तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Monday, 31 July 2017

घाटकोपर मध्येच सुनिल शितपची आणखी 4 अनधिकृत बांधकामं.

_________________________

घाटकोपर मधील साईदर्शन इमारत दुर्घटनेचा आरोपी सुनिल शितपचे आणखी कारनामे आता बाहेर आले आहेत. कोसळलेल्या साईदर्शन इमारतीच्या मूळ ढाच्यात शितपने विनापरवानगी फेरफार केल्याने इमारत कोसळली. मात्र, सुनिल शितपने केलेलं हे एकच आणि पहिलं बेकायदेशीर काम नाही. साईदर्शन कोसळली त्याच्या अवघ्या एकते दीड किमीच्या परिघातच शितपच्या अनधिकृत कारनाम्यांचे नमुने आपल्याला पाहायला मिळतात.ज्या ठिकाणी घाटकोपर मधली साईदर्शन इमारत कोसळली, त्याच्या अवघ्या एक ते दीड किमीच्या परिसरातच सुनिल शितपनंचार अनधिकृत बांधकामं केली आहेत आणि आश्चर्य म्हणजे साईदर्शन कोसळे पर्यंत त्यांच्याकडे महापालिकेचं लक्षही नाही. घाटकोपर मधील सुनिल शितपची अनधिकृत बांधकामं अल्ताफ नगर झोपडपट्टीला लागुन असेलेले दुमजली बांधकाम जागा – 2100 स्के. फूट कोसळलेल्या साईदर्शन इमारती पासून अवघ्या 1 किमीच्या परिघात अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर झोपडपट्टीला लागून असेलेले गॅरेजजागा – 200 स्के. फूट कोसळलेल्या साईदर्शन इमारतीपासून अवघ्या 1 किमीच्या परिघात अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरच्या महापालिकेच्या आरक्षित भूखंडावरचे वेअर हाऊससाठी असलेले बांधकाम जागा – 2500 स्के. फूट कोसळलेल्या साईदर्शन इमारतीपासून अवघ्या 700 मीटरच्या परिघातअल्ताफ नगर येथील दोन कॅटरिंग व्यवसायाचे गाळेजागा – 2000 स्के. फूट कोसळलेल्या साईदर्शन इमारती पासून अवघ्या 1 किमीच्या परिघात या  बांधकामांवर महापालिकेने साईदर्शन इमारत कोसळल्याच्या दोन दिवसांनंतर कारवाई केली. साईदर्शन इमारत कोसळल्यानंतर महापालिका यंत्रणांवरचा दबाव वाढला आणि या शितपच्या चार पैकी एका अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. मात्र, अजूनही शाबुत असणाऱ्या इतर अनधिकृत बांधकामांचं काय, हा प्रश्न कायम आहे.जे बांधकाम पालिकेनं तोडलं, त्याच्या शेजारीच दुमजली अनधिकृत बांधकाम आहे. या दुमजली बांधकामा संदर्भात कोर्टात केस सुरु आहे. तसेच याच दुमजली बांधकामाशेजारी एक गॅरेज आहे. सुनिल शितपने आतापर्यंत घाटकोपर मध्येच वेगवेगळ्या पद्धतीनंजमिनी ताब्यात घेऊन त्यावर अनधिकृत बांधकामं केली आहेत. आश्चर्य म्हणजे महापालिकेनेच मनोरंजन मैदानांसाठी आरक्षित केलेलं मैदानच पालिका अधिकाऱ्यांच्या कृपाशिर्वादानं शितपनं गिळंकृत केलं. घाटकोपर मध्ये शितपनं महापालिकेच्या जागा बळकावल्या आहेत. तर पवई सारख्या मोक्याच्या ठिकाणी म्हाडा आणि शिपिंग कॉर्पोरेशनच्या जागेवर सुनिल शितपनं थेट बार आणि रेस्टॉरंट बांधले आहे.17 निष्पापांचे बळी घेतल्यानंतर आता सुनिल शितपभोवतीचे फास आवळले जातीलही. मात्र, केवळ एक ते दीड किमीच्या परिघात किंवा पवईतल्या उच्चभ्रु वस्तीच्या जवळ गेली अनेक वर्षे सुनिल शितप राजरोस अनधिकृत इमले बांधत होता, ते नेमक्या कुणाच्या आशिर्वादानं..? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

No comments:

Post a Comment