिल शितपनंचार अनधिकृत बांधकामं केली आहेत आणि आश्चर्य म्हणजे साईदर्शन कोसळे पर्यंत त्यांच्याकडे महापालिकेचं लक्षही नाही. घाटकोपर मधील सुनिल शितपची अनधिकृत बांधकामं अल्ताफ नगर झोपडपट्टीला लागुन असेलेले दुमजली बांधकाम जागा – 2100 स्के. फूट कोसळलेल्या साईदर्शन इमारती पासून अवघ्या 1 किमीच्या परिघात अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर झोपडपट्टीला लागून असेलेले गॅरेजजागा – 200 स्के. फूट कोसळलेल्या साईदर्शन इमारतीपासून अवघ्या 1 किमीच्या परिघात अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरच्या महापालिकेच्या आरक्षित भूखंडावरचे वेअर हाऊससाठी असलेले बांधकाम जागा – 2500 स्के. फूट कोसळलेल्या साईदर्शन इमारतीपासून अवघ्या 700 मीटरच्या परिघातअल्ताफ नगर येथील दोन कॅटरिंग व्यवसायाचे गाळेजागा – 2000 स्के. फूट कोसळलेल्या साईदर्शन इमारती पासून अवघ्या 1 किमीच्या परिघात या  बांधकामांवर महापालिकेने साईदर्शन इमारत कोसळल्याच्या दोन दिवसांनंतर कारवाई केली. साईदर्शन इमारत कोसळल्यानंतर महापालिका यंत्रणांवरचा दबाव वाढला आणि या शितपच्या चार पैकी एका अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. मात्र, अजूनही शाबुत असणाऱ्या इतर अनधिकृत बांधकामांचं काय, हा प्रश्न कायम आहे.जे बांधकाम पालिकेनं तोडलं, त्याच्या शेजारीच दुमजली अनधिकृत बांधकाम आहे. या दुमजली बांधकामा संदर्भात कोर्टात केस सुरु आहे. तसेच याच दुमजली बांधकामाशेजारी एक गॅरेज आहे. सुनिल शितपने आतापर्यंत घाटकोपर मध्येच वेगवेगळ्या पद्धतीनंजमिनी ताब्यात घेऊन त्यावर अनधिकृत बांधकामं केली आहेत. आश्चर्य म्हणजे महापालिकेनेच मनोरंजन मैदानांसाठी आरक्षित केलेलं मैदानच पालिका अधिकाऱ्यांच्या कृपाशिर्वादानं शितपनं गिळंकृत केलं. घाटकोपर मध्ये शितपनं महापालिकेच्या जागा बळकावल्या आहेत. तर पवई सारख्या मोक्याच्या ठिकाणी म्हाडा आणि शिपिंग कॉर्पोरेशनच्या जागेवर सुनिल शितपनं थेट बार आणि रेस्टॉरंट बांधले आहे.17 निष्पापांचे बळी घेतल्यानंतर आता सुनिल शितपभोवतीचे फास आवळले जातीलही. मात्र, केवळ एक ते दीड किमीच्या परिघात किंवा पवईतल्या उच्चभ्रु वस्तीच्या जवळ गेली अनेक वर्षे सुनिल शितप राजरोस अनधिकृत इमले बांधत होता, ते नेमक्या कुणाच्या आशिर्वादानं..? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

बांधलेल्या पुलाचे पैसे न दिल्याने कंत्राटदाराने पूलच तोडला!

_________________________

यवतमाळ = दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलाचे बिल न निघाल्याने कंत्राटदाराने चक्क हातोडा आणि जेसीबीच्या सहाय्याने पूलच तोडला. पुसद तालुक्यातील शेबाळंपिंपरी येथे घडली. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जेसीबी पोलिसांनी जप्त केली आहे. पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी मध्ये ग्रामपंचायतीने 2014-2015 साली गावातील जिल्हा परिषद शाळा आणि दलित वस्तीला जोडणारा गावातील मुख्यमार्गाच्या नाल्यावर पूल बांधला होता. या पुलाचेकंत्राट चंदेल नामक व्यक्तीला ग्रामपंचायतीने दिले. काम झाल्यानंतर त्याचे पैसे सुद्धा दिले होते. मात्र निकृष्ट काम झाल्याने तीन महिन्यातच हा पूल कोसळला. त्यामुळे ग्रामपंचायतीने कंत्राटदारला बोलावून याची पुन्हा दुरुस्ती करण्याचे सांगितले. यावेळी कंत्राटदाराकडे काम करणाऱ्या हाफिज सिद्दीकी या व्यक्तीने दुरुस्तीचे काम केले. ग्रामपंचायतीला हाफिज सिद्दिकी पुलाचे पैसे मागत होत. पण ग्रामपंचायतीने पुलाच्या देखभालीसह बांधकामाचे पैसे चंदेल नामक कंत्राटदाराला आधीच दिले होते. मात्र ग्रामपंचायत पैसे देत नसल्याचे कारण पुढे करत रागाच्या भरात हाफिज सिद्दीकी आणि त्याच्या 2 साथीदारांनी हातोडा आणि जेसीबीने हापूल तोडला. ग्रामपंचायतीच्या तक्रारीवरून कंत्राटदाचा माणूस हाफिज सिद्दिकीसह इतर दोघांवर सरपंच शांता मासोळकर यांच्या तक्रारीवरून खंडाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी तोडफोड करणारा जेसीबीही जप्त केला आहे.तर, आपण हा पूल तोडला नसल्याचे स्पष्टीकरण हाफिज सिद्दिकी याने दिलंय. मात्र एका व्हॉट्सअॅप व्हिडीओ मध्ये हाफिज सिद्दिकी आणि त्याची माणसं हा पूल तोडताना दिसत आहेत.

✍🏻 TEJ NEWS HEADLINES ✍🏻

_________________________

नववीच्या इतिहास आणि राज्यशास्त्राच्या पुस्तकात इंदिरा आणि राजीव गांधी यांच्यावरील अयोग्य माहितीवरून सभागृहात गोंधळ.

पुणे = मुठा नदीच्या पूररेषेतील अतिक्रमणांवर कारवाईला सुरवात.

बटाटे शिजवताना कुकरचा स्फोट होऊन वडापाव विक्रेत्याचा मृत्यू झाला आहे. नाशिक मध्ये घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

घाटकोपर = साई दर्शन इमारतीतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांकडून प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर झाली आहे.

पुणे = पुढील आठ दिवस सिंहगड पर्यटकांसाठी बंद, दरड कोसळण्याच्या भीतीने पर्यटकांना जाण्यास बंदी, धोकादायक दरडी हटवण्याचं काम सुरु.

बीड = पोलिसांनी पत्रकाराला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ माजलगावात पत्रकारांचा काळ्या फिती लावून मूक मोर्चा.

नवी मुंबई = पाम बिचवर सुटकेस मध्ये आढळला अज्ञात तरुणीचा मृतदेह, परिसरात खळबळ.

पिंपरी-चिंचवड मनपातील पाणी पुरवठा विभागाचे लेखाधिकारी के. बी. शिंगेला लाच घेताना रंगेहाथ अटक, एसीबीची कारवाई.

कोल्हापूर = करवीर पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू. संबंधितांवर कारवाई करण्याची अन्य कर्मचाऱ्यांची मागणी.


काबूल मधील इराकी दूतावास आणि अफगाण पोलीस कंपाऊंड मध्ये आत्मघातकी बॉम्ब हल्लेखोराने स्वत:ला स्फोटा मध्ये उडवून घेतले.

जम्मू-काश्मीर = अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर बॅंक लुटल्याचे वृत्त.

सांगलीत भरदिवसा घरफोडी करुन सुमारे 31 तोळे सोन्याचे दागिने, 15 लाख रुपयांले केले लंपास.

नागपूर = रिअॅलिटी शोमुळे तरुण पिढीवर नकारात्मक परिणाम. मुलं संगीतात चुकीच्या दिशेकडे वळत आहेत. रिमिक्स मध्ये अश्लीलतेचा भडिमार असल्याची गायक रुपकुमार राठोड यांची प्रतिक्रिया.

सांगली = वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील प्रा. व्ही. बी. स्वामींवर निलंबनाची कारवाई. स्वामींवर विद्यार्थ्यांची छळवणूक, विद्यार्थिनीं सोबत वाईट वागणूक, परीक्षेत विद्यार्थ्यांना नापास करण्याचा ठपका.

धुळे = शिंदखेडा तालुक्यातील मुडावद येथे कानबाई विसर्जनावेळी गावातील 4 युवक तापी नदीत बुडाले. तीन जणांना वाचवण्यात यश.

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची वेबसाईट डाऊन, आयटी रिटर्न भरण्याची आज शेवटची तारीख.

मुंबई = चेंबूर नाक्यावर महानगरच्या गॅस पाईपलाईन मध्ये लीकेज. दुरुस्तीनंतर सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक सुरळीत.

गुजरात मधील पुरात आता पर्यंत 213 जणांचा मृत्यू.

आसाम आणि राजस्थान मधल्या पूरामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केली 50 हजाराची मदत.

‘ब्लू व्हेल’ या ऑनलाइन गेमचा मुंबईत पहिला बळी...?


_________________________

मोबाईल किंवा व्हिडिओ गेम्सच्या आहारी गेलेला वर्ग मोठा आहे. या गेम्सचे इतके व्यसन तरूणाईला लागले आहे की, या गेम्सच्या आहारी जाऊन अनेक शारीरिक आणि मानसिक विकार त्यांना जडले आहेत. पण आता विरंगुळा म्हणून खेळले जाणारे हे खेळ कधी तरूणाईच्या जीवाशी खेळू लागले हे कळलेच नाही. रशिया मध्ये दहशत पसरवणाऱ्या ‘ब्ल्यूव्हेल’ या एका ऑनलाइन खेळाचा पहिला बळी भारतात गेला असल्याचे समजते. अंधेरी पूर्वेकडील ‘शेर ए पंजाब’ वसाहतीत राहणाऱ्या मनप्रीत सिंग या चौदा वर्षांच्या विद्यार्थ्यांने शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास आत्महत्या केली. ‘ब्ल्यू व्हेल’ या ऑनलाइन खेळामुळेच त्यानं आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मनप्रीतने आपल्या राहत्या गच्चीच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. मेघवाडी पोलीस ठाण्यात त्याच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील चौकशी व तपास सुरू आहे. आत्महत्येपूर्वी मनप्रीतने एका मित्राला कळवले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ‘ब्ल्यू व्हेल’ खेळामुळे रशिया मध्ये तब्बल 100 हून अधिक मुलांनी आत्महत्या केली होती. या खेळात प्लेअर्सला 50 वेगवेगळी आव्हानं दिली जातात. म्हणजे एखादा हॉरर मुव्ही बघणं किंवा स्वत:ला जखमी करून घेणं वगैरे आणि प्रत्येक आव्हान पूर्ण झालं की त्याचा पुरावा प्लेअर्सला द्यावा लागतो. या खेळाचा शेवटचा टप्पा असतो आत्महत्या करण्याचा. जर प्लेअर्सने ते आव्हान पूर्ण केलं नाही तर त्यांना धमकीचे मेसेजही येतात, असेही इंग्लंड मधल्या अनेक वेबसाईट्सने म्हटले आहे. दुर्दैव म्हणजे एकदा का हा खेळ डाऊनलोड केला की तो डिलिट किंवा अनइन्स्टॉलही करता येत नाही असंही एका इंग्रजी वेबसाईटने म्हटले होते. यामुळे युजर्सची पर्सनला माहिती देखील हॅक होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. आतापर्यंत ज्या मुलांनी आत्महत्या केली ती सर्व मुलं 12 ते 16 वयोगटातली असल्याचे समजत आहे. रशियामध्ये या खेळामुळे अनेक लहान मुलांचे जीव गेले असले तरी भारतात या खेळामुळे एखाद्याने आत्महत्या करण्याची ही पहिलीच घटना असेल.

N.T.V. न्यूज चैनल पालम प्रतिनिधी पदी शांतीलाल शर्मा याची निवड

अरुणा शर्मा

पालम :- दिनांक 30 जुलै रोजी हिंगोली येथे शासकिय विश्रामग्रह येथे N.T.V. न्युज चैनल चि मराठवाडा व विदर्भा प्रतिनिधी ची बैठक आयोजित करण्यात आली यावेळी संपादक इकबाल शेख साहेब,  संपादकीय विभाग प्रमुख राजेंद्रजी त्रिमुख, वरीष्ठ उपसंपादक प्रा.सुभाषजी शेटे, पुणे विभाग शेख फारूख, ब्युरो चिफ हिंगोली, विनोद तायडे ब्युरो चिफ वाशीम, रियाज चाऊस परभणी सह अदीं प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी N.T.V. न्युज चैनल पालम तालुका प्रतिनिधी पदी शांतीलाल शर्मा यांची निवड करण्यात आली.