तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 30 July 2017

पेयजल योजनेचे काम करण्याबाबत प्राप्त आश्वासनानंतर उपोषण मागे

सुभाष मुळे..
-----------
गेवराई, दि. 30 __ काम मंजूर होवुन 5 वर्ष झाले असून अद्याप काम अर्धवट असून पाणी पुरवठा समितीने ग्राम पंचायतीच्या खात्यामधून पैसे उचलले होते. पेयजल योजनेचे काम करण्याबाबत प्राप्त आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे.
    गेवराई तालुक्यातील मौजे मारफळा ग्रामपंचायत अंतर्गत मारफळा राठोड तांडा या ठिकाणी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या कामासाठी  29,90,800 रुपये शासनाकडून मंजूर करण्यात आले होते. सदरील काम मंजूर होवुन 5 वर्ष झाले असून अद्याप काम अर्धवट असून पाणी पुरवठा समितीने ग्राम पंचायतीच्या खात्यामधून पैसे उचलले होते. या बाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार, दि 19/07/2017 रोजी गोरसेनेच्या वतीने उपोषणास बसले होते.    तीन दिवसानंतर अखेर यश आले.
       कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परीषद बीड यांनी उर्वरित काम हे ग्रा. पा. पु. विभाग बीड, या खात्या मार्फत करण्यात येईल व समितीतील लोकांवर योग्य ती कार्यवाही होईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर गोरसेना जिल्हाप्रमूख अर्जुनभाऊ राठोड, जिल्हा सहसचिव अनिल भाऊ राठोड, तालुकाप्रमूख सतीश भाऊ पवार, प्रसिद्धी प्रमुख छगन भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली गोरसेना सर्कल प्रमुख बाळासाहेब राठोड, गोरसेना सोबती मनोज राठोड, बाळु राठोड, जालिंदर राठोड, अनिल राठोड, राजू शिवाजी राठोड, लहू जाधव, राजू गुलाब राठोड, राम राठोड ज्ञानेश्वर राठोड, सुनील राठोड, नवनाथ राठोड व ग्रामस्थांच्या वतीने उपोषण मागे घेण्यात आले.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                          ╰════════════╯

No comments:

Post a Comment