तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Saturday, 29 July 2017

भारताचे नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल दोन शिक्षकांवर सोनपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


_________________________

नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट वॉट्सअप ग्रूपवर टाकल्याबद्दल दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यातील एका वॉट्सअप ग्रूपवर राष्ट्रपतींबद्दल अपशब्द वापरण्यात आले. एका मुख्याध्यापकाने ही पोस्ट एका वॉट्सअप ग्रूपवर टाकली आणि दुस-या एका मुख्यध्यापकाने त्याचे समर्थन केले. यावरुन दोघांविरोधात सोनपेठ ग्रामिण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनपेठ भाजप तालुका अध्यक्ष महादेव गिरे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही शिक्षक मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असल्यामुळं सोनपेठच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सध्याच्या आधुनिक युगात सोशल मिडीयाचा वापर विविध गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणात केला जातोय. सोशल मिडियावर आलेल्या मेसेजेस मुळं मोठ्या प्रमाणात अशांतता निर्माण होण्याचे प्रकारही घडू लागलेत. सध्या सुरू असलेल्या प्रत्येक घडामोडींवर सोशल मीडियातून टीका टिप्पणी होत आहे. अशाच एका पोस्टवर टिप्पणी करणे दोन शिक्षकांना चांगलंच भोवलं आहे. व्हाट्सअप वरील एका ग्रुप मध्ये भारताचे नूतन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली. एका खाजगी संस्थेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या राजकुमार धबडे याने ही टिप्पणी केली. त्यांवर जिल्हा परिषदेत शिक्षक असलेल्या दत्ता पवार याने समर्थन दिलं. या दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सोनपेठ भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पोलिसांकडं करण्यात आली होती. या तक्रार अर्जावरून सोनपेठ पोलिसांनी या दोन्ही शिक्षकांविरुद्ध भा.दं.व कलम 500, 501 व 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सपोनि सदानंद येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी बाबुराव जाधव हे करत आहेत.

No comments:

Post a Comment