तेजन्यूज हेडलाईन्सच्या सर्व वाचकांना शुभ दिवसाच्या हार्दिक सुभेच्छा


Sunday, 30 July 2017

उस्मानाबादमध्ये मटका व्यवसाय चालू ठेवण्यासाठी पोलिसांचे हफ्ते.

_________________________

उस्मानाबाद शहरात अवैध धंदे चालू ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी कसे हफ्ते घेतात, हे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. उस्मानाबाद मध्ये मटका व्यवसाय चालू ठेवण्यासाठी बुकीने त्याच्या मोबाईल मध्ये पैसे देतानाचा प्रकार कैद केला आहे.राज अहमद मोमीन असं पैसे स्वीकारणाऱ्या या पोलिस निरीक्षकाचं नाव आहे. मोमीन हे मुरुम पोलिस स्टेशनला कार्यरत होते, तोपर्यंत मटका चालवणारी मंडळी नित्यनियमाने हप्ते देत होती. पण मोमीन यांची बदली झाल्यावरही स्टेशन सोडेपर्यंत हप्त्याची मागणी करत होते.नव्या फौजदारालाही मटका बुकींना हप्ते द्यावेच लागणार होते. त्यामुळे जुन्या फौजदाराला हप्ते दिल्याचं सांगण्यासाठी एक मोमीन यांच्याकडे आला आणि हा संपूर्ण प्रकार मोबाईल मध्ये कैद झाला.

No comments:

Post a Comment