तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 30 July 2017

तुळजाभवानी अर्बन बँकेने केली विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या नाश्ता पाण्याची सोय.


प्रा. डॉ. संतोष रणखांब
सोनपेठ : तालुक्यातील तुळजाभवानी अर्बन बँक शाखा ग्राहकांना सेवा देण्याच्या बाबतीत उत्कृष्ट कार्य करते. परंतू सध्या विमा भरण्यासाठी असलेल्या  शेतक-यांना  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर  भरण्यासाठी मोठ्या लांबच-लांब रांगा लागलेल्या आहेत. या शेतकऱ्यांनासुद्धा तुळजाभवानी अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या वतिने चहा-नाष्टा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्याबद्दल शेतकऱ्यांमधून त्यांना धन्यवाद दिले जात आहेत.
आपल्या उत्कृष्ट कार्यप्रणालीने जनतेच्या मनात एक आगळे वेगळे स्थान निर्माण करणारी तुळजाभवानी अर्बन को ऑपरेटीव्ह बँक स्वतःच्या ग्राहकाबाबत फार जागरूक असते.पण त्याच बरोबर इतर बँकासमोर रांगेला लागलेले शेतकरी उपवास घडल्याने चकरा येऊन पडत आहेत. ही बाब तुळजाभवानी बँक व्यवस्थापनाच्या लक्षात आल्याने सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे बँकेचे व्यवस्थापक मंडळाने शेतकऱ्यांसाठी आज चहा पाणी व नाष्त्याची सोय केली होती. त्यामुळे शेतकरी रांगेत असतानाच त्यांना ही सुविधा पुरवली. शेतकरी त्यांना मनातून धन्यवाद देत होते.

No comments:

Post a Comment