Breaking News
Loading...

Sunday, 30 July 2017

पीक विम्यासाठी आजही बँका सुरु राहणार.

_________________________

पीक विमा भरण्यासाठी आजही (रविवार, 30 जुलै) बँका सुरु राहतील. शिवाय, उद्या म्हणजे सोमवारी (31 जुलै) ज्या बँकांची आठवडी सुट्टी असते, त्याही बँका रविवारी सुरु राहतील. पीक विम्याच्या ऑनलाईन पोर्टलचा बोजवारा उडाला असल्याने शेतकरी दोन-दोन दिवस रांगेत उभे आहेत. या स्थितीत आजही बँका सुरु राहणार असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

आरबीआयने आदेशात काय म्हटलंय?

पीक विमा भरण्यासाठी प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँकांच्या ग्रामीण आणि निम-शहरी भागातील सर्व शाखा 30 जुलै 2017 रोजी सुरु राहतील. त्याचसोबत सोमवारी (31 जुलै2017) ज्या बँकांची आठवडी सुट्टी असते, अशा बँकाही पीक विमा भरण्यासाठी सोमवारी सुरुच राहतील. आरबीआयचे सहाय्यक सल्लागार अजित प्रसाद यांनी यासंदर्भात पत्रक जारी केले आहे. पीक विम्यासाठी दोन-दोन दिवस रांगेत उभे राहून शेतकरी पोलिसांचा लाठीमार सहन करत आहेत. त्यानंतर आता राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना जाग आली आहे. शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी घाई करु नये, असं वक्तव्य कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरांनी केलं आहे. शिवाय, 15 दिवसांची मुदत वाढवून मिळावी यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला असल्याचंही फुंडकरांनी सांगितलं. दरम्यान, पीक विम्याच्या गोंधळावरून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुलडाण्यात पांडुरंग फुंडकरांना काळे झेंडे दाखवले.

No comments:

Post a Comment