तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक प्रगती कडे विषेश लक्ष देणारी शाळा ‘G D' इंग्लीश स्कूल

पाथरी शहरातील बालकांना स्पर्धेच्या युगात दर्जेदार इंग्रजी शिक्षण देण्या साठी दोन वर्षा पुर्वी जायकवाडी परिसरात एक एक्कर क्षेत्रात संचालक राम घटे सर, शेख सलीम सर या व्दयांनी "G D“ इंग्लीश स्कूल सुरू केली या साठी अतिषय निसर्ग रम्य असा शाळेचा परिसर बनवला असून शाळेच्या सर्व क्लास रुम डिजिटल केलेल्या आहेत. या शाळेत नर्सरीते ६ वी पर्यंत वर्ग सुरू असून अतिषय गुणवत्ता पुर्ण शिक्षणा बरोबरच बालमनात लपलेल्या सुप्त कला गुणां साठी संगीत,नृत्य, भारतीय खेळ,चित्रकला, स्वरक्षणा साठी कराटे प्रशिक्षण ही दिले जाते. प्रशिक्षित पदविधर शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या असल्याने आणि प्रत्यक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगती कडे संचालक आणि गुरूजनांचे लक्ष असल्याने प्रवेशा नंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता महिणा भरातच दिसून येत असल्याची प्रतिक्रीया पालकां मधून व्यक्त होते. पहिल्या वर्षी १८८ दुस-या वर्षी २२४ असा वाढता आलेख दिसून आला.शिक्षणा सोबतच विविध उपक्रम घेऊन बालकांना आकर्षक बक्षिसे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जातात. आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन्स ची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातात त्या मुळे स्पर्धा परिक्षे सारखी तयारी करण्याची माणसिकता विद्यार्थ्यांची तयार करून घेतली जाते. ऑलंपियाड सारख्या देशपातळी वरील स्पर्धा परिक्षा घेतली जाते वर्षी या शाळेचे ११३ विद्यार्थी या परिक्षेत यशस्वी झाले तर ४७ विद्यार्थ्यी या परिक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. या बरोबरच विद्यार्थ्यां साठी अतिषय नियोजन बद्ध असे वार्षिक स्नेहसंमेलन घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांनां वाव दिला जातो या सोबतच स्टेज करेज याव म्हणून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पिच देण्याची संधी मिळून दिली जाते. अशा या शहरातील नामवंत शाळेत या वर्षी प्रवेशा साठी नर्सरीते ६ वी वर्गा साठी पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी धडपडत आहेत. या शाळेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदुशन मुक्त वातावरण, शहराच्या निवांत, शांत असलेल्या भागात असल्याने बालकांना सुरक्षितता आणि निरामय स्वास्थ्य, आरोग्य अनुभवायला मिळते. शाळेत पुर्ण वेळ आर आे चे पाणी उपलब्ध असते. अशा या पाथरी शहरातील सर्वगुण संपन्न "G D” इंग्रजी शाळेत प्रवेश संख्या मर्यादित असल्याने पालकांनी गुणवत्ता पुर्ण शिक्षणा साठी आपल्या पाल्याला लवकरात लवकर प्रवेशीत करण्याचे आवाहन संचालक राम घटे, शेख सलीम यांनी केले आहे.
Adv

Sunday, 30 July 2017

पिक विमा भरण्यास मुदत वाढ द्या अन्यथा  शेतकर्‍यांचा उद्रेक होईल-ना.धनंजय मुंडे

सोमवारी अधिवेशनातही विषय मांडणार

परळी वै.दि.30.............
पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत खरीप हंगामाचा विमा भरण्यापासुन राज्यातील लाखो शेतकरी वंचित असल्याने पिक विमा भरण्यासाठी 15 दिवसांची तातडीने मुदतवाढ जाहिर करावी अन्यथा शेतकर्‍यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी दिला आहे. या संबंधी सोमवारी अधिवेशनात हा मुद्दा पुन्हा सरकारपुढे मांडणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

खरीप हंगामासाठी पिक विमा भरण्याची सोमवारची शेवटची मुदत आहे. ऑनलाईनच्या घोळामुळे हे काम कासव गतिने सुरू आहे. बँकांसमोर शेतकर्‍यांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्या आहेत. दिवस रात्र शेतकरी बँकेसमोर थांबत आहेत. या रांगेत उभा ठाकलेल्या भोकर तालुक्यातील किनी येथील शेतकरी रामा लक्ष्मण पोटरे याचा आणि बीड जिल्ह्यातील मंचक इंगळे या शेतकर्‍याचा मृत्यु झाला. ठिक ठिकाणी शेतकरी रास्ता रोको आंदोलन करत आहेत. आम्ही वारंवार सरकारकडे मागणी करूनही सरकार पिक विम्याची मुदत वाढवुन देण्याबाबत तयार नाही. त्यामुळे शेतकरी संतापला असुन, याबाबत सरकारने तातडीने मुदत वाढवुन द्यावी अन्यथा शेतकर्‍यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ही त्यांनी दिला. नोटा बंदीच्या निर्णयामुळे अनेकांना बँकेच्या रांगामध्ये आपले प्राण गमवावे लागले होते. आजही त्याचेच पुनरावृत्ती होत असल्याचे ते म्हणाले. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याची टिका ही त्यांनी केली आहे. 

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'राहुल गायसमुद्रे' वडवणी , बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 7066878277  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment