तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Monday, 31 July 2017

बांधलेल्या पुलाचे पैसे न दिल्याने कंत्राटदाराने पूलच तोडला!

_________________________

यवतमाळ = दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलाचे बिल न निघाल्याने कंत्राटदाराने चक्क हातोडा आणि जेसीबीच्या सहाय्याने पूलच तोडला. पुसद तालुक्यातील शेबाळंपिंपरी येथे घडली. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जेसीबी पोलिसांनी जप्त केली आहे. पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी मध्ये ग्रामपंचायतीने 2014-2015 साली गावातील जिल्हा परिषद शाळा आणि दलित वस्तीला जोडणारा गावातील मुख्यमार्गाच्या नाल्यावर पूल बांधला होता. या पुलाचेकंत्राट चंदेल नामक व्यक्तीला ग्रामपंचायतीने दिले. काम झाल्यानंतर त्याचे पैसे सुद्धा दिले होते. मात्र निकृष्ट काम झाल्याने तीन महिन्यातच हा पूल कोसळला. त्यामुळे ग्रामपंचायतीने कंत्राटदारला बोलावून याची पुन्हा दुरुस्ती करण्याचे सांगितले. यावेळी कंत्राटदाराकडे काम करणाऱ्या हाफिज सिद्दीकी या व्यक्तीने दुरुस्तीचे काम केले. ग्रामपंचायतीला हाफिज सिद्दिकी पुलाचे पैसे मागत होत. पण ग्रामपंचायतीने पुलाच्या देखभालीसह बांधकामाचे पैसे चंदेल नामक कंत्राटदाराला आधीच दिले होते. मात्र ग्रामपंचायत पैसे देत नसल्याचे कारण पुढे करत रागाच्या भरात हाफिज सिद्दीकी आणि त्याच्या 2 साथीदारांनी हातोडा आणि जेसीबीने हापूल तोडला. ग्रामपंचायतीच्या तक्रारीवरून कंत्राटदाचा माणूस हाफिज सिद्दिकीसह इतर दोघांवर सरपंच शांता मासोळकर यांच्या तक्रारीवरून खंडाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी तोडफोड करणारा जेसीबीही जप्त केला आहे.तर, आपण हा पूल तोडला नसल्याचे स्पष्टीकरण हाफिज सिद्दिकी याने दिलंय. मात्र एका व्हॉट्सअॅप व्हिडीओ मध्ये हाफिज सिद्दिकी आणि त्याची माणसं हा पूल तोडताना दिसत आहेत.

No comments:

Post a Comment