तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 29 July 2017

मंगरुळपीर तालुका 2 ऑक्टोबरला हागणदारी मुक्त करा उप मुख्य कार्यकारी अधिकारी ईस्कापे यांचे निर्देश


फुलचंद भगत
मंगरुळपीर- दि 29
स्वच्छ भारत मिशन ग्रामिण अंतर्गत मंगरुळपीर तालुका येणाज्या 2 ऑक्टोबरला अर्थात महात्मा गांधी जयंतीला  हागणदारीमुक्त करण्याचे निर्देश स्वच्छ भारत मिशन ग्रामिणचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम ईस्कापे  यांनी शुक्रवारी  दिले. मंगरुळपीर पंचायत समितीमध्ये सर्व मिनी बीडीओ आणि ग्रामसेवक यांच्या पाणी गुणवत्ता व स्वच्छता बाबत त्यांनी आढावा बौठक घेतली. यावेळी गटविकास अधिकारी खैरे, विस्तार अधिकारी शेळके आणि पद्मणे यांच्यासह जिल्हा कक्षाचे IE राम श्रृंगारे, रविचंद्र पडघाण, अभिजित दुधाटे यांची उपस्थिती होती.
उप  मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम ईस्कापे  यांनी उपस्थित ग्रामसेवकांकडुन ग्रामपंचायत निहाय शौचालयाचे किती शोषखड्डे खोदण्यात आले आणि किती शौचालयाचे बांधकाम झाले याचा आढावा घेतला. तसेच याबाबत दररोज माहिती घेऊन जिल्हा कक्षाला कळविण्याच्या सुचना गटविकास अधिकारी खैरे यांना दिल्या.  यावेळी तालुक्यातील कोणत्याच गावात जलजन्य आजार होणार नाही याची दखल सर्व ग्रामसेवकांनी घेण्याच्या सुचना उप मुकाअ ईस्कापे व पाणी गुणवत्ता निरीक्षक  अभिजित दुधाटे यांनी दिल्या. तालुक्यातील सर्व गावात गुड मॉर्निंग मोहिम सक्रिय करण्याच्या व काही गावात गटविकास अधिकारी आणि मिनी बीडीओ यांनीसुध्दा गुड मॉर्निंग करण्याचे निर्देश उप मुख्य कार्यकारी अधिकारी ईस्कापे यांनी दिले.
*तालुक्यातील 8 ग्रामसेवकांची सिईओंच्या दालनात हजेरी:*
शौचालयाचे फोटो शासनाच्या संकेतस्थळावर अपलोट न करणार्‍या तालुक्यातील 8 ग्रामसेवकांची दा. ३१ अॅागष्ट रोजी सकाळी ११ वाजता मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात हजेरी लावण्यात आली असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी ईस्कापे यांनी दिली. भडकुंभा, चेहेल, कळंबा बोडखे, माळशेलु, मोतसावंगा, नांदगाव, पिंप्री बु. आणि तपोवन बु. या ग्रामपंचायतीमध्ये आतापर्यंत एकही फोटो अपलोड केला नाही ही बाब अतिशय गंभीर असल्याचे सांगुन ईस्कापे यांनी संबंधित ग्रामसेवकांची चांगलीच कानउघडणी केली.
येणार्‍या 15 ऑगस्ट 2017 पर्यंत सर्व गावात शंभर टक्के फोटो अपलोड करण्याच्या सुचना विभागीय आयुक्तांनी जि. प. मध्ये नुकत्याच झालेल्या बौठकीत दिल्या होत्या.
*5 ऑगस्ट पर्यंत तालुक्यात 6 हजार खड्डे खोदणार:*
तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी येणार्‍या 5 ऑगस्ट 2017 पर्यंत 6 हजार शोषखड्डे खोदण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असुन त्याची अमलबजावणी करण्यात येत आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दररोज माहिती सादर करण्यात येणार आहे.  याबाबत उप मुख्य कार्यकारी अधिकारी ईस्कापे यांनी उपस्थितांना सुचना व डेली रिपोर्टींग फॉर्मेट दिले आहेत.
फुलचंद भगत
9763007835
---***---

No comments:

Post a Comment