तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 30 July 2017

अंबड-घनसावंगीत शासनाची लाखो रुपयांची फसवणूक.

घनसावंगी प्रतिनिधी
अंबड व घनसावंगी तालुक्यातील जप्त वाळू साठ्याचा खोटा पंचनामा करून शासनाची फसवणूक करणाऱ्या अंबड व घनसावंगी तहसीलदार सह इतर अधिकार्यावर निलंबनाची कार्यवाही करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसंग्राम संघटना व अ भा छावाच्या वतीने जिल्हाधिकारी जालना  यांना आज दिनांक २६/०७/२०१७ निवेदन देण्यात आले. सादर निवेदनात म्हटले आहेकी  अंबड तालुक्यातील गोंदी या ठिकाणी  २०/०६/२०१७ रोजी तहसील अंबड यांनी ५०० ब्राश वाळू साठा जप्त केल्याचे दाखून सदरील जप्त वाळूच्या लिलावाची  निवेदा काढलेली होती पण अचानक जिल्हाधिकारी जालना यांच्या पथकाने गोंदी या ठिकाणी पंचनामा केला असता ३१७१ ब्रास  वाळू साठा असल्याचे निष्पन्न झाले, अंबड तहसील यांनी केलेला पंचनामा व जिल्हाधिकारी पथकाने केलेला पंचनामा यात जवळपास २५०० ब्रासचा फरक आहे  तसेच घनसावंगी तहसील अंतर्गत मौजे जोगालादेवी येथील येथील २८/०६/२०१७ रोजी जप्त  केलेला वाळूसाठा पंचनामा हा २८०१ ब्रास होता या साठ्याचा दिनांक १०/०७/२०१७ रोजी लिलाव देखील मा तहसीलदार घनसावंगी यांनी करून बोली धारकाकडून ०००१७४,०००१७६,०००१७१,०००१७२,०००१७३,०००१७०,०००१६९,०००१७५,०००१७७ या धनादेसाद्वारे अनामत पण भरून घेतली होती पण अचानक जिल्हाधिकारी पथकाने पंचनामा केला असता या ठिकाणी ६८०९ ब्रास इतका साठा आढळून आला जवळपास ३८०० ब्रास वाळू साठा कमी दाखून तहसीलदार , मंडळ अधिकारी, तलाठी  
यांनी स्वताचे खिसे भरून शासनाची  फसवणूक केली हेही सिद्ध होते , जिल्हाधिकारी यांनी पंचनामा करताच तहसीलदार घनसावंगी यांनी सबंधित लिलाव धारकाला अनामत परत २०/०७/२०१७ रोजी र रु ६३०२२५ केल्याचे समजते.
आज वाळू चे बाजार मुल्य प्रती ब्रास ९०० इतके आहे म्हणजेच अंबड तहसीलदार यांनी शासनाची २५००००० ( पंचवीस लक्ष ) तर घनसावंगी तहसील ने ३८०००० (आडोतीस लक्ष रु ) इतक्या महसूलची फसवणूक केल्याचे सिद्ध होते.
जिल्हाधिकारी जालना यांनी सबंधित तहसीलदार , मंडळ अधिकारी , तलाठी यांनी  खोटे पंचनामे सादर करून जी शासनाची दिशाभूल करून स्वताचे खिसे भरण्याचे काम केले, यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा. जर येत्या ८ दिवसात साबंधीतावर निलंबनाची कार्यवाही झाली नाही तर शिवसंग्राम संघटना व अ भा छावा च्या वतीने मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल करण्यात येऊन लवकरच हा विषय लक्ष वेधी घेण्यासाठी पावसाळी अधिवेशनात आमदार  विनायकराव मेटे  यांना विनंती करण्यात येईल अश्या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देवकर्ण वाघ  (जिल्हाध्यक्ष अ भा छावा), गणेश पघळ  (जिल्हाध्यक्ष शिवसंग्राम जालना), निलेश गोर्डे पाटील (युवक जिल्हाध्यक्ष शिवसंग्राम जालना), उमेश गव्हाणे पाटील (तालुका अध्यक्ष अंबड) संतोष चांदोडे,अक्षय आटोळे,अमोल गायकवाड,शुभम संबळे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

No comments:

Post a Comment